ललित कला केंद्रात नक्की काय झालं?

Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11

ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.

सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.

मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:

त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाइम्स ऑफ इंडियामधल्या बातमीवरून असे समजतेय की "रामलीलेत काम करणार्‍या कलाकारांची बॅकस्टेज बॅन्टर्स" अशी नाटकाची कन्सेप्ट होती. त्यात सीतेचे काम करणारा स्त्रीपार्टी नट बॅकस्टेज ला सिगारेट फुंकताना आणि शिव्या इ. देताना दाखवला होता त्यावरून पब्लिक च्या भावना दुखावल्या. प्रकरण हे असेच आणि इतकेच असेल तर यात राम/ सीतेचा अपमान कुठून आला हे झेपले नाही!

बहुतेक जुन्या वस्त्रहरण(मच्छिंद्र कांबळे मालवणी) मध्येही असंच काही असेल, अर्थात आठवत नाही, बऱ्याच वर्षांपूर्वी पाहिलेलं होतं.
या ललित वाल्या नाटकात नक्की काय होतं याचे तपशील कळलेले नाहीत(म्हणजे इतकं बंद पाडण्याइतकं काही होतं का ते.एखादी (संयत, मुद्देसूद) फेसबुक पोस्ट असेल बंद पाडणाऱ्या बाजूची तर वाचायला हवी.

टाईम्स ऑफ इंडिया बातमी नुसार मै म्हणत्येय तशी रामलीलेत काम करणर्‍या व्यक्तीची पॅरडी होती. Lol
आणि हे झालं म्हणून पोलिसांनी एचओडी आणि पोरांना डायरेक्ट अटकच केली! आपली सिस्टिम महान आहे आणि राईट विंग पुढे काहीही बोलण्यात अर्थ नाही.

कोणत्याच मार्गाने ह्या कृत्याचे समर्थन करता येत नाही.
.राजकीय हेतू नी प्रेरित होवून कला क्षेत्राचा अपमान पण ह्या लोकांनी केला आहे.

त्यांचे समर्थन होवू च शकत नाही.

देशाच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणे हे कला क्षेत्राचे काम आहे राजकीय हेतू साठी कलाकृती निर्माण करणे हे त्यांचे काम नाही.

कृत्रिम बुध्दीमत्ता. आणि नोकऱ्यांचा प्रश्न.
प्रदूषण आणि मानवी आरोग्य.
सत्ताधारी आणि गुंड ,प्रशासन युती.
शिक्षणाचा बाजार आणि घसरत चालेलेला शिक्षणाचा दर्जा.

वाढत चालले ल धार्मिक ,जातीय आणि भाषिक द्वेष.

विज्ञान च वापर मानव विनाश साठी च करणे .

रोग जंतू निर्माण करण्या पासून घातक अणू अस्त्र पर्यंत m
हे आणि ह्या सारखे अनंत विषय कला क्षेत्रातील लोकांनी समाजा समोर आणून लोकांची जागृती केली पाहिजे .
हे जमत नसेल आपल्या बुध्दी बाहेर च असेल तर मनोरंजन हा विषय घ्यावा.

देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदू धर्माच्या पूजनीय,आदर्श character चे विकृती करणं करणे हा खूप मोठा गुन्हा आहे.
जन्म ठेप किंवा मृत्यू दंड अशाच शिक्षा भारतीय कायद्यात असल्या पाहिजेत

लोकंहो नाटकाचा व्हिडिओ बघा आणि मगच कोणा एकाची बाजू घ्या. काय झाले ते जाणून न घेता, किंवा उडत्या बातम्यावर विश्वास ठेवून घाईत व्यक्त होऊ नका.

कदाचित भावना दुखवायचा खोडसाळपणा मुद्दाम सुद्धा केला असेल.. त्यामुळे नक्की हेतू काय होता हे सुद्धा माहीत करून घ्या.

नाहीतर तिथे झोडपणारे आणि आपल्यात फरक काय उरला....

