भरलेली कोंबडी

Submitted by लालू on 12 November, 2008 - 16:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१ कोंबडी
१ मोठा चमचा आले - लसूण पेस्ट
अर्धा कप दही
१ वाटी ओले खोबरे
२ चमचे तीळ + १ मोठा चमचा खसखस (भाजून पूड करावी)

(२ कांदे,
५ - ६ मिरच्या,
१ इन्च आल्याचा तुकडा,
१० - १२ लसूण पाकळ्या,
१ जुडी कोथिंबीर) हे सर्व बारीक चिरून घ्यावे.

अर्धा कप काजूचे तुकडे
पाव कप बेदाणे,
२ मोठे चमचे तिखट
अर्धा चमचा हळद
१ चमचा गरम मसाला पावडर
अर्धा वाटी सुके खोबरे
१ कप तेल / तूप
२ लिंबांचा रस
मीठ.

क्रमवार पाककृती: 

कोंबडीची स्किन काढून कोंबडी स्वच्छ धुवावी. नंतर आले लसूण पेस्ट, मीठ आणि दही लावून अर्धा तास तरी ठेवावे.

सुके खोबरे भाजून घेऊन गरम मसाला घालून बारीक वाटावे. हे वाटण कोंबडीच्या आतल्या भागाला लावावे.

पातेल्यात तूप / तेल गरम करून त्यात ओले खोबरे, खसखस + तीळ पूड, बारीक चिरलेला कांदा, लिंबूरस, काजू, मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, बेदाणे, हळद, मीठ घालून चांगले परतावे. हा मसाला थंड झाल्यावर कोंबडीत भरावा. मसाला बाहेर पडू नये म्हणून दोरा बांधावा.

शेवटी तूप / तेल गरम करून बाहेरच्या बाजूने कोंबडीला लावावे. ओव्हन मधे ठेवून ४०० डिग्री वर ४५ मिनिटे ते १ तास बेक करावी. जाड बुडाच्या पातेल्यात गॅस वर सुद्धा भाजता येईल.
वाढताना सुरीने चकत्या करून कांदा, टोमॅटो चकत्या आणि लिंबाच्या फोडी बरोबर द्यावी.

वाढणी/प्रमाण: 
एक मध्यम कोंबडी चार लोकांना पुरेल. :)
अधिक टिपा: 

भरण्यापूर्वी कोंबडी पूर्ण thaw केली पाहिजे. फ्रीजर मधे असेल तर बाहेर काढून साधारण रुम टेम्प ला आल्यावर फ्रीज मधे ( फ्रीजर नाही) ठेवावी. मग भरण्यापूर्वी पुन्हा बाहेर काढावी. खूप थंड असेल तर स्किन काढायलाही त्रास पडतो. कोंबडीच्या आकारावर पण वेळ कमीजास्त होऊ शकतो. roasting chicken मोठी असते. fry करायची मिळते ती जरा लहान असते.

जेवायच्या २ तास आधी oven मधे ठेवली तर वेळेवर व्हायला हरकत नाही. फार आधीही ठेवू नये नाहीतर थंड होते.

या पदार्थाबरोबर पांढरा रस्सा(मटण किंवा चिकन) आणि जीरा पुलाव हा मेनू लोकांना आवडतो.

kombadi.jpgThanksgiving Style करायची असेल तर स्टफिन्ग वेगळ्या प्रकारे करता येते. कांदा, आले, लसूण हे सगळे बारीक चिरुन ब्रेडचा चुरा किंवा unseasoned croutons, काळी द्राक्षे, मिरे किंवा थोडे लाल तिखट हे थोड्या तेलावर परतून मिक्स करुन भरायचे. कोंबडी marinate करताना फक्त लिंबूरस, मीठ, गरम मसाला, हळद हे वापरायचे. बेक करताना बाजूने लाल बटाटे, कांदे, सफरचंदाचे तुकडे लावायचे.

माहितीचा स्रोत: 
व्हई. :) (वही. यात बरेच वर्षांपासून कुणी सांगितलेल्या, वाचून लिहून ठेवलेल्या अश्या रेसिपीज आहेत.)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू,
वाढताना कोंबडीत भरलेला मसालापण चकत्यांवर घालून वाढवे का?

अंजली, हो. कापताना तो मसाला बरोबर येईलच. रुंद पात्याच्या मोठ्या धारदार सुरीने कापावी. Chef's knife, santoku चालेल.

हीच रेसिपी पण थोडा बदल करुन thanksgiving style करता येते. ती आता वेगळी न लिहिता वरच्याच रेसिपीत टिपा मध्ये टाकते.

ही बघ आम्ही केलेली-

DSC03861.jpg

मस्तच दिसते आहे.

And now, Dear Readers, I am pleased to continue the tradition of offering the Thanksgiving Prayer that was penned by my dear mother, Pauline Phillips. No Thanksgiving would be complete for me without it.

Oh, Heavenly Father,

We thank thee for food and remember the hungry.

We thank thee for health and remember the sick.

