भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?

Submitted by छावा on 7 December, 2009 - 08:00

आजकाल शहरात रस्त्यांवर, मंदिरांच्या बाहेर भिकार्‍यांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुर्वी पाच्-दहा पैशाची भिक मागणारे आज एक रुपया ते पाच रुपये मागतात. चार-आठ आणे दिलेत तर ही मंडळी आपली इज्जत काढते.
काही जण पुण्य मिळवण्यासाठी तर कधी देवाच्या भितीने भिकार्‍यांना काहीना काही भिक्/दान देतात, तर काही लोक भिकार्‍याची कटकट आपल्या मागुन लवकर जावी म्हणुन का होईना पण भिक देतात.
या भिकार्‍यात धष्टपुष्ट, अपंग, कुष्ठरोगी, लहान मुले अशांचा भरणा असतो. मग देव देवतांचे फोटो गळ्यात लटकविले जातात. त्यांच्या भिक / दानाची रक्कम त्याच्या असहायतेनुसार ही वाढते. या पैश्या पैकी मोठा भाग भिकारी नशा पाणी व मजा करण्या साठी खर्ची करतात. यात भिकारी मुलेही मागे नाहीत.

मग भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का? हा विचार मनात येतो.
याचा विचार करतांना खालिल मुद्दे समोर येतात-
यात पहिल्यांदा भिकार्‍यांचे वर्गिकरण करणे आवश्यक आहे.
अ) धष्ट्पुष्ट भिकारी
ब) म्हातारे भिकारी
क) बाल भिकारी
ड) अपंग भिकारी
इ) वेडे भिकारी
ई) व्हाईट कॉलर भिकारी.

अ) धष्ट्पुष्ट भिकारी :- आजकाल मजुरांचा प्रचंड तुटवडा असुन ही मंडळी भिक मागते. आणि आपण देतो. याची काम करण्याची द्यानतच नसते. अशांना सर्वांनी भिक देणे बंद केले पाहिजे. म्हण्जे त्याना जगण्यासाठी काम करावेच लागेल.

ब) म्हातारे भिकारी:- म्हातारा काम करु शकत नाही म्हणून त्यांची मुले त्या म्हातार्‍याला भिक मागुन कमाई करायला लावतात. जर खरोखर असहाय्य असतिल तर वृध्दाश्रमात त्यांना भरती होता येईल. पण असे खुप कमी असतात.

क) बाल भिकारी:- आई वडील बळजबरी आपल्या मुलाला भिक मागण्यास भाग पाडतात. लहान मुलांनी भिक मागितल्यावर कोणीही लवकर भिक देतो. अशा मुलांचे शिक्षण बंद होते. यामुळे ही मुले व्यसनी ही होतात. ते मोठे झाल्यावर भिक मिळत नाही आणि काम करण्याची द्यानत नाही. म्हणुन ही मंडळी गुन्हेगारी कडे वळतात. उदा. चोरी, हप्तावसुली, खुन व इतर अनेक.

ड) अपंग भिकारी:- अपंगाचा बाऊ करुन ही मंडळी भिक मागते. परंतु जेष्ठ समाजसेवक मा. बाबा आमटे नी हे आनंदवन अपंग आणि कुष्ठरोग्यांच्या उपचार आणि पुर्नवसनासाठी सुरु केले. आज किती तरी लोकांचा आधार हे आनंदवन झाले आहे. तेथे अपंगांना ही स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित केले जाते.याच धर्तीवर काम करणार्‍या अनेक शासकिय-अशासकिय संस्था आहेत. असे असतांना बर्‍याच अपंग लोकांनी भिक मागण्याचा सोपा मार्ग पत्करला आहे. त्यानी ठरवले तर त्यांनाही स्वयंपुर्ण होता येईल. पण त्याना आता कष्ट करण्याचे जिवावर येते म्हणुन बाय चॉईस ते भिकारी झालेत.

इ) वेडे भिकारी:- यांचे प्रमाण नगण्य आहे. परंतु अशा लोकांना पोलिस, तहसिदार यांच्या मदतीने वेड्यांच्या इस्पितळात नेऊन चांगले आणि स्वयंपुर्ण बनवता येऊ शकते.

ई) व्हाईट कॉलर भिकारी:- नव्या जमाण्यात असेही भिकारी निर्माण झालेत. चांगले कपडे घालायचे आणि माझे पाकिट चोरीला गेले. मला इंटरव्ह्युव ला जायला आणि घरी जायला पैसे नाहीत. मला मदत करा. मी घरी गेल्यावर तुमचे पैसे तुमच्या पत्त्यावर MOने परत पाठविन. कृपया मदत करा. असे सांगणारे व्यवसाईक भिकारी ही निर्माण झाले आहेत.
अशांना तर पोलिसांच्या ताब्यातच दिले पाहिजे. हे भिक मागत नाहीत तर लोकांची फसवणुक करतात.

मग अशा भिक मागणार्‍यांना आपण भिक /दान देऊन चांगले काम करतो कि वाईट?
आपणच भिक देणे बंद केले तर भिकार्‍यांना जगण्या करिता काम करावेच लागेल ना.
म्हणुन, भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?
आपल्याला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छावा असे चुकुनही विचारू नका. त्या व्यक्तींना सहानुभूती नको असते तिथे ते भीक काय स्वीकारणार? >>>>>
पण ठीक-ठीकणी अपंग भिक मागतातच ना. आणि अपंग सुध्दा स्वकमाईवर जगु शकतात. त्यासाठी फक्त जिद्द हवी. अशी भरपुर उदाहण आहेत. त्यासाठी काम करणार्‍या संस्थाही आहेत.
माझे तर स्पष्ट मत आहे कि, जर माणसात जिद्द असेल तर तो स्वकमाई वर जगु शकतो. मग तो अपंग असो वा इतर कोणीही.

पैशाची मदत हे मी समतोलसारख्या संस्थांना म्हंटलं होतं. गुंडांना नाही.>>>>>>
तुमच्या म्हणण्या नुसार - मुले पळवून आणून भीकेला लावणे हे केव्हढे मोठे रॅकेट आहे याची कल्पनासुद्धा करता येणार नाही.>>>>> मग अशा मुलांना पैसे दिले तर ते कुणला जाणार?
आत्ता पर्यंत चे चर्चेत एका गोष्टीला सर्व सहमत आहेत कि, जेवण अगर खायला दयायला हवे. मग ते लंगर असो अगर वडापाव.
पण अश्विनी,
भिकार्‍यांना पैसे (भिक) द्यावी का? या मुद्यावर चर्चा होणे आवश्यक आहे, असे मला वाटते. मग ते मुले रॅकेट मधिल असोत वा इतर कोणी ही. तुम्हाला काय वाटते? सर्वांनी आपली मते नोंदवावीत, ही विनंती.

हे तर प्रचंड विनोदी. तुम्हाला काय वाटतं, हे कुणाला माहित नसतं? पोलिसांपासून मोठ्या अधिकार्‍यांपर्यंत सगळ्यांना ठाऊक असतं हे. पण सगळ्यांचे हात गुंतलेले असतात ह्यात.>>>>>>>
परंतु तक्रार केल्या शिवायही आपली शासकीय यंत्रणा हालत नाही ना. मग कुणाचा खुन झाला तरीही. म्हणजे पोलिस बर्‍याच वेळा खुनालाही अपघाती मृत्यु म्हणुन फाईल बंद करतात. त्याचे करिता यंत्रणेला तक्रारी व्दारे हालवावेच लागते. म्हणुनच असे लिहले.

<<'मी भीक देत नाही' हे जेव्हढ्या अभिमानाने आपण सांगतो, तितक्या पोटतिडीकेने सांगा ना, तुम्ही काय करता यासाठी.>>>>>>
माझ्या परीने मी करत आहे (भिक देण्या वितिरीक्त). आणि अशी बरीच मंडळी आहे. ते सर्वांनी आपापल्या परीने करावे. त्याची जाहीरात नको. तरी ही प्रश्न तसाच राहतो. जो पर्यंत आपण भिक (आर्थिक) देत राहु तोवर भिकारी जन्माला येतच राहणार. त्या करिता पंजाब सारखी पध्दत अवलंबली पाहिजे.

