चला पृथ्वीवरचे प्रदूषण कमी करूया !

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 November, 2021 - 06:02

क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग याबद्दल काहीच माहीत नाही असा मनुष्य विरळाच. येत्या काळात मनुष्यजातच नष्ट होण्यापासून वाचवायची असेल वा किमान तो मृत्यु लांबवायचा असेल तर आपण सर्वांनी आपापल्या परीने यात योगदान देणे गरजेचे.

पण बरेच लोकांना ही एक अशी वैश्विक समस्या वाटते की जी देशांच्या सरकारने धोरणे आणि कायदे करूनच सोडवता येईल. आपण रोजच्या दैनंदिन आयुष्यात जे वर्तन करतो त्यातले काय आणि किती प्रदूषणास हातभार लावते आणि ते कसे आणि कुठवर कमी करता येईल हे आपल्यापैकी बरेच जणांना ठाऊक नसते. जसे की फटाके आणि वाहनांपासून प्रदूषण होते हे सर्वांना चटकन कळते. पण मांसाहार देखील कार्बन फूटप्रिंट वाढवतो हे सगळ्यांनाच ठाऊक नसते. मलाही हल्लीहल्लीच कळले. त्यातही मांसाहारच्या तुलनेत मत्स्याहार प्रदूषण वाढीस कमी हातभार लावतो हे कळले. त्यामुळे आता मला मांसाहाराचा पुर्ण त्याग शक्य नसेल तर मी किमान मत्साहाराचा वाटा वाढवू शकतो. एसी हवाच ही माझी बिलकुल गरज नाही तर मी त्याचा वापर माझ्यापुरता तरी पुर्ण बंद करू शकतो. आणि फॅमिलीला समजावू शकतो. गाडीबाबतही हेच लागू. जर आजवर मी गाडीशिवाय पब्लिक ट्रान्सपोर्ट, सायकल आणि देवाने दिलेले हातपाय वापरून जगलो आहे तर पुढेही निव्वळ ऐपत आहे म्हणून स्टेटस दाखवायला गाडी घ्यायचे टाळू शकतो. मुले आज लहान आहेत. त्यांना फटाक्यांची आवड आहे. ते लगेच जोरजबरदस्तीने बंद करणे पटत नाही तर हळूहळू वर्ष दर वर्ष प्रमाण कमी करत ते लवकरच बंद करू शकतो. त्यांना त्याजागी दुसरे पर्याय देऊ शकतो. सोसायटीतील मोठ्यांना विनंती करू शकतो की तुम्हीही फटाके वाजवू नका जेणेकरून लहानांना तो मोह होणार नाही...

अश्याच विचारांची आणि कल्पनांची देवाणघेवाण करायला हा धागा. आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो याची चर्चा करायला हा धागा. आपण याबाबत काय केले आहे हे अनुभव शेअर करायला हा धागा.

सर्वांनाच सारेच जमणार नाही. प्रत्येकाची जीवनशैली आणि आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे अमुकतमुक आम्हाला जमते तर तुम्हाला का नाही असे बोटं ठेवण्यात अर्थ नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने सामाजिक भान राखले तरी एकूणात पडणारा फरक मोठा राहील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुझावू शकेना विधाता तयाला. आता हे वाचा.
काही वर्षांपूर्वी दिल्लीला भारत विरुध्द श्री लंका क्रिकेटचा सामना चालला होता. हिवाळ्याचे दिवस होते. दिल्लीचे पोल्युशन परमोच्च कोटीला पोचले होते. श्री लंकन खेळाडूंना त्रास होऊ लागला. त्यांनी सामना थांबवण्याची विनंती केली. कोहलीने ती धुडकावून लावली.
"आमच्या खेळाडूंना काही त्रास होत नाहीये. तुम्हाला कसा होतोय?"

