
निसर्ग आपल्याला जन्मताच एक अमूल्य शरीर देतो. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे शरीर कधी ना कधी कुठल्या तरी रोगाची शिकार बनते. रोग म्हटला की उपचार करणे आले. उपचारांमध्ये घरगुती उपायांपासून अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. आधुनिक वैद्यकात रुग्णास औषध देण्याचे अनेक मार्ग(routes)आहेत. त्यातले सर्वपरिचित मार्ग म्हणजे :
औषध तोंडाने घेणे, औषधाचा वाफारा नाका/तोंडाद्वारे घेणे, स्नायू अथवा रक्तवाहिनीतून इंजेक्शन्स घेणे आणि त्वचेवर मलम लावणे.
पण शरीरात औषध पोचवण्याचे याव्यतिरिक्तही अनेक मार्ग आहेत. वरील चार परिचित प्रकारांचेही अनेक उपप्रकार आहेत. या सर्वांचा सोदाहरण आढावा या लेखद्वयात घ्यायचा आहे. काही ठराविक औषधे शरीराच्या एखाद्याच छोट्या भागात काम करण्यापुरती वापरली जातात. उदाहरणार्थ, डोळ्यात टाकायचे थेंब. परंतु बरीच औषधे शरीरात गेल्यानंतर रक्तप्रवाहाद्वारे संपूर्ण शरीरभर पसरतात. अशा औषध-प्रवासाचा विस्तृत आढावा आता घेतो.
• तोंडाद्वारे घेतलेली औषधे
अशी औषधे गोळी, कॅप्सूल, चुरा किंवा द्रव स्वरूपात असतात. तोंडाद्वारे घ्यायच्या मार्गात दोन पद्धती आहेत :
1. औषध जिभेवर ठेवून गिळणे
2. औषध जिभेखाली ठेवून विरघळवू देणे
हे दोन्ही मार्ग जरी एकाच पोकळीत जवळपास असले तरी त्यांच्याद्वारे होणाऱ्या परिणामांमध्ये लक्षणीय फरक आहे ! तो आता समजून घेऊ.
१. जे औषध जिभेवर ठेवून पाण्याच्या मदतीने गिळले जाते त्याचा पुढील प्रवास संपूर्ण पचनसंस्थेतून होतो. बहुतेक औषधांचे सर्वाधिक शोषण लहान आतड्याद्वारा होते. असे शोषण झाल्यानंतर ते पचनसंस्थेच्या स्थानिक रक्तप्रवाहात (portal) जाते. तिथून पुढे यकृतात आणि पुढे मजल दरमजल करीत शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात (systemic)पोचते. तोंडातून अशा प्रकारे घेतलेल्या औषधाच्या शोषणावर पचनसंस्थेतील अनेक घटकांचा परिणाम होतो. जसे की, आहाराचे स्वरूप, विविध हॉर्मोन्स व चेतातंतूंचे परिणाम, पचनाचे आजार, इत्यादी. तसेच एखादे औषध हे गोळी, कॅप्सूल की द्रव स्वरूपात आहे यावरही त्याचे शोषण अवलंबून असते.
कॅप्सूलचे विशिष्ट फायदे :
कॅप्सूल म्हणजे जिलेटिनचे एक कवच असते. त्याच्यात औषध व पूरक रसायने एकत्र घातलेली असतात. आपण कॅप्सूल गिळल्यानंतर ती पचनमार्गात ओली होऊन फुगते आणि मग त्यातले औषध बाहेर पडते. कॅप्सूलमधील औषध द्रव स्वरूपात असल्यास त्याचे शोषण तुलनेने लवकर होते. काही औषधे सामान्य गोळीच्या स्वरूपात थेट जठरात जाणे इष्ट नसते. तिथल्या तीव्र आम्लतेमुळे त्यांचा नाश होऊ शकतो. म्हणून ती कॅप्सूलमध्ये भरून पुन्हा तिच्यावर एक विशिष्ट प्रकारचे वेस्टण चढवले जाते. हे वेस्टण आम्लतारोधक असते. अशी कॅप्सूल जेव्हा जठरात येते तेव्हा तिथल्या आम्लतेचा तिच्यावर परिणाम होत नाही आणि ती मूळ स्वरूपात लहान आतड्यात पोचते. तेथील कमी आम्लता असलेल्या वातावरणात वेस्टण विरघळते आणि मग औषध बाहेर पडते. या प्रकारच्या वेस्टणाला enteric coating असे म्हणतात.
