Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

bigboss चा हा season फक्त आणि फक्त अमृता देशमुख आणि प्रसाद यांच्यासाठी च आहे.

प्रसाद काय अभिनय करतो वा...
केळकर ची आठवण करून देतो..(दिलीपकुमार)

दुसऱ्या कुणी शिव्या दिल्या असत्या तर संपूर्ण विकेंड एपिसोड त्यावरती झाला असता पण
प्रसाद बाळाला राग कुणामुळे आला यावरच शनिवारचा एपिसोड घालवला.
पण राग आल्यावर बाळाने काय केले याच्यावर काहीच नाही!

मांजरेकर अमृता देशमुख आणि प्रसाद यांचे pr झालेत.
हे घरातील बाकीच्यांना कळतंय पण ते बहुतेक घाबरत असावेत.

प्रसादच्या बाबतीत कीव येऊ लागली आहे. त्याने बेअरींग घेतलं असेल तर ठीक नाहीतर त्याला मेडीकेशनची गरज आहे. तो बाहेर पडायला तयार आहे. बेअरिंग घेतलं असेल तर हे टिकवून एवढे दिवस काढणे, छान गेम plan, लोकं सहानुभूती देतायेत, मी नाही यावर वोटस देऊ शकत. हे म्हणजे लोकांना मूर्ख बनवणे. नाहीतर त्याला मानसोपचाराची गरज आहे असं वाटू लागलं आहे, प्रसादबाबत मीच confused, हाहाहा.

तीन अ चा माज कमी होणार नाही (एक अ धोंगडे यातली) . अक्षयला स्नेहलताच्या जाण्याचे जास्त वाईट वाटलं अपूर्वापेक्षा. ती गृहीत धरून बसली आहे की ते फायनलला असतील.

स्वरूप बरोबर, अपूर्वाचे स्वत:कडे फार लक्ष असतं, कधी कधी अंबाडा किंवा जी हेअरस्टाईल असेल ती ही ठीक आहे की नाही चाचपडते, आणि एकीकडे म मां कडे दुर्लक्ष पण करते.

अक्षय कायम माज असलेल्यासारखा बसतो आणि प्रसाद कायम गरीब भाव तोंडावर ठेऊन बसतो.

पहिल्या सीझनला लोक म्हणायचे की रेशम मांजरेकरांची मैत्रीण आहे तिला जिंकवणार ते..... आस्ताद कलर्सचा माणूस आहे तोच जिंकेल पण जिंकली मेघा धाडे!!
दुसऱ्या सीझनला परत तेच सरांचा सपोर्ट नेहा शितोळेला आहे..... वीणा कलर्सची हिरोईन आहे वगैरे वगैरे आणि जिंकला शिव!!
तिसऱ्यात जय ला मांजरेकर सीझनभर शिव्या घालत होते तर तो फायनलपर्यंत गेला.... चॅनेलचा म्हणवला गेलेला विकास उत्कर्षच्या आधी बाहेर पडला!!
त्यामुळे या चर्चेला फार काही अर्थ नाही!!
थोडेफार मॅन्युपलेशन करणे किंवा एखाद्याला लॉंग रोप देणे प्रॉडक्शन हाऊस करतेच पण त्याचा मुख्य उद्देश एखाद्या खेळाडूला फेव्हर करणे नसून जो शोला, त्याच्या लोकप्रियतेला फायदेशीर ठरतो त्याला पुढे नेणे हा असतो!!
प्रसादला बाहेर (सो कॉल्ड) सपोर्ट नसता तर ज्या पध्दतीचा गेम तो खेळतोय त्यावर तो कधीच शो च्या बाहेर फेकला गेला असता!!

विकास तिसरा आणि उत्कर्ष चौथा होता.
उत्कर्ष आधी बाहेर पडला.
१, ,३, ५ ( मीनल) हे एका टीमचे आणि २,४,६ (मीरा)विरुद्ध टीमचे होते.

