पनीर- बोटाएवढे लांब तुकडे करून (नानकचं एक छोटं पॅकेट घेतलं), काजू (साधारण पाव वाटी) भिजवून त्याची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा (पाव कांदा), आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, रजवाडी गरम मसाला, हळद, जिरं, तेल, थोडी कसुरी मेथी, वरून थोडं क्रिम, चवीप्रमाणे मीठ, वरून कोथिंबीर.
काजू निदान तासभर तरी पाण्यात भिजवून पेस्ट करून घ्यावी. पनीर रूम टेंप.ला आणून बोटाएवढे लांब तुकडे करून घ्यावेत. कांदा अगदी बारीक चिरावा म्हणजे भाजीत दिसणारही नाही.
तेलाची जिरं घालून फोडणी करून त्यात कांदा चांगला परतावा. त्यावर आलं लसूण पेस्ट, रजवाडी गरम मसाला, लाल तिखट घालून आणखी परतावा. मग त्यात काजूची पेस्ट घालून मिक्स करावं. त्यातच थोडी हळद घालून चुरून कसूरी मेथीही घालावी (साधारण दोन चमचे पुरेल). मग त्यात पनीर घालून बारीक गॅसवर उकळी काढावी. वरून थोडं क्रिम घालून कोथिंबीर घालून सर्व करावं.
पनीर कॅप्सिकम करायला भोपळी मिरच्या नव्हत्या आणि मखनी करायला टोमॅटो प्युरे नसल्याने ह्या झटपट भाजीचा जन्म झालेला आहे.
नेहमी घालता त्यापेक्षा किंचीत जास्त लाल तिखट घालून चालेल. काजू पेस्ट आणि क्रिममुळे माईल्ड होते तशी.
पनीरचं प्रमाण काजूची पेस्ट, क्रिम ह्याच्या तुलनेत थोडं कमी असावं नाहीतर भाजी ड्राय वाटते- स्वानुभव.
(No subject)
मस्त!
मस्त!
मस्त, एकदम रीच ग्रेवी झाली
मस्त, एकदम रीच ग्रेवी झाली असणार पनीर + काजु + क्रीम.
काजुच्या ग्रेव्हीमुळे दाटपणाही येतो ग्रेव्हीला.
मस्त रेसिपी.
वा मस्तच....तुमची पनीर मखनी
वा मस्तच....तुमची पनीर मखनी आमच्याकडे एकदम हिट आहे...
आता ही भाजीदेखिल करुन बघणार नक्की...
ताजी मेथी घातली तर चालणार
ताजी मेथी घातली तर चालणार नाही का?
छान आहे पाकृ.
यम्म्म.. मस्त दिसते आहे.एकदा
यम्म्म.. मस्त दिसते आहे.एकदा करुन पाहणार नक्की,
फोटो कसला यम्मी आहे
फोटो कसला यम्मी आहे
मस्त पाकृ.
मस्त पाकृ.
तुम्ही मलई बर्फी, मेथि मलई,
तुम्ही मलई बर्फी, मेथि मलई, काजू ग्रेव्ही अशा अनहेल्दी रेसिपच टाकता. बिनतेलाची कारल्याची भाजी वगैरे लिहा की.
मस्त दिसतेय भाजी!
मस्त दिसतेय भाजी!
सायो, मस्त दिसतेय भाजी एकदम.
सायो, मस्त दिसतेय भाजी एकदम. करून बघण्यात येईल.
मी यात ताजी साय मिक्सरला
मी यात ताजी साय मिक्सरला फिरवुन, रजवाडी मसाला न वापरता घरगुती १६ मसाल्यांचे मिश्रण असलेला मसाला टाकतो.
छान प्रकार.
छान प्रकार.
भाजी मस्त दिसतेय. पण प्रमाण
भाजी मस्त दिसतेय. पण प्रमाण सगळे अंदाज्पंचे पनीर किती? आनि पाव कांदा म्हणजे इकडे जे नॉर्मल साइजचे कांदे असतात त्यातला पाव भाग? की अमेरीकन कांदा?
छान दिसतेय ...
छान दिसतेय ...
मस्तं आहे पनीर ग्रेवी भाजी.
मस्तं आहे पनीर ग्रेवी भाजी.
सस्मित, माझ्याकडे ४०० ग्रॅ.
सस्मित, माझ्याकडे ४०० ग्रॅ. पनीरचं पॅकेट होतं ते सगळं वापरलं मी. पाव कांदा म्हणजे अमेरिकन कांद्याचा पाव भाग.
जनरली प्रमाण फॉलो करत नाही. खरंच सगळं अंदाजपंचे.
जनरली प्रमाण फॉलो करत नाही.
जनरली प्रमाण फॉलो करत नाही. खरंच सगळं अंदाजपंचे.>>>ह्म्म.
माझी आईसुध्धा रेस्पी सांगताना असंच सांगते. थोडं घे, थोडंजास्त घे, वरुन अंदाजाने घाल इइ. पण त्यामुळे यथातथाच स्वयंपाक ज्ञान असणार्या, माझी भांबेरी उडते.
पनीर ४०० ग्राम.>>> मग ठीक आहे. मुलीला पनीर जीव की प्राण असल्याने करुन बघेन.
छान दिसतेय ...
छान दिसतेय ...
मस्त दिसतेय भाजी.
मस्त दिसतेय भाजी.
मस्त दिसतेय. चवीला तर सुंदरच
मस्त दिसतेय. चवीला तर सुंदरच असणार. करुन बघेन.
मस्तच
मस्तच
रेस्पी आणि फोटो, दोन्ही
रेस्पी आणि फोटो, दोन्ही आवडलं.
लवकरच करते. दिवाळी पार्टीत नॉनदेशी जनतेलापण आवडेल.
फोटो कातील दिसतोय अगदी. करून
फोटो कातील दिसतोय अगदी. करून बघेन कधी तरी. नॉन-देशी जनतेला आवडेलच.
सायोबेन! यम्मी यम्म्मी
सायोबेन! यम्मी यम्म्मी रेसिपी,
बी! ताज्या मेथिने कडसर चव येइल,!
अरे वा! काल वेळात वेळ काढून
अरे वा! काल वेळात वेळ काढून सायोने रेसिपी पण टाकली मस्त आहे. लवकरच पॉटलक गटग करायला हवं
घरात असलेल्या काजुचा सदुपयोग
घरात असलेल्या काजुचा सदुपयोग करायची इच्छा होतीच. ही भाजी करून बघण्यात येईल. कदाचीत पनीर ऐवजी ग्रील्ड चिकन घालेन.
पाकृ एकदम भन्नाट आणि फोटो त्याहून भन्नाट !!
पाकृ एकदम भन्नाट आणि फोटो
पाकृ एकदम भन्नाट आणि फोटो त्याहून भन्नाट !! >> +१ करून बघणार.
ग्रिल्ड चिकनची कशी झाली ते
ग्रिल्ड चिकनची कशी झाली ते इथे लिही धनि.
तुम्ही ग्रिल्ड ब्याडवर्डाची
तुम्ही ग्रिल्ड ब्याडवर्डाची लिहा
Pages