जठरातील अन्न आणि तोंडाने घेतलेल्या औषधाचे शोषण हे दोन्ही घटक एकमेकांशी चांगलेच निगडीत आहेत. औषधाच्या रासायनिक स्वरूपानुसार ते उपाशीपोटी, मुख्य जेवणापूर्वी का जेवणानंतर लगेच घ्यायचे, याचे नियम ठरलेले असतात. बहुतेक रसायनयुक्त औषधे जठराच्या आतील आवरणाचा दाह करणारी असल्यामुळे ती जेवणानंतर घेणे इष्ट असते. मात्र, ज्या औषधांचे शोषण अन्नामुळे बरेच कमी होते अशी औषधे निक्षून सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी घ्यावी लागतात; याचे सध्याचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे थायरोक्सिनची गोळी. रेचक प्रकारची औषधे रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी घ्यावी लागतात.
२. औषध जिभेखाली ठेवणे : तोंडातील अन्य भागांशी तुलना करता जिभेखालच्या भागातील म्युकस आवरण विशिष्ट प्रकारचे आहे. त्यामुळे इथे ठेवलेल्या औषधाचे शोषण तुलनेने चांगले व सहज होते. या भागातला रक्तपुरवठाही भरपूर असतो. इथल्या औषधाचे शोषण झाल्यावर ते लगेचच शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात जाते. त्यामुळे वरील १ मध्ये असलेला संपूर्ण पचनसंस्था आणि यकृत हा लांबचा प्रवास पूर्णपणे वाचतो. अशा प्रकारे घेतलेल्या औषधाचा परिणाम त्वरित आणि अधिक प्रमाणात दिसून येतो. जी औषधे तोंडाने गिळून घेतली असता जठरात गेल्यावर त्यांचा नाश होण्याची शक्यता असते, अशी औषधे या प्रकारे देता येतात. तसेच गिळण्याच्या व पचनसंस्थेच्या आजारांमध्ये या औषधमार्गाचा उपयोग केला जातो.
अर्थात या औषधमार्गाची एक मर्यादाही आहे. इथे औषधाच्या शोषणासाठी उपलब्ध असलेली जागा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शक्तिमान (potent) प्रकारचीच औषधे इथून देणे सयुक्तिक ठरते. तसेच जिभेखाली ठेवलेले औषध पूर्ण विरघळून जाईपर्यंत संबंधित रुग्णाने बोलणे, पाणी पिणे आणि गिळणे या सर्व क्रिया निक्षून टाळायच्या असतात. तसे न केल्यास औषधाचा काही भाग अन्ननलिकेतून पुढे जठरात जाईल आणि मग या प्रकारे औषध देण्याच्या प्रकारालाच बाधा पोचेल. या प्रकारे दिलेल्या औषधाचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे nitroglycerin. हृदयविकारातील अंजायना या स्थितीमध्ये हे औषध रुग्ण स्वतःच पटकन जिभेखाली ठेवू शकतो.
