Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11
ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.
सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.
मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:
त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋन्मेश, तो प्रयोग पुणे
ऋन्मेश, तो प्रयोग पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला होता, एखाद्या प्राथमिक शाळेतील मुलांनी नव्हे. कॉलेज (विद्यापीठ) मध्ये जाणारी मुले सज्ञानच असणार ना ? मी ते नाटक पाहिले नाही, इंटरनेट वर आहे का ? सर्वांना अटक करण्याइतके वाईट होते का ?
तेच म्हणायचं होतं , आता
उत्तर पत्रिका - तेच म्हणायचं होतं , आता क्लिअर केलं आहे
कॉलेज (विद्यापीठ) मध्ये
कॉलेज (विद्यापीठ) मध्ये जाणारी मुले सज्ञानच असणार ना ?
>>>
अकरावी बारावीतील मुले नसतात
आणि डिप्लोमा ची सुद्धा नसतात
ती मुले त्या कॉलेजला किंवा त्यावेळी उपस्थित होती का हे मला माहीत नाही म्हणून विचारले
"विवेकबुद्धी नी निर्णय घेवु
"विवेकबुद्धी नी निर्णय घेवु ध्या." ही पळवाट असते.
आपल्या न्याय व्यवस्थेत पण आहे न्यायालया विवेकबुद्धी वापरून निकाल देवू शकतात असा त्यांना अधिकार आहे.
पण ह्या विवेक बुध्दीच्या पळवाटे नी कधी गुन्हेगार सुटतात किंवा निरपराध तुरुंगात जातात.तर कधी योग्य न्याय पण होतो.
जे काही असतील ते स्पष्ट नियम असावेत लोकांच्या विवेक बुध्दी वर अवलंबून राहण्याची गरज नाही.
अभाविपचा आक्षेप समजतो पण
अभाविपचा आक्षेप समजतो पण त्याचबरोबर आक्रमक होण्याची गरज नव्हती. कला अभिव्यक्तीबाबतीत स्थळ, काळ, वेळ, प्रसंग याप्रमाणे मापदंड बदलत असतील. सरसकट नियम करून चालणार नाहीत कदाचित.
शिवाय 'विविधतेत एकता, सर्वधर्मसमभाव' असं वर्णन करत असलेल्या देशात एकाच (मेजॉरिटी) धार्मिक गटाच्या श्रद्धास्थानांना सतत हास्यास्पद दाखवणे कधीतरी कोणाच्यातरी डोक्यात जाणारच. ते गेलं की 'बघा बघा कसे असहिष्णु आहेत.' अशी हाकाटी करणारे ती ही करणारच.
ते एक टेप्लेट बनलंय आता.
टीका, विनोद, कलाविष्कार करतानाही सर्वधर्मसमभाव दाखवला आणि सर्वांकडूनच सहिष्णुता दिसली तर हा पूर्ण मुद्दाच निकालात निघेल.
आतापर्यंत या घटनेवर प्रकाश
आतापर्यंत या घटनेवर प्रकाश टाकणाऱ्या बातम्यांच्या, माहितीच्या लिंक प्रतिसादात आल्या असतील तर त्या हेडर मध्ये टाकता येतील का? जेणेकरून प्रतिसाद देणारे त्या तपासून घेतील. अन्यथा बरेच लोक उगवतील आणि हवेत चर्चा करत राहतील.
>>> एकाच (मेजॉरिटी) धार्मिक
>>> एकाच (मेजॉरिटी) धार्मिक गटाच्या श्रद्धास्थानांना सतत हास्यास्पद दाखवणे कधीतरी कोणाच्यातरी डोक्यात जाणारच
सतत म्हणजे कधी आणि कोणी आणि कुठे हास्यास्पद दाखवलं आहे? मला खरोखरच माहीत नाही म्हणून विचारते आहे.
अशा घटना ‘रिॲक्शनरी’ असल्याचा मुद्दा आला होता वर. कशाची रिॲक्शन?