आज प्रसाद दोनदोनदा जातो म्हणत होता तर वाटलं जाऊ द्या की त्याला....कशाला त्याला बिचाऱ्याला त्रास देताय आणि प्रेक्षकांवर अत्याचार करताय...पुन्हा आठवडाभर शांत होऊन बसेल...बोअरींग....स्नेहलतासाठी वाईट वाटलं मला ,ती आली तेव्हा सुरुवातीला 2 आठवडे तिच्या hairstyle मुळे तिचा चेहरा पण बघायची इच्छा होत नव्हती...पण जसाजसा गेम पुढे गेला ,तसतशी मला ती आवडायला लागली....खूप स्ट्राँग आणि versatile प्लेयर होती ती... तिची AV पण छान वाटली..ती सुरुवातीपासूनच गेम मध्ये हवी होती....मजा आली असती..प्रसादपेक्षा नक्कीच बेटर होती ती... पण ती 40 दिवस मी खोटी वागली वगैरे असं का म्हणाली ते काही कळलं नाही.sarcasticallyम्हणाली का? ...आणि nomination टास्क मध्ये स्नेहलता कोणाच्या opposite nominate झाली होती?देशमुखच्या?

>>विकास तिसरा आणि उत्कर्ष चौथा होता
होय काय? असेल!!

>>पण ती 40 दिवस मी खोटी वागली वगैरे असं का म्हणाली
हो तिची पाठोपाठची ती दोन वाक्ये एकदम कॉंट्राडिक्टरी आणि गोंधळात पाडणारी होती!!

विकास तिसरा आणि उत्कर्ष चौथा होता.
उत्कर्ष आधी बाहेर पडला.
१, ,३, ५ ( मीनल) हे एका टीमचे आणि २,४,६ (मीरा)विरुद्ध टीमचे होते. >>> करेक्ट.

हो तिची पाठोपाठची ती दोन वाक्ये एकदम कॉंट्राडिक्टरी आणि गोंधळात पाडणारी होती!! >>> सेम मी आणि नवरा म्हणालो.

शनिवार ची चावडी आतापर्यंत झालेल्या सगळ्या चावड्यांपैकी सर्वात भयंकर बोअर होती. overdose of sarcasm...
पहिले ५-१० मिनिट ठीक पण पूर्ण एक तास तेच काय ? त्यात गंमत म्हणजे विकास, राखी यासारख्या लोकांना कळत तरी होतं का की हे टोमणे आहेत याबद्दल शंका आहे.
स्नेहलता गेली ते एक बरं झालं. तसही काही कामाची नव्हतीच. असुन नसुन काही फरक पडत नव्हता.
अमृता देशमुख ने गाळलेले अश्रु खोटे वाटले. त्यावर आरोह चा पण डायलॉग दाखवला की एवढं काय रडण्यासारखं होतं त्यात म्हणजे बिबॉ ला पण नक्कीच लोकांना हे सांगायचं होतं की ती उग्गीच रडली फुटेज साठी.
आणि या प्रसाद ची भानगड काय आहे नक्की ? आठवडाभर अ‍ॅक्टीव्ह असणारा, तावातावाने भांडणारा, शाळेत मस्ती करणारा प्रसाद वीकेंड ला असे चेहेरे करुन का बसतो ? मला क्वीट करायचं आहे असं काय मधेच म्हणाला. त्याची आता एकंदरच काळजी वाटायला लागली आहे. क्लिनिकल डीप्रेशन ची लक्षणं वाटतात कधी कधी बघताना. त्याच्या घरच्यांना त्याला असं हतबल बघुन त्रास होत नसेल का ? त्याला तिथे खरच एखाद्या कौंसेलर ची गरज आहे असं वाटलं मला.तो बाहेर असा नाही असं घरात सगळेच सांगत आहेत म्हणजे खरच जर हा एक मुखवटा असेल तर अशा पद्धतीने खेळून लोकांची सिंपथी मिळवुन जर तो जिंकला तर हे भयंकर आहे.
जे खरे वागतात तेच आतापर्यंत जिंकलेत हा बिबॉ चा इतिहास प्रसाद बदलेल की काय ?
काल धोंगडे ला गेमर आहे अशी काहीतरी चुगली आली होती तेव्हा राखी म्हणाली की हेच पाहिजे बिबॉ मधे. नुसतं झोपायला आलाय का इथे .. हा हा हा.. rakhi knows her duty well . बहुतेक तिला ओरडा पडु नये म्हणुन या वेळी तासभर sarcasm चं बेरिंग पकडायला लावलं होतं ममां ना Wink

