Submitted by sneha1 on 6 June, 2018 - 10:45
नमस्कार,
मला आधार कार्ड बद्दल माहिती हवी आहे. एन आर आय लोकांना हे कार्ड काढणे मस्ट आहे का? असल्यास कसे काढावे? भारतात जाऊनच काढावे लागते का?
धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमचा ओ टी पी माझ्या फोनवर
त्यापेक्षा... तुमचा ओ टी पी माझ्या फोनवर पाठवा, आणि पासवर्ड पण मला द्या मग मीच चालवतो तुमचे खाते...
(टेक्स्ट साठी फारसा खर्च येत नाही. मला ६/७ महिन्यात १५० रुपये खर्च आला... फक्त कुणी त्या नंबर वर फोन केला तर उचलत नाही).
>>> वदतोव्याघ्यात धन्यवाद!
>>> वदतोव्याघ्यात
धन्यवाद!
मला Citibank व Axis Bank ,
मला Citibank व Axis Bank , NRE/NRO साठी US ला text msgs / OTP etc. येतात. पण Bank Of Maharashtra चा Internet banking / Text etc technology बाबत सावळा गोन्धळ आहे. ते अकाउंट बन्द करणार आहे.
आधार कार्ड आता पर्यन्त लागले नाही. प्रॉपर्टी साठी पण नाही. इकडे येण्या आधीचे पॅन कार्ड होते , त्याने काम झाले. US passport च्या Xerox copies दिल्या.
Citibanke ला KYC साठी पॅन कार्ड व US Passport दिला. US DL दिले होते पण त्यान्ची system confuse झाली.
इथला SSN मात्र दिला. जानेवारीत Tax statement येते tax returns करता.
माझ्या परिचयातील एक जण
माझ्या परिचयातील एक जण अमेरिकेत 50वर्षे आहेत, लहानपणीच इकडे आले होते भारतातून.
त्यांच्या आईची fd होती भारतात. आईच्या मृत्युपत्रानुसार ती यांना आता nominate आहे. त्यांना पॅन कार्ड काढायला सांगितले बँकेने. इथे कोणाला माहिती आहे का अमेरिकेतून पॅन कार्ड कसे काढता येईल?
https://www.tin-nsdl.com
https://www.tin-nsdl.com/services/pan/foreign-citizen.html
https://www.pan.utiitsl.com/PAN/newAA.do
धन्यवाद भरत. माझा बी झाला आज
धन्यवाद भरत. माझा बी झाला आज
इथे विचारले आणि मग गूगल केले!
सोपी आणि सरळ पद्धती दिसते.
आज ऐकले की आधार कार्ड आणि पॅन
आज ऐकले की आधार कार्ड आणि पॅन लिन्क करावे लागेल, नाही तर नवीन पॅन कार्ड काढावे लागेल. कोणाला माहिती आहे का? माझ्याजवळ आधार कार्ड नाही. अशा वेळी काय करावे लागेल?
नाही तर नवीन पॅन कार्ड काढावे
नाही तर नवीन पॅन कार्ड काढावे लागेल. >> मग ते नवीन पॅन कार्ड परत आधार कार्डला लिंक करायला सांगतील.
आधार कार्ड काढा आणि आहे ते पॅन कार्ड त्याला लिंक करा.
आता १००० रु लागतात लिंक
आता १००० रु लागतात लिंक करायला. ३० जुन शेवटची तारिख होती म्हणे. मी हल्लीच दोघा तिघांचे करुन दिले. दंड भरावा लागला. नियमित रिटर्न फाईल करणार्यांचे आपोआप लिंक झालेले आहे.
आता मृत्यु झाल्यावर अंत्यसंस्काराच्या वेळी आधार कार्ड द्यावे लागते, ते लगेच कँसल केले जाते. त्यावर काही सरकारी मदत वगैरे येत असेल तर ती आपोआप रद्द होते. गावात ग्रामपंचायतीने अजुन असे नियम केलेले नसले तरी शहरांमध्ये मात्र स्मशानभुमीत कार्ड मागतात.
