Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मनी रत्नमचे गेल्या दहा
मनी रत्नमचे गेल्या दहा वर्षांत हिट्स नाहीत.
प्राईमवर फुकट झाला कि बघणारे.
छुरी. शॉर्ट मूव्ही आहे.
छुरी. शॉर्ट मूव्ही आहे. टिस्का चोप्रासाठी पाहिला. अनुराग कश्यप पण आहे यात.
एका मराठी चित्रपटाची (समाला) कथा सेमच आहे. पण ट्रीटमेंट मस्त आहे...
मला मोठी डि टेल वारी पोस्ट
मला मोठी डि टेल वारी पोस्ट लिहायची होती. पण कामाचा ताप भयंकर. व ऑफिसचा लॅप्टॉप आहे. त्यात माउस मध्ये काहीतरी प्ले आहे. लिहिलेली पोस्ट एकदम गायब होउन जाते. उद्या जमले तर घरुन लिहिते. पीएस व कांतारा असे देशाच्या मातीतले सिनेमे आले तर फार छान. परवा कांतारा ला जाणार आहे. व्हीआय पी तिकेट.
तो वानर क्लॅन मधील स्पाय व नंदिनी ची इंटरअॅक्षन बघितली तर एक लाइट फ्लर्टिन्ग चालू आहे ते करणॅ फार अवघड. खरेतर तो ज्या शिडीवरुन आला ती दुसृयाच कोणासाठी होती कि कॉय असे वाट्ते. तो म्हणतो जाताना मी एका हिर्या समोर उभा आहे. मग ती म्हणते
मग डोळे दिपले कि नाही. तो दार बंद होता ना म्हणतो थोडेसे. कोंचं. ते फार गोड.
व्हल्गर काही नाही.
लहान पणची ऐश्वर्या जिच्याव र आदिताचे प्रेम बसते. ती तर अग दी सुकुमार कलिका दाखवली आहे अनाघ्रात सुंदरी.
व पुढे जेव्हा ती चोला महालात येते. तेव्हा बाहेरच थांबते राज दरबारात तेव्हा तिची लहान पणची महत्वा कांक्षा दाखवली आहे.
सिंहासनावर बसायची. ही ती पूर्ण करे लच.
श्रिलंकेतले सीन पण सुखद आहेत
श्रिलंकेतले सीन पण सुखद आहेत. बुद्ध मठातले लोक अरुण मोळीला सिं हासन ऑफर करतात पण तो नाकारतो. बुद्धाला व्हाइट फुले वाहतो. तो सीन. जाती व्यवस्था, शैव व वै ष्णव भेद. दाखवला आहे. तो विनोदी जाड्या वैश्ण व. म्हणजे रमण्याची अपेक्षा करणारा वाट बघणा राच वाट्तो. तिथे उत्सव आहे जेवन छान असेल. एका मंदिरात दुधाचे पायसम बनव णार् आहेत असे उल्लेख येतात. मला दक्षिणेतील देवळामधले अन्न / प्रसाद फार आवडतो. आय वुड टोटली डू दॅट.
वानर क्लॅन चा स्पाय राजमहाला तून उडी मारतो. व खाली पडतो तिथे एक बाई ताक घेउन बसलेली असते व तो गडगाभर पितो. ते बरूबर दाखवले आहे. तमिळाला मोर म्हणजे बिहार्याला लिट्टी चोखा.
पी एस १ च कौतुक करणारा मी
पी एस १ च कौतुक करणारा मी एकटाच आहे >>> अरे! मला वाटतं धनि ने आधीच्या धाग्यावर केलं होतं कौतुक पी एस १ चं. खरोखरच भारी पिक्चर आहे. अगदी खिळवून ठेवणारा. व्हिएफेक्स पण डोळ्यात न खुपणारे, सहजपणे सादर होणारे वाटले. आणि गाणी एकसेएक! मी तमिळ व्हर्जन पाहिलं. पण आवडलं ते. इनफॅक्ट मला तरी गाणी हिंदीपेक्षा तमिळमधली जास्त आवडली.
अच्छा, हो का? सॉरी धनी.
अच्छा, हो का? सॉरी धनी.
हा चित्रपट तमिळमध्येच पहा. आधी स्टोरी समजून घ्या म्हणजे सबटायटलसमध्ये महत्त्वाचं काही निसटलं तरी ते माहीत असेल.
हपा, मीही तुमच्याबरोबरीनेच
हपा, मीही तुमच्याबरोबरीनेच केलं की कवतिक! पुस्तकसुद्धा घेतलं ऐकायला तर!