'चुकून/अनवधानाने'- जत्रेत मला
'चुकून/अनवधानाने'- जत्रेत मला रेड इंडियन/नेटिव्ह इंडियन्स ची लोंबती किंवा (स्थानिक उदाहरण घ्यायचे तर वारकऱ्याची) टोपी मिळाली, आणि मला हे काये माहितीच नाही, पण आवडली म्हणून घालून काहीतरी वेडेपणा करत, दारू पीत सगळीकडे मिरवली, सोशल मीडियावर फोटो टाकले आणि कोणा धार्मिक माळकऱ्याला/ नेटिव्ह अमेरिकन ला पाहून अतिशय खटकले, त्याने आक्षेप जाहीर केला हे कल्चरल इनअप्रॉप्रियेशन.
'मुद्दाम': आपण एक नाटक परीक्षेत इव्हॅल्यूएशन साठी सादर करतोय. ग्रेड देणारे आणि समोर बसलेली जनता माझे निर्विष वगैरे विनोद कळून खदखदून हसणारी असू शकेल किंवा पारंपरिक विचारांची, हे अजिबात न आवडून यातून भावना भडकल्या असं वाटून ग्रेड/शांतता बिघडवणारी असू शकेल. पण तरीही मला हा विषय आवडला.मी याच्यावरच आणि असंच नाटक सादर करणार.
भावना कश्याने दुखावल्या जाव्या, कश्याने नाही हा सोशल मीडिया काळात अत्यंत स्लीपरी स्लोप आहे.मी '(अशोकचक्र नसलेले) तिरंगी रंगाचे क्रोशाचे कानातले विकले हा झेंड्याचा अपमान' किंवा 'व्हायोलिन/सतार/तबला/ढोल आकाराचा केक कापणे हा भारतीय संगीताचा अपमान' हे प्रवाहही वाचले आहेत, तेव्हा 'हे काय, यात कसल्या आल्यात दुखावलेल्या भावना' असं झालं होतं.त्याने माझ्या भावना दुखावल्या नाही गेल्या.हे अमुक एक नाटक हा दंगा होण्यापूर्वी कुठे पाहण्यात आलं असतं तर पाहून 'काय फालतूपणा आहे,धड हसू पण येत नाहीये, कहना क्या चाहते हो' झालं असतं, दंगा झाल्याचा आनंद झाला नाही.पण क्लिप बघून कलाकारांना (मारहाण, fir नाही) समज मिळायला हवी हे नक्की वाटलं.पूर्ण नाटक कदाचित काही वेगळा दर्जेदार संदेश देत असेलही, पाहिलेले नाही.कोणी पाहिले असल्यास शेवट सांगा.
> एकाच (मेजॉरिटी) धार्मिक
> एकाच (मेजॉरिटी) धार्मिक गटाच्या श्रद्धास्थानांना सतत हास्यास्पद दाखवणे कधीतरी कोणाच्यातरी डोक्यात जाणारच
कांगावा.
मी_अनू, मुळात हा प्रयोग
मी_अनू, मुळात हा प्रयोग जनतेसाठी केला गेला होता का पण? परीक्षेसाठी होता ना?
सतत म्हणजे कधी आणि कोणी आणि
सतत म्हणजे कधी आणि कोणी आणि कुठे हास्यास्पद दाखवलं आहे? मला खरोखरच माहीत नाही म्हणून विचारते आहे.
अशा घटना ‘रिॲक्शनरी’ असल्याचा मुद्दा आला होता वर. कशाची रिॲक्शन?
>>>>. स्वाती नंतर लिहिते.
बाकीच्या नेहमीच्या दळण
बाकीच्या नेहमीच्या दळण गँगच्या चर्चेत इंटरेस्ट नाही. बोअर होतात.
मला तर्क पाहिलेल्या व्हिडीओत
मला तरी पाहिलेल्या व्हिडीओत बरेच प्रेक्षक दिसत होते.बहुतेक त्याच वर्गातले विद्यार्थी असतील.आणि बाकी शिक्षक.पण त्यांच्या समाज भावना दुखावल्या जाणारच नाहीत, ते नेहमी बहुवाचिक (हा शब्द नक्की चुकवलाय मी, मराठी ज्ञानींनी योग्य तो सांगावा)
आणि मॅच्युअर असतीलच असा नियम नाही ना.जिथे चार लोकांना काही दाखवलं, तिथे कोणाच्या तरी भावना दुखावल्या, तोडफोड, पुढचा मनस्ताप हे आलं. याला घाबरून बोटचेपेपणा करा असं म्हणत नाही.पण तुमचा संदेश, उद्देश काय, आणि त्यातून फुटलेल्या या फाट्यानी वाया गेलेला वेळ, मोजावी लागलेली किंमत काय.ज्याला हे डील मान्य आहे त्याने सर्व शक्यता मनात धरून तयारी करून स्टेटमेंट(विधान या अर्थी नाही, 'मेकिंग अ स्टेटमेंट' या अर्थाने) अवश्य करावं.