आधारच्या वेबसाईटवर अॅड्रेस प्रुफ म्हणुन काय काय चालेल याची भलीमोठी यादी दिलेली असली तरी प्रत्यक्षात त्यातले बरेच काही चालत नाही. मी ग्राम पंचायतीकडुन रहिवासाचा दाखला घेऊन आधारवरील पत्ता बदलण्यासाठी केलेला ऑन्लाइन अर्ज नामंजुर झाल्यावर आधार केंद्रातुन ही माहिती मिळाली.
कित्येक नियम बदललेले आहेत, आधी जे चालत होते ते आता चालत नाही. मला रहिवासी दाखल्यावर गावात बँक अकाऊटही उघडता आले नाही. काही वर्षांपुर्वी हा दाखला चालत होता.
त्यामुळे आम्ही केले होते त्यामुळे आताही होत असणार याला फारसा अर्थ उरलेला नाही.
आज ऐकले की आधार कार्ड आणि पॅन
आज ऐकले की आधार कार्ड आणि पॅन लिन्क करावे लागेल, नाही तर नवीन पॅन कार्ड काढावे लागेल. कोणाला माहिती आहे का? माझ्याजवळ आधार कार्ड नाही. अशा वेळी काय करावे लागेल? >>>
नवीन पॅन काढु नये तो कायद्याने गुन्हा आहे. NRI कडे आधार नसेल तरी चालते. बिना आधार कार्ड ने NRI/OCI रिटर्न भरु शकतात. भारतात आला आणि भारतातले अॅड्रेस प्रुफ असेल तर आधार कार्ड काढुन घ्या . भारतातला पत्ता नसेल तर आधार मिळत नाही.
निराधार रेसिडेण्ट्स ऑफ इंडीया
निराधार रेसिडेण्ट्स ऑफ इंडीया.
<< भारतात आला आणि भारतातले अ
<< भारतात आला आणि भारतातले अॅड्रेस प्रुफ असेल तर आधार कार्ड काढुन घ्या . भारतातला पत्ता नसेल तर आधार मिळत नाही. >>
------- आधारासाठी अर्ज करते वेळी, मागच्या १२ महिन्यांतले किमन १८२ दिवस भारतात रहाणे गरजेचे आहे.
The SC, in its judgement,
The SC, in its judgement, upheld the legal validity of linking Aadhar Card with PAN but provided partial relief, where the SC declared that the non-obtaining of an Aadhaar number would not lead to PAN becoming inoperative.
>>आज ऐकले की आधार कार्ड आणि
>>आज ऐकले की आधार कार्ड आणि पॅन लिन्क करावे लागेल, नाही तर नवीन पॅन कार्ड काढावे लागेल. कोणाला माहिती आहे का? माझ्याजवळ आधार कार्ड नाही. अशा वेळी काय करावे लागेल?>>
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/verifyYourPAN/1
या दुव्यावर जावून पॅन ऑपरेटिंग आहे की नाही ते चेक करता येते. आमच्याकडेही आधार नाही. पॅन कार्ड काढले तेव्हा सगळे सोपस्कार अमेरीकेतून केले होते. इथला पासपोर्ट दिला होता. त्यामुळे मूळचे भारतीय-परदेशी नागरीक अशी नोंद झाली होती त्यानुसार पॅन ऑपरेटिंग आहे का ते आत्ताच चेक केले.
भारतीय नागरीक- परदेशात वास्तव्य असे असल्यास पॅन कार्डची कॉपी आणि पासपोर्टची कॉपी - नॉन रेसिडेंट चा काळ दाखवण्यासाठी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिल्यावर ते तसा बदल करतील आणि पॅन पुन्हा अॅक्टिव होईल.
सगळ्यांना धन्यवाद!
सगळ्यांना धन्यवाद!
सोनाली,
इथे राहून आधार काढणे शक्य नाही, तिथल्या शॉर्ट स्टे मधे पण होणार नाही ते.