मला तर वाटत आहे की त्या घरात फ्रॉम डे वन पासून गेम कळलेला प्रसादच आहे.
आठवडाभर दंगा करून, टास्क खेळून,भांडून अचानक चावडीवर गप्प बसायच आणि टार्गेट करणारे कसे निगेटीव्ह आहेत ते दाखवायच
प्रसाद इतका काही बावळट नाही की वारंवार नॉमिनेट होऊन सेफ होत आहे म्हणजे बाहेर पब्लिक सपोर्ट भरपूर आहे हे न कळण्याइतका.
धोंगडे,विकास,माने यांच्याकडून त्याला फार धोका नाही.अपूर्वा, अक्षय आणि देशमुखकडून तो आहे.देशमुखला ही सपोर्ट आहे हे त्याला माहित असणार म्हणून तिच्याबरोबर सेफ गेम खेळत आहे,पण अक्षय फारसा नॉमिनेट होत नाही,पुढे जाऊन पहिल्या पाचात अक्षय ,अपूर्वाकडून धोका असू शकतो म्हणून त्यांना जस जमेल तस निगेटीव्ह दाखवायचा प्रयत्न करायचा.
जिच्यापासून खरा धोका होता ती तेजू आता गेली,.
खरच जर डिप्रेशन असत तर तिथे रेग्युलर मेडिकल चेकअप होत असत, आधीच सांगून एलिमिनेट होता आल असत.
पण स्वत:.हून गेम सोडण हे महागात पडेल हे शिवानी सुर्वे च्या अनुभवावरून त्याला नक्कीच माहीत असणार.
मला नाही वाटत अकराव्या आठवड्यात येऊन शो सोडेल आणि सोडलाच तर बाहेर गेलेल्या एखाद्यावर अन्याय नाही का,चांगल फाईन लावायला हव बिबॉसने.
काल स्नेहलताला ठेवून खरच प्रसादला काढायला हव होत..मजा आली असती.
सगळ्यात मोठा गेमर तोच असावा.

नाही सोडणार तो. नंतर राखीशी बोलत होता, मी माझ्या प्रेक्षकांसाठी इथे आहे, मला चावडीवर मी बोललो त्याचं वाईट वाटतंय, आता मी कसा खेळतो बघा वगैरे. हे सर्व लाईव्ह बघणाऱ्या एका यूट्यूबरने सांगितलं.

फक्त सिंपथी आणि बरेचदा चांगलं वागून केवळ वोट्सवर जिंकला तर इतिहास घडेल.

कंटेट देणारे अ‍ॅरोगंट आणि निगेटीव्ह वागतात ना त्याचाही फायदा त्याला होणार.

>>आज प्रसाद दोनदोनदा जातो म्हणत होता तर वाटलं जाऊ द्या की त्याला....कशाला त्याला बिचाऱ्याला त्रास देताय आणि प्रेक्षकांवर अत्याचार करताय...पुन्हा आठवडाभर शांत होऊन बसेल...बोअरींग.
हो ना!! तुला जमत नसेल तर जा बाबा बाहेर!! पण असेच कुणालाही जाता वगैरे येत नसणार.... काहितरी कॉंट्रॅक्ट वगैरे असेलच की!! त्यामुळे तो नाही जात सोडा!!
त्याच्या अंधफॅन्सनाच काही उपरती झाली तर चान्सेस आहेत त्याचे बाहेर जायचे!!
बाकी या अश्या बुळ्या खेळाला स्ट्रॅटेजी वगैरे म्हणणाऱ्यांची मला गम्मत वाटते..... एकतर सीझन बोअर चाललाय म्हणून बोंबा मारायच्या आणि घरातल्या सगळ्यात बोअर सदस्याला सपोर्ट करायचा म्हणजे कमाल आहे ना!!
यावेळी पंचाईत अशी झालीय की नुसते व्हिलनच उरलेत..... अपूर्वा, अक्षय, माने, धोंगडे..... तेजस्विनी जी खरच चांगले खेळायची ती बाहेर गेलीय म्हणून मग बळेबळे आता अमृता देशमुखला जास्तीत जास्त हायलाईट करतायत!!
ती जोपर्यंत अक्षय आणि अपूर्वाला शिंगावर घेणार नाही तोपर्यंत बाहेरुन कितीही सपोर्ट दिला तरी विनर म्हणून एस्टाब्लिश होणार नाही.
अमृता देशमुख आणि मानेंचे टीमअप झाले तर बघायला आवडेल..... मानेंच्या इमेजसाठीही ते चांगले असेल.
कारण राखी आणि आरोह जातील लवकरच..... धोंगडे आणि विकास कधीही देशमुखला साथ देणार नाहीत.... प्रसादवर भरवसा ठेवणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे..... त्यामुळे माने आणि देशमुख हे आगळेवेगळे आणि कल्पनेच्या पलीकडले समीकरण अक्षय आणि अपूर्वाच्या विरोधात बघायला मजा येईल.
धोंगडे आता अक्षय आणि अपूर्वाला जाऊन चिकटणार आणि तेही तिला चढवतील अमृता देशमुख आणि मानेंच्या विरोधात वापरायला Wink

