चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आजच्या ऐतिहासिक चित्रपटातला अ‍ॅटीट्यूड, डायलॉगबाजी ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करताहेत असे वाटते.

+१११
रानभुली उत्तम प्रतिसाद

लाल सिंग चढ्ढा पाहिला.
आमिर खान चा डोळे वटारून अभिनय नजरे आड केला तर बाकी एकदा बघायला चांगला आहे.
मूळ गम्प पूर्ण पाहिलेला नाही.त्यामुळे फ्रेश पिक्चर म्हणून पाहिला आणि आवडला.

रेअर विंडो पाहिला काल ... हिचकॉक म्हणजे प्रश्न नव्हताच पण तरीही ज्या लेव्हल एक्सपेक्त होता तिथपर्यंत गेला नाही...

>>ही ऐतिहासिक चित्रपटांची आलेली लाट राजकारणापासून दूर असणार्‍यालाही एका अजेण्ड्याचा भाग असावी अशी शंका यायला लावणारी आहे. <<
ऑफकोर्स त्यामागे अजेंडा आहे, पण त्यात भालजींना ओढलेलं खटकलं. भालजींनी महाराजांवर निर्मित केलेल्या चित्रपटांमधे कोणाला कुठे/कसला अजेंडा दिसला ते जाणुन घ्यायला आवडेल. भालजीं सारखा निस्सिम शिवप्रेमी त्यानंतर जन्माला आला नाहि; आले ते निव्वळ बेगडि. महाराजांच्या पुण्याई वर आपापली तुंबडि भरणारे. ऐतिहासिक घटनांंमधे थिएट्रिक्स शोधुन त्याचं कमर्शलायझेशन करण्याची सुरुवात पुरंदर्‍यांनी केली. आज त्याचेच परिणाम आपण भोगत आहोत...

मागे वाचलं होतं कि, हॉलिवुडच्या सहकार्याने पालखेडची आणि कोरेगावची लढाई यांच्यावर आधारीत सिनेमे येणार आहे. ते मटिरियलाय्ज होइस्तोवर लांजेकर, मांजरेकर इ. ना झेलावं लागणार आहे...

बिम्बिसारा- तेलुगू झीफाईव्
पाचव्या शतकातील एक क्रुर, शुर, घमंडी राजा असतो..आजुबाजुची राज्ये लुबाडून खजिना भांडार भरलेला असतो त्यात एक धन्वंतरी पुस्तक पण असते... राजा जनतेवर प्रचंड अत्याचार करत असतो..तो एका जादुई आरशाथ्रु एकवीसाव्या शतकात पोचतो..पुढे काय होते सिनेमात पाहा..
फैन्टसी ऐक्शन सिनेमा.. मजा आली बघायला..
ज्यु एनटिआरचा स्टेपब्रदर नायक आहे.

फाईट क्लब पाहिला काल.
चांगली सुरवात, मग हा निवेदका सारखा स्टोरी टेलिंग प्रकार जास्तच लांबलाय नाही का असे वाटणे, परत ग्रीप, मग टायलर गायब होतो आणि हा त्याला शोधायला मागे लागतो तेव्हा आधी उत्सुकता मग काहीही सुरुय असं वाटणे आणि मग तो ट्विस्ट! (जो आधी एकदा मार्ला आली असताना एडवर्ड नॉर्टनला ब्रॅड पिट प्रॉम्टिंग करत असतो तेव्हा जरासा क्लिक होतो पण नंतर समहाऊ डोक्यातून विसरून जातो) तो येतो तेव्हा खरेच डोक्याला "शॉट" लागल्या सारखे वाटले.
शेवटी तो तोंडात गोळी लागूनही अगदी व्यवस्थित बोलतो ते मात्र खटकले.

एकंदरीत छान एन्जॉय केला.

फाईट क्लब आवडतो पण टायलर डर्डन आणि फाईट क्लबला खरोखरीच इन्स्पिरेशन मानणारे लोक आंजावर दिसतात तेव्हा गंमत आणि भीती वाटते.