सर्व कंस बंद केले.
नाटक सर्वांसमोर नव्हते आणि
नाटक सर्वांसमोर नव्हते आणि फक्त काहीच लोकांपुढे होते हा मुद्दा का येत आहे चर्चेत?
जर चूक होते तर चूक आहे
आणि बरोबर आहे तर बरोबर..
की चार लोकात हे नाटक करू शकतो आणि हजार लोकांसमोर केले तर चूक ठरणार..
आपलाच मुद्दा खोडायचा प्रकार आहे हा
बरे, शिक्षकांना आणि आपल्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांना भावना दुखावून घ्यायचा हक्क नाही का
या नाटकासाठी हॉस्टेलमधील
या नाटकासाठी हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना बोलावले होते आणि नाटकात गोंधळ होईल म्हणून नाटक करणारे विद्यार्थी काठ्या, हॉकी स्टिक्स घेऊन आले होते, अभाविपच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यावर हाणामारी झाली असे वाचले आहे.
बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा कुठे संपते याविषयी मी साशंक आहे.
सध्या एकंदरीत रामनामाचा गजर चालला असताना गोंधळ होणार हे गृहीत धरून त्या तयारीनिशी नाटक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या धैर्याचे कौतुक करावे की मुद्दाम वादग्रस्त विषय निवडून फुकट प्रसिद्धी मिळवावी या उद्देशाने केलेला हा प्रपंच आहे याविषयी मनात संभ्रम आहे.
काहीही असले तरी मारहाण न होता कायदेशीर मार्गाने विरोध व्हावा.
अनु म्हणते तसे वस्त्रहरणमध्ये यापेक्षा जास्त विडंबन आहे. 'जाने भी दो यारो'चा शेवटचा सीन विडंबन आहे. घाशीराम कोतवालला तर प्रचंड विरोध सहन करावा लागला. पण मच्छिन्द्र कांबळी, कुंदन शाह, भक्ती बर्वे किंवा कमलाकर सारंग यांच्या हेतूंविषयी, त्यांच्या रंगमंचीय सामर्थ्याविषयी किमान चीप प्रसिद्धी हा त्यांचा उद्देश नाही याविषयी कोणाला शंका नव्हती.
इथेच घोडं पेंड खाते. 'कुणीही यावे आणि टपली मारून जावे' याविषयी लोकांना चीड असू शकते.
पूर्वीच्या काळीही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून वाद झालेच की. पण तुम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा मांडता आहात यावर चर्चा झाली. राजकीय पक्ष वादात उतरलेही. पण 'हा आमचा' आणि 'हा तुमचा' अशी विषयाची विभागणी आधीच झाली नव्हती. आता सामान्य गोष्टीवरून ध्रुवीकरण होत असेल तर टाळी दोन्ही बाजूनी वाजते याचे भान कुणाला आहे.
लज्जा सिनेमात एक नाटक
लज्जा सिनेमात एक नाटक अभिनेत्री दाखवलेली , नाटकात ‘सीता बनलेली ‘ माधुरी दिक्षित तिच्या नाटकातल्या सीन आधी सीतेच्या ड्रेस मधे दारु पीताना दाखवली आहे, स्टेज वर अग्नि परीक्षा द्यायला नकार देते , राम आणि लक्ष्मणावरही राग काढते , लक्ष्मणाला रावणाच्या सगळ्या युद्धाचा दोष देते .
हे सेन्सॉरबोर्डने जर पास केलय तर अशा छोट्या परीक्षेसाठी केल्या जाणार्या नाटकाला विरोध का ?
खरेखुरे रामसीता नाही नाही आहेत , नाटकातल्या ‘नाटकातली ‘ सिच्युएशन आहे इतके समजायला अवघड आहे का ?