<<जेंव्हा शक्य असेल तेंव्हा ह्या मुलांना खायला देणे, कपडे देणे, इतर जीवनोपयोगी वस्तू देणे. किमान त्यांना हिडिसफिडीस न करता माणूस़कीच्या दृष्टीकोनातून संवाद साधणे.>>>>>
हे मान्य.
पण
म्हणजे पैसे देऊ नये. असेच का?

मायबोलीवर 'सुपंथ' नावाचा ग्रूप या वर्षाच्या सुरूवातीस, म्हणजे जानेवारीत, काही मायबोलीकरांनी पुढाकार घेऊन (केदार, उपास, वगैरे) सुरू केला होता. ह्या उपक्रमा अंतर्गत गरजू संस्थांना दर महिन्याला एकदा अशी देणगी देण्यात येते. ग्रूपने नोव्हेंबरपर्यंत (११ महिन्यात) 'निराधार बाल संगोपन अनाथाश्रम' आणि 'समतोल फाउंडेशन' या संस्थांना मिळून सुमारे ८५,००० रू देणगी दिली आहे.>>>>>>
अभिनंदन मला ही आवडेल सामिल व्हायला.

मला असेही वाटते की रस्त्यावर पैशांच्या स्वरूपात शक्यतो मदत करू नये, उलट तेच पैसे व्यवस्थित साठवून अशा संस्थांना देणगी स्वरूपात नियमितपणे द्यावेत.>>>>>>>>>
फचिन लाख मोलाचा सल्ला!

.....तर भीक दिली पाहिजे असं म्हणणं अजूनच गमतीशीर वाटतं.>>>>>
नीधप १००% सहमत

[भिकारी असा उल्लेख न करता गरीब असा केला तर बरं.]>>>>
दिपक कुलकर्णी,
प्रत्येक गरीब हा भिकारी नसतो, आणि प्रत्येक भिकारी हा गरीब नसतो.
भिकारी आणि गरीब यात जमिन आस्मानच अंतर आहे. त्यांच्यात तुलना करुन गरीबी ची अवहेलना करु नका. कित्येक (९९.९९%) गरीब स्वकष्टावर जगतात. Happy

चेंबूर येथे भिक्षेकर्‍यांसाठी निवारा आहे, आणि हा निवारा आर्थिक संकटात आहे, असं मध्ये वाचलं होतं. त्याविषयी कोणास अधिक माहिती असेल तर कृपया इथे लिहा.

पुण्यात श्री. राठी म्हणून एक गृहस्थ आहेत. त्यांनी कात्रजजवळ निराधार, भिक्षा मागणार्‍या वृद्धांसाठी निवारा सुरू केला होता. तो प्रकल्प आर्थिक मदतीअभावी बंद पडला. सुपंथतर्फे त्यांना मदत करता आली तर उत्तम. त्यांचा दूरध्वनी क्रमांक शोधतो मी.

रस्त्यावर राहणारे वृद्ध व लहन मुलं पाहून कसंतरी होतं. त्यांना निदान रस्त्यावर राहायला लागू नये म्हणून काहीतरी करायला हवं. 'सकाळ'च्या निवारा वृद्धाश्रमात मागे आमच्या क्लाससमोर असलेल्या पदपथावर राहणार्‍या एका आजींची आम्ही सोय केली होती. त्यांचा मुलगा त्यांना बंगालातून 'शिर्डीला जाऊ' म्हणून पुण्यात घेऊन आला, आणि इथेच सोडून निघून गेला. त्यांना भीक मागून जगणंही शक्य नव्हतं. आजूबाजूचे दुकानदार त्यांना काहीबाही खायला द्यायचे.
निवारात राहायला गेल्यावर महिनाभरातच त्या वारल्या. तिकडे बंगालमध्ये त्यांचं स्वतःचं घर होतं. मुलानं रस्त्यावर सोडून दिल्यावर त्या दु:खानंच त्या गेल्या असाव्यात.

निवारात राहायला गेल्यावर महिनाभरातच त्या वारल्या. तिकडे बंगालमध्ये त्यांचं स्वतःचं घर होतं. मुलानं रस्त्यावर सोडून दिल्यावर त्या दु:खानंच त्या गेल्या असाव्यात.>>>>>>>>>>>
Sad

'सकाळ'च्या निवारा वृद्धाश्रमात मागे आमच्या क्लाससमोर असलेल्या पदपथावर राहणार्‍या एका आजींची आम्ही सोय केली होती. >>>>>
तुम्हाला सलाम. Happy

त्यांचा मुलगा त्यांना बंगालातून 'शिर्डीला जाऊ' म्हणून पुण्यात घेऊन आला, आणि इथेच सोडून निघून गेला. त्यांना भीक मागून जगणंही शक्य नव्हतं. आजूबाजूचे दुकानदार त्यांना काहीबाही खायला द्यायचे.>>>>>
असे ही वाईट दिवस येतात. सख्ख्या मुलाने असे करावे? तरीही या आज्जीबाईने भिक मागितली नाही. याला म्हणतात. स्वाभिमान.

भीक द्या नका देऊ, तुमचा प्रश्न आहे. सरसकट सगळ्या मुलांना 'व्यसनं करतात, चैनीसाठी फुकटचा पैसा हवा असतो, कामं करायला नको'.. हे मापदंड लावले गेले त्यामुळे त्यामागची दारूण आणि विदारक परिस्थिती काय आहे ते दाखवण्यासाठी हा प्रपंच केला. तुम्ही भीक न देण्याने हा प्रश्न सुटणार असेल तर जरूर तो मार्ग अवलंबवा पण त्या मुलांची लायकी नसल्याने भीक देत नाही असले ताशेरे झोडू नका.

>>>प्रत्येक जण कितीही कणव वाटली तरी प्रत्येक विषयात काम करूच शकेल असं नाही. आणि ते करता येत नसेल तर भीक दिली पाहिजे असं म्हणणं अजूनच गमतीशीर वाटतं. >>> अगदी अगदी. प्रत्येकाचे कन्सेप्ट्स वेगळे असतात.
मान्य! प्रत्येकाचे कन्सेप्ट्स, प्रायॉरिटीज वेगळे असतात. आणि सगळे जण प्रत्येक विषयात काम करू शकेल असेही नाही. पण हे करता येत नसेल तर भीक दिली पाहिजे असं मी कुठे म्हंटलय? मी माझ्यापुरतं जे सोल्युशन काढलय ते सांगितलं. तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. फक्त माणूसकीने वागवा एव्हढच म्हंटलं. तेही जमत नसेल तर तेसुद्धा करण्याची आवश्यकता नाही. पण तुम्हांला भीक द्यायची नाही म्हणून त्यांना नावं ठेवलीच पाहिजेत याचीसुद्धा आवश्यकता नाही.

>>भिकारी आणि गरीब यात जमिन आस्मानच अंतर आहे. त्यांच्यात तुलना करुन गरीबी ची अवहेलना करु नका.
आणि जबरदस्तीने भिकारी बनवल्या गेलेल्या अश्राप बालकांची अवहेलना केलेली चालते, असच ना? बरोबर, त्यांना काहीही बोललं तरी ते थोडेच प्रतिवाद करायला येणार आहेत!

जाता जाता,
>>मजा तुमची, मूल तुमचं आणि आम्ही काय म्हणून आमच्या कष्टाचा पैसा द्यायचा...
आणि
>>अर्ध्याहून अधिक वेळेला भीक मागण्यासाठी मूल भाड्यानेही आणलेले असते.
या दोन वाक्यांमध्ये प्रचंड विसंगती जाणवते.

बाकी, जे सांगायचं होतं ते सांगून झालय. वाद घालण्यात मला रस नाही. आता याच्यावरही हल्ले होणार हे माहित आहे तरीही हे माझे शेवटचे पोस्ट!

