ललित कला केंद्रात नक्की काय झालं?

Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11

ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.

सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.

मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:

त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला हवा येऊ द्या मध्ये भाऊ कदम हातात तंबाखू चोळताना दाखवतात. त्या वेळी पाटी दाखवावी काय ? काहीही !
'सिगारेट' हा मुद्दा आहे का ? मग 'रामाचा अपमान' म्हणून ऊर का बडवत आहेत लोक्स ?

बाय द वे एक गणवेशातला भारतीय सैनिक काश्मिरी मुस्लिम म्हातार्‍या कडून बळजबरीने 'जय श्रीराम' म्हणून घेत आहे असाही व्हिडिओ व्हायरल आहे. माझ्यामते तिथे श्रीरामाचा जास्त अपमान झाला आहे, पण कुणालाच ते खटकत नाही, अभिमानच वाटतो कारण या थयथयाटामागे रामभक्ती हे कारणच नव्हे.

सीतेची भूमिका करणारे पात्र धूम्रपान करते. सीता नव्हे.
आणि यावर जर आक्षेप असेल, म्हणजे सीतेचे कपडे घातलेल्या पात्राने धूम्रपान करू नये, असे वाटत असेल, तर त्या पात्राला, आणि इतर पात्रांना धक्काबुक्की आणि मारहाण केली त्याचं काय? म्हणजे तुम्ही त्यांना मारता तेव्हा ते रामासीता नसतात, पण स्टेजवर त्यांच्या नाटकात ते कधी आणि कोण, हे तुम्ही ठरवणार. धूम्रपान करणारी सीता असेल तर मारहाण झाली ती कोण होती?

Lol
धाग्याला टाळं लावायला गोंधळच घालावा लागतो का अ‍ॅडमिन करू शकतात?
शकत असतील तर वाजवा एकदाचं सूप. नाहीतर इथे आता एएची मिटिंग चालू झाली आहे.

>>> धूम्रपान करणारी सीता असेल तर मारहाण झाली ती कोण होती?
Happy
खरंच आता धाग्याला टाळं लावायला हरकत नाही.

Pages