We thank thee for freedom and remember the enslaved.

May these remembrances stir us to service,

That thy gifts to us may be used for others. Amen.

Have a safe and happy Thanksgiving, everyone! -- Love, ABBY

डीअर अ‍ॅबीच्या सौजन्याने.

केरळात एक मोपला मुसल्मान स्वैपाकाचा प्रकार आहे त्यात मुर्गीत दोन उकड्लेली अंडी व इतर मसाला भरतात. झैनाबी नावाच्या बाइचे हाटिल आहे. जबर्दस्त स्वैपाक करते. केरळ मध्ये गेलात तर जरूर एक
मील तिथे प्लॅन करा.

रेसिपी वाचून आणि फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटले. आता करायला हवी लवकरच. लालू, अशा कोंबड्या बरेचदा स्कीनसकट पण करतात ना. आयना गार्टन तिच्या शो मध्ये चिकन ब्रेस्ट पण स्किनसकट बेक करते आणि मग स्किन काढते. त्यामुळे चिकन छान मऊ, ओलसर राहते म्हणे ( अर्थातच !! Happy )

यावर्षीच्या Thanksgiving Style कोंबडीचा फोटो रेसिपीमध्ये टाकला आहे. उपडी ठेवल्याने खालचा जास्त मांस असलेला भाग पहिल्यांदा कापून घेता येतो. रंगीत Peppers, द्राक्षे, कांदा भाजतानाच ठेवला होता. नंतर चेरी टोमॅटोज, लिंबू इत्यादी सजावटीसाठी वापरले आहे.

मस्तच. मी केलेली त्याला पूर्ण भाजुन होइतो खूप पाणी सुटले होते. मागच्या वर्षी केली तेव्हा पण. मी बेक करते त्या भांड्यातुन काढुन वेगळी सर्व करते. त्यामुळे भाजताना कांदे वगैरे टाकता येत नाही. का बरं असे ?

रॅकवर ठेवून भाज. बाकी कांदा वगैरे दुसर्‍या बेकिन्ग डिशमध्ये ठेवू शकतेस. मी हे चिकन आणते, याला कमी पाणी सुटते- तिथली पोस्ट्सपण वाच.
https://www.wegmans.com/webapp/wcs/stores/servlet/ProductDisplay?langId=...

रॅकवर ? म्हणजे कोंबडी डायरेक्ट रॅकवर ठेवायची ? मी होल फूड्स मधुन आणते चिकन. हे बघते आता.

नाही गं. रोस्टिन्ग पॅनमध्ये ठेवायचे रॅक मिळते त्यावर ठेवून. पाणी सुटले तर पॅनमध्ये पडते आणि त्याच्या वाफेमुळे कोंबडी ड्राय होत नाही.
http://www.amazon.com/Calphalon-Contemporary-Nonstick-Roaster-Injector/d...

हे जे पाणी पडते त्याला थोडा मैदा वगैरे लावून मस्त ग्रेव्ही पण करता येते ना कापलेल्या चिकनवर घ्यायला ?

हि चिकन मस्त लागते ....मी केली होती गेल्या वर्शी ...पण कापताना मात्र वाट लागली.....कशी कपयची ते कोणी
सन्गेल का? serve करताना कुर्र्तडल्यासर्खी दिसत होती ....sontoku knife वपरली होती.

मला शेज्,वान पद्धतिने बनवलेलि कोलम्बिचि पाक् क्रुति हवी आहे. क्रुपया मिलेल का? गुगल् मधे शोध् ली पन मिलालि नाही

आता मला हे ट्राय करन्याचा आत्म विश्वास आला आहे. शिवाय चिकन च्या नवीन रेसीपीच्या शोधात आहे. एका रविवारी करूनच बघते. जबरी आहे.

येस्स मामी, आता कोंबडीला आत्मविश्वास आला की झालं Wink

बादवे. भरलेली कोंबडी हे थोडसं भरलेल्या कुर्ल्यांसारख वाटतं Light 1

चिकन काफ्रिअल (CAFREAL) नावाची गोव्याची प्रसीद्ध पाकक्रुती पाहीजे आहे. कोणी देऊश केल काय ?

आमच्या तिघि पण सेम टु सेम अशाच दिसत होत्या, पण आमच्या कॉर्निश गेम हेन्स असल्याने एवढा वेळ लागला नाही. ४०-४५ मिनिट्स पुरले. स्टफिंग ची चव अप्रतिम आहे या. आम्ही थोडे ऊरलेले स्टफिंग बेबी बटाटे आणि कांद्याच्या फोडींना चोळून ते पण अवन मधे टाकले. प्रचंड टेस्टी झालेला तो पण प्रकार. धन्यवाद लालू!!

विकएंडला ह्या पद्धतीने भरली कोंबडी केली. अफलातुन झाली. उरलेल्या मसाल्यात बेबी पोटॅटो खरपुस परतुन घेतले. ते पण मस्त झाले. हा चिकनचा फोटो.

chicken.jpg