चिन्मय तु जरूर शोध त्यांचा पत्ता, सुपंथ तर्फे काहि करता आल त्यांच्यासाठि तर खुप छान होइल. छावा तुमच सुपंथ मध्ये स्वागत. तुम्हाला सुपंथ गुगल ग्रुप च सदस्यत्व घ्याव लागेल सुपंथ मध्ये सामिल होण्याकरिता. सुपंथ बद्दल कुणाला चर्चा करायचि असेल तर मायबोलिवर्च 'सुपंथ' असा वेगळा बीबी आहे तिथे करुयात.

छावा तुम्हि मत मांडण्याच आवाहन केलय म्हणुन इथे लिहितेय. कुणालाहि दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा हेतु नाहि, आणि तस वाटलच तर कृपया मला विपुत जाब विचारा कारण मी बर्‍याच ठिकाणि अस बघितलय कि अश्या गैरसमजात मुळ चर्चा बाजुला पडुन ह्याच गोष्टि जास्त चर्चिल्या जातात.

तुम्हि जे स्वाभिमान वगैरे म्हणताय ते एक अतिशय मध्यमवर्गिय मुल्य आहे. हे विधान विचित्र वाटेल वाचायला पण दुर्दैवाने सत्य आहे. सगळ्यांनाच स्वाभिमान परवडु शकत नाहि. मला मान्य आहे कि लोकांच्या सहानुभुतिचा गैरफायदा घेणारे लोक आहेत समाजात पण मला वाटत ह्या बाबतित कायद्याच तत्व आदर्श म्हणुन वापरायला हव "शंभर गुन्हेगार सुटलेत तरि चालतिल पण एका निरपराधाला शिक्षा व्हायला नको". लहान मुल ज्याचा वापर करुन भिक मागितलि जाते, मग ते पळवुन आणलेल असो, रस्त्यावरच्या स्रीच्या असहायतेमुळे जन्माला आलेल असो किंवा अगदि कुणाचि मजा म्हणुनहि जन्माला आलेल असो त्याचा ह्या सगळ्यात काय दोष? तुम्हि जर या मुलाला मदत करु शकत असाल तर उत्तमच (त्यासारखि चांगलि गोष्ट दुसरि कुठलिहि नाहि) पण ते शक्य नसेल तर किमान त्या मुलांना भिक द्या (कायला तर द्याच कारण तुम्हि पैसे दिलेत तरिहि त्यांना खायला मिळत नाहि पण वरति आठाअणे, रुपया अस काहितरि द्या) कारण तुमच्या दयेला पात्र होउ शकला/शकलि नाहि ह्या गुन्ह्यासाठि दिवसाच्या अखेरिला त्यांना कुठल्याहि छळछावणिला लाजवेल इतक्या भयानक क्रौर्याला सामोर जाव लागेल. हे जे पैसे तुम्हि त्यांना द्याल ती भिक नाहि तर अशि मुले अवतिभवति असतांना तुम्हि आनंदाने आणि सुखाने जगता/जगु शकता ह्या बद्दल वाटलेल्या लाजेचि पावति आहे. मला मान्य आहे हे पैसे त्या रॅकेट चालवणार्‍यांकडेच जातिल पण ते गेले नाहित तर ह्या मुलांना विलक्षण हाल सहन करत जीव गमवावा लागेल. मी एक दिवस ह्या मुलांना पैसे दिलेत तर त्यांच्या एक दिवस जीवंत रहान्याचि आणि पर्यायाने त्यांना मदत मिळु शकण्याचि शक्यता वाढेल.

कलाकारांजवळ कला आहे म्हणुन त्यांना मदत करण खरच एक उदात्त तत्व आहे पण म्हणुन ज्यांच्या जवल एखादि कला किंवा योगक्षेम चालवण्यासारख एखाद कौशल्य नाहि ते गुन्हेगार नाहि ठरु शकत येवढच मला म्हणायच आहे. ह्यातलि काहि मुल विलक्षण उर्मट असतात, आपल्याकदे स्वतःचा हक्क समजुन मागतात हेहि मान्य पण जर सहज आजुबाजुला बघितल तर सगळ मिळु शकनार्‍या वर्गातलि, मिळनारि काहि मुल सुध्धा विलक्षण हट्टि असतात (खरतर ही एक समस्या ठरावि एवढि ह्या मुलांचि संख्या जास्त आहे), मग ह्या रस्त्यावरच्या मुलांकडे बरेचदा मुळात हट्ट करायलाच कुणि नसत आणि समजा कुणि असलच तर हट्ट पुरवण्याच्या परिस्थितित नसत हे वास्तव लक्षात घेतलत तर ह्या मुलांचा राग नाहि येउ शकणार.

फक्त माणूसकीने वागवा एव्हढच म्हंटलं.
---- १०० % पटले...

तरीही या आज्जीबाईने भिक मागितली नाही. याला म्हणतात. स्वाभिमान.
---- आता भिक मागायचाच विषय आहे, तर काही गडगंज पैसा असणारी कोट्याधीश लोकं स्वत: चे अनेक व्यावसायात कोटींमधे पैसा कमावत असतांना देखील सरकारकडे आम्हाला बाहेरुन भेट म्हणुन मिळालेली गाडी भारतात आणायला कस्टम्स करात सवलत मिळावी म्हणुन केंद्र सरकारकडे अर्ज खरडतात. माझ्या मते अशा मनोवृत्तीच्या लोकांना (यांना कोणत्या शब्दात मोजायचे) पण गरिब जनतेच्या सरकारने वटाण्याच्या अक्षता लावाव्यात.
छावा तुम्ही अशा लोकांना स्वाभिमानी म्हणणार कां?

त्यांचा मुलगा त्यांना बंगालातून 'शिर्डीला जाऊ' म्हणून पुण्यात घेऊन आला, आणि इथेच सोडून निघून गेला. त्यांना भीक मागून जगणंही शक्य नव्हतं. आजूबाजूचे दुकानदार त्यांना काहीबाही खायला द्यायचे.
निवारात राहायला गेल्यावर महिनाभरातच त्या वारल्या. >>>>>> Angry Angry कुफेहेपा.

अश्विनी, अगं रागावू नकोस गं. मी कन्सेप्ट्स यासाठी म्हटलं की मुलांना भीक (मुलांसाठी भीक हा शब्दच सहन होत नाही मला) देणं याला दोन बाजू आहेत. एक म्हणजे मुलांचा वापर प्रोफेशनल भिकार्‍यांकडून केला जाणं आणि दुसरं म्हणजे मुलांनी नाईलाजाने दुसर्‍यासमोर हात पसरणं. पहिल्या बाबतीत तर भीक दिली तर मुलांचं काहीच भलं होत तर नाहीच पण त्यांचे बॉसेस सोकावतात. दुसर्‍या बाबतीत जेव्हा ते बाळ अगदी भुकेलं असेल, थंडीत कुडकुडत असेल तर नक्कीच त्याला काही देऊ करावं, भीक म्हणून नव्हे तर आपलं कर्तव्य म्हणून. पण हे कायमचे सोल्युशन होऊ शकत नाही कारण त्या बाळाचं उभं आयुष्य पडलेलं असतं समोर आणि त्याच्या कोवळ्या मनावर हेच बरोबर आहे असं बिंबवायचं नसेल तर त्यांना अन्य प्रकारे आधार देणं योग्य असं मला वाटतं.

आता आपण कुठल्या परिस्थितीतील मुल समोर पाहतो आहे त्याच बरोबर आपली मानसिक परिस्थितीही त्यावेळेस कशी आहे (म्हणजे आपण त्यावेळी जास्त भावूक आहोत की प्रॅक्टीकल आहोत) यावर त्यावेळचा आपला कन्सेप्ट बदलू शकतो.

यात वाद घालण्याजोगं काहीच नाहिये गं. हा इतका संवेदनशिल विषय आहे की यात कसले आलेत आपले इगो सांभाळणं आणि माझं बरोबर की तुझं बरोबर वगैरे ! मी खरंतर वरच्या पोस्ट्मधेच हे लिहिणार होते पण फाफटपसारा वाटेल म्हणून संक्षिप्त लिहिलं होतं.