ऋन्मेष , असहमत.
एचओडी आणी मुलांना डायरेक्ट अटक करणे चुकिचेच आहे, अगदी खोडसाळपणा केला असला तरीही. शिवाय ज्या संघटनेने हा गोंधळ घातला त्यांचा इतिहास पाहिला तर ते 'राम के नाम' सारख्या सुंदर डोक्युमेंटरीही दाखवू देत नाहीत.

विकु +१ अगदीच असहमत.
अटक केली म्हणजे कुठलं साधं-सुधं कलम लावलेलं नसणार. नाटकात काम केलं म्हणून अटक??

हो, मलाही तोच प्रश्न पडला. एकदम अटक कसं केलं? कुठल्या कलमान्वये?
आणि विद्यापिठात जाऊन गोंधळ घालणार्‍यांना अटक का झाली नाही?

द.सा., दुव्यांबद्दल आभार - त्यामुळे प्राध्यापकांचीही बाजू समजली आणि मला व्यक्तिशः पटली.

दत्तात्रय साळुंखे.

फक्त न्यूज बाईट चे व्हिडिओ का टाकत आहात.
नाटकात काय अकलेचे तारे तोडले आहेत त्या विषयी काही व्हिडिओ असेल तर टाका

त्या लिन्क्स पैकी दुसर्‍या लिन्क मधे ते प्राध्यापक सांगतायत की गोष्ट राम सीतेची नव्हे तर त्यांची भूमिका करणार्‍या नटांच्या बॅकस्टेज ला होणार्‍या धांदलीची आहे , तुम्ही नट आणि पात्रं यात घोळ करत आहात. तिसर्‍या लिन्क मधे एक 'कार्यकर्ता ' जे बोलत आहे त्यावरून त्याने नेमके तेच केलेल आहे असे दिसतंय.

भावना दुखावल्या म्हणून अटक हेच पटत नाही. बॅकस्टेज मध्ये होणाऱ्या गोष्टी वैगरे गौण मुद्दे आहेत.

अगदी खोडसाळपणा केला असला तरीही...
>>>>

खोडसाळपणा असेल तर तो साधासुधा नाही..
ज्याने धार्मिक भावना दुखावून धार्मिक दंगली होऊ शकतात तो खोडसाळपणा मुद्दाम केला असेल तर मला तरी तो गोंडस वाटत नाही.

त्यामुळे.. "तरीही."... हे काही पटत नाही.
पण मुद्दाम त्या हेतूने केले नसेल तर तर वेगळे..

नाटक कुठे बघायला मिळेल का.तरच त्यावर मत मांडता येईल. सध्याचे मत त्या नाटकावर नसून जर का असल्यास अश्या प्रकारच्या खोडसाळपणाच्या विरोधात आहे.

सकाळ वर्तमानपत्रात विद्यापीठाच्या सिनेटच्या सदस्या अपर्णा लालिंगकर यांचा लेख आहे. तो वाचावा. संगती लागेल. त्या माबोवर होत्या.

नाटकही पाहिलेले नाही आणि कालचा गोंधळही पाहिलेला नाही.

पण निवडणुकांचं वारं, त्यात नाटकात राम, सीता अशी धार्मिक पात्रं, त्यावरून विनोद. मग पुढचा गोंधळ ठरलेलाच असणार.
आता एक पक्ष सेक्युलॅरिझम, व्यक्तीस्वातंत्र्य असे मुद्दे घेईल. दुसरा पक्ष धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा करेल.
मग तेव्हां का नाही अभिव्यक्तीस्वातंत्र्य आठवले ? तेव्हां कुठे गेला होता तुझा धर्म ?
हा नेहमीचाच अंक पार पडेल. निवडणूकही पार पडेल.

शेतकर्यांचं कंबरडं मोडलंय. गुंठेवारीत जमीन राहिल्याने आता पुढे वाटेही पडत नाहीत आणि विकताही येत नाही. प्रचंड बेरोजगारी आहे.
हे मुद्दे या ही वेळेला राहूनच जातील.