• गुदद्वारातून दिलेली औषधे
बद्धकोष्ठतेसाठी देण्यात येणारा ‘एनिमा’ सर्वपरिचित आहे. या प्रसंगात संबंधित औषध हे फक्त स्थानिक काम करते. मात्र काही प्रसंगी या मार्गाने दिलेले औषध रक्तप्रवाहात शोषले जाऊन सर्व शरीरभर पोचू शकते. या मार्गातून औषध देणे अर्थातच सुखावह प्रकार नाही ! त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीतच त्याचा अवलंब केला जातो, जसे की :
• रुग्णास प्रचंड उलट्या होत असताना किंवा गिळण्याचे त्रास असताना
• बेशुद्धावस्थेतील रुग्ण
• लहान मुलांमध्ये एखादे कडूजहर औषध देण्यासाठी
Lidocaine हे या प्रकारातील एक उदाहरण. ते भूलकारक असून हृदयतालबिघाडही दुरुस्त करते.
………….
• इंजेक्शनद्वारा दिलेली औषधे
इंजेक्शन हा मुळातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच नकोसा वाटणारा प्रकार ! त्याची कमी-अधिक भीती प्रत्येकाच्या मनात असते. इंजेक्शनचे नाव काढताच भोकाड पसरणारी मुले हे तर सार्वत्रिक दृश्य. परंतु, एरवी व्रात्य मुलांना इंजेक्शनवाल्या डॉक्टरांची भीती दाखवणारे पालक, जेव्हा स्वतःवर इंजेक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांची अवस्था थोडीफार लहान मुलासारखीच झालेली असते.
या प्रकारात त्वचेतून सुई टोचून औषध शरीरात सोडले जाते. खालील परिस्थितीत या मार्गे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो:
१. काही औषधे पचनसंस्थेद्वारे शोषली जाऊ शकत नाहीत. तर अन्य काही (उदा. इन्सुलिन) पचनसंस्थेतच नाश पावतात.
२. बेशुद्धावस्थेतील रुग्ण
३. जेव्हा औषधाचा परिणाम तातडीने होण्याची गरज असते तेव्हा.
या प्रकारे औषध देण्याचे ३ उपप्रकार आहेत :
१. सामान्य इंजेक्शन : जेव्हा औषध द्रव स्वरूपात लहान प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते सिरींजमध्ये भरून सुईद्वारा टोचले जाते.
२. इन्फ्युजन : जेव्हा द्रव औषध मोठ्या प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते रक्तवाहिनीतून हळूहळू सोडले जाते.
३. इम्प्लांट : यात एखादे औषध त्वचेवर छेद घेऊन तिच्याखाली ठेवले जाते.
सामान्य इंजेक्शन : हा प्रकार तिघांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा असल्याने त्याबद्दल सविस्तर पाहू. सामान्य इंजेक्शन शरीरात ४ प्रकारे देता येते :
१.स्नायूंमध्ये.
२. रक्तवाहिनीत
३. त्वचेखालच्या निकटच्या भागात
४. त्वचेमध्येच
*
१. स्नायूंमध्ये (IM) :
हा प्रकार खूप औषधांच्या बाबतीत वापरला जात असल्याने सर्वपरिचित आहे. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या प्रकारचे इंजेक्शन घेतलेले असते. अलीकडील उदाहरण म्हणजे कोविडची लस. या प्रकारे इंजेक्शन देताना शरीरातील तीन जागा गरजेनुसार निवडता येतात :
अ) दंडाची बाहेरील बाजू : इथे २ ml पर्यंत द्रव टोचता येतो. इथून टोचलेल्या औषधाच्या शोषणाची गती चांगली असते.
आ) खुब्यावर : इथे ८ ml पर्यंतचा द्रव टोचता येतो. मात्र येथून होणारी शोषणाची गती वरील १ पेक्षा कमी असते.
इ) मांडीची बाहेरील बाजू : इथे ५ ml पर्यंत द्रव टोचता येतो. ही जागा लहान मुलांमध्ये निवडली जाते.
स्नायूमध्ये टोचलेले औषध हळूहळू झिरपत रक्तप्रवाहात पोचते. जी औषधे स्नायूदाह करणारी असतात ती या प्रकारे देता येत नाहीत; ती थेट रक्तवाहिनीतच द्यावी लागतात.