यात वाद घालण्याजोगं काहीच नाहिये गं. >>>>>>
आपण या ठीकाणी चर्चा करित आहोत. त्यामुळे याला वैयक्तिक वाद कोणी समजुन वाईट मानुन घेउ नये, हि विनंती. Happy

मला वाटते कि, आपण एकाच प्रकारच्या भिकार्‍यांना केंद्रीत करुन चर्चा करित आहोत, ते म्हणजे बळजबरीचे (फोर्सफुल) बाल भिकारी. असा प्रकार फक्त पुणे-मुंबईत आढळतो तो ही काही प्रमाणात. पण देशात इतर ठीकाणी आई वडीलांच्या इच्छे प्रमाणे मुले भिक मागतात. त्या चर्चेकडे मात्र आपण दुर्लक्ष करत आहोत. तसेच इतर प्रकारचे भिकारी ही आहेतच ना. ही मुले मोठी झाल्यावर काय होते? याचा ही विचार होणे आवश्यक आहे. ते वाम मार्गालाच जातात ना? तरी ही आपण सहानुभुतीच दाखवायची का?
मग अशा मुलांना भिक देणे पेक्षा त्यांचे पुर्नवसन करता येईल का? त्या दृष्टीने काम केले पाहीजे. ते आपल्या एकट्या कडुन शक्य नसेल तर सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांचे पुर्नवसन होते का ते बघावे. नुसतेच त्यांना भिक (आर्थिक) देऊन समाज कार्य होईल असे वाटत नाही. म्हणुन मी पुन्हा सांगिन कि, आपण असे केले तर या क्षेत्रातील माफियांचेच भले होणार. चार- आठ आणे देऊन समाज कार्य करण्याचे समाधान मिळवण्यात काही अर्थ नाही. आणि तुम्ही अशा मुलांसाठी काय करता? असे विचारुन दुसर्‍याला दोष देण्यात काय अर्थ? मग करायचेच असेल तर आपण काही तरी भरीव करु या विचाराने प्रेरीत होणे आवश्यक आहे. मग मी भिक देतो म्हणुन त्याचे काही झाले तरी मी सर्मथच करेन हा हेका बदलणे ही आवश्यक आहे. मग एखादी सामाजिक संस्था जर फक्त अशा भिकार्‍यांना जेवण, कपडेलत्ते अशा तात्पुरती मदत करत असेल, परंतु त्याचे पुर्नवसन होण्या साठी काम करणार नसेल, तर अशा भिकारींच्या संखेत वाढच घालेल. कारण अशाने भिकारी हे भिकारी राहणेच पसंत करतील. त्या ऐवजी त्यांना मुख्य प्रवाहात आणता यावे असे करणे आवश्यक आहे.

आणि जबरदस्तीने भिकारी बनवल्या गेलेल्या अश्राप बालकांची अवहेलना केलेली चालते, असच ना?>>>>
इथे कोणीही अवहेलना करण्याच्या दृष्टीकोनातुन लिहत नाहीये. फक्त खरी परिस्थिती लिहलीय आणि ती नाकारुन चालणार नाही.

छावा तुमच सुपंथ मध्ये स्वागत. >>>>>
धन्यवाद रमा.

तुम्हि जे स्वाभिमान वगैरे म्हणताय ते एक अतिशय मध्यमवर्गिय मुल्य आहे.>>>>
हे पटत नाही. तुमच्या म्हणण्यानुसार गरीबांना स्वाभिमान नसतो का? तसे असते तर मग उन्हात सिमेंट्च्या पाट्या उचणारे, शेत मजुर किंवा दिवसभर जड काम करुन आपला उदरर्निवाह करणारे, यांना स्वाभिमान नसतो का? मग त्यांनी ही भिक मागावी का?
तसे असेल तर भिक कोणी मागावी आणि कोणी मागु नये?
मोठ्या शहरा बाहेरील भिकार्‍यांचे काय? आपण फक्त मुंबई पुण्याच्याच (फोर्सफुल) बाल भिकारी यांच्यावरच का चर्चा करतोय? सगळ्या भिकार्‍यांवर चर्चा करायला हवी.

भारतात आणायला कस्टम्स करात सवलत मिळावी म्हणुन केंद्र सरकारकडे अर्ज खरडतात.
छावा तुम्ही अशा लोकांना स्वाभिमानी म्हणणार कां? >>>
उदय,
आपण येथे उदरनिर्वाहासाठी व नशे साठी जे भिक मागतात त्यांचीच चर्चा करतोय. सवलतीला भिक म्हणुन संबोधले तर आपण सर्वच कोणत्या ना कोणत्या सवलती घेत असतो. मग आपण सर्वच भिकारी आहोत असे तुम्हाला म्हणायचे आहे का? उदाहरण बरेच देता येतील. नुसती टिका करायची म्हणुन करायची असे नको.

एक म्हणजे मुलांचा वापर प्रोफेशनल भिकार्‍यांकडून केला जाणं आणि दुसरं म्हणजे मुलांनी नाईलाजाने दुसर्‍यासमोर हात पसरणं. पहिल्या बाबतीत तर भीक दिली तर मुलांचं काहीच भलं होत तर नाहीच पण त्यांचे बॉसेस सोकावतात. दुसर्‍या बाबतीत जेव्हा ते बाळ अगदी भुकेलं असेल, थंडीत कुडकुडत असेल तर नक्कीच त्याला काही देऊ करावं, भीक म्हणून नव्हे तर आपलं कर्तव्य म्हणून. पण हे कायमचे सोल्युशन होऊ शकत नाही कारण त्या बाळाचं उभं आयुष्य पडलेलं असतं समोर आणि त्याच्या कोवळ्या मनावर हेच बरोबर आहे असं बिंबवायचं नसेल तर त्यांना अन्य प्रकारे आधार देणं योग्य असं मला वाटतं.>>>>>
अश्विनीके अगदी सहमत.

अलिकडे अंध किंवा अपंग हे शब्दही अपमानास्पद समजले जातात. त्याऐवजी 'शारीरिक दुर्बल व्यक्ती' असे म्हणतात आणि दलित, हरिजन, मागास असे अपमानास्पद शब्द मागे पडून 'वंचित समाज' असा शब्द प्रयोग रूढ झाला आहे.>> अनुमोदन>>>>
Rofl
Rofl Rofl
Rofl Rofl Rofl

जाता जाता,
>>मजा तुमची, मूल तुमचं आणि आम्ही काय म्हणून आमच्या कष्टाचा पैसा द्यायचा...
आणि
>>अर्ध्याहून अधिक वेळेला भीक मागण्यासाठी मूल भाड्यानेही आणलेले असते.
या दोन वाक्यांमध्ये प्रचंड विसंगती जाणवते.<<<<
आहेच विसंगती पण ते भाड्याने आणलेलं मूल, मजा मारून झालेलं मूल आणि रेपमधून झालेलं मूल हे वेगवेगळं ओळखण्याची कला माझ्याकडे नाही हे एक आणि दुसर्‍या दोन्ही उदाहरणांमधेही मला करे कोई भरे कोई हाच फिल येतो. माझ्याकडून या सगळ्याच प्रकाराला शून्य सहानूभूती....
आणि हो मला विसंगत म्हणून परत हल्ले करू नका असं स्वतःच म्हणणं ही पण तेवढीच विसंगती आहे नाही का?

असो...

रमा,
तुमचे मुद्दे नाही पटले. भीक म्हणून पैसे देण्याचं खूप जास्त उदात्तीकरण वाटलं.
कलाकार सोडून इतर सगळे गुन्हेगार असतात असं मी तरी म्हणाले नाहीये. पण धडधाकट माणसाला मी भीक देऊ शकत नाही शकणार नाही. पैशाची भीक दिल्याने तुम्ही म्हणता ते सगळे छळ थांबत असतील या मुलांचे असं काही मला वाटत नाही.