हा तो सीन :
https://youtu.be/bE3uTHKU5ws?si=24EtP_di7V3thubU
लज्जा , वस्त्र हरण, जाने भी
लज्जा , वस्त्र हरण, जाने भी सगळे खांग्रेस च्या जमान्यात होते
पार्वतीचं काम करणारी सोनारिका
पार्वतीचं काम करणारी सोनारिका भादुरिया काय करते हल्ली ?
फोटो नेत्रसुखद असतात अगदी
प्रत्येकाची होली काऊ वेगळी
प्रत्येकाची होली काऊ वेगळी असते. कोणाचा सपोजेड अपमान केला आहे त्यानुसार राग येणारे वेगळे असतात. मग अशा वेळेस "स्वातंत्र्य वगैरे सगळे ठीक आहे, पण..." असे पालूपद लावून अशा हल्ल्यांचे समर्थन केले जाते. आज राम, सीता असल्याने भाजपवाले आहेत. उद्या दुसरी दैवते असतील तेव्हा हीच टेप इतर वाजवतील. इव्हन त्यात आज अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुळका आलेलेही बरेच असतील. यांचा आजचा पुळका फेक आहे.///
Perfectly summed up! फेक पुळका वाली पूर्ण गॅंगच जमली आहे इथे. Thanks for calling them out, they know who they are!
अजून एक category म्हणजे bubble मधले, echo चेंबर मधले लोक ज्यांना फक्त हिंदुत्ववादीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करतात असं वाटतं. दुसऱ्या बाजूची उदाहरणं शेकड्यांनी असली तरी "कधी?" "कुठे?""मला तर काही माहीत नाही?" असं हे चकीतचंदू विचारत बसतात. या selective amnesia ला देखील औषध नाहीच.
लज्जा , वस्त्र हरण, जाने भी
लज्जा , वस्त्र हरण, जाने भी सगळे खांग्रेस च्या जमान्यात होते >>>
भारतात कुठलेही सरकार निर्विवाद अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने नव्हते. मजरूह सुलतानपुरींना तुरुंगवास, किशोर कुमार यांना आकाशवाणीवर बंदी, सॅटॅनिक व्हर्सेस वर बंदी हे काँग्रेस काळातले नमुने. बाकी जनता पक्ष केंद्रात फारकाळ सत्तेत नव्हता आणि त्यांचा काळ इतर वादळी घटनांनी भरलेला होता. आत्ताचे सपा, जनता दल वगैरे जयप्रकाश नारायणाचा वारसा सांगत असले तरी ते त्यांच्यापासून कोसो दूर आहेत. कम्युनिस्टांचे भारतातील उदाहरण माहित नसले तरी जगभरातील कम्युनिस्ट आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यावरील असंख्य उदाहरणे पुरेशी असावीत.
धाग्यावर राजकारण येतेय हे
धाग्यावर राजकारण येतेय हे चांगले होतेय. कारण या घटनेच्या मागे राजकारणच आहे
असे मला वाटते.
>>> जिथे एखाद्या नाटकाच्या
>>> जिथे एखाद्या नाटकाच्या backstage ला सावित्रीबाईंच्या गेटअपमधील अभिनेत्रीला डॉ आंबेडकरांच्या किंवा फुलेंच्या गेटअप मधला अभिनेता सिगरेट पेटवून देतोय, ते तिघे घाणेरड्या शिव्या देत एकूण cheap पणे वागत आहेत.
अहो, फुल्यांचं पात्रच का, खुद्द फुल्यांवरच चिखलफेक केली होती की लोकांनी! त्यांना त्यासाठी सिगरेटसुद्धा ओढावी लागली नाही!
सुधारक तेव्हाही नकोसे होतेच आणि आताही असतात.