२. रक्तवाहिनीतून दिलेले इंजेक्शन (IV):
याप्रकारे दिलेले औषध थेट रक्तप्रवाहात जात असल्याने त्याची पूर्ण मात्रा शरीरासाठी उपलब्ध होते.
सर्वसाधारणपणे या प्रकारचे इंजेक्शन नीलावाहिन्यांमधून (veins) देतात. या वाहिन्या त्वचेखालोखाल असतात आणि त्या त्वचेवरून सहज दिसतात. बहुतेक वेळा कोपर किंवा मनगटाच्या पुढील बाजूच्या नीलांची निवड केली जाते.
या इंजेक्शनचे दोन प्रकार आहेत :
a. एका दमात दिलेले इंजेक्शन : यात सिरींजमध्ये द्रव भरून तो रक्तवाहिनीत वेगाने सोडला जातो. अशा प्रकारे जास्तीत जास्त १० ml द्रव देता येतो. रक्तात शिरलेले औषध आधी हृदय, मग फुफ्फुसे आणि मग रोहिणी वाहिन्यांद्वारा सर्व शरीरात पोचते. अशा औषधी इंजेक्शनचा परिणाम सुमारे 20 ते 40 सेकंदात दिसतो. अशा इंजेक्शनचे एक उदा. म्हणजे Calcium gluconate.
b. हळू दिलेले इन्फ्युजन : जेव्हा एखादे औषध मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळासाठी द्यायचे असते तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. यात मूळ औषध एखाद्या सलाईनच्या बाटलीमध्ये मिसळले जाते. आणि मग हे मिश्रण थेंब थेंब स्वरूपात रक्तात सोडले जाते. रुग्णालयात दाखल झालेल्या विविध प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत अशा प्रकारे औषधे दिली जातात.
c. रोहिणीवाहिन्यांतून (arteries) दिलेले इंजेक्शन (IA):
याचा वापर अत्यंत मर्यादित असून काही ठराविक आजारांतच केला जातो. अशा प्रकारे दिलेले औषध फक्त निवडक पेशींपुरते काम करते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्करोगाची गाठ. अशा प्रकारे इंजेक्शन दिल्याने त्याचा जास्तीत जास्त परिणाम संबंधित गाठीवर होतो आणि संपूर्ण शरीरावर होणारे दुष्परिणाम कमीत कमी राहतात. तसेच विशिष्ट रोहिणीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यासही या प्रकारे इंजेक्शन देतात.
३. त्वचेच्या खालच्या निकटच्या मेदथरात (SC):
अशी इंजेक्शन्स सहसा दंड/मांडीच्या बाहेरील बाजूस किंवा पोटावर देतात. स्नायूमध्ये दिलेल्या इंजेक्शनपेक्षा यात कमी प्रमाणात औषध टोचता येते. त्या औषधाचे शोषण स्नायूपेक्षा कमी गतीने परंतु तोंडाने घेतलेल्या औषधापेक्षा जास्त गतीने होते. या प्रकारात ३ उपप्रकार असून त्यांची उदाहरणे अशी आहेत :
a. एका दमात दिलेले इंजेक्शन: इन्सुलिनचा एक डोस किंवा रक्तगुठळ्यांच्या उपचारासाठी दिलेले हेपारिन ही त्याची परिचित उदाहरणे.
b. इन्फ्युजन : सध्या विविध प्रकारचे इन्शुलिन पंप उपलब्ध आहेत. त्यातून गरजेनुसार इन्शुलिन शरीरात सोडले जाते.
c. इम्प्लांट : यात त्वचेवर छोटीशी शस्त्रक्रिया करून औषध आत छोट्या वडीच्या स्वरूपात ठेवले जाते. गर्भनिरोधक हॉर्मोन्स हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशा वडीतून संबंधित औषध सुमारे 3 ते 5 वर्षे हळूहळू शरीरात सोडले जाते.