प्रयोग करताना पाण्याचे तापमान हळूहळू वाढवून ३५ वर्षाने १०० अंश से. करताना पाण्यात तेलाचे प्रमाण वाढवत नेउन ५०% आणि पुढील ३५ वर्षात १००% , आणि तपमान २०० अंश से करावे. म्हणजे हवे तेव्हा फ्राईड बेडूक मिळतील.
ते चीनला एक्स्पोर्ट करता येतील.
दुसऱ्या पातेल्यात हाच प्रयोग बोंबील वगैरे माशांवर करावा, आपल्याला हवे तेव्हा फिश फ्राय मिळेल.

ढोबळ विचार केला तरी 60 वी पिढी 35 वर्ष नंतर असेल .इतक्या कमी वेळात मोठा बदल होणे शक्य च नाही.
बरोबर, प्रतिगामी बेडके इतक्या कमी वेळात बदलूच शकत नाही किंवा कधीच बदलू शकत नाहीत.

पुरोगामी आणि प्रतिगामी ह्यांचा अर्थ भारतात तरी खूप वेगळा आहे.
जे व्याखे नुसार पुरोगामी म्हणून घेतात
ते प्रतिगामी लोकं न पेक्षा जास्त कट्टर आणि हट्टी असतात.
आणि प्रतिगामी ज्यांना भारतात समजले जाते ते बदल स्वीकारत असतात.
पुरोगामी देव मानत नाहीत हेच एक करण्यासारखे काम ते करतात.
बाकी काही करत नाहीत.

Covid नी पूर्ण जगाला वेठीस धरले होते.
अजून तो व्हायरस आक्रमक असता तर जग हादरून गेले असते.
स्वतःला वाचवण्याचा कोणताच मार्ग शिल्लक राहिला नसता
विज्ञान,डार्विन,संशोधन सर्व पुस्तकात च राहिले असते .
बरा च न होणारा tb आता लोकांना होत आहे.
Antibiotics ल पण दाद न देणारे आजार आजार वाढू लागले आहेत.
अजून तरी ह्या वर काहीच उपाय नाही.
Covid पासून heart attack चे प्रमाण वाढले आहे.
कोणाला पण अटॅक येत आहे.
लसी चा परिणाम का कविड च काहीच माहीत नाही.
त्या मुळे आपण लय बुध्दीमान आहे आणि निसर्गावर पण मात करू हा फक्त भ्रम आहे.
दोन वर्षे पावूस नाही पडला तर .
माणसाकडे तडफडून मरण्या शिवाय कोणताच उपाय नाही.
आधुनिक ज्याला आपण म्हणतो ते विज्ञान पण उपयोगी पडणार नाही .
माणूस आहे त्याच पातळीवर आहे.
तो प्रगत झाला वैगेरे सर्व भ्रम आहे

आग्य 1990 ..
तुम्ही संजय सोनावणे ह्यांचा लेख वाचा.
पुरोगामी आता अस्तित्वात च नाहीत .
हे पटेल तुम्हाला.
सर्व प्रतिगामी च झाले आहेत मग ते
डाव्या विचार सरणी चे भारतीय राजकीय पक्ष आणि संघटना.
आंबेडकरी विचारांचे राजकीय पक्ष आणि संघटना ....
ब्राह्मणी विचाराचे राजकीय पक्ष आणि संघटना
अशा अनेक संघटना
उजव्या विचारच राजकीय पक्ष आणि संघटना
पुरोगामी आहेत असा फक्त भास होतो पण ते सर्व राजकीय पक्ष आणि संघटना प्रतिगामी च आहेत
सर्व संघटना,राजकीय पक्ष आणि त्यांचे पाठीराखे हे कट्टर प्रतिगामी च आहेत..
म्हणून तर काँग्रेस जावून bjp आली तरी व्यवस्थेत काडी चा फरक पडत नाही.
कम्युनिस्ट जावून bjp आली तरी व्यवस्थेत काडी चा फरक पडत नाही.
आता bjp जावून काँग्रेस आली तरी काही ही फरक जाणवणार नाही

कम्युनिस्ट जावून bjp आली तरी व्यवस्थेत काडी चा फरक पडत नाही.
आता bjp जावून काँग्रेस आली तरी काही ही फरक जाणवणार नाही >>>
कारण
बीजेपी हा कॉंग्रेसचा डू आयडी आहे.