पैशाची भीक देण्याने आपणच आपल्याच समाजाचा एक भाग आळशी आणि ऐदी करत असतो. जे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला खीळ घालणारं आहे. हे मला पटतं. म्हणून मी देत नाही. देणार नाही. गाणारे, नाचणारे, वाजवणारे, रांगोळी काढणारे, पूर्वी दारावर यायचे ते डोंबारी इत्यादी लोक हे त्यांची कला विकून पैसे कमवत असतात त्यामुळे ती भीक नसतेच. आणि त्याबद्दल मी तरी किमान २०-३० रूपयांच्याखाली कधीच देत नाही. पण धडधाकट असतानाही नुसतेच मागत येणारे, पैसे दिले नाही तर अंगावर थुंकू अश्या धमक्या देणारे, किळस येऊन का होईना आपण पैसे द्यावेत यासाठी नाकात बोटं घालून आपल्या कपड्याला ते हात पुसू पाहणारे, खोट्या हृदयद्रावक कहाण्या सांगून पैसे उकळू पहाणारे यांच्याबद्दल सहानूभूती नाही. याबद्दल इथल्या अनेकांना वाटल्याप्रमाणे मी विसंगत, क्रूर, माणुसकी शून्य, चौकटीबद्ध मध्यमवर्गीय इत्यादी इत्यादी काही वाटत असेल तर मला फरक पडत नाही.

बाकी मी कधी कुणाला पैशाने किंवा इतर मदत करते/ करत नाही इत्यादी गोष्टींचा उहापोह करायची गरज मला वाटत नाही.

गाणारे, नाचणारे, वाजवणारे, रांगोळी काढणारे, पूर्वी दारावर यायचे ते डोंबारी इत्यादी लोक हे त्यांची कला विकून पैसे कमवत असतात त्यामुळे ती भीक नसतेच.>>>>>>>>>
अनुमोदन Happy

खरतर या विषयावर लिहीणं संपलय असं म्हंटलं होतं. पण डिरेक्टली मला उद्देशून जे लिहीलं गेलय त्याला उत्तर देणे ही माझी जबाबदारी आहे असं वाटलं.

अश्विनीके, अभिनंदन.
>>जे भरपूर कष्ट करतात आणि तरीही त्यांना जगण्यापुरेसं मिळत नाही, त्याच धडधाकट व्यक्तींना मदत करावी, ते भिकारी नाहीत.

या विचारसरणीपासून...

>>दुसर्‍या बाबतीत जेव्हा ते बाळ अगदी भुकेलं असेल, थंडीत कुडकुडत असेल तर नक्कीच त्याला काही देऊ करावं, भीक म्हणून नव्हे तर आपलं कर्तव्य म्हणून.

या विचारापर्यंत तुम्ही आलात.

कुठल्या का भावनेनं असो, तुम्हाला काहीतरी करावसं वाटलं ह्याचं मोल फार मोठं आहे.

>>पण हे कायमचे सोल्युशन होऊ शकत नाही कारण त्या बाळाचं उभं आयुष्य पडलेलं असतं समोर आणि त्याच्या कोवळ्या मनावर हेच बरोबर आहे असं बिंबवायचं नसेल तर त्यांना अन्य प्रकारे आधार देणं योग्य असं मला वाटतं.>>
You hit the nail. पण प्रॉब्लेम असा आहे की लोकांना इथे सोल्युशनमध्ये इंटरेस्टच नाहीये. फक्त भीक देणे योग्य की अयोग्य ह्यावरच चर्चा करायची आहे. मग भीक देणे अयोग्य असा निष्कर्ष निघाला तर पुढे काय? ते कुणालाच नकोय. या बाफचा उद्देश फक्त भीक देणे कसे अयोग्य आहे हे ठासून सांगणे एव्हढाच आहे. बाकीच्या गोष्टींचा ऊहापोहसुद्धा कुणाला नको आहे. दुर्दैवाने ते माझ्या आणि रमा, उदय इ. इतरांच्या आधी लक्षात आले नाही. भीक न देऊन आपण समाजाच्या एका घटकाला कसं स्वयंभू बनण्यासाठी मदत करतो आहोत यासाठी स्वत:ची पाठ थोपटून घेणे एव्हढाच उद्देश आहे ह्या बाफचा.

>>हा इतका संवेदनशिल विषय आहे की यात कसले आलेत आपले इगो सांभाळणं आणि माझं बरोबर की तुझं बरोबर वगैरे >>
ह्याचा संदर्भ लागला नाही. Uhoh

>>एक म्हणजे मुलांचा वापर प्रोफेशनल भिकार्‍यांकडून केला जाणं आणि दुसरं म्हणजे मुलांनी नाईलाजाने दुसर्‍यासमोर हात पसरणं. पहिल्या बाबतीत तर भीक दिली तर मुलांचं काहीच भलं होत तर नाहीच पण त्यांचे बॉसेस सोकावतात. दुसर्‍या बाबतीत जेव्हा ते बाळ अगदी भुकेलं असेल, थंडीत कुडकुडत असेल तर नक्कीच त्याला काही देऊ करा>>>>
अश्विनीके, ह्या पहिल्या बाबतीतल्या दुर्दैवी मुलाचा वाली कोण हो? कुणीच नाही. त्याने तसच कुत्र्यासारखं आयुष्य जगायचं? विचार करून पाहा ना, समजा आपल्या ओळखीतल्या कुणाचं बाळ असतं तर ते? उन्हातान्हात, पावसापाण्यात दिवसभर सतत भीक मागत वणवण हिंडायचं. गुंडांकडे जाणार म्हणून तुम्ही त्याला काही देणार नाही, आणि तुम्ही काही दिलं नाही म्हणून गुंड त्याचे हाल हाल करणार. त्याने कुठे जायचं? Sad

>>मला वाटते कि, आपण एकाच प्रकारच्या भिकार्‍यांना केंद्रीत करुन चर्चा करित आहोत, ते म्हणजे बळजबरीचे (फोर्सफुल) बाल भिकारी. >>
हो, मी तरी फक्त त्यांच्याविषयीच चर्चा करत होते. कारण त्यांच्याविषयी काहीही माहिती नसताना जे अवहेलनाकारक उद्गार काढले गेले ते मला दाहक वाटले. आणि मी फक्त ह्याच गोष्टीचा विरोध केला आहे. कारण मी त्यांच्याविषयी खूप वाचलं आहे. कशा परिस्थितीत ही बाळं जगतात, त्याला जगणं म्हणणं हा जगण्याचाच अपमान आहे. त्यांच्याविषयीचा तिरस्काराचा आणि हेटाळणीचा सूर मला असह्य वाटला. बाकी गोष्टींबद्दल मला काही म्हणायचं नाही.

आणि छावा, ही रॅकेटची समस्या तुम्ही समजता तितक्या लहान प्रमाणातली नाही. हे वाचा:
http://www.thenational.ae/article/20090118/FOREIGN/494805023/1135/OPINION
या विषयावर मत मांडणार्‍या (आणि इतर रोमातल्याही) प्रत्येकाने हे आर्टीकल वाचायला हवं.

>>भाड्याने आणलेलं मूल, मजा मारून झालेलं मूल आणि रेपमधून झालेलं मूल हे वेगवेगळं ओळखण्याची कला माझ्याकडे नाही हे एक आणि दुसर्‍या दोन्ही उदाहरणांमधेही मला करे कोई भरे कोई हाच फिल येतो.>>
हे वेगवेगळं ओळखण्याची कला कशासाठी असली पाहिजे? कुठल्याही मार्गे झाली असली तरी मुलं ती मुलच. मजा करून झालेलं मुल आणि रेपमधून झालेलं मुल दोन्हीही तितकीच निष्पाप असतात. दोघांनाही कल्पना नसते आपण कुठल्या पद्धतीने जन्मलो आहोत.
नशीब सगळे लोक 'करे कोई भरे कोई' असा विचार करत नाहीत, नाहीतर ह्या जगात आपण कुणाचं तरी अदृष्य देणं लागतो हे मानणारेच कुणी उरले नसते.