पुस्तकात (अर्थातच) आणखी कितीतरी डीटेल्स आहेत.
आता पुन्हा सिनेमा बघताना आणखी छान समजेल.
मला आत्मपरीक्षण करायची गरज
मला आत्मपरीक्षण करायची गरज आहे आता. _/\_
मला आत्मपरीक्षण करायची गरज
पु तो प्र आ, त्या का टा.
मी कौतुक नाही केलं पण थिएटरला
मी कौतुक नाही केलं पण थिएटरला जाऊन काही बघताय तर पी एस वन बघा असं इथेच रिकमंड केलं. हे कौतुकात मोडते का बघा.
(कुणी आत्मपरीक्षण करणार म्हटलं की आपण शक्य तेवढी मदत करावी.)
(No subject)
कुणी आत्मपरीक्षण करणार म्हटलं
कुणी आत्मपरीक्षण करणार म्हटलं की आपण शक्य तेवढी मदत करावी >>>
द ब्लैक फोन..प्राईमवर पाहिला.
द ब्लैक फोन..प्राईमवर पाहिला.
विषय- सीरीयल किलींग, किडनैप,मर्डर,शोधाशोध, पळापळ,वायोलंस, हॉरर, थोडा गुढ, ठिक वाटला.
(कुणी आत्मपरीक्षण करणार
(कुणी आत्मपरीक्षण करणार म्हटलं की आपण शक्य तेवढी मदत करावी.)
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 5 November, 2022
तुम्हाला मायबोलीवरचे शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात यावे असा मी ठराव मांडते.
ब्रह्मस्त्र hotstar वर आलाय.
ब्रह्मस्त्र hotstar वर आलाय.
पाहिला. त्यातली lovestory तर बालिश वाटली.
टिपिकल चुका करणारे हिरो लोक्स आणि व्हिलन लोक्स.
डायलॉग first half तर एकदम बोअर.
सुरवातीला तर कुठे, काय आणि का सुरुय lovestory मध्ये हेच कळलं नाही.
चित्रपटात सर्वात best VFX पार्ट.
रणबीर कपूर आता एकसुरी वाटतोय.
आलिया डोळ्यात बदाम सुंदर.
बच्चन हुकुमी भूमिका.
माबोवर लै उदो उदो वाचलेल्या cameo भूमिका दोन्ही ठिकठाकच. मुळात स्टोरी आणि डायलॉग मध्ये त्या पार्ट पुरता दम नसल्याने शाहरुख आणि नागार्जुन पार्ट सुमार वाटला.
शाहरुख डर अंजाम देवदास च्या वेळेची acting आणि डायलॉग डिलिव्हरी वाटली. नागार्जुन ह्यांचे इतर काही पाहिले नाही काम त्यामुळे त्यावर बोलता नाही येणार.
Concept भारी पण बरीच माती खाल्ली.
बरं झालं थिएटरला नाही गेलो.
झकास राव , आजच बघायला चालू
झकास राव , आजच बघायला चालू केलाय.
त्यातली lovestory तर बालिश वाटली. >>>> माझा तेरा वर्षाचा मुलगा बघून आला , तेव्हा मला सांगत होता , " काहीही हां , मम्मा . तो त्या इशाला बघतो. मग ती भेटते, तर तिला त्याच्याबरोबर पार्टी ला बोलवतो आणि ती लगेच जाते पण . एकदाच भेटल्यावर ??? अरे , असं असतं काय ??? ती तर त्याला ओळखत पण नसते . मग तिला adventure trip वर पण घेऊन जातो . ती तेव्हा पण मी पण येते बोलते. काहीही फालतुगिरी दाखवली आहे. "
कालच मला म्हणाला , " watch at ur own risk . Dont complain later "
Concept भारी पण बरीच माती खाल्ली. >> +10000.
ते सारखं शिवा , शिवाS , शिवाSSS कंटाळा आणतं
अरे हा आला ओटीटीवर..
अरे हा आला ओटीटीवर..
घरी सांगायला नको. नाहीतर उगाच लाऊन ठेवतील टीव्हीला. पुन्हा बघायची ईच्छा नाही.
पण शाहरूखचा पार्ट पुन्हा बघायचा आहे. तो गपचूप जमवावा लागेल.