अक्षय, अपूर्वा. धोंगडे आणि राखी विरुद्ध प्रसाद, अमृता, माने आणि आरोह अश्या टीम पडल्या पुढच्या गेमसाठी तर मजा येईल.... आणि विकास संचालक म्हणजे अगदीच होऊ दे राडा!!

राखीला ठराविक वेळासाठी आणले असेल तर ते घरात आलेले भूत राखीला घेऊन जाईल बहुतेक Wink

यावेळी बाहेर जाणाऱ्या सदस्यांना काहीच पॉवर देत नाहियेत..... आता सरप्राईज म्हणून एखाद्याला पॉवर द्यायला हरकत नाही.... मजा येईल Happy

राखीला ठराविक वेळासाठी आणले असेल तर ते घरात आलेले भूत राखीला घेऊन जाईल बहुतेक Wink >> आपके मुह मे घी शक्कर. राखी ला जाउदेत आता लवकर बाहेर त्याशिवाय घरात नवीन समीकरणं तयार होणार नाहियेत. तिचे एक एक आयटेम बघुन वैताग आलाय. परवा तिचा असाच काहितरी फालतुपणा सर्व जनता हतबल होउन पहात होती तेव्हा अपुर्वा म्हणाली की " बिग बॉस , प्लीज आम्हाला एकेकाला आत बोलावुन ईलेक्ट्रीक शॉक द्या पण हे असलं नको" हा हा हा...

आजतर राखी म्हणे मंजुलिका बनली आहे.
आणि माने मांत्रिक.
सोमिनुसार देशमुखने प्रसादला,अपूर्वाने धोंगडेला,राखीने विकासला नॉमिनेट केल्याच कळत आहे.बाकीच्यांच नाही समजल.
बाकी प्रसाद विनर होईल कि नाही माहित नाही पण मँक्झिमम नॉमिनेट होणारा बिबॉसमधला तो एकमेव उमेदवार असावा.
जर चुकून विनर झालाच तर प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट होणारा,कधीही कँप्टन न झालेला उमेलवार विनर होईल.हा पण एक इतिहासच असेल.

सॉरी,अपूर्वाने देशमुखला, मानेंनी चक्क धोंगडे ला नॉमिनेट केल आहे.आता मला खरच अस वाटत आहे की बिबॉसच सांगत असावेत कुणाला नॉमिनेट करायचे ते.

प्रसादला सबस्टंस अ‍ॅडिक्शन आहे आणि हे त्याचे विड्रॉअल्स आहेत असं त्याच्याकडे एकंदरीत बघुन वाटतं. किंवा तो नशेतच असतो.

हो, एक तर अ‍ॅडिक्शन चे विदड्रॉअल्स नाही तर मग डीप्रेशन. दोन पैकी एक असावेच. फार विअर्ड वागतो प्रसाद. चेहरा कम्प्लीट लॉस्ट असतो. काहीच कन्सिस्टन्सी नसते वागण्या बोलण्यात.
नक्की कोण याचे फॅन्स असावेत असा प्रश्न पडतो.
सध्या जेन्युइनली अपूर्वा मला बरी वाटते आहे सर्वात. तिच्या वागण्यात सुरुवातीला माज वाटला पण तरी नंतर तिने बर्‍याच शेड्स दाखवलेल्या आहेत घरात वेळोवेळी. देशमुख ला विनर दाखवायचा प्रयत्न सुरु आहे पण ती हुषार असली तरी इमोशनल साइड काहीच दिसत नाही. तिची खास लॉयल्टी कुणाशीच दिसत नाही.