>>आणि तुम्ही अशा मुलांसाठी काय करता? असे विचारुन दुसर्‍याला दोष देण्यात काय अर्थ>>
तुम्ही अशा मुलांसाठी काय करता असे विचारल्याने दुसर्‍याला दोष कसा देता येतो?
हा बाफ काही मार्ग काढण्यासाठी, उपायांची चर्चा करण्यासाठी आहे असा माझा समज होता, म्हणून तो प्रश्न विचारला. हा बाफ फक्त 'तुम्ही भीक देता का नाही देत?' याचे हो किंवा नाही (त्यातही 'नाहीच') असेच उत्तर देण्यासाठी काढला आहे हे मला तेंव्हा माहित नव्हते.

>>आणि हो मला विसंगत म्हणून परत हल्ले करू नका असं स्वतःच म्हणणं ही पण तेवढीच विसंगती आहे नाही का?>>
परत हल्ले करू नका असे मी म्हंटले नाही. हल्ले होणारच असे म्हंटले होते.

असो. हा विषय आता चर्चेच्या पलिकडे चालला आहे. परत एकदा, हल्ले करू नका असं मी म्हणत नाही. जरूर करा. पण याच्यापुढे उत्तर द्यावे असं मला वाटत नाही. इति लेखनसीमा! बाकी तुमचं चालू द्या.

>नशीब सगळे लोक 'करे कोई भरे कोई' असा विचार करत नाहीत, नाहीतर ह्या जगात आपण कुणाचं तरी अदृष्य देणं लागतो हे मानणारेच कुणी उरले नसते.

पटलं. १००%.

नीधप, छावा,

खरतर ह्या बाफ वर लिहिण्याच मी सुरुवातिलाच टाळत होते कारण ज्यांच्या बद्दल मी लिहलय आणि आता खालि लिहिणार आहे त्यांना स्वर्गच वाटावा अश्या सर्व सुखसोइंनि युक्त अश्या माझ्या अमेरिकेतल्या घरात बसुन इतर कुणालाहि काहिहि सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाहि ह्याचि नुसति जाणिवच नाहि तर बोच आहे मनाला. त्यामुळे मी इथे जे काहि लिहितेय त्याला कन्फेशन समजा हवतर. नजिकच्या भविष्यात ह्याच क्षेत्रात पुर्ण वेळ काम करण्याचा मानस असल्यामुळे त्या अनुषंगाने केलेले वाचन आणि घेतेलेल्या अनुभवांच्या पार्श्वभुमिवर तुमचि आणि काहि इतरांचि मते आणि वस्तुस्थिति ह्यात जे अंतर मला आढळल तेवढ फक्त दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे, ह्या लिखाणाला येणार वैय्यत्तिक स्वरुप टाळण्यासारख नसल्यामुळे तुम्हा दोघांनाच फक्त हे लिहिण्याचा माझा आधि विचार होता, पण इथे जे विचार मांडले गेलेत ते प्रातिनिधिक आहेत, मला जे जे सांगायच ते कदाचित कुणा एकाचा गैरसमज दुर करु शकेल किंवा कुणा समविचारि व्यक्तिपर्यंत मला पोहचवु शकेल अशि शक्यता वाटलि म्हणुन इथे लिहितेय. तुम्हाला (किंवा इतर कुणालाहि) माझ्या लिखाणाने कुठलाहि मनस्ताप होउ नये अशि माझि प्रामाणिक इछ्छा आहे आणि जर झालाच तर आधिपासुनच माफि मागतेय.

<<<<<<"रस्त्यावरच्या सगळ्या भिकारणींना मूल होणार नाही अशी व्यवस्था कायद्याने करावी असंही कधी कधी मनात येतं. ते तितकसं बरोबर नाही हे माहीत असलं तरी मनात येतंच...">>>>>>>>>

हे वाक्य माझ्या अक्षरशः अंगावर आल. कुणालाहि भिक मागावि लागु नये असा समाज निर्माण करण हे आपल्या कुणाच्याहि हातात राहिलेल नाहिये. काहि मोजकेच लोक रक्त आटवुन त्या दिशेन जमेल तितक कार्य करतात ते करण आपल्यापैकि प्रत्येकाला शक्य नाहिये हे देखिल मान्य. ह्या लोकांच्या अंगात इतर अनेकांचा एखादा का होइना पण क्षण सुंदर बनवणारि कला किंवा स्वतःच पोट भरण्यासाठि आवश्यक अस इतर कुठलहि कौशल्य नाहिये हेहि मान्य पण म्हणुन मानवच नाहितर समस्त सजिव सृष्टिला असलेला प्रजोप्तादनाचा हक्क हि त्यांच्याकडुन आपण काढुन घ्यायचा? मानवि लोकसंख्या अमर्याद वाढु नये म्हणुन प्रत्येकाच्या कमाल अपत्यसंख्येवर बंधन असण वेगळ आणि सबल गटाने दुर्बल गटाला प्रजोत्पादनाचा हक्क नाकारण वेगळ. (तुम्हि त्या उद्देशाने लिहल नाहिये ह्याचि खात्रि आहे
पण कुत्र्या पाळ्णारे लोक अशि व्यवस्था करतात अस ऐकल होत ते आठवल. )

<<<<<<<हे पटत नाही. तुमच्या म्हणण्यानुसार गरीबांना स्वाभिमान नसतो का? तसे असते तर मग उन्हात सिमेंट्च्या पाट्या उचणारे, शेत मजुर किंवा दिवसभर जड काम करुन आपला उदरर्निवाह करणारे, यांना स्वाभिमान नसतो का? मग त्यांनी ही भिक मागावी का?
तसे असेल तर भिक कोणी मागावी आणि कोणी मागु नये?
मोठ्या शहरा बाहेरील भिकार्‍यांचे काय? आपण फक्त मुंबई पुण्याच्याच (फोर्सफुल) बाल भिकारी यांच्यावरच का चर्चा करतोय? सगळ्या भिकार्‍यांवर चर्चा करायला हवी.>>>>>>>>

फोर्सफुल भिकारि हि फक्त मोठ्या शहरांचि समस्या नाहिये दुर्दैवाने.

छावा तुमच्याच उदाहरणातल्या लोकांच्या मुलांना मी स्वतः मीच कचर्‍यात टाकलेल्या कलिंगडाच्या सालि उचलुन त्यातला गर भिक मागचा प्रय्त्न करताना बघितल आहे, कारण कलिंगड विकत आणण्याचि चैन किंवा रस्त्यावरुन ते उचलुन न खाण्याचा स्वाभिमान ह्यातल काहिहि त्यांना परवडु शकत नाहि! कष्ट करणार्या किति मोलकरणिंचि मुल दुसर्‍यांचे कपडे घालुन वाढतात, मुम्बैतले किति कष्टकरि फुटपाथवर झोपतात? हे प्रश्न स्वतःला विचारुन बघा. प्रत्येक कष्ट करणार्‍या कित्येक व्यक्तिंना साध अन्न, वस्त्र निवारा परवडु शकत नाहि मग स्वाभिमान कसा परवडणार? एक भयानक उदाहरण आहे, पण बोलुन चालुन धंदा करण्यासाठि संध्याकाळि रस्त्यावर उभ रहाणार्‍या वेश्येला देखिल कुणाला नाहि म्हणण्याचा स्वाभिमान नाहिये आपल्या देशात, तिने तस करण्याचा प्रयत्न केला तर तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन वर तिचि कमाइ पण लुटुन नेणारे राक्षस आहेत आपल्या ह्या समाजात.