साधना, खरे आहे. नियम फार लवकर बदलत असतात हे.
स्वाती, पॅन आधीपासून च आहे, पण आधार कधी काढलेच नाही.
मला वाटले होते ही बातमी वाचून की आधार नसल्यास आहे त्या पॅन कार्डला अडचण येईल, तसे नाही म्हणजे
आता मृत्यु झाल्यावर
आता मृत्यु झाल्यावर अंत्यसंस्काराच्या वेळी आधार कार्ड द्यावे लागते, ते लगेच कँसल केले जाते. त्यावर काही सरकारी मदत वगैरे येत असेल तर ती आपोआप रद्द होते.
>>>
हा नियम कधीपासून सुरु झाला? २०२२ च्या सुरुवातीला आधार मागितले नव्हते म्हणून विचारते आहे.
तसेच माणसाचे निधन झाले तरी त्या फायनान्शिअल वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करावे लागतात.
अशा वेळी आधार कॅन्सल झालेले असेल तर प्रॉब्लेम नाही का होणार? कारण आधार व पॅन जोडलेले असते.
इथे राहून आधार काढणे शक्य नाही, तिथल्या शॉर्ट स्टे मधे पण होणार नाही ते.
>>> बाहेरच्या देशातून भारतात येण्यापूर्वी आधारच्या ऑफिसची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन ठेवल्यास शॉर्ट स्टे मध्ये काम होऊ शकते. आधार ऑफिसेस अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मोजकी आहेत, मुंबईत सफेद पूल, कुर्ला इथे आहे.
अंत्यसंस्कारासाठी आधार
अंत्यसंस्कारासाठी आधार अनिवार्य असल्याच्या २०१८ पासूनच्या बातम्या आहेत.
अनिवार्य नाही असं सरकारने सांगितलं तरी मागितलं जातं. https://punemirror.com/pune/civic/aadhaar-still-compulsory-for-cremation...
डॉक्टर, इस्पितळाकडून दिल्या जाणार्या मृत्यूच्या दाखल्यात आधारचा कॉलम आहे. मनपाकडून दिल्या जाणार्या डीसीमध्येही आधार आहे.
बँकेत आधार अनिवार्य नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तरी बँका इन्सिस्ट करतात. ज्यांना काही उत्पन्न नाही अशा खातेधारकांकडे पॅन मागतात.
निवडणूक आयोग आधार आणि निवडणूक ओळखपत्र लिंक करतो आहे.
आता आधार सुरळीत पण मिळत असेल
आता आधार सुरळीत मिळत असेल अशी आशा आहे. मला स्वतःला तीन वेळा अर्ज द्यावा लागला. पहिल्या दोन वेळा टेक्निकल एरर म्हणून रिजेक्ट झालं. प्रत्येक वेळी किमान तीन दिवस वाया गेले. आताही फक्त एकाच बोटाचं फिंगर प्रिंट धड आलं आहे.
सुरुवातीला आधार साठी फोन नंबर लागत नसे. माझ्या बाबांकडे सेल फोन नव्हता आणि त्यांच्या आधारशी कोणाताही फोन लिंक नाही. आता आधार वापरून काही काम करायचं तर तुम्हांला ओटीपी येतो. माझ्या माहितीतल्या एका अतिवृद्ध व्यक्तीचं रिटर्न फोन लिंक नसल्याने ऑनलाइन फाइल होत नाहीए. पेपर वर्क करावं लागतं.
एन आर आय लोकांचे आधार कार्ड
एन आर आय लोकांचे आधार कार्ड करणे अजिबात सोपे नाही. मी माझ्या मुलीचे आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न २ वेळा केला. प्रत्येक वेळा अर्ज रिजेक्ट झाला.
तिचं birth certificate भारतातले नाही. ती minor असल्याने तिच्या नावावर कोणतीही बिले, बँक अकाउंट नाही.
