✪ ८ नोव्हेंबर रोजी चंद्र ग्रहण- पूर्ण भारतातून दिसणार
✪ सहजपणे उघड्या डोळ्यांनी बघता येईल
✪ चंद्राच्या जवळच युरेनस- बायनॅक्युलरमधून सहज बघता येईल
✪ सौ फॉरवर्ड नॉलेज की, एक खुद के अनुभव की!
✪ मनोरंजक अनुभवातून विचारांना चालना
✪ ग्रहणात चंद्र लाल का दिसतो?
✪ माझं दु:ख सर्वांत मोठं! नक्की ना?
सर्वांना नमस्कार. मागच्या आठवड्यात झालेल्या सूर्यग्रहणानंतर येत्या पूर्णिमेला- ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी चंद्र ग्रहण दिसणार आहे. ह्या निमित्ताने सतत स्पर्धा आणि परफॉर्मंसचं दडपण असलेल्या मुलांना आणि मोठ्यांनाही एक वेगळा अनुभव घेण्याची संधी आहे. सूर्यग्रहण बघताना डोळ्यांची काळजी घ्यावी लागते व थेट सूर्याकडे बघता येत नाही. पण चंद्र ग्रहणामध्ये डोळ्यांना त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे सहजपणे चंद्रग्रहण बघता येतं. नुसत्या डोळ्यांनीही त्या दिवशी उगवलेल्या चंद्राचा वरचा भाग किंचित लालसर असल्याचं बघता येईल. फक्त ते बघण्यासाठी पूर्व क्षितिज नीट दिसेल- चंद्र उगवताना दिसेल अशी जागा हवी. एक- दोन दिवस आधी चंद्र उगवण्याची जागा बघून ठेवल्यास उत्तम. त्याशिवाय आकाशात दक्षिण- पूर्वेला काही उंचीवर असलेला ठळक गुरू बघता येईल. दक्षिणेला शनी हा ग्रह आणि माथ्यावर श्रवण आणि पश्चिमेला अभिजीत असेही ठळक तारे बघता येतील.
भारतातून दिसताना चंद्र बिंब पृथ्वीच्या उपछायेमधून (penumbra) जात असेल. भारतात संध्याकाळी चंद्र उगवेल तेव्हा त्याच्यावर पृथ्वीची उपछाया असेल व त्यामुळे तो किंचितसा लालसर दिसेल. न्युझीलंड, रशिया व इतर काही ठिकाणांहून चंद्र बिंब पृथ्वीच्या प्रच्छायेतून (umbra) जाताना दिसेल व त्यामुळे तिथे चंद्र अगदी फिकट झालेला दिसेल. पण भारतामधून बघताना चंद्र पृथ्वीच्या उपछायेतूनच जाणार असल्यामुळे तो किंचित लालसर दिसेल आणि उगवल्यानंतर साधारण सव्वा तासामध्ये हे ग्रहण संपेल. त्यानंतर नेहमीच्या पूर्णिमेसारखा चंद्र तेजस्वी दिसेल.
(ग्रहणाच्या दिवशी चंद्र- युरेनस स्थिती व चंद्राचे विवर- खड्डे, गुरूचे उपग्रह, शनीची कडी, गुरू- शनीची महायुती, चंद्र- मंगळ पिधान, शुक्राची कोर, सूर्यावरचे डाग व सूर्य ग्रहण आणि तारकागुच्छ ह्यांचे मी घेतलेले टेलिस्कोपिक फोटो http://niranjan-vichar.blogspot.com/2022/11/wonders-of-sky-lunar-eclipse... इथे बघता येतील. आकाश दर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संपर्क: निरंजन वेलणकर 09422108376)
युरेनस!
ह्यावेळी चंद्राच्या अगदी जवळ आणि किंचित पश्चिमेला जेमतेम दिड अंशावर (म्हणजे हात लांब केल्यावर जेमतेम बोटाच्या रुंदीइतक्या अंतरावर) युरेनस हा ग्रह आहे. हा नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाही, पण छोट्या बायनॅक्युलरमध्ये चंद्राला बघितलं आणि त्याला केंद्रस्थानी ठेवलं तर वरच्या बाजूला युरेनस दिसेल. ट्रायपॉडच्या मदतीने नुसत्या मोबाईलने चंद्राचा फोटो घेताना pro mode वापरून जर शटर स्पीड 3-4 सेकंद इतकी वाढवली आणि ISO 800 किंवा 1600 असं ठेवलं तर फोटोमध्ये चंद्र फार जास्त चमेकल पण युरेनससुद्धा फोटोमध्ये कॅपचर होऊ शकेल. असा फोटो घेणार असाल तर त्यामध्ये 3-5 सेकंद टायमर नक्की ठेवा, ज्यामुळे फोटो क्लिक केल्यामुळे होणरं हाताचं व्हायब्रेशन निघून जाईल आणि फोटो स्थिर येईल. चंद्राचा चांगला फोटो घेण्यासाठी pro mode मध्ये शटर स्पीड 1/4 सेकंद आणि ISO 100- 200 असं ठेवून बघू शकता. चंद्र छान व स्पष्ट येईल, पण युरेनस त्यावेळी फोटोत येणार नाही.
सौ फॉरवर्ड नॉलेज की, एक खुद के अनुभव की!
आकाशामध्ये अशा घटना नेहमी घडत असतात. ह्या निमित्ताने आपल्याला मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देता येते. सध्या फॉरवर्ड- उधार ज्ञान आणि माहितीचा स्फोट इतका प्रचंड आहे. पण जेव्हा मुलं अशा प्रत्यक्ष गोष्टीचा अनुभव घेतात, स्वत: प्रयत्न करतात आणि शोधतात तेव्हा त्यांना जास्त आनंद मिळतो. त्याबरोबर विज्ञानातली गंमत पण नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या प्रकारे त्यांना अनुभवता येऊ शकते. कोणतंही बर्डन किंवा स्पर्धेचा ताण नसताना वेगळी गंमत अनुभवण्याचा आनंद ते घेऊ शकतात. अशा छोट्या छोट्या अनुभवांमधून मुलांना त्यांचे कल आणि आवडी- निवडी कळायला मदत होऊ शकते.