आणि तुम्ही ही दोन नावं का घेताहात सारखी? फुले आणि आंबेडकर रामकृष्णांइतकेच, किंबहुना अधिक पूजनीय आहेत माझ्यासाठी. मला शिक्षण घेता आलं आहे ते सावित्रीबाईंनी चिखलाचे गोळे झेलले म्हणून, आणि माझ्या जन्मभूमीची राज्यघटना आंबेडकरांनी लिहिली होती. ते 'त्यांचे' आणि रामकृष्ण 'माझे' असं काही वर्गीकरण नाही करता येत मला.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
स्वाती, तुझ्या या प्रतिसादातच उत्तर आहे. जेव्हा कोणी केवळ आंबेडकर / फुले यांचं काम करणारे अभिनेते असं काहीतरी विचित्र वागताहेत असं दाखवलं तर चालेल का हे लिहिल्यावर तुला 'तुम्ही सारखी सारखी दोन नावंच का घेताय?' असा प्रश्न पडला. फुले /आंबेडकरांना प्रत्यक्ष जीवनात किती त्रास भोगावा लागला हे लिहावसं वाटलं. सावित्रीबाईंचं कार्य कसं महान होतं हे सगळ्यांना माहित असूनही पुन्हा पोटतिडकीनं लिहिलंस.
का? ते नट त्यांच्या स्वतःच्या स्वभावानुसार तसं वागत आहेत ना? फक्त फुले आंबेडकरांच्या गेटअप मध्ये आहेत असं आहे ना?
कारण ती आपली श्रद्धास्थानं आहेत. समस्त मराठी लोकांची आहेत. सर्व देशाची आहेत. आणि त्याबद्दल कोणी वाकड्यात जाऊन लिहितंय हे तुला खपलं नाही.
आता खाली लिहिलेलं बघ ....
'आणि तुम्ही हिंदूचेच देव का घेता सारखे? फुले आणि आंबेडकरांइतकेच रामकृष्ण पूजनीय आहेत माझ्यासाठी. माझी पूर्ण श्रद्धा आहे रामावर आणि इतक्या वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर आता कुठे रामाला न्याय मिळालाय तर त्याचवेळी नाटकाच्या प्रयोगाच्या नावाखाली मुद्दाम हिंदूंच्या श्रद्धास्थानांना डिवचलेलं नाही चालणार आम्हाला. सध्याच्या काळात नेमका हाच विषय घेण्याची गरज होती का? डाव्या विचारसरणीच्या लोकांना हिंदू तेव्हाही नकोसे होतेच आणि आताही असतात. आमचे देव हे हक्कानं तुमचे म्हणून तुम्ही त्यांना वाटेल तसं दाखवा पण तुमची श्रद्धास्थानं मात्र अनटचेबल आहेत असं वर्गीकरण मान्य नाही आम्हाला.'
हे इतर कोणाला वाटू शकतं की नाही?
बेसिकली, जसं इतरांनी तुमच्याबरोबर वागावं अशी तुमची इच्छा असते तसंच तुम्हीही इतरांना वागवा. इतकं कठीण आहे का ते? पण जर कळ काढली आणि त्याची रिअॅक्शन आली तर मग व्हिक्टिम कार्ड खेळू नका.
डिस्क्लेमर : मला व्यक्तीश: कोणत्याही प्रकारच्या विनोदाचं वावडं नाही.
अगदी सुरूवातीची माझी
अगदी सुरूवातीची माझी प्रतिक्रिया ही अज्ञानातून होती. निवडणुका आल्या कि अशा स्क्रीप्टेड घटना घडवल्या जातात यात नवीन काहीच नाही.
मग दोन्ही बाजू त्या घटनेतून चरकातून ऊस काढावा तसा रस काढत राहतात.
पण एक तर ही परीक्षा. कलाकृती कितीही चुकीची असू द्या, ते सांगायला परीक्षक, गुरूजन होतेच. त्यासाठीच तर या परीक्षा आहेत. बहुधा सरावाच्या वेळी यांची संहिता पाहून झालेला प्रकार घडवून आणला असावा असे आता वाटतेय. अर्थात कुणावर विश्वास ठेवायचा हा यक्ष प्रश्न आहे.
त्या पलिकडे जाऊन ललित कला केंद्राची स्वायत्तता, त्याचा अधिकार हे महत्वाचे आहे. भादु च्या नावा खाली कला सादर करणे आणि त्याबाबत मार्गदर्शन होणे यात संघटना, पोलीसच काय न्यायालयाचा सुद्धा हस्तक्षेप अयोग्य आहे.