शाळेतून बोनाफाईड सर्टिफिकेट मिळवले. त्यात तिचा पत्ता, ती गेली ४ वर्ष ह्या शाळेत शिकतेय अशी माहिती, तिचा फोटो असं सर्व काही होतं. तरीही अर्ज रिजेक्ट झाला.
https://uidai.gov.in/ ही वेबसाइट उघाडायला बरेचदा प्रॉब्लेम येतो. त्यांच्या कॉल सेंटरला कॉल केला तर प्रत्येक वेळेस वेगवेगळी माहिती मिळाली. एन आर आय मुलांचे आधार कार्ड होते का नाही, कसे करावे ह्यावर कोणीही नीट माहिती दिली नाही. जवळच्या आधार सेंटर ला जा असे सांगतात.
आधार सेंटर वर बसलेला माणूस सर्व कागद्पत्र अपलोड करण्याचे आणि फिंगर प्रींट स्कॅन करण्याचे काम करतो (ते ही सरळपणे नाही, त्याची मर्जी असेल तर, सिस्टीम धड चालत असेल तरच). आणि अर्ज सबमिट करतो. १-२ अठवड्याने अर्ज रिजेक्ट झाल्याचा मेसेज येतो. तो का रिजेक्ट झाला याचे कारण कोणीच देत नाही.
कोणी त्यांच्या एन आर आय मुलांचे आधार कार्ड केलं असेल तर कसं केलं, प्लीज सांगा.
NRI ना आधार लागू नाही.
NRI ना आधार लागू नाही.
Aadhaar act 2016,section 3(i).=
"Only residents of India are entitled to get aadhaar number. "
म्ह णजे आडवळणाने हे म्हटलं आहे की एनआआरआइ ना मिळणार नाही. म्हणजे तसा स्पष्ट उल्लेख act मध्ये नाही. त्यामुळे बँकवाले उगाचच मागे लागतात.
तरी कुणाला अडवले तर तसे स्पष्ट सांगा.
अंत्यसंस्कारासाठी आधार
अंत्यसंस्कारासाठी आधार अनिवार्य असल्याच्या २०१८ पासूनच्या बातम्या आहेत.
नाही. काही गैरसमज होतो आहे.
अंत्यसंस्कारासाठी लागणारा फॉर्म भरताना ते विचारतात की मयताचे दहन कोणत्या प्रकारे करायचे आहे. लाकडावर अग्नी देण्यास खर्च तीन हजारांच्या आसपास आहे. पण विद्युत/डिझेल दाहिनीसाठी रुपये दीडशे आहेत. परंतू मयताच्या पाच नातेवाईक/संबंधितांनी आधार क्रमांक फोटो कॉपी देऊन सह्या दिल्या तर सरकारी अनुदानाने दीडशे रुपयेही माफ होतात. तसे आम्ही तीन चारदा केले आहे.
जिथे ही सोयच नाही तिथे काय करणार?
(बाकी मयताचे आधार कशाला? कुठे ते दाखवून लाभ घेतो तिथे इ तपासणी असते आणि ती होत नाही आणि विषयच संपतो.)
गैरसमज? मी कोणाचं ऐकून सांगत
गैरसमज? बातमीची लिंक दिली आहे. ते अफवा पसरवताहेत का? ही एका शहराची झाली, अशा अनेक शहरांच्या आहेत.
तसंच मी कोणाचं ऐकून सांगत नाही. माझे स्वतःचे दोन अनुभव आहेत.
आधी हॉस्पिटल /डॉक्टरांनी मागितला. मृत्यूच्या दाखल्यात आधार नंबर लिहिला.
आधार स्मशानभूमीतही दाखवावं लागलं.
चार जणांचं दाखवा आणि पैसे माफ असला काही प्रकार नव्हता. मृताचंच दाखवलं.
म्युनिसिपालिटीने इश्यु केलेल्या डेथ सर्टिफिकेटमध्येही आधार नंबर आहे आणि ते घेणार्याचं आधारही बघतात.
दोन्ही ठिकाणी आधारसाठी ठरलेली जागा आहे.
