Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
स्वस्ति व झकासराव यांच्या
स्वस्ति व झकासराव यांच्या वाक्या वाक्याशी सहमत. कालच हॉटस्टार वर ब्रम्हास्त्र पाहिला. झक मारली आणि पाहिला असे वाटले. त्या शाहरूख व नागार्जूनला असले कॅमिओ करायची का अवदसा आठवली कोण जाणे. नसते तरी चालले असते. मुलीने आधीच वॉर्नींग दिली होती. तरी पाहिला. लवस्टोरी पार्ट खूपच ताणलाय. त्या नागार्जूनला वाचवायला जातात आणि तिथे ते काम सोडून लवस्टोरी चालूच....
आम्हाला आवडला ब्रह्मास्त्र...
आम्हाला आवडला ब्रह्मास्त्र... रणबीर आलिया क्युट दिसतात एकत्र...
आणि आपण xmen बघतो , हॅरी पॉटर बघतो त्याला शिव्या घालतो का.. ब्रह्मास्त्र आपला xman आहे...
हॅरी पॉटर बघतो त्याला शिव्या
हॅरी पॉटर बघतो त्याला शिव्या घालतो का >> मी घालतो
मला आवडला नाही, पण कश्याला
मला आवडला नाही, पण कश्याला बघितला असेही झाले नाही.
उलट थिएटर नाहीतर ओटीटी, कुठेतरी एकदा बघायचा होताच. कारण त्याशिवाय दुसरा भाग कसा कळणार.
त्यामुळे थिएटरला बघितले हे चांगलेच झाले. कारण असला पिक्चर थिएटरलाच बघण्यात मजा. आता घरी शाहरूखचा पार्ट तेवढा पुन्हा बघणार.
यावर ईथे लिहिलेले तेव्हा
ब्रह्मास्त्र - एक प्रामाणिक परीक्षण - by SRK
https://www.maayboli.com/node/82466
हॅरी पॉटर बघतो त्याला शिव्या
हॅरी पॉटर बघतो त्याला शिव्या घालतो का >> मी घालतो Happy >>>> +७८६ मी सुद्धा घालतो
पण चित्रपट वाईट आहे म्हणून नाही. तर घरी बायकापोरं लाऊन ठेवतात. उगाच मलाही सहन करावा लागतो. काय चालूय एक शब्द कळत नाही.
अरेरे... हॅरी पॉटर ला शिव्या
अरेरे... हॅरी पॉटर ला शिव्या घालणारे पब्लिक आहे हाच मला कल्चरल शॉक ...
हॉलिवूडचे अचाट आणि अतर्क्य
हॉलिवूडचे अचाट आणि अतर्क्य पिक्चर असेल तर घालतो की शिव्या.
हॅरीचा पहिला भाग आलेला तेव्हा
हॅरीचा पहिला भाग आलेला तेव्हा मी लहान होतो. गंमत वाटलेली.
पण नंतर मोठे होत गेलो तरी त्यात तेच. मग गंमत कशी वाटणार ..
त्याचा पाचवा की सहावा कुठलातरी फायर वगैरे शीर्षकात असलेला एक भाग थिएटरात पाहिलेला. कॉलेजमध्ये गेलेलो तेव्हा. परीक्षा चालू होती. मित्रांना बघायचा होता. मग मी चला म्हटले. नाईलाज होता. पैसे उगाच खर्च केले असेच झाले होते. एकतर मोजून पॉकेटमनी असायचा. जो शाहरूखच्या चित्रपटांसाठी जपून वापरायचो.
हॅरीचा पहिला भाग आलेला तेव्हा
हॅरीचा पहिला भाग आलेला तेव्हा मी लहान होतो. गंमत वाटलेली.>>>>
सर २००१ साली लहान होते आणि २००५ ला ते कॉलेजमध्ये होते, यावरुन त्यांचे वय किती असू शकेल
पैसे उगाच खर्च केले असेच झाले होते>>>>>
थोडक्यात म्हणजे चांगल्याचे वावडे आहे तुम्हाला सर
आता वरची पोस्ट वाचली, हॅरी
आता वरची पोस्ट वाचली, हॅरी पॉटर आणि ब्रम्हास्त्र याची तुलना बघून धन्य धन्य झालं
या लोकांना सिरियसली घेऊ नये हे कळत पण कुठवर सिरियसली घेऊ नये ते कळत नाही.