४. त्वचेमध्ये दिलेले इंजेक्शन (ID) :
साधारणपणे ते हाताच्या कोपर ते मनगट या पट्ट्यातील पुढच्या बाजूस दिले जाते. अशा प्रकारे दिलेले औषध रक्तप्रवाहात जवळजवळ शोषले जात नाही. याची ठळक उदाहरणे :
a. काही रोगांसाठी लसीकरण
b. रोगनिदान चाचण्यांसाठी टोचलेला द्रव.
….
पारंपरिक इंजेक्शन पद्धतीत सिरींजमध्ये औषध भरले जाते आणि तिला जोडलेल्या सुईमार्फत शरीरात सोडले जाते. यामध्ये रुग्णाला सुई टोचणे हा भाग वेदनादायी असतो. त्या दृष्टीने सुईविरहित इंजेक्शन ही संकल्पना गेल्या दशकात मांडली गेली. त्यावर अव्याहत संशोधन चालू आहे. या तंत्रज्ञानात विशिष्ट औषध खालील प्रकारे त्वचेतून आत वेगाने सोडले जाते :
• धक्का लहरींचा वापर
• वायुदाबाचा वापर
• सूक्ष्म वीजवापर
• लेझर तंत्र
या नव्या पद्धतीचे फायदे आणि तोटे दोन्ही लक्षात घ्यावे लागतील.
• फायदा : काही औषधे मुळातच घट्ट व चिकट स्वरूपाची असतात. ती पारंपरिक इंजेक्शनने देता येत नाहीत. ती देणे आता शक्य होईल.
• तोटा : औषध त्वचेखाली सोडण्यासाठी उच्च दाबाचा वापर केला जातो. त्यातून त्वचेखालील थरांना इजा होऊ शकते.
• एक महत्त्वाचे : या नव्या तंत्राने रक्तवाहिनीतून इंजेक्शन देता येत नाही. इंजेक्शनचे बाकी वर वर्णन केलेले इतर मार्ग या प्रकारे हाताळता येतील.
....
आतापर्यंत आपण पचनसंस्थेद्वारा आणि विविध इंजेक्शन्सच्या स्वरूपात देण्यात येणाऱ्या औषधमार्गांचा आढावा घेतला. बहुसंख्य रोगोपचारांत हे दोन मार्ग प्रामुख्याने वापरले जातात. याव्यतिरिक्त औषध देण्याचे जे अन्य शरीरमार्ग आहेत त्यांचे विवेचन पुढील भागात करेन.
...................................................
क्रमशः
म्हणूनच कुत्रा चावल्याच्या
म्हणूनच कुत्रा चावल्याच्या प्रत्येक प्रसंगी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक. ते पूर्ण माहिती घेऊन, रुग्ण तपासणी करून आणि तारतम्याने कोणत्या प्रकारचे उपचार करायचे ते ठरवू शकतात :
RIG+ vaccination course
Or
Only vaccination course
ओके धन्यवाद
ओके धन्यवाद
उपयुक्त माहिती
या इंजेक्शन च्या वापराची वेळ कोणावरही येऊ नये ही आशा.
https://indiadarpanlive.com
https://indiadarpanlive.com/column-jago-grahak-jago-stray-or-pet-dogs-co....
गुडगाव जिल्हा ग्राहक आयोग यांनी केस क्रमांक CC/७४१/२०२२ मध्ये एक जबरदस्त निर्णय दिला आहे. एका व्यक्तीचे पाळलेले कुत्रे एका स्त्रीला रस्त्याने जात असताना चावल्यामुळे त्या स्त्रीला भरपूर जखमा झाल्या आणि त्यामुळे गुडगाव महानगर पालिका यांना रुपये २ लाख नुकसान भरपाई देणेचा आदेश दिला आहे. शिवाय गुडगाव मुनिसिपल कॉर्पोरेशनला फॉरेन ब्रीडचे घातक कुत्र्यांचे लायसेन्स रद्द करून ती सर्व कुत्री ताब्यात घेण्याचा आदेश दिला आहे.