All Quiet on the Western
All Quiet on the Western Front नेटफ्लिक्सवर आलाय
युद्ध, त्याची भयानकता आणि भिषण वास्तव अगदी मोजक्याच फ्रेममध्ये दाखवणाऱ्या सिनेमात याची गणना व्हावी इतका उत्कृष्ठ आहे. अक्षरश अंगावर काटाच येतो ते बघताना
पण सिनेमाचे नाव वेगळं हवं होतं असे मनापासून वाटलं, कारण मूळ कादंबरी किवा त्यावर आलेले दोन्ही सिनेमे याचा आणि या नव्याचा काहीच ताळमेळ नाही. फक्त गाभा सारखा ठेऊन अनेक नवीन प्रसंग, नवीन पात्रे घुसडली आहेत, संवाद पूर्णपणे वेगळेच आहे, त्यांचे ट्रेनिंग वगैरे सगळं कापूनच टाकलं आहे त्यामुळे व्यक्तिरेखांची नीट ओळखच होत नाही.
अनेक घोडचुकाही आहेत. मुळ कथेत पॉलसमोर विषारी वायूने तडफडून नवीन रिक्रुटांचा बळी जातो. तो कसा हेही तो बघतो, पण सिनेमात हा प्रसंग अगदीच बदलून टाकला आहे आणि त्यामुळे तो हास्यास्पद झाला आहे.
पण एक विलक्षण युद्धपटांमध्ये याचा नक्कीच समावेश होईल, लहानमुलांसोबत किंवा जेवताना बघू नका, हा वैधनिक इशारा
PS-1 तमिळ अर्धा पाहिला..अर्धा
PS-1 तमिळ अर्धा पाहिला..अर्धा उद्या..खूप संथ आहे..
नेफ्लिवर द घोस्ट पाहिला
नेफ्लिवर द घोस्ट पाहिला नागार्जुनचा. चांगला अॅक्शनपट आहे. जरा कुठे कुठे अ आणि अ होतो. व्हिएफेक्सच्या रक्ताच्या चिळकांड्यांचा मोह टाळला असता तर बरं झालं असतं असं वाटलं. बाकी हॉलिवूडी अॅक्शन सीक्वेन्सेस आहेत अगदी. नागार्जुन एकदम फिट दिसतो. छान वाटतं त्याला अश्या रोलमधे पहायला. एकदोन गोष्टी 'असं कशाला केलं' असं वाटवणार्या आहेत. पण ठीक आहे.
घोस्ट माय लिस्ट मधे आहे. बरं
घोस्ट माय लिस्ट मधे आहे. बरं झालं चांगला रिव्ह्यू आला. धन्यवाद.
पीएस १ साठी प्राईमला पैसे का भरावे लागताहेत ? काल मी सूरू केला तर नाहीत मागितले. सबस्क्रीप्शनशिवाय वेगळे मागतंय का ? (आमचे कुणी प्राईम व्हिडीओ, अॅमेझॉन मधे नाहीत :फिदी:)
कालपासून पैसे नाहीत पीएसवनला
कालपासून पैसे नाहीत पीएसवनला म्हणून मी पण सुरू केला
घोस्ट काल जागून पाहिला. नसता
घोस्ट काल जागून पाहिला. नसता पाहिला तर बरं झालं असतं. नार्गार्जुन वयाच्या ६५ त तरूण दिसतो हाच युएसपी आहे. बाकी हिंदी डबिंग मुळे संवाद बकवास झाले आहेत. ज्याने कुणी आवाज दिला आहे त्याने सूड उगवल्याप्रमाणे हवाच काढून घेतलेली आहे. सुरूवातीचा अॅक्शन सीन हा अ आणि अ च्या पल्याड गेलेला आहे. बथ्थड सीन आहे. आपणही मध्यंतरी बथ्थड होऊनच सहन करत होतो. ज्यासाठी सूर्यवंशी हा टीकेबल आहे त्यासाठी घोस्टला क्षमा नाही करता येत. अगदी पहिली गोळी सुटते तेव्हां छान वाटलं. कारण कशाच्या तरी मागे नायक नायिका लपून दूरचा वेध घेत असतात. पण इतर कोणत्याही हिंदी आणि साऊथच्या चित्रपटाप्रमाणे ते बुलेटप्रूफ जॅकेट, अंगडं टोपडं न घालता शत्रूच्या गोटात चणे फुटाणे विकायला आल्याप्रमाणे फिरतात आणि त्यांना एकही गोळी लागत नाही हे आता सहन होत नाही. हॉलीवूड मधेही असतं हे. हे लोक लपलेल्या गनिमाला टिपू टिपू ठार करत असतात. पाठीला पाठ लावून गोळीबार केला की यांना कुठलीच गोळी शिवत नाही. किमान ब्रह्मास्त्र मधे एखादं शिल्ड दाखवता आलं तर ते चालणेबल असतं.