तिफा इन ट्रबल हा पाकिस्तानी सिनेमा पाहिला. काहीच खास नाहीये पण एक मात्र जबरी आवडलं - भारत रहाणीमानात किती पुढे आहे पाकिस्तानपेक्षा हे समजलं चित्रपट बघून. 'कुठे तो चश्मेबद्दूर आणि कुठे हा' असे वाटायला लावणारा अली जफर नायक आहे.

कंतारा पहिला. कर्नाटकातले जंगल, जुनी घरे, फर्निचर, नायकाचे उंच झाडावरचे घर आणि भूत कोला चे प्रसंग हे आवडले. पण KGF सारख्या टिपिकल दाक्षिणात्य चित्रपटांमधून आहे तशी मारधाड, बेछूट गोळीबार, लोक धडाधड मारतात हे सगळं अंगावर येतं. मध्येच नायिकेचे वेगळे कथानक का घुसवले आहे ते ही कळत नाही.

काल खुदा हाफिज चैप्टर-2 (अग्नी परिक्षा) पाहिला.
सुरूवातीला टेकन वाला फिल आला पण नाही स्टोरी वेगळी आहे.
खुदा हाफिज वन मधले कपल एक पाच वर्षाची अनाथ मुलगी दत्तक घेतात..ती किडनैप होते..हिरो तीला शोधायला निघतो.. ती सापडते पण भयंकर अवस्थेत... अंगावर येणारा हिंसाचार,रक्तपात..ऐक्शन,रिवेंज स्टोरी.

हॅलोविन चा सीजन असल्याने नुकतेच आलेले दोन हॉरर / थ्रिलर सिनेमे पहिले. दोन्हीही आवडले.

स्माईल (2022) - एका सायकॉलॉजिस्ट ची पेशंट सेशन मध्येच हसत हसत स्वतःच गळा चिरून जीव देते.
ह्या घटने नंतर सायकॉलॉजिस्ट सगळी कडे क्रीपी हसणाऱ्या लोकांचे भास होऊ लागतात. नक्की काय होतं हे बघूनच ठरवा.

वॉचर (2022) - रोमेनिया ला नुकतीच मूव्ह झालेल्या एका तरुणीचा असा पक्का समज होतो कि तिच्या घरा समोर राहणारा इसम हा सिरीयल किलर आहे. पुढे काय होते हे नक्कीच इंटरेस्टिंग आहे.

कृपया चित्रपट कुठे पहिला हे सर्वांनी टाकावे जेणेकरून इतरांना शक्य झाले तर आस्वाद घेता येईल...नाहीतर बोकलत यांना पाचारण करण्यात येईल...!!!

मोनिका ओ माय डार्लिंग चा ट्रेलर आवडला. अंधाधुनच्या मेकर्स कडून अशी टॅगलाईन आहे. राजकुमार राव, हुमा कुरेशी इत्यादी स्टार कास्ट चांगली वाटली. इंटरेस्टीग सस्पेन्स कॉमेडी प्लॉट असावा. नेटफ्लिक्सवर ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

पठाणचा ट्रेलर पाहून ओटीटीवर येईल तेव्हां बघायचा कि नाही ठरवू असे वाटले. टायगर जिंदा है, धुम चा मसाला कोंबलाय. यशराज प्रॉडक्शन तसेही निराशाजनक होत चाललेय चित्रपटागणिक.

झी५ वर नाना पाटेकरचा ‘तडका’ नावाचा पिच्चर आलाय.. मस्त फील गूड मूव्ही आहे. बहुतेक साऊथचा रिमेक आहे.. डिरेक्शन जुनं वाटलं पण एकदा बघता येईल असा आहे

पोन्नियिन सेल्वन बघितला. छान आहे. हा भाग एक आहे. मणि रत्नम चा कसलेला हात जाणवतो. ऐश्वर्या फार सुरेख दिसते पण तिच्या भोवती एक निगेटिव्ह व्हाइब्ज देते. त्रिशा जी कुंदवई राजकन्या झालेली आहे ती ही फार सुरेख दिसते. केशरचना सुरेख आहेत तिच्या. शोभिता धुलीपाला सुरेख दिसते. विक्रमचा आदिथा राजकुमार चांगला आहे. त्याने आपले फ्रस्ट्रेशन दाखवले आहे तो भाग काटा आणतो अंगावर. चित्रण पण नेत्र सुखद. सीजी आय आहे पण डोक्यात जात नाही. कथा जरा चांदोबा टाइपच आहे. पण पोन्नियन सेल्वन युनिवर्स चांगले उभे केले आहे.

