पनीर- बोटाएवढे लांब तुकडे करून (नानकचं एक छोटं पॅकेट घेतलं), काजू (साधारण पाव वाटी) भिजवून त्याची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा (पाव कांदा), आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, रजवाडी गरम मसाला, हळद, जिरं, तेल, थोडी कसुरी मेथी, वरून थोडं क्रिम, चवीप्रमाणे मीठ, वरून कोथिंबीर.
काजू निदान तासभर तरी पाण्यात भिजवून पेस्ट करून घ्यावी. पनीर रूम टेंप.ला आणून बोटाएवढे लांब तुकडे करून घ्यावेत. कांदा अगदी बारीक चिरावा म्हणजे भाजीत दिसणारही नाही.
तेलाची जिरं घालून फोडणी करून त्यात कांदा चांगला परतावा. त्यावर आलं लसूण पेस्ट, रजवाडी गरम मसाला, लाल तिखट घालून आणखी परतावा. मग त्यात काजूची पेस्ट घालून मिक्स करावं. त्यातच थोडी हळद घालून चुरून कसूरी मेथीही घालावी (साधारण दोन चमचे पुरेल). मग त्यात पनीर घालून बारीक गॅसवर उकळी काढावी. वरून थोडं क्रिम घालून कोथिंबीर घालून सर्व करावं.
पनीर कॅप्सिकम करायला भोपळी मिरच्या नव्हत्या आणि मखनी करायला टोमॅटो प्युरे नसल्याने ह्या झटपट भाजीचा जन्म झालेला आहे.
नेहमी घालता त्यापेक्षा किंचीत जास्त लाल तिखट घालून चालेल. काजू पेस्ट आणि क्रिममुळे माईल्ड होते तशी.
पनीरचं प्रमाण काजूची पेस्ट, क्रिम ह्याच्या तुलनेत थोडं कमी असावं नाहीतर भाजी ड्राय वाटते- स्वानुभव.
मुग्धा केदार, मस्त लागेल
मुग्धा केदार, मस्त लागेल ह्यात वाद नाही.
स्वाती२, थॅन्क्स.
छान आहे रेसिपी करून बघेन हि
छान आहे रेसिपी करून बघेन हि एकदा.. क्रिम न घालता दुधावर जमलेली साय चालेल का? क्रिम कधीच वापरलं नाहीये..
मृणाली, करुन बघ. आमच्याकडे
मृणाली, करुन बघ. आमच्याकडे साय नसते म्हणून क्रिमशिवाय पर्याय नाही.
मी आजकाल ग्रेवी, सॉस वगैरेत
मी आजकाल ग्रेवी, सॉस वगैरेत थोड्या प्रमाणात क्रिम घालायचे असल्यास पर्याय म्हणून दूध आणि बटर २:१ प्रमाणात वापरते.
Pages