माझ्या बाबाची तुळस

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 March, 2023 - 09:56

अंगणात वृंदावन
त्यात तुळस देखणी
वारीयाने पान हाले
विठ्ठलाचे संकिर्तनी

जरी बाबा परलोकी
येतो पहाटे उठोनी
प्रात:स्नान उरकोनी
घाली तुळसीला पाणी

मग जागतो मुकुंद
दारी वाजता मृदंग
बाबा नाचतो अंगणी
मुखी तुक्याचा अभंग

असे रोजचेच चाले
बाबा विठूसंगे डोले
बघताच तुळसीला
मन वारकरी झाले

पान तुळसा माईचे
बाबा प्रसाद सेवतो
दुःख सागर संसार
विठू पैलतीरा नेतो

तोच क्रम रोजचाच
परी उत्साह आगळा
तुळसीच्या वृंदावनी
वेणूनादी घननीळा

तेजोप्रभा वृंदावनी
कर्म कृष्णार्पण झाले
भोवताली तुळसीच्या
नित्य वैराग्य जागले
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुःख सागर संसार
विठू पैलतीरा नेतो
ज्यांना विठू भेटला त्यांचे जीवन पावन झाले.
आपण अजूनही कोरडे ...

केशवकूल
कुमार१
शर्वरी
सामो
ह.पा.
अस्मिता

आपणा सर्वांचे अनेकानेक आभार....

आंबा
प्राचीन
sanjana25
रूपाली ताई

अनेकानेक धन्यवाद

सुंदर

सुंदर !
मन वारकरी झाले>>> आहा !