ग्रहणात चंद्र लालसर का दिसतो?
चंद्र ग्रहणात अगदी खग्रास स्थिती दिसतानाही चंद्र पूर्ण अदृश्य होत नाही. फिकट लालसर दिसत राहतो. आणि खंडग्रास स्थितीमध्येही तो किंचित लालसर दिसतो. त्याचं कारण असं की, जरी चंद्र पृथ्वीच्या प्रच्छायेच्या आतमध्ये असला तरी पृथ्वीवर असलेल्या वातावरणामधून विखुरलेले सूर्याचे काही प्रकाश किरण चंद्रापर्यंत पोहचत असतात. त्यामुळे सावलीत असला तरी चंद्रावर काही प्रमाणात प्रकाश पोहचत असतो. त्यामुळे तो फिकट लालसर दिसतो. आणि लालसर असण्याचं कारण म्हणजे सूर्यप्रकाशातले निळा- हिरवा- पिवळा अशा रंगांची तरंगलांबी (wavelength) कमी असल्यामुळे ते इतक्या अंतरामध्ये विखरून जातात आणि लाल रंगाची तरंगलांबी जास्त असल्यामुळे तोच न विखुरता काही प्रमाणात दिसतो. त्यामुळेच वातावरणातून विखुरलेला सूर्यप्रकाश चंद्रावर पोहचताना लालसर होतो आणि चंद्रही लालसर होतो (त्याला त्याचा स्वत:चा प्रकाश नाही आहे)! आणि ह्याच कारणामुळे उगवताना- मावळतानाही प्रकाश जास्त हवा ओलांडून येत असल्यामुळे चंद्र- सूर्य आणि ग्रहसुद्धा लालसर दिसतात. आणि लाल रंगाची तरंगलांबी जास्त असल्यामुळेच ट्रॅफिक सिग्नल आणि रेल्वेचे सिग्नलही लाल असतात! आणि दिवसा आकाश निळं दिसतं ह्याचं कारण काय असेल?
आपल्याला चंद्रग्रहण दिसतं तेव्हा चंद्रावरून सूर्य ग्रहण दिसतं. कारण चंद्रावरून बघताना पृथ्वी सूर्याच्या मध्ये आलेली दिसेल. पृथ्वीला वातावरण असल्यामुळे सूर्य एकदम झाकला जाणार नाही व पूर्ण अंधार होणार नाही. त्याउलट आपण पृथ्वीवरून सूर्यग्रहण बघतो तेव्हा चंद्रावर वातावरण नाही व प्रकाश विखुरला जाईल अशी शक्यता नाही, त्यामुळे खग्रास सूर्यग्रहणात पूर्ण अंधार होतो!
माझं दु:ख सर्वांत मोठं! नक्की ना?
तेव्हा ह्या थोड्या विज्ञानातील गमतींचा आनंद घेऊया आणि मुलांना हा अनुभव देऊया. मुलांसाठी हे जितकं आनंददायक आहे, तितकंच ते मोठ्यांसाठीही असू शकतं. अनेकदा आपल्याला वाटतं की, आपलं दु:ख जगातलं सगळ्यांत मोठं दु:ख आहे आणि आपल्या समस्या सर्वांत मोठ्या. पण जेव्हा आपण हे कोट्यवधी किलोमीटर्स अंतरावरचे (गुरू तुम्ही पाहाल तेव्हा तो ६० कोटी किलोमीटर्सपेक्षा लांब असेल आणि शनी १६० कोटी किलोमीटर्सपेक्षा लांब) ग्रह आणि शेकडो प्रकाशवर्ष लांब अंतरावरचे तारे बघताना आपण, आपला अहंकार आणि आपलं दु:ख किती छोटे आहोत, आपण किती नगण्य आहोत ही जाणीवही होत जाते! आणि आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी आपण हे अतिदूरचे ग्रह- तारे बघू शकतो, हा केवढा मोठा चमत्कार आहे, हेही कळतं!
(माझे आकाश दर्शन, हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख वरच्या ब्लॉगवर उपलब्ध. निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील व असं सेशन आपल्याकडे आयोजित करायचं असेल तर संपर्क करू शकता. धन्यवाद.)
मन्या राव ( ), फारच जबरी
मन्या राव (
), फारच जबरी फोटो.
Manya, खंडग्रास सूर्यग्रहण
Manya, धन्यवाद
खंडग्रास सूर्यग्रहण २०१२ चा फोटो काढताना सोलर फिल्टर वापरला नव्हता का? की वापरूनही एवढा तेजस्वी दिसतोय सूर्य? (फिल्टर नाही वापरला तर कॅमेऱ्याला इजा होऊ शकते, म्हणून विचारलं)
@वावे
@वावे
तो फोटो फिल्टर लावून काढला नव्हता, माझ्या कडे त्या वेळी स्पेसिफिक फिल्टर नव्हता (just a uv to filter) .
मी स्वतः ते ग्रहण pinhole camera (home made) वापरून बघत होतो
फोटो काढताना viewfinder मधे न बघता minimum exposure setting वर काही फोटो काढले होते, सुदैवाने कॅमेरा अजूनही ठीक आहे (no oblivious black spots).
पुढल्या वर्षी व्यवस्थीत तयारी करून जाईन
आज चंद्र - गुरू युती होती
आज चंद्र - गुरू युती होती आकाशात.