तुम्हाला डोळ्यांनि अव्यंग दिसणार्‍या प्रत्येक व्यक्तिजवळ कष्ट करुन पोट भरण्याइतकि शाररिक क्षमता असेलच असहि नाहिये कित्येकांचि शरिर अ‍ॅनिमिया, क्षय, एड्स ह्यांनि इतकि पोखरलेलि असतिल कि साधा श्वास घेण्याचेहि श्रम वाटावेत. दुसर म्हणजे आपल्या ह्या सुजलाम सुफलाम भारतभुमि मध्ये प्रत्येक कष्ट करणार्‍या व्यक्तिला काम मिळेलच असहि नाहिये, मायबोलिवरच गेल्या वर्षिच्या गणेशोत्सवात चिन्मय ने सिंधुताइंबद्दल लिहलय लौकिअर्थाने धडधाकट असणार्या त्यांनिहि पुण्यामुम्बइच्या मधल्या कुठल्यातरि रेल्वे स्टेशनवर दुसराकाहिच पर्याय न उरल्याने भिक मागितलि आहे. कित्येक बायकांजवळ तर शरिरविक्रय किंवा भिक मागण हे दोनच पर्याय असतात स्वाभिमान कुठुन परवडणार त्यांना?
पोटातलि भुक विलक्षण क्रुर असते!

मला भिक मागणार्‍यांच उदात्तिकरण हि करायच नाहिये किंवा चार आठ आण्यात समाजसेवेच समाधानहि मिळवायच नाहिये. (तुम्हाला ते तस वाटल हि माझ्या लिखाणाचि मर्यादा आहे हे मान्य) फक्त इतकच सांगायच आहे कि कुठल्यातरि समतोल, निराधार, वास्तल्य ला ह्या मुलांपर्यंत पोहचण्यासाठि त्या अश्राप जीवांनि जीवंत रहाण गरजेच आहे. त्यासाठि त्यांच्या पदरात चार पैसे घालण्याचि चुक करायला मी तयार आहे. १०० पैकि ९९ झणि गैरफायदा घेत असल्या तरिहि एका सिंधुताइंसाठि मी प्रत्येकिला मदत करण्याचा प्रयत्न करिन कदाचित दुसर काहिच शक्य नाहि झाल म्हणुन चार पैसे देउन स्वतःच्या अपराधिपणाचि बोच तरि कमि करिन. तुम्हि करताय ते चुक कि बरोबर किंवा तुम्हि काय करायच हे मी बापडि काय सांगणार? फक्त ह्या सगळ्याला दुसरिहि एक बाजु आहे एवढच सांगण्याचा प्रयत्न होता.

.

नीरजा,

तू उत्तर द्यावस अशी माझी अपेक्षाही नाही. मूळात मी तुला काही विचारलेच नव्हते. पण परवा मैत्रेयीने विचारला तोच प्रश्न आता विचारते, तुझ्यावर वैयक्तिक टीप्पणी करावी अशी मला गरज का वाटावी? असं तुझं माझं काय शत्रूत्व आहे?
संपूर्ण वादविवादात मी तुला उद्देशून एकही वैयक्तिक कॉमेंट टाकला नव्हता. हां, तुझ्या मुद्यांचं मात्र खंडन केलं. तुझी वाक्य विसंगत होती हे तू स्वत्:सुद्धा मान्य केलेसच की. पण मुद्दे संपले की वैयक्तिक पातळीवर उतरायचं ही तुझीच खासियत आहे. त्याचा अनुभव असल्यानेच मी आवरतं घेत होते कारण माहित होतं याच्यापुढे ह्या चर्चेला हेच वळण लागणार. माफ कर, पण तू ज्या बाफवर जातेस त्या बाफच्या नशीबी हेच येतं.
आणि मी दोन पाच रूपयांची भीक देते की आणखी काय करते ते तुला सांगण्याची मला गरज वाटत नाही. जेव्हढं सांगण्याची गरज होती तेव्हढं सांगितलं आहे.
इतका वेळ आणि शक्ती घालवून फक्त तुझ्या एकटीच्या सामाजिक जाणिवांबद्दल टीप्पणी करायला तू एव्हढी महत्वाची आहेस असं मला वाटत नाही. त्यापेक्षा मी माझे प्रयत्न स्वार्थापलिकडे पहाणार्‍यांकडे वळवीन. आणि मी टीप्पणी करण्याची तू वेळच येऊ दिली नाहीयेस. तुझ्या आत्मकेंद्रीत आणि दुसर्‍यांना तुच्छ लेखणार्‍या पोस्टातून तुझे विचार तू स्वत:च व्यक्त केले आहेस. एकदा आत्मपरिक्षण करून पाहा की, 'नीरजाने मत मांडले की लोक शिकवायला येतात' हे जिथे तिथे लिहायची तुलाच का आवश्यकता पडते.

.

१०० पैकि ९९ झणि गैरफायदा घेत असल्या तरिहि एका सिंधुताइंसाठि मी प्रत्येकिला मदत करण्याचा प्रयत्न करिन...
---- संपुर्ण पोस्ट चिंतनीय आहे.

सगळ्यांना एक विनंती आहे कि, तसेच चर्चा करावी, वैयक्तिक वाद खालु नयेत.

छावा तुमच्याच उदाहरणातल्या लोकांच्या मुलांना मी स्वतः मीच कचर्‍यात टाकलेल्या कलिंगडाच्या सालि उचलुन त्यातला गर भिक मागचा प्रय्त्न करताना बघितल आहे, कारण कलिंगड विकत आणण्याचि चैन किंवा रस्त्यावरुन ते उचलुन न खाण्याचा स्वाभिमान ह्यातल काहिहि त्यांना परवडु शकत नाहि!>>>

हे उदाहरण पटत नाही. त्यांची आई वडील कमवतात ते त्यांचे उदरर्निवाहा साठीच. त्याबिचार्‍या मुलांना पडलेल म्हणून उचलले. तसे तर मित्राची मोटरसायकल फिरवणारे ही मध्यमवर्गियांची मुले आहेत. रस्त्यावर पडलेले पैसे उचलणारे ही उच्चभ्रु लोक आहेत. त्याला फुकटची संधी म्हणता येईल. त्यात आणि भिक यात फरक आहे.

या बाफचा उद्देश फक्त भीक देणे कसे अयोग्य आहे हे ठासून सांगणे एव्हढाच आहे. बाकीच्या गोष्टींचा ऊहापोहसुद्धा कुणाला नको आहे. दुर्दैवाने ते माझ्या आणि रमा, उदय इ. इतरांच्या आधी लक्षात आले नाही. भीक न देऊन आपण समाजाच्या एका घटकाला कसं स्वयंभू बनण्यासाठी मदत करतो आहोत यासाठी स्वत:ची पाठ थोपटून घेणे एव्हढाच उद्देश आहे ह्या बाफचा.>>>>>
हा बाफ फक्त 'तुम्ही भीक देता का नाही देत?' याचे हो किंवा नाही (त्यातही 'नाहीच') असेच उत्तर देण्यासाठी काढला आहे हे मला तेंव्हा माहित नव्हते.>>>>>

माफ करा अश्विनी तुमचे हे वक्तव्य वैयक्तिक होत आहे असे नाही का तुम्हाला वाटत?
हा बाफ काही माझ्या मालकीचा नाही. आणि स्व:ताची पाठ थोपट्ण्याचा तर प्रश्नच नाही. ज्या व्यक्तीना मी वैयक्तिक ओळखत नाही. त्याच्या कडुन काय पाठ थोपटण्यात अर्थ आहे. आणि माझा दृष्टीकोन बाफ चालु करतांना मी दिला आहे. मायबोली वर विचारवंताचा खजाना आहे असे मला कळाले होते, म्हणुन मी हा प्रयत्न केला. पण वैयक्तिक टिपण्या झाल्यात त्या होऊ नयेत. अशी अपेक्षा आहे. प्रत्येकाचे अनुभव वेग वेगळे असतात. त्यावर चर्चा करुन त्यातुन काही सोल्युशन आपण सुचवु शकतो का? कारण पदद्या मागेही बरेच कारण असतात. त्यावर चर्चा व्हावी. हाच खरा उद्देश हा बाफ सुरु करतांना माझा होता. यातुन आपण ही यंत्रणा / हा सामाजिक प्रश्न लगेच सोडवु शकत नसलो तरी कुठे तरी छोटी सुरवात करता येईल का हाच खरा उद्देश आहे.
चर्चा करतांना (फोर्सफुल) बाल भिकारी हा मुद्दा पुढे आला. त्यांचा होणारा छळ हा ही मान्य केला गेला. इथ सर्वांचे एकमत झाले. पण त्यांना भिक द्यावी का? या मुद्यावर वाद झालेत. वाद विवाद व्हावेत. पण कोणी वैयक्तिक पातळी गाठु नये ते वैचारीक असावेत. माझ्या कडुन काही चुकल्यास मी येथे माफी मागतो. माझा कुणालाही दुखावण्याचा उद्देश नाही. या ठीकाणी सर्वांनी पोटतिडकीनेच मते मांडलीत. पण काही ठीकाणी वैयक्तिक पणा आला. पण (फोर्सफुल) बाल भिकारी यांचेवर पुढे चर्चा व्हावी . जेणे करुन काही तरी निर्ष्कष निघु शकेल.त्याच बरोबर इतर भिकार्‍यांना भिक देण्या बाबत चर्चा व्हावी.