इथे झालेल्या प्रकाराने भावना दुखावणार्यांमुळे स्टूलवर चढून खिडकीच्या व्हेंटिलेटरमधून पलिकडच्या घरात वावरणा र्या तरूणाने कमी कपडे घातले म्हणून लाज वाटते ही तक्रार करणार्या महिलेची आठवण झाली. अर्थात हा विनोद आहे हे सांगावे लागणार आहे. नाहीतर इथे अभिनेत्रीचा मृत्यू कन्फर्म करण्यासाठी घटनास्थळी जा असा आदेश देणारे महाभाग पण आहेत.
इथं कुणी शोभायात्रा नाटक
इथं कुणी शोभायात्रा नाटक किंवा त्यावर आधारित सिनेमा पहिला आहे काय? त्यात काय वेगळं होतं? टिळकांचा रोल करणारा प्रत्यक्षात पैसे घेऊन मुलांना पास करत असतो, नेहरू आणि गांधीजी पण असेच काहीतरी काळ्या गोष्टी करताना दाखवलेत
तेव्हा ते खटकलं नव्हतं
दर वेळी हे आमच्याच देवांच्या बाबतीत का, त्यांच्या का नाही हे म्हणणाऱ्यांना
आपला समाज प्रगल्भ आहे (होता???) त्यांना मनोरंजन हे मनोरंजन म्हणून स्विकारता येतं (होतं???)
त्यांनी तुमच्या सारखं व्हायला हवं असं सोडून आपण त्यांच्यासारखे कसे बंदिस्त, कर्मठ आणि झापडं लावून बसायला हवं आहे का?
त्याने सगळं छान होणारे का?
मग त्यांच्यात चालत नाही म्हणून आपल्यात पण नाही चाललं पाहिजे असला कसला युक्तिवाद म्हणायचा हा
मग त्यांच्यात बुरखा आहे, अजूनही अनेक निर्बंध आहेत
पुढे जाऊन हेही सक्तीचे करणार का?
Far fetched वाटलं तरी ज्या पद्धतीने सध्या धार्मिक ध्रुवीकरण, रिकाम्या डोक्यात भडकावून unproductive गोष्टीत गुंतवून ठेवणे हे जे सुरू आहे ते पाहता असे काही नियम आल्यास आश्चर्य वाटणार नाही
काही वर्षांपूर्वी शाळेत
आशुचँप +१
काही वर्षांपूर्वी शाळेत मराठीच्या पुस्तकात रामाच्या गोष्टी असायच्या. तेव्हां राम, शिवाजी हे गोष्ट्तले सुपरहिरो होते. काही काळाने त्यापे़क्षा मोठा सुपरहिरो म्हणून हनुमान भेटायचा. मुलं मग हनुमानाच्या प्रेमात पडायची. माझे मुसलमान मित्र सुद्धा हनुमान शिकवायला लागले की खूष व्हायचे.
तेव्हां या सर्व पात्रांशी घट्ट मैत्री असायची. त्यामुळे त्यांचा उल्लेख एकेरीच असायचा.
गेल्या काही वर्षातल्या मिलिटंट संघटनांनी अस्मिता इतक्या टोकदार बनवल्या आहेत कि आता हिंंदूलाच समोरचा हिंदू कट्टर आहे कि नॉर्मल याची खात्री वाटत नाही. आता आदरार्थी उल्लेख सक्तीचा झालेला आहे. एक वेळ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरार्थी उल्लेख करा ही सक्ती समजून घेऊ (मान्य करू असे नाही म्हटलेले) कारण अशी व्यक्ती होऊन गेली आहे. ती पौराणिक , काल्पनिक व्यक्ती नाही.
पण ज्या कथा या घराघरात परंपरेने आलेल्या आहेत त्यातल्या नायकांना कशाला आदराने संबोधित करायचे ? बुद्ध ऐतिहासिक असला तरी आता काय त्याचे ? अडीच हजार वर्षे म्हणजे गोष्टीतला नायक जितका आपल्यासाठी खरा खोटा नायक असतो तसाच. एकेरी उल्लेख केल्याने अपमान होतो कि त्यांचे विचार समजून न घेतल्याने अपमान होतो ?
आपल्याकडे देवांचे उच्चार
आपल्याकडे देवांचे उच्चार एकेरीच करतात.
कोणाला काही खटकत नाही की भावना दुखावत नाहीत.