भटक्या कुत्र्यांच्या
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे राज्यघटनेतील जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होते असा दावा करून ‘प्राणी जन्म नियंत्रण’ नियमाच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्याची सुनावणी 1 जुलैला होणार आहे
(छापील मटा : ९ मे २०२४)
चांगला लेख.
चांगला लेख.
हे माहित नव्हते.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून (न्यायपत्र ) The menace of stray dogs has acquired alarming proportions. Solutions will be found that will protect humans (especially children) and that are consistent with a humanitarian approach to animals.
आज जागतिक ‘पशुसंक्रमित आजार
आज जागतिक ‘पशुसंक्रमित आजार (Zoonoses) जागृती दिन’.
६ जुलै १८८५ रोजी लुई पाश्चर यांनी जगातील पहिली रेबीजविरोधी लस एका व्यक्तीला टोचली होती. या क्रांतिकारक घटनेच्या स्मरणार्थ आजचा दिवस पाळला जातो.
पाश्चर यांना वंदन !
ठाणे मनपाने ZMQ व GAVI
ठाणे मनपाने ZMQ व GAVI या संस्थांच्या मदतीने एक अतिशय चांगला आरोग्य उपक्रम राबवलेला आहे त्याची ही नोंद.
या पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या मुंब्रा-कौसा विभागात अनेक स्थलांतरित गरीब लोक राहतात. त्यांच्या कुटुंबातील कित्येक बालकांना जन्मानंतर कोणतीही लस दिली गेलेली नसते. अशा बालकांचे मूलभूत लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या उपक्रमांतर्गत काही तृतीयपंथी व्यक्तीना, लोकांच्या घरोघर जाऊन बाल-लसीकरणाची माहिती घेणे आणि त्यांना लसीकरणाला उद्युक्त करण्याचे काम दिलेले आहे.
अशा प्रकारे या उपक्रमात तृतीयपंथी व्यक्तींना सामावून घेतल्यामुळे त्यांना रोजगार मिळून त्यांचे मनोधैर्य देखील उंचावले आहे.
अभिनंदन !
तृतीयपंथी व्यक्तींना सामावून
तृतीयपंथी व्यक्तींना सामावून घेतल्यामुळे त्यांना रोजगार मिळून त्यांचे मनोधैर्य देखील उंचावले आहे. >> छान
अवांतर: यंदा आसामच्या काझिरंगा पार्कमध्ये गेलो होतो तेव्हा कळले की जे लोक अवैध शिकार करायचे (poachers) त्यांनाच आता तिथे पार्कमध्ये सिक्युरिटी गार्ड्स म्हणून नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे ते इतकं मनापासून काम करतात की तेथील गेंड्यांची संख्या आता कमी न होता उलट वाढू लागली आहे आणि आता तिथे ३००० गेंडे झाले आहेत. (हे एका गार्डनेच सांगितले जो पूर्वी शिकार करून तस्करी करत असे.)
>>>>>>अशा प्रकारे या उपक्रमात
>>>>>>अशा प्रकारे या उपक्रमात तृतीयपंथी व्यक्तींना सामावून घेतल्यामुळे त्यांना रोजगार मिळून त्यांचे मनोधैर्य देखील उंचावले आहे.
अभिनंदन !
वाह!! खूप चांगले.
चष्म्याचा नंबर घालवण्याचा
चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या Pres Vu eye drops च्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित :
https://indianexpress.com/article/health-wellness/dgci-license-eye-drop-...
आता तो औषध उद्योग दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे
महाराष्ट्र शासनातर्फे प्रौढांसाठी बीसीजी लसीकरण मोहीम चालू झालेली आहे. यामध्ये क्षयरोगाचा धोका संभावणाऱ्या लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे.