राम के नाम इतका तो सहना पडेगाही.

आणि त्या व्हीडिओजच्या खालच्या जवळपास सगळ्या प्रतिक्रिया गोंधळ घालणार्‍यांना पाठिंबा दर्शवणार्‍या आहेत.
"'आमच्या' देवांची विटंबना करता, 'त्यांच्या' देवांची करून दाखवा" - हाच सूर सोशल मीडिआवरही दिसला. 'त्यां'च्या म्हणजे कोणाच्या? 'ते' आपले आदर्श आहेत का?
भारतात न पटलेल्या बाबींबद्दल अभिव्यक्त होण्याचे काही सांसदीय मार्ग आता उपलब्ध नाहीयेत का? एकदम हाणामारी का करावी लागते? आता भारतात लोकशाही/ कायदा आणि सुव्यवस्था नाहीये का? किंवा त्यावरचा विश्वास उडाला आहे का?

रामाची व सीतेची भूमिका करणारे लोक त्याच गेट अप मध्ये नंतर backstage ला सिगरेट ओढणं, अश्लील शिव्या देणं , असे अनेक अचकट विचकट प्रकार करताना दाखवले आहेत.

आता हे accept व्हायला हवं, याने भावना दुखावल्या कशा हा मुद्दा बरोबर आहे. पण इथे राम व सीतेच्या ऐवजी पुरोगामी icons - उदा- आंबेडकर व रमाई आंबेडकर, फुले व सावित्रीबाई - असते तर? म्हणजे त्या महापुरुष व महास्त्रियांच्या गेट अप मधले कलाकार व्यसनीपणा , शिवीगाळ करत आहेत असं दाखवलं असतं तर? तर मग ते सहजपणे accept झालं असतं का? चाललं असतं का? अट्रोसिटी कायदा लागला नसता का? आक्रमक अनुयायांनी विरोध केला नसता का?
म्हणजे पुरोगामी icons बद्दल अत्यंत आदराने, घाबरून, decorum पाळूनच व्यक्त व्हायचं ना? आणि हेच पुरोगामी आमच्या हिंदू देवदेवतांना मात्र विकृतपणे present करणार? आधी स्वतःच्या icons वर तो प्रयोग करा, काय होतं बघा, मग तुम्हाला नैतिक अधिकार मिळेल हिंदू धर्मियांना शहाणपणा शिकवण्याचा.

प्रत्यक्ष नाटकाची क्लिप असेल तर ती बघायला आवडेल.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कौतुक करणाऱ्यांसाठी प्रश्न:
हिंदू धर्मावर बेतलेल्या नाटकाऐवजी मुहम्मद याच्यावर नाटक करणार का कधी? लहान मुलीबरोबर त्याचे लग्न दाखवणार का कधी?

धार्मिक वाद अजून वाढू नये, म्हणून पोलिसांनी कारवाई केली ते योग्य आहे. पुढचे पुढे कोर्ट बघून घेईल, जामीन वगैरे देऊन.

https://en.wikipedia.org/wiki/Section_295A_of_the_Indian_Penal_Code#:~:t....

मुस्लिम लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून इंग्रजांनी कायद्याचे एक कलम आणले ज्यामुळे धार्मिक तेढ, लोकांच्या भावना दुखावणे हा एक गुन्हा मानला गेला. स्वातंत्र्य मिळाल्यावरही आपल्या महाथोर घटना निर्मात्यांनी हे कलम कायम ठेवले. त्यामुळे भारतात पूर्ण अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही.
आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे म्हणण्याचा आणि त्या आधारावर कारवाई करण्याचा अधिकार काही विशिष्ट पंथ, विचार यांनाच असावा. "बाकीच्यांनी" गुमान अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या सदराखाली काहीही अपमान खपवून घ्यावेत कारण पूर्वी आपण यापेक्षाही जास्त अपमान सहन केले होते हे आज "बाकीच्या" लोकांना पटवणे अवघड आहे.
नुकतीच रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा झालेली असताना लोकांच्या मनात राम, सीता, रामायण याविषयी भक्तिभावाला भरते आलेले असतानाच असे विडंबन घडणे हा निव्वळ योगायोग मानावा का? की जाणूनबुजून केलेला खोडसाळपणा?

