Submitted by संयोजक on 20 September, 2023 - 02:43
मायबोलीकरांनो, या खेळात संयोजक टीम तुम्हाला पहिले कोडे देतील त्यावरून तुम्हाला गाणे कोणते आहे ते ओळखून त्याची एक ओळ किंवा दोन ओळी लिहायच्या आहेत. मराठी किंवा हिंदी कोणतीही गाणी चालतील. कोड्याच्या सुरुवातीला फक्त तसे नमूद करावे. जो गाणे ओळखेल त्याने पुढचे कोडे द्यायचे आहे. जर त्या आयडीला कोडे सुचत नसेल तर दुसऱ्या कोणीतरी कोडे द्यावे.
उदा. "हिंदी गाणे- एका माणसाने प्लेटमधील पाव उचलला तर त्याखाली लिहिलेले असते जन्नत आणि त्याच्या डोक्यावर सावली असते,."
उत्तर " जिसके सर हो इश्ककी छांव, पाँव के नीचे जन्नत होगी."
तुमच्यासाठी पहिले कोडे खालीलप्रमाणे
"मराठी गाणे - मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठीची पाककृती बनवण्यासाठी ओल्या वेळेला फोडणी द्यावी. "
सांगा पाहू कोणते गाणे आहे ते आणि खेळ चालू करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चहा आणा, चहा आणा असे सारखे
चहा आणा, चहा आणा असे सारखे म्हणुनही कोणी चहा आणत नाही. खूप वेळ गेल्यावर शेवटी कोणीतरी चहा पोस्ट करतं. तेव्हा
"आला बुवा हा एकदाचा चहा असे म्हणुन पुढे चहा पोस्ट करणाऱ्या व्यक्तीस कृतज्ञता व्यक्त करण्यास"
माबोकर हे गाणे म्हणतो. (मराठी)
च आणि हा एकत्र कि आधीच्या
च आणि हा एकत्र कि आधीच्या शब्दाचे शेवटचे आणि पुढल्या शब्दाचे पहिले अक्षर ?
ग्रामीण चहा. आणि कृतज्ञता
ग्रामीण चहा. आणि कृतज्ञता घुमते.
ग्रामीण चहा = गावचा?
ग्रामीण चहा = गावचा?
या गाव चा त्या गाव चा,
या गाव चा त्या गाव चा,
अमका नाही आला
तमक नाही मला
कशी मी नाचू ?
नाच गं घुमा
https://www.youtube.com/watch?v=GTc6E3IVSuc
बरोबर वाटतं आहे.
बरोबर वाटतं आहे.
नाच गं घुमा = कृतज्ञता घुमते? हे संत्र सोलून द्या.
ग्रामीण चहा = चा एवढे बरोबर
ग्रामीण चहा = चा एवढे बरोबर आहे.
आवाज घुमतो: हिल स्टेशनला असतो ना एखादा पॉइंट, तिथे कसा घुमतो, तसा.
क्रियापद नाहीय हव्या तेवढ्या गाण्याच्या सुरवातीच्या भागात.
अखेर चा हा तुला दंडवत ('तुला
अखेर चा हा तुला दंडवत ('तुला दंडवत' हे शब्द घुमतात त्या गाण्यात)
श्रद्धा आणि मानव, दंडवत घ्या.
श्रद्धा आणि मानव, दंडवत घ्या.
बिंगो श्रद्धा.
बिंगो श्रद्धा.
खरं तर त्या गाण्यात आवाज घुमण्याची आयडिया माबोवरूनच आली असावी.
चहा आल्यावर, मागण्याऱ्या व्यक्तीने वरील प्रमाणे पोस्ट केली की त्यातील शेवटचे दोन शब्द कॉपी करून बाकीचे:
तुला दंडवत +१
तुला दंडवत +१
.
.
श्रद्धा आणि मानव, दंडवत घ्या.
श्रद्धा आणि मानव, दंडवत घ्या. >> +१
आता घुमणारी कृतज्ञता ऐकू आली बरोबर
ओह ओके मानव.
ओह ओके मानव.
मी गुगलला विचारले असता त्याने कृ म्हणजे करणे असे सांगितले. तज्ञता = प्राविण्य.
या गाण्यात घागर घुमवतात. बायका ही घुमतात. म्हणून हे असावे असे वाटले.