त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, मधुमेही आणि क्षयरोग झालेल्या रुग्णाचे जवळचे लोक यांचा समावेश आहे. हे लसीकरण ऐच्छिक आहे
https://indianexpress.com/article/cities/pune/maharashtra-begins-vaccina....
महाराष्ट्रात गेल्या पावणेतीन
महाराष्ट्रात गेल्या पावणेतीन वर्षांमध्ये कुत्रे, मांजर आणि माकड हे प्राणी चावल्याने रेबीजची बाधा होऊन 71 जणांचा मृत्यू झालेला आहे. ही माहिती राज्य आरोग्य विभागाच्या अहवालात दिलेली आहे.
बापरे
बापरे
अजूनही इतक्या केसेस आहेत रेबीजच्या
मी के ई एम मध्ये असताना ARV OPD मध्ये गाढव, घोडा, गाय, बैल, म्हैस, उंदीर अश्या प्राण्यांनी चावा घेतल्यावर सुद्धा बरेच रुग्ण यायचे.
28 सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिन आहे.
बरोबर. २८/९ हा वैज्ञानिक
बरोबर. २८/९ हा वैज्ञानिक लुई पाश्चर यांचा पुण्यतिथी दिन असतो.
यंदाचे ब्रीदवाक्य हे आहे :
Breaking Rabies Boundaries
https://rabiesalliance.org/world-rabies-day?utm_term=world%20rabies%20da...
नागपूर मधील सरकारी
नागपूरमधील सरकारी रुग्णालयांना पुरवण्यात आलेल्या बनावट प्रतिजैविक औषधांत टाल्कम पावडर आणि स्टार्च भरलेले होते.
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे :
https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/government-hospitals-dec...
भारतात ऑगस्ट 2024 मध्ये तयार
भारतात ऑगस्ट 2024 मध्ये तयार केलेल्या सुमारे 50 हून अधिक औषधांचा दर्जा निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे औषध नियंत्रण मंडळाच्या तपासणीत आढळले आहे.
अशा औषधांमध्ये प्रामुख्याने यांचा समावेश आहे :
Paracetamol, मधुमेह व रक्तदाब उपचारांवरील, जठर-आम्लविरोधी काही औषधे, आणि पुरुषांमधील लैंगिक दुर्बलतेवरील इंजेक्शन.
https://www.business-standard.com/india-news/cdsco-flags-substandard-bat...
क्षयरोग, दमा, काचबिंदू आणि
क्षयरोग, दमा, काचबिंदू आणि बायपोलर मनोविकारांवरील काही औषधे भारतात 50 टक्क्यानी महागणार
https://www.financialexpress.com/business/healthcare-tuberculosis-asthma...
जेनेरिक औषधे हा विषय कायम
जेनेरिक औषधे हा विषय कायम संशयाच्या धुक्यात वेढलेला असतो :
https://theprint.in/health/tariff-cloud-looming-us-study-links-indian-ge...
सत्य समजणे अवघड जाते . . .
कृपया प्रतिसाद बदलावा, ही
कृपया प्रतिसाद बदलावा, ही विनंती. जेनेरिक औषधे हा संशयाचा विषय नाही, तर भारतातील जेनेरिक औषधे हा संशयाचा विषय आहे. आणि त्याचे कारण लेखात सुस्पष्ट केले आहे. निव्वळ एक उदाहरण.
Generic Drug Manufacturer Ranbaxy Pleads Guilty and Agrees to Pay $500 Million to Resolve False Claims Allegations, cGMP Violations and False Statements to the FDA
धन्यवाद. भारतातीलच म्हणायचं
धन्यवाद.
भारतातीलच म्हणायचं होतं. तो दुवा भारतासंबंधीच आहे.
