आधार कार्ड आणि एन आर आय

Submitted by sneha1 on 6 June, 2018 - 10:45

नमस्कार,
मला आधार कार्ड बद्दल माहिती हवी आहे. एन आर आय लोकांना हे कार्ड काढणे मस्ट आहे का? असल्यास कसे काढावे? भारतात जाऊनच काढावे लागते का?
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

NRI (परदेशी नागरिकवाल्याना) आधार कार्ड मिळत नाही, असा माझा समज आहे. पॅन कार्ड वरून NRE/ NRO खाते उघडता येते.

आधार कार्ड NRI (regardless of citizenship) मिळतं. तो नागरिकत्वाचा पुरावा नाहीये / residency चा आहे. पण ते भारतातच काढता येतं.

>>एन आर आय लोकांना हे कार्ड काढणे मस्ट आहे का?<<
मस्ट नाहि. भारतात दीर्घकाळ वास्तव्य करायचं असेल तर आधार कार्ड असलेलं बरं. तुम्हाला "मस्ट" हवं असं का वाट्तंय याची पार्श्वभूमी दिलीत तर अधिक माहिती देता येइल.

बाय्दवे, आधार कार्डच्या उदारमतवादि धोरणांमुळे भारतात न रहाणार्‍यांनी हि आधार कार्ड घेतल्याचं पहाण्यात आहे... Happy

दीर्घकाळ वास्तव्य करायचे नाही. पण पुष्कळ लोक म्हणतात की तिथल्या आर्थिक बाबींसाठी असलेले बरे आहे. जसे तिथे असलेली प्रॉपर्टी वगैरे विकायची असेल तर गरज लागते का?
<<बाय्दवे, आधार कार्डच्या उदारमतवादि धोरणांमुळे भारतात न रहाणार्‍यांनी हि आधार कार्ड घेतल्याचं पहाण्यात आहे... >> Happy

ओके फेफ, राज. चाबुक एफएक्यु परफेक्ट आहे. धन्यावाद.
>>>आधार कार्डच्या उदारमतवादि धोरणांमुळे भारतात न रहाणार्‍यांनी हि आधार कार्ड घेतल्याचं पहाण्यात आहे.>> Biggrin

आर्थिक (गुंतवणुक, बँक/ब्रोकरेज्/डिमॅट अकाउंट्स इ.) बाबींसाठी अजिबात आवश्यक नाहि, हे मी स्वतःच्या अनुभवावरुन सांगु शकतो. प्रॉपर्टी विकण्याबाबत कल्पना नाहि, बहुतेक त्याकरता हि नसावी...

अजिबात आवश्यक नाही +१
प्रॉपर्टी विकण्याबाबत >> मला वाटतं, एनआरआयला कॅपिटल गेन बराच जास्त आहे (कदाचित लाँग टर्म नसेल). आधार कार्ड देउन लोक उदारमतवादी धोरणात रेसिडंट बनून टॅक्स ब्रेक घेत असावेत. Happy एक शक्यता फक्त.

आर्थिक (गुंतवणुक, बँक/ब्रोकरेज्/डिमॅट अकाउंट्स इ.) बाबींसाठी अजिबात आवश्यक नाहि, हे मी स्वतःच्या अनुभवावरुन सांगु शकतो. प्रॉपर्टी विकण्याबाबत कल्पना नाहि, बहुतेक त्याकरता हि नसावी... >>> २०१८ मध्ये आधार कार्ड शिवाय ह्या सगळ्या गोष्टी निवासी भारतिय म्हणुन करु शकत नाही. NRI ला आर्थिक (गुंतवणुक, बँक/ब्रोकरेज्/डिमॅट अकाउंट्स इ.) साठी आधार लागत नाही.

मस्ट वगैरे नाहीये... किंबहुना NRI Technically dont qualify.. पण तरीही आता भारतात बर्‍याच ठिकाणी 'आधार' लागतो. Happy
पुढील ट्रिप मध्ये काढून घ्या.. एका दिवसात काम होते, एका आठवड्यात ऑनलाईन क्रमा़ंक मिळतो.. व एका महिन्यात येतं कार्ड.
[यावर एक लेख लिहीता येईल असा अनुभव आहे. ईथल्या युके मधिल भारतीय दूतावासापासून, पिएमओ ऑफिस, आणि स्थानिक वित्त सचिव, या सर्वांकडे चौकशी, ओळख, विचारण ई... करून वगैरे मग एका भारत ट्रीप मध्ये हे कार्ड शेवटी काढलेच.]

As an NRI, you are not eligible to get an Adhar Card (it is for residents only).

As such, if you apply for and get one, you are indicating that you are a resident. At the same time you expect to get the benefits of an NRI. This cannot be. एकपे रेहना, या resident या NRI
Please remember this before proceeding.

एन आर आय ला आधार कार्ड इश्यु केलेच नाही पाहिजे ना. माझ्या ओळखीत तर इथले सिटिझन, हिरवे कार्डवाले सुद्धा भारतात जाऊन आधार कार्ड घेऊन आलेत Uhoh

भारतात खुर्चीवर बसलेल्या लोकानादेखील नियम नीट माहित नसतात. भारतीय दूरध्वनि क्रमांकासाठी पण आधारकार्ड लागतं, आणि बँकेच्या NRO खात्यासाठी तिथला दुरध्वनि क्रमांक.. (तरच Text Message येऊ शकतात)..
...
NRE खाते सिटीबँकेत होते, (आणि ते व्याज म्हणून दिलेले १०/२० डॉलर देखील अमेरिकन सरकारला कळवत होते) तरी ते Pan No. साठी नोटिसा पाठवत होते, शेवटी खाते बंद केले.
...
तेव्हा शक्य असेल तर आधार काढून ठेवावे म्हणतो..