नेटफ्लिक्सवर The chalk line पाहिला. छान आहे मुवी. शेवट जरा गडबडीत केला आहे. 'प्रेक्षकांनी समजून घ्यावे नक्की काय घडले ते. मग प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकते ' असा ऍप्रोच वाटला.

पी एस वन प्राइम वर बघि तला भाडे भरून १९९ रु. व तमीळ मध्ये. चित्रपट तमीळ मध्ये जास्त खुलतो. रहमानने पण तीनच गाणी दिली आहेत पण त्यातले एक गायले आहे. अगदी ओल्ड रहमान टच आहे. रहमान मणिरत्नम गुड टीम. बाकी पडद्यामागचे टीम पण भरपूर अनुभवी व छान आहे.
मी तमीळ नाडू मध्ये कामानिमित भरपूर हिंडलेली आहे त्यामुळे तमीळ ऐकायला बरे वाटले.

तो स्पाय व प्रिन्सेस कुंदवई आणी साइडला सर्व ऐकत हसणारी शोभिता धुली पाला हा सीन फार गोड आहे. स्पायचे काम करणारा फार इजी वावर आहे. विक्रम तर लाँग टाइम फेवरिट. ऐश्व्रया अगदी त्रिपुर सुंदरी दिसते. पण त्रिशाचे ड्रेसिन्ग व केस जास्त जमले आहेत.

मी थिएटरमध्ये हिंदीत बघितला. काही संवादात भाषांतर खटकते मात्र. पण कांतारा तुलनेत बरेच कमी. एकदा ओटीटी वर तमिळ मध्ये बघेन.

सब टायटल्स वाचायचा कंटाळा येतो नाहीतर पाहिला असता कालच. मायबोलीवरचा बहुचर्चित ब्रह्मास्त्र पाहिला त्या ऐवजी Proud

रानभुली बरोबर आहे. मला सुद्धा दुसऱ्या भाषेत बघून सबटायटल्स बघत बसणे आवडत नाही.

हिंदीत बघितलाय, कथा, प्लॉट तर मग माहीत असल्याने तमिळमध्ये बघुन पाहण्याचा विचार करतोय.
असा एक प्रयोग केला, डब्ड चित्रपट नव्हे पण, सूर संगम हा हिंदी रिमेक असलेला पाहुन मग शंकराभरणम मूळ तेलुगू चित्रपट पाहिला होता. तेलुगू आवडला होता.

शंकराभरणम मू़ळ कुठल्या भाषेत पाहिला ते सांगता येणार नाही. कारण लहान असताना आमच्या कन्नड शेजार्‍यांनी घरी लावला होता आणि आम्हाला बघायला लावला होता. ते कन्नड असल्याने त्यांनी तेलगू लावला कि कन्नड मधे लावला हे कळायला मार्ग नाही कारण दोन्ही भाषा माझ्यासाठी सारख्याच. Proud
सुरूवातीला सक्ती वाटली पण नंतर एक शब्दही न कळता संपूर्ण कथा समजली. चित्रपट आवडला. बहुतेक संगीतामुळे असेल. सूरसंगम आत्ता आत्ता पाहिल्यावर त्या वेळी जे पाहीले ते आता सगळे शंभर टक्के समजले.

मला सुद्धा संगीतामुळे आवडला. माझा त्यातला अभ्यास नाही पण ओढ आहे एवढेच. शेवटले गाणे दोरकुना इटुवंटी सेवा हे विशेष आवडलेले, अधून मधून ऐकत असतो केव्हातरी.

अमा, थँक्यू. इथे मला वाटलं की पी एस १ च कौतुक करणारा मी एकटाच आहे. एव्हढा नितांत सुंदर चित्रपट ठेत्रातच बघण्यासारखा होता. (सुदैवाने मी पाहिला) तो फारसा चालला नाही याचं मला अतीव दुःख आहे.

Watcher पाहिला काल

शेवटच्या १० मिनिटांसाठी अगोदरचा दीड तास वाया गेला अस वाटलं.

Pages