A generic drug is a
A generic drug is a pharmaceutical drug that contains the same chemical substance as a drug that was originally protected by chemical patents. Generic drugs are allowed for sale after the patents on the original drugs expire. Because the active chemical substance is the same, the medical profile of generics is equivalent in performance compared to their performance at the time when they were patented drugs.
तुमच्या प्रतिसादामुळे, एकंदर सर्वच जेनरिक औषधांच्या कार्यक्षमतेबद्दल संशय व्यक्त होत आहे (किमान माझ्या आकलनानुसार), म्हणून मुद्दाम स्पष्टीकरण दिले की जेनरिक औषधे ही पेटंटेड औषधांच्या तोडीस तोड असतात. (जर ती व्यवस्थित बनवली तर). त्यामुळे जेनरिक औषधांबद्दल सरसकट संशय घेऊ नये.
Abhayrab या रेबीज प्रतिबंधक
Abhayrab या रेबीज प्रतिबंधक लशीचे बनावट उत्पादन काही भारतीय शहरांमध्ये विकले जात आहे. ते घातक असून शीत तापमानात पण ठेवलेले नाही. दिल्लीच्या औषध नियंत्रण विभागाने ही माहिती जाहीर केली आहे आणि औषध निरीक्षक आणि औषध-दुकानांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत :
https://www.newindianexpress.com/cities/delhi/2025/Mar/29/counterfeit-an...
Last month mdhe mulila rabies
Last month mdhe mulila rabies vaccine dil ahe govt hospital mdhun.mg te banavt nhi yachi khatri kshi kraychi? Parat dyav lagel ka?
Iraru
Iraru
त्या संदर्भात संबंधित डॉक्टरांनाच पुन्हा विचारलेले बरे. कोणत्या कंपनीचे इंजेक्शन दिले होते त्याची खातरजमा करावी लागेल.
Dhanyavad sir....
Dhanyavad sir....
हा लेख आधीही वाचलाच होता.
हा लेख आधीही वाचलाच होता. यात वर्णन केलेल्या काही औषधांशी मधल्या काळात संबंध आल्याने आज पुन्हा वाचताना काही गोष्टी नीट कळल्या. प्रतिसादांतही चांगली माहिती आहे.
डायबिटीस , ताप, अॅसिडिटी अशा आजारांसाठी दिल्या जाणार्या गोळ्यांत सस्टेन्ड रिलीज हा एक प्रकार मिळतो. हे अलीकडचे संशोधन म्हणावे का?
एका इंजेक्शनमागच्या तंत्रज्ञानाचं कौतुक करावंसं वाटलं, म्हणून हा लेख आज शोधला.
ऑस्टिओप्रोसिसच्या विकारासाठी बोनिस्टा हे हार्मोन देणारं इंजेक्शन पेन सारख्या उपकरणातून मिळतं. त्याचं पिस्टन मागे ओढलं की ठरलेला डोस इंजेक्शनमध्ये उतरतो. एका पेनासोबत १६ सुया दिल्या जातात. एक सुई दोन दिवस वापरायची. अशा सगळ्या सुया वापरून होतात, तेव्हा इंजेक्शनचं पिस्टन मागे पूर्ण ओढलं जात नाही.
* सस्टेन्ड रिलीज हे अलीकडचे
* सस्टेन्ड रिलीज हे अलीकडचे संशोधन म्हणावे का?
>>> नाही !
याची सुरुवात 1952 मध्येच झालेली आहे. 1989 पासून या स्वरूपाची (Depot) इंजेक्शनसही उपलब्ध झाली
https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0168365921006830#....
* Bonista
* Bonista
>>> ही तंत्रज्ञानातील उत्तम प्रगती आहे.
याचप्रमाणे इन्सुलिन pens देखील बऱ्याच वर्षांपासून उपलब्ध आहेत.
अच्छा! इन्सुलिन पेनाशी कधी
अच्छा! इन्सुलिन पेनाशी कधी संबंध आला नाही.
Pages