माझाही स्वतःचा अनुभव आहे. आई
माझाही स्वतःचा अनुभव आहे. आई गेली तेव्हा रिलायन्स हॉस्पिटलात आधार द्यावे लागले, नंतर पार्ले स्मशानभुमीतही मागितले, तशीही ती माहिती होतीच कागदपत्रांवर.
आईचे नाव तिच्या माहेरच्या सातबारावर होते, किसान सन्मान निधी येत होता. तिचे नाव पुढच्या लिस्टीतुन आपोआप गेले, आम्ही कुठेही अर्ज केला नाही. तेव्हा मी नेटवर शोधले की माणुस गेला की आधार कार्डाचे काय होते.
मृत्युदा़हल्यासाठी अर्ज करताना करणार्याचे आधार लागते, २०१७ मध्ये अर्ज केला होता तेव्हा आधार नंबर लागला होता.
Only residents of India are
Only residents of India are entitled to get aadhaar number.>> पण लहान मूल जे भारतीय नागरिक नाही, ते रेसिडंट असल्याचा काय पुरावा द्यायचा? हे कोणीच सांगत नाही. अजून १-२ वर्षातच मुलीला PayTm/ Google Pay वगैरे वापरावे लागेल. तेव्हा तिचे KYC करताना आधार कार्ड लागेल.
https://uidai.gov.in/en/291
https://uidai.gov.in/en/291-english-uk/faqs/your-aadhaar/nri-aadhaar.htm...
NRI & Aadhaar
इथे वाचून पहा.
तीन वर्षांपूर्वी माझा मामा
तीन वर्षांपूर्वी माझा मामा गेला फेब्रुवारी २०२०.
तेव्हा प्रॉव्हिजनल डेथ सर्टीफिकेट देण्यास हॉस्पिटलने आधार कार्ड मागितले आणि स्मशानभूमीत ते डेथ सर्टिफिकेट आणि आधार कार्ड दोन्हीच्या कॉपीज द्याव्या लागल्या. मग दहा दिवसांनी म्युनिसिपल ऑफिस मधून डेथ सर्टिफिकेट मिळाले तिथे ओरिजिनल आधार कार्ड मागून व्हेरिफाय केले.
हे ऐकीव नाही, ही तिन्ही कामे मीच स्वतः केली.
हे हैद्राबादमध्ये झाले.
यापुढे कोणाकडे आधार मागितलं
यापुढे कोणाकडे आधार मागितलं की srd ना बोलवा
. पेन्शन यांना नोव्हेंबरमध्ये
. पेन्शन यांना नोव्हेंबरमध्ये जीवीत प्रमाणपत्र लागते ते आधार इवेरिफिकेशन करून पुढे चालू राहाते. आधारकार्डाने लाभार्थींना लाभ मिळतो हे बरोबर तिथेही चेकिंग असेलच. मृत्यूनंतर वर्षभर तो लाभ मिळत राहील. पण नंतर बंदच होईल.
हॉस्पिटलवाले मागतात कशाला तर गैरप्रकार होऊ नये.
लहान मूल जे भारतीय नागरिक
लहान मूल जे भारतीय नागरिक नाही, ते रेसिडंट असल्याचा काय पुरावा द्यायचा?
त्यांचे नागरिकत्व त्या देशाचे हे बरोबर. पण नंतर ती मुलगी भारतात राहात आहे तर ती इथेच आहे आणि आधारासाठी अर्ज करताना मी इथेच राहाते आहे म्हटल्यावर तिचे आधार का नाही मिळणार? (फक्त भारतीयांनाच आधार मिळणार का? भारतीय नसणारे तिकडच्या विझावर इथे येणार ना?)
काहीतरी लोचा आहे. पण पूर्णपणे
काहीतरी लोचा आहे. पण पूर्णपणे aadhaar act वाचूनच कुठे भांडता येईल. तोपर्यंत ते म्हणतील ती पूर्व दिशा.
Pages