मैत्रेयी.... वाक्यावाक्याला अनुमोदन!!
काही दिवसापूर्वी मीही इथे लिहले होते की अमृता देशमुखचा इमोशनल कनेक्ट कुणाशीही दिसत नाही पण एक वेगळा विचार करता असा कुठलाही कंफर्ट झोन नसताना लोकांचे वार झेलत राहणे; रोज नव्याने मोटीव्हेट होणे हेही एक वेगळे स्किल आहे Happy
काल मांजरेकर तिला म्हंटलेच होते की यु आर ऑन टारगेट आणि आज तिलाच सगळ्यात जास्त लोकांनी नॉमिनेट केले.
अक्षयने बहुतेक माने आणि विकासला नॉमिनेट केलेय आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघता या दोघांचे काही खरे नाही!!
पण मला धोंगडेचे चान्स जास्त वाटतात..... अमृता देशमुख आणि प्रसाद वोट्सनुसार नक्की जात नाहीत; वोट्स कमी असले तरी माने आणि अपूर्वाला कंटेंटसाठी ठेवतीलच!!
आरोह जर मिनिमम गॅरेंटी घेऊन आला असेल तर तोही राहिल..... त्यामुळे धोंगडे किंवा विकासमधले कोणीतरी जाईल बाहेर!!

मी बघितला नाही एपिसोड. बघण्यासारखा असेल तर बघेन, नाहीतर उगाच कशाला.

नक्की कोण याचे फॅन्स असावेत असा प्रश्न पडतो. >>> काय माहीती, पण सत्तर टक्के वोटींग याला असतं, सगळे युट्युबर एक नंबरवर राज्य करतोय आपल्या सर्वांचा लाडका प्रसाद म्हणतात. आता तर प्रसाद अजून लाडका झालाय. सगळे त्याला टारगेट करतात, बिचारा वगैरे. धन्य आहेत. तो आठवडाभर भांडेल, पण चावडीवर गरीब बिचारा बेअरींग धरुन बसेल. अरे त्या मेघाला कित्ती टारगेट करायचे, ती कशी लढायची.

मला तर वाटतं बिग बॉसच सांगतात, स्क्रीप्टेड वाटतं. परत प्रसाद अक्षय भांडले, ते कदाचित आज रात्री दाखवतील. इतका अक्षय मुर्ख नसेल ना की सारखं सांगून तेच तेच, व्हिलनगिरी. त्यालाही एव्हाना समजलं असेल तो जिंकणार नक्कीच नाही, ट्रॉफीचं उगाच बोलत असेल.

आता धोंगडे जावी.

बाय द वे प्रसादला काही आजार असेल तर असं शो मधे ठेवणं चुकीचं नाहीये का, जर खरोखर डीप्रेशन असेल तर घरचे तरी कसे पाठवू शकतात, हा शो कसा हे एव्हाना माहीती असेल ना.

राखीनेही trp वाढवला नाही म्हणून हॉरर वेबसिरिज सुरू केली का bb त. काय ते भूत, एकटा अक्षय म्हणाला मी भुताला पकडेन, खरंच पकडायला हवं होतं.

या भुताला अपूर्वा खरंच घाबरली की नाटक करत होती फुटेजसाठी. राखी नाटक करत होती आणि हे सर्व राखीला माहिती असणार कारण सात आत्मे अंगात आहेत ही ती चावडीवरही बोलत होती, हाहाहा.

काय ते स्पर्धक, सगळ्यांनी मिळून त्या भुताला घेराव घालायचा होता की.

ॲक्टींग?? ओव्हर ॲक्टींग चालू होती सगळ्यांचीच!!
राखी, धोंगडे आणि अपूर्वाची जास्तच..... हास्यास्पद चालले होते सगळे!!
खुळे समजतात का काय लोकांना??