खूप ढगाळ होत म्हणून SLR वैगेरे ऐवजी पटकन मोबाइल ने फोटो घेतला.
नवमी चा चंद्र आणि गुरू ढगा आडून छान दिसत होते.
फोन कॅमेरा pro mode मधे ISO 3200 1/90 sec exposure.
होय छान दिसत होते काल चंद्र
होय छान दिसत होते काल चंद्र आणि गुरू.
हा मी काढलेला चंद्राचा फोटो.

जबरी!
जबरी!
जबरदस्त फोटो, @वावे..
जबरदस्त फोटो, @वावे..
माझा मागचा फोटोग्राफी चा attempt फसल्यानंतर पुन्हा पुन्हा खगोलांचे फोटो काढण्याची practice करते आहे



बघा जमतंय का?
चंदामामा
.
.
.
(No subject)
धन्यवाद मनिम्याऊ. तुझेपण फोटो
धन्यवाद मनिम्याऊ. तुझेपण फोटो छान आलेत. दुसऱ्या फोटोत मृग नक्षत्र आणि तिसऱ्या फोटोमधे शर्मिष्ठा आहे ( M आकाराचं)
आज गुरूचे (आपल्याला दिसणारे)
आज गुरूचे (आपल्याला दिसणारे) उपग्रह गुरूपासून ज्या क्रमाने असतात, त्याच क्रमाने दिसताहेत. आयो, युरोपा, गनीमीड आणि कॅलिस्टो.
चंद्र आज नेहमीपेक्षा जास्तच सुंदर दिसतोय असं मला वाटलं
Ohh.. शर्मिष्ठा.. मला
Ohh.. शर्मिष्ठा.. मला सप्तर्षी वाटले होते..

BTW
या कृतिका आहेत ना?
हो बरोबर
हो बरोबर
सप्तर्षी आणि शर्मिष्ठा साधारणपणे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत. मध्ये ध्रुवतारा.
(या फोटोत सप्तर्षी नाहीत. आकाशात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतात)
अप्रतिम फोटोज @ वावे जी!!
अप्रतिम फोटोज @ वावे जी!!
@ मनिम्याऊ जी, चांगले फोटो घेतले आहेत. चांगला प्रयत्न. शेवटच्या फोटोमध्ये कृत्तिकांच्या खाली रोहिणी, त्याहून खाली डावीकडे मंगळ आणि कृत्तिकांच्या रेषेत डावीकडे अलगोल तारासुद्धा दिसतोय. स्मार्ट फोननेही असे फोटो योग्य सेटिंग करून घेता येतात.
@ वावे, आजच "मंगळ ग्रहण"
@ वावे, आजच "मंगळ ग्रहण" टीपणार का ?
भारतातून नाही दिसणारे युरोप
भारतातून नाही दिसणारे
युरोप-अमेरिका-आफ्रिकेतून दिसेल.
मला माहितीच नव्हतं आज पिधान आहे हे! तुमची पोस्ट वाचल्यावर शोधलं.
मंगळाच्या पत्रिकेत आज चंद्र
मंगळाच्या पत्रिकेत आज चंद्र आहे
(No subject)
@ वावे "पिधान" हा शब्द बऱ्याच वर्षांनी वाचनात आला, अगदी बरोबर. मला occultation ला मराठी शब्द आठवत नव्हता म्हणून "मंगळ ग्रहण" लिहल.

काल संध्यकाळी तर खूप अंतर होत
मंगळ डाव्या बाजूला खाली दिसत होता.
वेळ ६.३५ ते ७.३५ वाचली होती म्हणून काल संध्याकाळी आणि आता सकाळी पण बघितल पण अंतर अजुनही आहे
Pages