भारतात न पटलेल्या बाबींबद्दल अभिव्यक्त होण्याचे काही सांसदीय मार्ग आता उपलब्ध नाहीयेत का? एकदम हाणामारी का करावी लागते? आता भारतात लोकशाही/ कायदा आणि सुव्यवस्था नाहीये का? किंवा त्यावरचा विश्वास उडाला आहे का?
>>>>>>>>>

अश्या घटनांवरून, ते देखील बातमी कानावर पडताच भारताबद्दल एवढा मोठा निष्कर्ष Happy

बॅक स्टेज मध्ये गोंधळ फक्त आणि फक्त रामायण किंवा महाभारत ह्या विषयातील नाटकं दरम्यान च होतो का,,?

भारतात फक्त ह्याच विषयावर नाटक सादर होतात का?

प्रमाण बघितले तरी हा विषय अगदी नगण्य पने रंग भूमीवर आला आहे.

धार्मिक वाद अजून वाढू नये, म्हणून पोलिसांनी कारवाई केली ते योग्य आहे.
>>>>>

मला सुद्धा हेच योग्य वाटत आहे.
इथेच बघा ना.. बघता बघता विषय पेटायला सुरुवात. तर प्रत्यक्ष नाटक किंवा जे काही असेल ते जे जे बघतील त्यांच्यात सुद्धा लागलीच हाणामारी होण्याची शक्यता आहेच.

मला एका प्रश्न. पडलाय
हे जे काही होते ते सेन्सॉर ने पास केले ले होते का?
किंवा तशी परवानगीची गरज नव्हती का?

चार्ली हेब्दो वाल्या लोकांनी हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम तिन्ही धर्मांची cartoons बनवली होती. हिंदू , ख्रिस्ती यांनी ते स्वीकारलं, मुस्लिमांनी खून पाडले.
तसं इथे राम सीते सोबत वर लिहिलेल्या पुरोगामी दैवतांना पण तेच सगळं करताना दाखवा जे राम सीतेच्या गेट अप मधल्या लोकांनी केलंय. नुसतं हिंदू सॉफ्ट टार्गेट आहेत म्हणून त्यांना टार्गेट करणार का?
छत्रपती शिवाजी महाराज यांची political legacy तर दोन्ही sides क्लेम करतात. छत्रपतींच्या गेट अप मधला माणूस चुकीच्या गोष्टी back stage ला करतो आहे असं दाखवू शकता का?

आता हे accept व्हायला हवं, याने भावना दुखावल्या कशा हा मुद्दा बरोबर आहे. पण इथे राम व सीतेच्या ऐवजी पुरोगामी icons - उदा- आंबेडकर व रमाई आंबेडकर, फुले व सावित्रीबाई - असते तर? >>> तर काय ? मूळ मुद्दा तुम्हालाही पटला आहे असे पहिल्या वाक्यात लिहिलेच आहे मग पुढच्या वाक्याचा काय पॉइन्ट आहे?!
तरी उत्तर हवेच असेल तर - होय ही गोष्ट त्या नटांची आहे, पात्रांची नाही मग राम सीता असोत की फुले आंबेडकर असोत. काय फरक पडतो?
आता लेटेस्ट पोस्ट्स काहीही न ऐकता वाचता साप समजून भुई धोपटणारी वाटत आहेत. राम , अपमान असे २ शब्द दिसले की लगेच "हिंदू सॉफ्ट टार्गेट", "महंमदाचे लग्न" फुले, आंबेडकर, शिवाजी वगैरे की वर्ड्स टाकून दिले!! Lol

Pages