कोड देणारे आणि उत्तर सांगणारे
कोडं देणारे आणि उत्तर सांगणारे दोन्ही ग्रेट! दंडवत! हा हा हा
पुण्यातील एक प्रसिद्ध
पुण्यातील (अस्सल पुणेकरांनी पुण्याजवळील असे वाचावे) एक प्रसिद्ध मिसळवाले ग्राहकांचा राग राग करू लागतात. परिणामी ग्राहक कमी कमी होत जातात तसे वैतागुन ते अधिकच राग राग करू लागतात आणि मिसळ बंद पडते. अर्थात त्यांची ही राग वैताग येण्याची फेज टेम्पररी असते. थोड्याच दिवसात त्यांना आपली चूक लक्षात येते.
पण आपण लोकांचा एवढा राग केला त्यांच्या समोर परत जाण्याची त्यांना भीती वाटु लागते.
शेवटी ते एका भल्या बाबा कडे जातात. ते विचारतात काय समस्या आहे? हे सांगतात.
तेव्हा अच्छा कळलं या अर्थी उद्गार काढून ते त्याला प्रेम कर, लोकांना घाबरू नको असा सल्ला देतात गाण्यातून, हिंदीत.
Hmmm (हम) प्यार कर नेवाले
Hmmm (हम) प्यार कर नेवाले (नेवाळे मिसळवाले)
दुनिया से ना डर नेवाले
Too good!
ओहो! वॉव!
ओहो! वॉव!
मानव, ही दोन्ही कोडी निव्वळ अप्रतिम आणि डिकोडिंगसाठी श्र ला एक दंडवत आणि एक मिसळ, एक मिसळ, एक मिसळ...........
मामी +१ महान!
मामी +१
महान!
एका मुलीचे एका मुलावर प्रेम
एका मुलीचे एका मुलावर प्रेम असते. दोघेही 'ए' वर्गात शिकत असतात.
नंतर मुलाला कमी मार्क पडतात म्हणून त्याला पुढच्या वर्षी 'बी' वर्गात टाकतात. तर ती मुलगी हे कळल्यावर कुठले गाणे म्हणेल?
मेरा सुंदर सपना बीत गया
मेरा सुंदर सपना बीत गया
बाकी लोक परीक्षेत फारच माती खाऊन जी तुकडीत जातात
बेदर्द जमाना जीत गया
ह.पा. बरोबर... धन्यवाद.. !!
ह.पा. बरोबर... धन्यवाद.. !!
जीत गया ची अॅडीशन मस्तच...
एक मुलगा असतो, त्याच्याकडे
एक मुलगा असतो, त्याच्याकडे डॉक्टरी सुपरपॉवर आणि हात लावेल त्याला राख करण्याची पावर अशा दोन पावरी असतात. लोकांना हाडं मोडल्यावर त्याच्याकडे जायची इच्छा असते, पण तो नक्की कुठली पावर वापरेल ह्याबाबत त्यांना शंका असते. शेवटी कुणीतरी तिकडे जाऊन अनुभव घेतो आणि त्याच्या डॉक्टरी पावरची ग्वाही देतो.
हिंदी गाणे
गाणं चित्रपटातलं नाही,
गाणं चित्रपटातलं नाही, जाहिरातीतलं आहे.
मुलाचं नाव जीवन.
तंदुरूस्ती की रक्षा करता है
तंदुरूस्ती की रक्षा करता है लाईफ बॉय?
बरोबर.
बरोबर.
तन - दुरुस्ती की रक्षा (राख) करता है लाईफ बॉय? (इथे की मराठीत वाचावं. हे की ते? अश्या अर्थाने. )
लाईफ बॉय है जहाँ तन दुरुस्ती है वहाँ
जाहिरात आहे हे सांगितल्यावर
जाहिरात आहे हे सांगितल्यावर ओळखता आलं
नाहीतर वाट्टेल ते गेसवर्क चालू होतं 
मस्तं
मस्तं
जाहीरात आहे हे मिसलं मी.
गुड वन rmd
गुड वन rmd
श्र भन्नाट ओळखलं. रमड भारीच.
श्र भन्नाट ओळखलं.
रमड भारीच.
भारी हपा आणि rmd
भारी हपा आणि rmd
हपा आणि रमड ... बेस्ट!
हपा आणि रमड ... बेस्ट!
Pages