Submitted by संयोजक on 20 September, 2023 - 02:43
मायबोलीकरांनो, या खेळात संयोजक टीम तुम्हाला पहिले कोडे देतील त्यावरून तुम्हाला गाणे कोणते आहे ते ओळखून त्याची एक ओळ किंवा दोन ओळी लिहायच्या आहेत. मराठी किंवा हिंदी कोणतीही गाणी चालतील. कोड्याच्या सुरुवातीला फक्त तसे नमूद करावे. जो गाणे ओळखेल त्याने पुढचे कोडे द्यायचे आहे. जर त्या आयडीला कोडे सुचत नसेल तर दुसऱ्या कोणीतरी कोडे द्यावे.
उदा. "हिंदी गाणे- एका माणसाने प्लेटमधील पाव उचलला तर त्याखाली लिहिलेले असते जन्नत आणि त्याच्या डोक्यावर सावली असते,."
उत्तर " जिसके सर हो इश्ककी छांव, पाँव के नीचे जन्नत होगी."
तुमच्यासाठी पहिले कोडे खालीलप्रमाणे
"मराठी गाणे - मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठीची पाककृती बनवण्यासाठी ओल्या वेळेला फोडणी द्यावी. "
सांगा पाहू कोणते गाणे आहे ते आणि खेळ चालू करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका माबोकराला ग्रीन टी खूपच
एका माबोकराला ग्रीन टी खूपच आवडत असतो. त्याच्या पत्नीला पण खूपच आवडायला लागतो- म्हणजे तो आणि ग्रीन टी सुद्धा. ते दोघंही एकमेकांना पहिले प्रेम तर ग्रीन टी म्हणजे दुसरे प्रेम म्हणत असतात.
पण एकदा ते रहात असतात तिथे ग्रीन टी चा तुटवडा येतो.
मग हे दोघे त्याचं रेशनिंग करतात, रोज फक्त एकदाच प्यायचा आणि कोणीच चिटिंग करायचं नाही.
एकदा ती बाहेर गेली असताना याला रहावत नाही, तो दुसरा ग्रीन टी बनवतो आणि हॉल मध्ये येऊन पहिला घोट घेणार एवढ्यात दारात किल्ली घातल्याचा आवाज येतो. तो पटकन ग्रीन टी सोफ्याखाली लपवून निर्विकार चेहरा करतो.
ती आत येते आणि एका श्वासात ती काय झालंय ते ओळखते आणि त्याला उद्देशून हे गाणं म्हणते.
हिंदी ?
हिंदी ?
लपविलास तू हिरवा चा, फा,
लपविलास तू हिरवा चा, फा, सुगंध त्याचा छपेल का?
कोडं मस्त रचलंस मानव.
भारी कोडं होतं. मामी मस्त
क्या बात है मामी !
क्या बात है मामी !
_/\_
_/\_
बॅंग ऑन मामी.
बॅंग ऑन मामी.
आणि पुढे ’प्रीत लपवुनी लपेल का” यासाठी ग्रीन टी दोघांचेही दुसरे प्रेम केले होते.
लपविलास तू हिरवा चा, फा,
लपविलास तू हिरवा चा, फा, सुगंध त्याचा छपेल का?..
मला वाटलेलं की हे मिसेस फारएंड, फारएंड ला म्हणत आहेत !!!
(No subject)
आंबट गोड कोड्यात तशीच कल्पना
आंबट गोड कोड्यात तशीच कल्पना केलेली आहे.
ओह्ह, येस. मानव, पुन्हा
ओह्ह, येस. मानव, पुन्हा वाचल्यावर लक्षात आले.
आहे कुठे पण फा?
धमाल आहे हे.
आहे कुठे पण फा? >>>
मी पण आहे अधूनमधून इथे आणि वाचतोय ही कोडी पण पटकन उत्तरे सुचलेली नाहीत
नवीन कोडं - जरा सोपं -
लपविलास तू हिरवा चा, फा, >> फार भारी होतं हे. कोडं आवडलं.
त्याच्या पत्नीला पण खूपच आवडायला लागतो- म्हणजे तो आणि ग्रीन टी सुद्धा. >> हे मी 'मान गए| किसे? आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनों को'च्या चालीत वाचलं.
नवीन कोडं - जरा सोपं -
एक अगदी लहान मुलगी मामींचा हा धागा वाचते आणि ठरवते की माटुंग्याच्या या बाजारातून ही वस्तू आणायचीच. बाजारात गेल्यावर तिला प्रश्न पडतो की आपण आणलेले पैसे नक्की पुरतील ना? कारण सणासुदीच्या काळात इथे भलती महागाई असते म्हणे. ती एका दुकानदाराकडे जाते आणि त्या वस्तूकडे हात दाखवून विचारते की ही कितीला देणार? तर तो किंमत सांगण्याऐवजी तिलाच म्हणतो की तुमचा काय अंदाज आहे? हा संवाद एका हिंदी गाण्यात चालतो.
हार कैसा है जनाब का?
हाल (हार) कैसा है जनाब का?
क्या खयाल है आप का?
बरोबर मानव
बरोबर मानव
जिया, प्रियंवदा आणि
जिया, प्रियंवदा आणि प्रियंवदेचा भाऊ सगळे लहानपणापासूनचे दोस्त. पुढे मोठ्या झाल्यावर जि आणि प्रि ला एकमेकींबद्दल प्रेम निर्माण होतं. पण दोघीही लाजाळू. शिवाय ही भावना नक्की काय आहे हे ही त्यांना अजून क्लियर नसतं. प्रियंवदेच्या आईला साधारण संशय असतो पण नक्की एकमेकींशी त्या याबाबत बोलल्या आहेत, 'प्यार का इजहार' केला आहे की नाही हे कळत नसतं. त्या आपल्या मुलाला या बद्दल विचारतात तेव्हा तो 'हे' गाऊन आईला उत्तर देतो.
मराठी गाणं. गझल.
जिया जाने ना .... ओ रे प्रिया
चुकीच ऐकू आलेल गाणं झाले माझे उत्तर म्हणजे. त्यामुळे डिलीट केले
ये अपने बस की बात नही हेच खरे
माझीया प्रियाला प्रीत कळेना
माझीया प्रियाला प्रीत कळेना (मा जिया प्रियाला प्रीत कळेना)
बरोबर वाटतेय कवीन
बरोबर वाटतेय कवीन.
बरोबर वाटतंय. शिवाय पुढच्या
बरोबर वाटतंय. शिवाय पुढच्या ओळीत एक मायबोलीकर गाऊन सांगतात की प्रियंवदेच्या भावाच्या आधीच्या ओळीतला राग आणि माझ्या आत्ताच्या गाण्यातला राग हे दोन वेगळे आहेत.
बरोबर कविन. शाब्बास!
बरोबर कविन. शाब्बास!
पुढच्या ओळीत एक मायबोलीकर
पुढच्या ओळीत एक मायबोलीकर गाऊन सांगतात की प्रियंवदेच्या भावाच्या आधीच्या ओळीतला राग आणि माझ्या आत्ताच्या गाण्यातला राग हे दोन वेगळे आहेत. >>>
Pages