आपल्याकडे जसे देवधर्माचे राजकारण करणारे आहेत तसेच मुद्दाम उकसवणारे सुद्धा आहेत.
आणि हे एकदा समजले की हट्टाने एकच बाजू घेणाऱ्यांना आपली चूक उमगेल.
लहानपणापासून मुलांच्या
लहानपणापासून मुलांच्या भावविश्वात रामायण,महाभारत असते. टिव्ही यायच्या आधीपासून कीर्तन, भजन यातून हीच दोन महाकाव्ये भेटीला येतात.
इतके की मुसलमान असो किंवा अन्य कुणी, घरात बोलता बोलता उदाहरणे रामायण महाभारतातलीच दिली जातात. या दोन महाकाव्यांनी बालपणापासून भावविश्व व्यापून टाकलेले असल्याने त्यावर जसे कथासार सप्ताह भरवले जातात, तसेच विनोदी प्रहसनासाठी पण यातलीच पात्रे लोकांना आवडतात.
गावोगावी, मोठ्या शहरातून दशावतार, रामलीला सादर होते. रावण वध सादर होतो. मग जाने भी दो यारो सारख्या सिनेमात याच घटनांचा वापर करून विनोदनिर्मिती होते.
शाळेत कुराण किंवा मुहम्मद पैगंबर शिकवला असे उदाहरण आहे का ? मला तर शाळा संपून कॉलेज संपले तरी पैगंबर, ख्रिस्त यांच्या आयुष्यातल्या घटना माहिती नव्हत्या. त्या हॉलिवूडमुळे समजल्या. आपल्या कडे ना साहीत्य आहे, ना कादंबर्या, ना वर्तमानपत्रे, टिव्हीवर कधी इतर धर्मियांच्या संस्कृतीतल्या कथा भेटीस येतात.
तर मग त्यावर विनोद निर्मिती कशी होणार आणि कोण बघायला जाणार ?
युरोपात ख्रिस्ताची, मेरीची टर उडवली जाते त्यामागे हेच कारण आहे.
आपल्या देशात बहुसंख्य हिंदू
आपल्या देशात बहुसंख्य हिंदू असताना आघाडीचे सुपरस्टार खान आहेत म्हणजे आपण मुळात धर्माबाबत कट्टर नाही आहोत आणि ते कलेपासून वेगळेच ठेवतो हेच दिसून येते.
फक्त असे धर्माचे राजकारण करणारे आणि त्यांना उकसवणारे अश्या दोन्ही प्रकारच्या खोडसाळ लोकांपासून सावध राहणे गरजेचे.
मनोरंजन हे मनोरंजन म्हणून
मनोरंजन हे मनोरंजन म्हणून स्विकारण्याचा काळ गेला. आता तसं निर्विष मनोरंजन आहेच याचीही खात्री नाही.
विनोदाचा वापरही सफाईदार शस्त्र म्हणून होतो. त्यामुळे संशयकल्लोळाला जागा राहते. मधल्या काळात जे विष कालवले गेलेले आहे त्याचा प्रभाव कमी कमी करत नेऊन पुन्हा नितळ समाजाकडे जायला खूप काळ लागेल. खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून हे विष इतरही ठिकाणी पोहोचलेले आहे.
शाळेत कुराण किंवा मुहम्मद
शाळेत कुराण किंवा मुहम्मद पैगंबर शिकवला असे उदाहरण आहे का ?तर मग त्यावर विनोद निर्मिती कशी होणार आणि कोण बघायला जाणार ?
>>>>
कुराण शिकवले नाही तरी सलमान रश्दीवरील फतव्यातून, शार्ली हेब्दोवरच्या हल्ल्यातून काय होऊ शकते याचा अंदाज येतो हो लोकांना. भारताचेच उदाहरण घ्यायचे झाले तर नुपूर शर्मावर फतवे निघालेच आहेत. लोक इमिजिएट रिअक्शन देत नसतील. पण म्हणून या गोष्टी आणि त्यावेळी भारतीय अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाद्यांनी घेतलेली बोटचेपी भूमिका कलेक्टिव्ह मेमरीतून जात नाही(त).
या बाबतीत फ्रान्सचे कौतुक करावेसे वाटते कि सरकारने ठामपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूची भूमिका घेतली.
Pages