व्याख्या जशी आहे तसा राजकीय पक्ष आणि संघटना दाखवा जी पुरोगामी आहे
आणि 100 करोड घेवून जा असे आव्हान केले तरी एक पण पुरोगामी राजकीय पक्ष आणि संघटना भारतात तरी मिळणार नाही
.ढोंगी पायली ल पसा भर आहेत.

100 करोड रुपयात फक्त दोन आमदार/खासदार येतात.
तेवढ्यासाठी स्वतःला पुरोगामी सिद्ध करायला गेले तर इतर मतदार नाराज होऊन 100 आमदार / खासदारांचा फटका बसेल. तेव्हा हे आव्हान स्वीकारणार असे वाटत नाही. मतदार असते तर सिद्ध करण्याचा आटापिटा करतील त्यासाठी काहीपण करतील.

हे आव्हान स्वीकारणारा प्रामाणिक पुरोगामी पक्ष आणि संघटना भारतात अस्तित्वात च नाहीत.

बाप रे ! काय ही महागाई. हमारे जमानेमे ५ करोड मध्ये एक जुडी येत होती. नंतर ५ करोड मध्ये एक जोडी यायला लागली पण आता म्हणजे कहर झाला आहे. मोठे लोक म्हणतात कि युक्रेन युद्धा मुले भाव कडाडले आहेत.

आता मागे फिरायचे मार्ग बंद झाले आहेत..असे का लिहिले आहे.
१) जगाची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. नैसर्गिक वातावरण असते तर इतकी लोक संख्या वाढणे केवळ अशक्य होते
२) इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांचे पोट भरायचे असेल तर..कीटक नाशक,रासायनिक खत ह्याला पर्याय नाही .
म्हणजे रासायनिक प्रदूषण होणारच ते थांबवता येणार नाही जर थांबवले तर उपास मारी नी लोक मरतील
३) आधुनिक उपकरण.
मोबाईल,कॉम्प्युटर, ह्यांना सेमी कंडक्टर लागतात आणि त्याची निर्मिती करण्या साठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी आणि वीज लागते.
प्रदूषण होणारच ते थांबवता येत नाही.
४) फास्ट वाहतूक ही गरज आज तरी आहे.
विमान, रेल्वे, गाड्या ह्यांना इंधन लागते त्याचे ज्वलन होते .प्रदूषण होते..
ते थांबवणे आज तरी शक्य नाही..
ह्या सर्व गरजेच्या सोयी झालं

५) ऐश करण्यासाठी.
चार माणसाचे कुटुंब असेल तरी ३० फ्लोअर ची इमारत बांधतात..सिमेंट,लोखंड लागते ते निर्मित करण्याच्या process मध्ये प्रदूषण होते..हे थांबवता येईल..
६) विविध अवकाश मोहिमा ,युद्ध, ह्या मध्ये सरळ पृथ्वी च्या वातावरणातील वरच्या थरात प्रदूषण होते ..ते कसे थांबवणार.
७) प्रचंड लोकसंख्येच्या फालतू गरजेसाठी रसायनी प्रक्रिया करून वस्तू बनवल्या जातात..त्याचे वेस्ट हवेत आणि पाण्यात जाते ..हे थांबवू शकतो पण कोण थांबवणार.
८)एसी, heater, जेवण बनवणे ह्या साठी इंधन ज्वलन होते आणि वेस्ट पदार्थ पण तयार होतात..ते प्रदूषण करतात.
ते कसे थांबवणार.
माणूस अंतिम घटका mojel तेव्हाच ना इलाज म्हणून हे सर्व थांबेल..पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल

हे असे वाचले की असे वाटते आपण एसी गाडी मोबाईल वापरायचे सोडून, चार फटाके वाजवायचे सोडून, विद्युत उपकरणांचा वापर आपल्यापुरते कमी करून असा काय मोठा तीर मारणार आहोत. उद्याचे मरण परवावरही ढकलले जाणार नाही. ते उद्याच नशीबात लिहिले आहे.
संघटीत पातळीवर जगभरात काही होईल तरच अर्थ आहे. एकट्यादुकट्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत Sad

थेंबे थेंबे तळे साचे
थेंबाचे होऊ न द्यावे बाष्पीभवन.