पण मला वाटते कि,
(फोर्सफुल) बाल भिकारी असोत वा इतर कोणताही भिकारी त्यांना भिक (आर्थिक) देण्याने प्रश्न सुटणार आहेत का? त्यापेक्षा त्यांचा पुर्नवसन व्हायला हवे. त्याने परत भिक मागता कामा नये, अशे पर्यायी व्यवस्था निर्माण करायला हवी. भिक देणे हे काही कायचे सोल्युशन नाही. भिक मिळाल्याने ते सुखी होणार नाहीत. मग त्यांचे पुर्नवसन कसे करता येईल. या वर चर्चा करु यात का? Happy

तरिहि एका सिंधुताइंसाठि मी प्रत्येकिला मदत करण्याचा प्रयत्न करिन...>>>>
पण त्यांच्या पुर्नवसनाचे झाले तर बघु या. नुसती भिक देऊन काय होईल. सिंधुताईंचा प्रश्न कायमाचा सुटेल?

तरिहि एका सिंधुताइंसाठि मी प्रत्येकिला मदत करण्याचा प्रयत्न करिन...>>>>
पण त्यांच्या पुर्नसनाचे झाले तर बघु या. नुसती भिक देऊन काय होईल. सिंधुताईंचा प्रश्न कायमाचा सुटेल?
(ही पोष्ट चुकुन दोनदा सेव झाली. गैरसमज होतील म्हणुन डिलीट करत नाही.) (तसेच पुर्नचसन च्या एवजी दुरुस्त केला)

पण त्यांच्या पुर्नचसनाचे झाले तर बघु या. नुसती भिक देऊन काय होईल. सिंधुताईंचा प्रश्न कायमाचा सुटेल?<<
अगदी अगदी.
भीक देण्याने तो वाढेलच असं मला तरी वाटतं.

बर अगदी तात्पुरतं मान्य केलं की भीक देणं हे खूप महत्वाचं काम आहे. तर मला मुंबईत दिवसभरात लहान मुलं, बायका, हिजडे, करूण कहाण्यावाले असे एकुणात साधारण २० तरी वेळा भिकारी सामोरे येतात. भीक द्यायची हे ठरवल्यावर एकाला द्यायची दुसर्‍याला द्यायची नाही हे बरोबर नाही म्हणजे २० ही वेळा दिली पाहिजे. किमान ५ रूपये तरी द्यायला हवेत. दिवसाला १२५ रूपये महिन्याला ३७५० रूपये.
माझी आर्थिक परिस्थिती महिन्याला ३७५० रूपये भिकेमधे देण्याची नाही. ज्या पैशाचा विनियोग कसा होणार हे माहीत नाही अश्या ठिकाणी दरमहा ३७५० दान देणे मला अजिबात शक्य नाही.
आणि स्वतःचा खर्च भागवून उरलेल्या पैशातूनच मी भिक देऊ शकते. पोटाला चिमटा घेऊन भिक देणे मला जमण्यासारखे नाही. मी इतकी उदात्त नाहीच मुळात.
माझ्याबरोबरच इथल्या अनेक भिक न देणार्‍यांसाठी हेच मुद्दे खरे आहेत.
ज्यांना वाटतंय की भिक दिलीच पाहिजे त्यांनी पाठवावेत महिना $१००-२०० कुणालातरी त्यांच्या वतीने भिक घालायला.
असो..
भिक देणारे लोक चांगले आणि न देणारे वाईट या संकल्पनेवर शिक्कामोर्तब झालं असेल आणि वर्गवारी झाली असेल लोकांची तर पुढे वळूया.

पुनर्वसनाची गरज, भिकारी बनण्यापासून मुलांना, बायांना वाचवणं, भिक मागण्याची वृत्ती या सगळ्याकडे बघायचं असेल तर या क्षणाला आपण सगळे आपली कामं सांभाळून काही संस्थांना मदत किंवा महिन्यातून काही ठराविक वेळ देणे एवढंच करू शकतो. त्यातूनही तात्पुरती मलमपट्टी पलिकडे काम उभे रहाणार नाहीये. कारण मुळात या सगळ्यामधे इतके विविध प्रकारातून भिकेशी पोचणारे लोक आहेत की प्रत्येक समस्येच्या शेवटाला भिक मागणे या पर्यायाकडे माणूस येतोय हे लक्षात येतं. तेव्हा भिकारी ही समस्या असण्यापेक्षा अनेक समस्यांचं एक बायप्रॉडक्ट आहे असं म्हणायला हवं. आणि प्रत्येक जण प्रत्येक समस्येवर समजून घेऊन आर्थिक मदत, वेळ वा पूर्णवेळ काम करू शकत नाही. जो तो त्याच्या परीने करत असतो. करायची इच्छा बाळगून असतो. विचार करत असतो. अभ्यास करत असतो. यामुळे कोणी उदात्त वा कोणी फालतू बनत नाही.

इथले सगळे वाद कुणा भिकार्‍याला वाचायला लावले तर तोच म्हणेल भिक नको पण कुत्रे आवरा Lol
शब्दश खरी म्हन

नीधप,
एक विनंती कुणाला उद्देशुन लिहु नका. सामुहीक अर्थाने लिहा. म्हणजे वाद होणार नाही. आणि ही सर्वांना विनंती,
झाले गेले गंगेत मिळाले.

तुमचा हिशोबावर नविन चर्चा करावी लागेल. म्हणजे रस्तावर आपण उभे राहतो त्यावेळेस आपल्या जवळ बर्‍याच वेळा ५ ते १० भिकारी जमा होतात. मग आपल्या पैकी बरेच पुढच्याला भिक देतो. मग बाकीच्या भिकार्‍यांचे काय? त्यात ही पुढे होणारा दादागिरी करुन ही बर्‍याच वेळा पुढे असतो.
असो. मुळ मुद्दा पुर्नवसन असे करता येईल. हा आहे.

या क्षणाला आपण सगळे आपली कामं सांभाळून काही संस्थांना मदत किंवा महिन्यातून काही ठराविक वेळ देणे एवढंच करू शकतो. त्यातूनही तात्पुरती मलमपट्टी पलिकडे काम उभे रहाणार नाहीये. >>>>
प्रत्येक जण पुर्ण वेळ जरी देऊ शकलो नाही. तरी साधारणता भिकारी १००० लोकां मागे १ असतो असे मानु. १००० पैकी १० लोकांनी थोडा थोडा जरी प्रयत्न केले तरी फरक पडु शकतो. आणि यात काम करणार्‍या संस्था आहेत, त्यांना आपण मदत करु शकतो. लगेच १००% भिकार्‍यांचे पुर्नवसन होईल असे नाही. पण आपण १% जरी काही करु शकलो. १ मुलाचे जरी पुर्नवसन करुन त्याचे आयुष्य सुधारु शकलो, तरी खुप होईल. एकदा सुरवात तर होणे आवश्यक आहे. हळु हळु नक्कीच पुर्ण बदल होईल.:)

इथले सगळे वाद कुणा भिकार्‍याला वाचायला लावले तर तोच म्हणेल भिक नको पण कुत्रे आवरा>>>>>>
हा बाफ विनोदा साठी नाही. याची नोंद घ्यावी. Uhoh

Pages