>>सगळे युट्युबर एक नंबरवर राज्य करतोय आपल्या सर्वांचा लाडका प्रसाद म्हणतात. आता तर प्रसाद अजून लाडका झालाय.
धन्य आहे!! फॅन्सचे एकवेळ समजू शकतो (खर म्हणजे त्यांचेही नाहीच समजू शकत Wink एव्हढे सपोर्ट करण्यासारखे काय आवडते त्यांना?) पण यूट्यूबर्स असे करुन स्वताचीच क्रेडिबिलिटी का पणाला लावत असतील? का प्रसादला सपोर्ट नाही केला तर त्याच्या सपोर्टर्सचे व्ह्यूज कमी होतील अशी भिती असेल का? काय माहिती!! पण आतापर्यंतच्या त्याच्या खेळावरुन तो या गेमशोसाठी बनलेला नाही हे नक्की..... म्हणजे असेल तो चांगला माणूस किंवा सेंसिटीव्ह वगैरे पण त्याचे इथे काय??
इथे गेमर असूनही अज्जिबात गेमर न वाटणारा स्मार्ट स्पर्धक जिंकतो असा इतिहास आहे..... आख्खा सीझन घुम्यासारखा बसून राहणारा; अतिशय अनप्रेडिक्टेबल आणि ज्यात त्यात कंफ्यूज होणारा आणि कंफ्यूज करणारा नाही!!

वोटिंगवर जिंकवले तर प्रसाद जिंकेल. नाहीतर देशमुख त्याच्यापेक्षा चांगली आहे.

माने जास्त शातीर दिमाग आहेत, ते अक्षयच्या पुढे असतील. अक्षयला फायनलला नेऊन पहिला काढतील, हाहाहा.

आरोह, राखी दोघांना फायनलला नेणार असतील अक्षयला मीरासारखं मिडवीक काढतील.

काल सदस्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती का की आरोह आणि राखीला अजिबात नॉमिनेट करायचे नाही.
अक्षयलाही अपूर्वासारखेच 2वोट्स होते मग अपूर्वाला केल अक्षयला का नाही,यावरूनच कळत की अक्षयला बाहेर अपूर्वापेक्षाही कमी वोटिंग असल्याने त्याला येऊन देत नाहीत.
आज मर्डर मिस्ट्री टाईप टास्क आहे.
बघू काय होत ते.

हो अक्षय निगेटिव्ह का होईना कंटेंट देतो आणि कलर्सचा आहे, हिंदी सिरियलमध्ये होता. त्यामुळे ओढत नेतील शेवटपर्यन्त. त्याला वोटिंग नसतं फार.

काल अॅक्ट रायडर्स म्हणाला अक्षयला काढलं तर कंटेट कोण देईल. निगेटिव्ह का होईना, त्याच्याबद्दल चर्चा बाहेर सुरू असते, मी असतो bb तर मीही ठेवलं असतं त्याला.

बाहेर आल्यावर त्याला रिअ‍ॅलिटी चेक मिळणार आहे चांगलाच. प्रसाद आणि अमृताची पॉप्युलॅरीटी बघून पार जमिनीवर येईल तो.

अक्षयलाही अपूर्वासारखेच 2वोट्स होते >>> एक आरोहने दिलं, दुसरं कोणी दिलं.

मागच्यावर्षी जय निगेटीव्ह होता पण त्याला वोटींग असायचे आणि म मां समोर तो शांत बसायचा, माज दाखवायचा नाही.

एक आरोहने दिलं, दुसरं कोणी दिलं.....
विकासने दिल असाव
मानेंना काय खुनी केल त्यापेक्षा अक्षयला करायला हव होत.
प्रसादला तर सरळ कळल.तो म्हणाला सुध्दा की माझा खून करत आहेस.
राखीने छान केले खून.
अपूर्वाला पराभव सहन होत नाही हे पुन्हा सिध्द झाल.धोंगडेसारखीच लगेच रिअँक्ट होते.

राखीने छान केले खून.>>> हो सुरुवातीला ती खुनी बनली तेव्हा वाटलं ही बया काय खून करणार पण छान खेळली ती...याउलट मानेंनी प्रसादचा खून खूपच obvious केला...अगदी तो समोर बसला असतानाच त्याच्या बेडवर पाणी फेकले ...लगेच लक्षात आलं प्रसादच्या..
नंतर माने swimming pool जवळ येऊन म्हणाले ,"फालतू idea वापरतात खून करायला काहीतरी creative करायचं ना"...तेव्हा असं वाटलं माने बिग बॉस बद्दल बोलत आहेत. Lol

Pages