अशा नकारात्मक विचारांनी आपल्याच दोन थेंबात अंतर वाढले तर थेंबांचे बाष्पीभवन होऊन तळे काय चुल्लूभरही साचणार नाही.

संघटित प्रकार नी आणि कोणीच अपवाद नाही.
अशा प्रकारे जागतिक स्तरावर निर्णय घेतले जातील आणि जग त्याची काटेकोर पण अमलबजावणी करेल तेव्हाच प्रदूषण वर मार्ग निघेल.
भारताने सर्व नियम पाळले आणि पाकिस्तान नी पाळले नाहीत तरी प्रदूषण कमी होवू शकत नाही
प्रदूषणाला देशाच्या सीमा अटकाव करू शकत नाहीत.

ह्या धाग्यावर बोकलत ह्यांची एक प्रतिक्रिया.

वेड्या नो पृथ्वी प्रदूषण मुक्त करण्याचा नाद सोडुन ध्या .
स्वतः पण अडचणीत याल आणि दुसऱ्यांना पण अडचणीत आणाल.
ही बोकलात ह्यांची

ही एकमेव योग्य प्रतिक्रिया आहे.अतिशय मार्मिक प्रतिक्रिया आहे

(सामान्य,अतिसामान्य,माध्यम वर्गीय ,ह्या लोकांनी .
पृथ्वी प्रदूषण मुक्त करण्याच्या नादाला लागू नये.
नाही तर प्रदूषण कमी होणारच नाही पण ह्या सर्व वर्गातील लोकांचे जगणे अती मुश्कील होईल.) ही माझी प्रतिक्रिया.

अतिशय मार्मिक कॉमेंट boklat ह्यांनी केली आहे

व्यावहारिक विचार केला तर लगेच जाणवेल उपाय म्हणून जे निर्णय घेतले जातील त्याचे बळी हे समाजातील कमजोर घटक च असतील .
.त्या मुळे पृथ्वी प्रदूषण मुक्त करण्याच्या चा उच्च शोक पाळू नका.
.माणूस आता असा पण पृथ्वी लं ( पृथ्वी ल म्हणजे पृथ्वी वरील मानव जात आणि मानव जात ज्या वर अवलंबून आहे त्या वनस्पती आणि प्राणी,आणि हवामान असा घ्या .पृथ्वी चे अस्तित्वच धोक्यात आणायची कुवत माणसाकडे कधीच असणार नाही.माणूस अतिशय किरकोळ प्राणी आहे पृथ्वी शिल्लक राहील च ती नाही नष्ट होणार माणसं मुळे )

वाचवू शकणार नाही .

सामान्य लोकांनी शांत राहावे आणि स्वतःचा फायदा फक्त बघावा
सामान्य लोकांना स्वतःचे हीत स्वतचं जपावं लागणार आहे.
सरकार ,संशोधक, तज्ञ हे कधीच सामान्य लोकांचे हीत जपणार नाहीत

ह्या धाग्याचे नाव वाचताना नेहेमी "चला पृथ्वीला प्रदक्षिणा मारुया" असे वाचले जाते. काय करावे?

Ohh हे खरे आहे का?
वरच्या लिंक मधून...

Permission Granted To Use Loudspeakers Until Midnight During Ganesh Festival In Mumbai
The District Collector has allowed the use of speakers till 12 in the midnight on the three days of Ganeshotsav this year.

चांद्रयानचा AC २टायर तिकीट बुकिंग करुन हरितालीका ते चतुर्दशी तिकडेच राहणे हां पर्याय बरा. दुरून डोंगर सण साजरे करुन प्रदूषण आवाज कसला कसला त्रासच नको तो !

एक विनोदी रीळ आहे

मुलगा - अरे आज चंद्रयान निकल गया..
मुलगी- अच्छा , जा कहा रहा है Happy

Pages