आधार कार्ड आणि एन आर आय

Submitted by sneha1 on 6 June, 2018 - 10:45

नमस्कार,
मला आधार कार्ड बद्दल माहिती हवी आहे. एन आर आय लोकांना हे कार्ड काढणे मस्ट आहे का? असल्यास कसे काढावे? भारतात जाऊनच काढावे लागते का?
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@भरत,तुमचे अनुभव खरे आहेत तसे माझेही आहेत. मृतांचे आधार लिहिण्याचा उल्लेख फॉर्ममध्ये नव्हता,आणि मागितलेले नाही.
तरीही मी उगाच वाद घालणार नाही. आणखी काही नवीन कलम हल्लीच वाढवले असेल. बघू.

मृत्युदा़हल्यासाठी अर्ज करताना करणार्‍याचे आधार लागते,
>>>> हो. मृत्यूदाखला मिळवताना अर्जदाराचा आधार द्यावा लागतो तो मी दिला होता. पण मृत व्यक्तीचा नव्हता दिला.

हॉस्पिटलमध्ये मृत्यूनंतर आधार सबमिट केले नव्हते. स्मशानपावतीवरही आधार मेन्शन नाही. पण दाखल्यावर मृताचा आधार नंबर आहे.

मला असे वाटते की हॉस्पिटलमध्ये भरती करताना मेडिक्लेमसाठी दिला असल्यास तो बीएमसीचे रेकॉर्डस् अपडेट करताना वापरला गेला असेल.

ही २०२२ च्या सुरुवातीची गोष्ट आहे.

एक मृत्यू घरी. एक मृत्यू हॉस्पिटल मध्ये . नो मेडिक्लेम. दोन्ही केसमध्ये वैद्यकीय दाखल्यावर आधार नंबर आहे. स्म शान पावतीवर नसतो , पण तिथे आधार दाखवावा लागला.

संशयास्पद प्रकरणं स्मशान कर्मचारी,पोलीस यांना लगेच जाणवतात. आणि आपले फॅमिली डॉक्टर मृताच्या नावानेच मृत्युपत्र देतात. बाकी काही मागत नाहीत. पण हॉस्पिटलमध्ये रुग्णांची नोंद /प्रवेश ज्या नावाने असेल तसेच देतील. आधाराचा आग्रह धरतील असं वाटतं नाही. परंतू काही केसेस वेगळ्या असतात.
------
असो.
आपला काही वैयक्तिक वाद नाही.

मागच्या महिन्यात पिपरी- चिंचवड मधुन जवळच्या नातेवाईकाचा म्रुत्युची नोंद केली त्यावेळी मृत व्यक्तीचा आधार कार्ड / नंबर नसताना पण दाखला दिला (जो स्मशान भुमीत लागतो). स्मशानात मात्र काही सवलत न देता पुर्ण पैसे भरायला सांगितले आणि अंतविधी पार पाडला.
वैद्यकिय दाखला (Death Certificate) मी नाही काढले त्यामुळे त्यावर आधार नंबर आहे का ते माहित नाही.

आधार NRI/ बाहेरच्या देशात जन्म झाला असेल तरी मिळते हे स्वानुभवाने सांगतो. त्यासाठी १८२ दिवस वाट नाही बघितली. आमचा पासपोर्ट भारतिय आहे.

परदेशी माणुस जर वैध्य मार्गाने राहात असेल तरी अधार कार्ड मिळते . त्यासाठी १८२ दिवस भारतात रहायला हवे. ओळखीच्या एका बांग्लादेशी कॉलेज विद्यार्थ्याकडे आधार कार्ड होते.
https://aadhaarkendra.in/foreign-national-aadhaar-registration-process#:....

कठीण काय? चर्चा आहे आणि वस्तुस्थिती आहे. जसे कागदपत्र मागतात तसे आपण देतोच. पण काय नियम आहेत हे जाणून घ्यायची इच्छा असते.
(बाकी स्मशानात पाच व्यक्तींचे आधार आणि सह्या दिल्या की डिझेल दाहिनी मोफत ही सरकारी सोय सगळीकडेच असेल परंतू ती अमलात आणवून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मंडळाने तजवीज केली असेल. तर काही गावांत लाकडे मृताच्या समुदायालाच दुसरीकडून विकत घेऊन तिथे न्यावी लागतात.)

मी माझे अनुभव लिहिले. इतर काहींनीही लिहिले. त्यावर तुम्ही संशयास्पद प्रकरणे, हॉस्पिटल मागेल असं वाटत नाही, असे तारे तोडलेत. म्हणून म्हटलं कठीण आहे.
बँकांसकट अनेक ठिकाणी आधार अनिवार्य नसताना तो मागितला जातो आणि भांडायला लागणारा वेळ, शक्ती, अडवणूक सोसण्याची तयारी नसल्याने तो दिला जातो. स्मशानात आधार अनिवार्य नाही, असं सरकार म्हणतं, तरी मागतात. तशा (वृत्तपत्रांच्या) बातम्या आहेत.
हे अनुभव तुम्ही एक प्रकारे नाकारताय.

आणि तुम्हांला आलेला सवलतीत लाकडे हा अनुभव सगळीकडे असेल असं म्हणताय.

तुम्हांला उद्देशून किंवा तुमच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया म्हणून हा माझा शेवटचा प्रतिसाद.

Pages