ग्राहक पंचायतीमध्ये अपील करण्यासाठी मदत हवी आहे

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 16 December, 2022 - 12:24

मला HDFC ERGO विरुद्ध ग्राहक पंचायतीमध्ये अपील करण्यासाठी मदत हवी आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@कुंतल
नाही
कशी करायची.

मला पाहिले कायदेशीर मार्गदर्शन हवे आहे

ग्राहक पंचायत कि ग्राहक सेवा केंद्र कि ग्राहक लवाद कि ग्राहक न्यायालय ?
ग्राहक पंचायत ही खासगी संस्था आहे. पण तिचा उपयोग होईल.

खालील website वर टोल फ्री नंबर आहेत. त्यांना call करा सविस्तर माहिती सांगतील.

https://www.irda.gov.in/ADMINCMS/cms/NormalData_Layout.aspx?page=PageNo2...

माहिती साठी हे वाचा

https://www.fincash.com/l/mr/insurance/irda

@रघु
@कुंतल
आधी मला माझ्या केस मध्ये किती दम आहे ते बघायचे आहे.
तुमच्या माहितीत कोणी जाणकार व्यक्ती किंवा वकील आहे का?

इतक्या त्रोटक माहितीवर वकील तरी काय सांगणार. तुम्ही थेट वकील गाठू शकता किंवा (जर पुण्यात असाल तर) शनिवारवाड्याजवळ मोदीबागेत ग्राहकपंचायतीचे कार्यालय आहे, तिथे श्री. विजय सागर हे सदनिका घेऊ पाहणार्‍या, घेतलेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करतात. त्यांची वेळ आणि वार बघून घ्या. मुंबई ग्राहक पंचायत या नावाने मायबोलीवर एक खाते देखील आहे. त्यांना संपर्क करू शकता.

एचडीएफसी तर बँक आहे. त्यांना रेरा लागू शकतो का ?
ग्राहक मंच / न्यायालय यांच्याकडे तक्रार करण्यापूर्वी ज्यांच्याशी वाद आहे त्यांना नोटीस देणे गरजेचे असते. बँकेची तक्रार बँकेचे लोकपाल यांच्याकडे करता येते. पण ती ग्रीव्हन्स च्या संदर्भात. तुमच्या तक्रारींना दाद मिळत नसेल तर. लोकपाल ने पण काही केले नाही तर ग्राहक न्यायालयात जाता येते.

धन्यवाद रघु
माझा त्रास कार इन्श्युरन्स संदर्भात आहे.
मी इमर्जन्सी सर्विस ऍड ऑन म्हणून घेतली होती,
माझा अपघात झाल्यावर टोइंग व्हॅन पाठवायला त्यांनी 16 तास घेतले. त्यावेळेला वारंवार कॉल करून सुद्धा बरोबर प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मी झालेल्या त्रास बद्दल नुकसानभरपाई मागायच्या विचारात आहे.

या बद्दल सविस्तर पोस्ट करतो

शीर्षकात कार इन्शुरन्स लिहीले असते तर गैरसमज झाला नसता. एचडीएफसी म्हटल्यावर घर घेतले असावे असा समज होतो.
तुम्हाला बँकेच्या लोकपालाकडे न जाता विमा लोकपालाकडे जावे लागेल.
IRDA - Ombudsman सर्च करा. मला एल आय सी चे पोस्टात हरवलेले चेक पुन्हा मिळाले.

प्रथम HDFC ERGO कडे तक्रार नोंदवा.
https://www.hdfcergo.com/customer-voice/grievances
प्रथम ईमेलने तक्रार करा. मग शक्य असेल तर जवळच्या ऑफिसात जाऊ़न लेखी तक्रार देऊन पोच घ्या. पत्रात अर्थातच तुमचा पॉलिसी क्रमांक, वाहन क्रमांक , तक्रारीचे नेमके स्वरूप लिहा.
किती दिवसांत तक्रारीचं निवारण होऊ शकेल ते विचारा. त्यानंतर एक स्मरणपत्र देऊन पहा. तरीही काम झालं नाही तर ग्राहक मंचाकडे, IRDA कडे तक्रार करीन असं लिहिणारं एक पत्र लिहा. या सगळ्यांची पोच घ्या. आणि त्यानंतर IRDA ला पत्र लिहा.
इथेही काम झालं नाही तर किंवा वाटल्यास आधीच ग्राहक मंचात consumer forum - तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी - केस दाखल करा. इथे केसेसचा निकाल लागायला भरपूर वेळ लागतो. तारीख पे तारीख पडते असा अनुभव आहे. यासाठी तुम्हांला ग्राहक पंचायत मार्गदर्शन करू शकेल.
मनस्तापासाठी नुकसान भरपाई मागण्यासाठी केस करणे अधिक मनस्तापदायक ठरू शकेल.