बँक खातं आणि फोनसाठी आधार अनिवार्य करायच्या नियमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने "जरा धीर धरा " असं सांगितलंय.
पण बँक आणि फोन क़पन्या ग्राहकांना काहीही सांगू शकतातच.

डेथ सर्टिफिकेटसाठीही आधार लागतं.

देसाई, NRO/ NRO ICICI मध्ये मी उघडताना भारतीय नंबर दिलेला असं आठवतं पण आता अमेरिकेचा नंबर बदलुन दिला आहे. आणि त्यावर ओटीपी वगैरेचे टेक्स्ट व्यवस्थित येतात.
सिटीचं माहित नाही.

डेथ सर्टिफिकेटसाठीही आधार लागतं. >>> काय!!!
मग जिवंत असताना काढलेलंच बरं. मेल्यावर आधी आधार काढा मग क्रिमेशन करु करुन आप्तांना टांगवत ठेवतील. आणि मेलेल्या माणसाला कोण 'आधार' देणार! Wink

>>बँकेच्या NRO खात्यासाठी तिथला दुरध्वनि क्रमांक.. (तरच Text Message येऊ शकतात)..<<
हे बँकेवर अवलंबुन असेल. आय्सिआय्सीआय माझ्या युएस नंबरवर मला टेक्स्ट अलर्ट पाठवते...

>>तरी ते Pan No. साठी नोटिसा पाठवत होते, शेवटी खाते बंद केले.<<
पॅन नंबर आवश्यक आहे. अमेरिकन सरकारला कळवताना (फॉर्म # विसरलो) भारतातला पॅन नंबर द्यावा लागतो आणि वायसवर्सा. थिस इज रीक्वायर्ड टु टाय इंडियन अ‍ॅसेट्स्/इन्कम विथ युएस इन्कम, टु अव्हॉय्ड डबल टॅक्सेशन...

भरत नाही हो! इथे वाचून तरी असं बंधनकारक वाटत नाहीये.
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/aadhaar-ma...
हुश्श! पुढच्यावेळी भारतात मेलो तर काय! अशी टांगती तलवार नाही रहाणार डोक्यावर Biggrin

अशी टांगती तलवार नाही रहाणार डोक्यावर >> तुझ्या डोक्यावर कशाला राहील पण तलवार टांगत ? मेल्यावर आधार कार्ड काढायला येणार होतास का ? Lol

हे बँकेवर अवलंबुन असेल >> मला ही देसाईंसारखे सांगितले होते. मी माझ्या कडे देशातला नंबर नाही असे सांगितले (ठणकावून असे म्हणू शकतो NRI च्या माजाने Wink ) मग त्यांनी अमेरिकेतल्या नंबर वर देशात text करून ATT ला खूश करून टाकले Wink

हे बँकेवर अवलंबुन असेल. आय्सिआय्सीआय माझ्या युएस नंबरवर मला टेक्स्ट अलर्ट पाठवते... << हे खरं.. एका बँकेत अमेरिकन नंबर चालतो (कॅनरा) एका कोऑपरेटिव्ह (सारस्वत) मध्ये नाही...

असामी, तुला फ्युनेरल प्लॅनिंग आमच्याकडे करा अशी गळ घालत नाही का कोणी? Proud
असं असेल तर मग सारस्वत बँकेला नॉन कोऑपरेटिव्ह म्हटलं पाहिजे Happy

अरे वा! भरपूर पोस्टी आल्या की!
योग, लिहा तुमचा अनुभव Happy
एकाच दिवसात काम होते? मी ऐकले की आधी अप्लाय करायचे, फिंगर प्रिंटिंग साठी ते बोलवतील तेव्हा जावे लागते म्हणून. आता Karvy कडून होते म्हणे.
icici चा प्रॉब्लेम आला नाही खरा कधी. असामी म्हणतात तसे AT&T ला खुश करणे चालते !

एन आर आय ला आधार कार्ड इश्यु केलेच नाही पाहिजे ना. माझ्या ओळखीत तर इथले सिटिझन, हिरवे कार्डवाले सुद्धा भारतात जाऊन आधार कार्ड घेऊन आलेत
>>> कसे कळणार nri आहे ते?

कसे कळणार nri आहे ते? >> खरच शोधायचे असेल तर सहज शक्य आहे कि. tax returns मागवा, ते नावावरच्या estates शी टॅली करा नि बघा. सगळेच्नसले तरी बहुतांशी केसेस कव्हर होतील.

सारस्वत बँकेला नॉन कोऑपरेटिव्ह > >:D

नागरिक नाही हे सरकार प्रुव्ह करु शकेल का? रिनंसिएशनचा डेटाबेस त्यांना सहज अ‍ॅक्सेस करता येत असेल का?
बर्थ सर्टिफि़केट, ड्रायव्हर लायसन्स दिलं की सरकारचा काही डेटाबेस असेल आणि त्यात बघुन काही करतील असं अजिबात वाटत नाही.

Pages