इंटरपोल मधे हे दोनच अधिकारी असणे, दुबईतले लोकल अधिकारी काहीच कामाचे नसणे, सनी देवलला नेहमी वरीष्ठ पोलीस अदिकार्यांकडून समज मिळते तशी नागार्जुनला मिळणे यातले काहीच पटत नाही. बरं एव्हढा मोठा अधिकारी आणि नंतर त्याचा वैयक्तिक बदला यात काही नावीन्य नाही. साऊथच्या हल्लिच्या चित्रपटात कथानक मधेच तोडतात. नंतर वेगळेच सुरू होते. मग शेवटी जिथून तोडले तिथून ते पांढरे कपडे घालणार्या दिग्दर्शक द्वयीच्या धक्काचित्रपटा प्रमाणे शेवटी धक्क्यावर धक्के दिले की प्रेक्षकाची मती कुंठीत होऊन त्याला सस्पेन्स चित्रपट पाहिल्याचा फील येतो. या तंत्राचा सर्वात चांगला वापर कहानी - १ मधे केला आहे. साऊथला त्याचा अतिरेक आहे. रॉ बीस्ट हे त्याचे सर्वात वाईट उदाहरण आहे..
वन टाईम वॉच सुद्धा नाही.
टीप : मोदी जाकीट प्रमाणे इंटरपोल अशी अक्षरे लिहीलेली काळी जाकीटं आणि पांढरा टी शर्ट हा अद्याप गुलदस्त्य़ात असलेला इंटरपोलचा युनिफॉर्म खूप्पच आवडला. या युनिफॉर्मसाठी जर इंटरपोलमधे सिलेक्शन झालं तर जायला तयार आहे. कुणा नगरसेवक आमदार खासदाराची ओळख असेल कर कळवा
तळटीप : हल्ली मोठा प्रतिसाद लिहील्यानंतर आपोआप सगळं टेक्स्ट सिलेक्ट होऊन तो गाय़ब होतो, मग उत्साहच मावळतो. हे फक्त माझ्याच बाबतीत होते का ?
भारी लिहिलंय राभू
भारी लिहिलंय राभू
बाकी हिंदी डबिंग मुळे संवाद बकवास झाले आहेत. ज्याने कुणी आवाज दिला आहे त्याने सूड उगवल्याप्रमाणे हवाच काढून घेतलेली आहे. >>>> याचा अनुभव खुपदा आलाय...रिसेंट अम्मू तेलुगू बघताना तर हिंदीत इमोशन्स च नव्हते नायिकेच्या आवाजात...
साऊथच्या हल्लिच्या चित्रपटात
साऊथच्या हल्लिच्या चित्रपटात कथानक मधेच तोडतात. नंतर वेगळेच सुरू होते.
अगदी अगदी
बाकी हिंदी डबिंग मुळे संवाद
बाकी हिंदी डबिंग मुळे संवाद बकवास ....
>>>>>
अगदी...
पुष्पामध्ये मात्र हेच बरे वाटले. श्रेयस तळपदेने आवाज मस्त दिला.
पीएसवन पूर्ण पाहिला..खूप कमी
पीएसवन पूर्ण पाहिला..खूप कमी कळला..कोण कुठुन कुठे चाललंय..कुणाला काय हवंय..नाही समजलं.. तरी नवर्यानं कळणार्या भाषेत (तेलुगू) आणि मी वीथ सबटायटल्स पण तरीही आम्हाला नाही समजला.
नेटफ्लिक्सवर RV म्हणून २००६
नेटफ्लिक्सवर RV म्हणून २००६ चा पिच्चर आहे.. अमेरिकन कुटूंब जे पहिल्यांदाच RV घेऊन रोड ट्रिपसाठी जातात..धमाल कॅामेडी आहे.. IMDb रेटिंग ५.५ असलं तरी माझ्याकडून ८
अरे पण हिंदी डबिंग नसेल तर
अरे पण हिंदी डबिंग नसेल तर चित्रपट कळणार कसा?
डबिंग तर हवेच. फक्त चांगले
डबिंग तर हवेच. फक्त चांगले हवे. हिंदीतही पैसे कमावणार असाल तर खर्चही करा.
Pages