खुप दिवसांनी डोकं बाजूला
खुप दिवसांनी डोकं बाजूला ठेवून बघण्यासारखा सिनेमा पूर्ण पाहिला
ब्रॅड पिटचा बुलेट ट्रेन, आधी वाटलेलं मस्त हलका फुलका कॉमेडी वगैरे असेल, सुरुवातीचे डायलॉग आणि प्रसंग धमाल वाटलेले, नंतर मग त्याचं लॉजिक, फिजिक्सचे नियम, व्यक्तिरेखा सगळ्या रानोमाळ पळून जातात आणि उरतो तो निर्बुद्ध अॅक्शनपट
इतका म्हणजे इतका निर्बुद्ध की सलमानच्या सिनेमांना पण जबरा कॉम्पलेक्स येईल. फक्त ब्रॅड पीट, जोई किंग साठी आणि चटपटीत संवादांसाठी बघितला तर बघावा, नाही बघितला तर उत्तमच
मोदी जाकीट प्रमाणे इंटरपोल
मोदी जाकीट प्रमाणे इंटरपोल अशी अक्षरे लिहीलेली काळी जाकीटं आणि पांढरा टी शर्ट हा अद्याप गुलदस्त्य़ात असलेला इंटरपोलचा युनिफॉर्म खूप्पच आवडला. या युनिफॉर्मसाठी जर इंटरपोलमधे सिलेक्शन झालं तर जायला तयार आहे. कुणा नगरसेवक आमदार खासदाराची ओळख असेल कर कळवा>>>>

इथे कोनीतरी सांगीतल्याप्रमाणे
इथे कोनीतरी सांगीतल्याप्रमाणे ओशन अकरा हा भंगारपट पाहीला. वेळ वाया गेला.
आता वरची पोस्ट वाचली, हॅरी
आता वरची पोस्ट वाचली, हॅरी पॉटर आणि ब्रम्हास्त्र याची तुलना बघून धन्य धन्य झालं
या लोकांना सिरियसली घेऊ नये हे कळत पण कुठवर सिरियसली घेऊ नये ते कळत नाही.++++++++++++++++++१०^१०^०८^१० upto infinity.
हॅरी पॉटर चित्रपटांना (म्हणजे
हॅरी पॉटर चित्रपटांना (म्हणजे पुस्तकांना नाही, फक्त चित्रपटांना) शिव्या घालतय पब्लिक का एक ते आठ मूव्हीत जादू बघून ते लहान पोरांचं आहे मोठेपणी कसली जादू असं काही वाटतंय?
बॉय हू लिव्हडला शिव्या असतील तर मगलानो. . Repelo Muggletum! मराठीत... फुटा!
How I wish I was at Hogwarts
How I wish I ware at Hogwarts!
You are already at Hogwarts
You are already at Hogwarts केकु , you write magical stories!!
मला सगळं वाचणं होत नाही पण अंदाज आलायं, तुम्ही चांगले लिहिता.
--------
योगी +१
'ब्रह्मास्त्र'वर मीही हेच लिहिले आहे! फक्त शीर्षकात 'प्रामाणिक' शब्द राहिलाय
@नेटफ्लिक्स
@नेटफ्लिक्स
ब्लू जास्मिन
अप्रतिम वाटला. केट ब्लॅन्चेटचे काम अतिशय सुरेख झाले आहे. न्युयॉर्कची श्रीमंत सोशलाईट नवऱ्याच्या अफेअरने कशी कोलमडते व सावरता येत नाही , सुबत्तेची सवय व गरीब बहिणीकडे रहायची गरज , स्वार्थी स्वभाव व वहावत गेलेले आयुष्य फार छान रंगवलंय.
द मर्डर मिस्ट्री
ॲडम सॅन्डलर व जेनिफर ॲनिस्टन , विशेष नाही. आवडला नाही, ओढून ताणून केलेले विनोद आहेत.
रेप्लिकाज
फक्त कियानु रिव्हज साठी बघितला. आवडला नाही, साय फाय व मृत कुटुंबाचे कॉन्शसनेस डाऊनलोड करणे वगैरे जमले नाही. हेच जॉनी डेपच्या ट्रान्सेन्डन्स मधे खूप आवडले होते.
एक्सट्रॅक्शन
क्रिस हेम्सवर्थला अभिनय येत नाही, देखणा आहे झालं. रक्तपात, बांग्लादेशातले ड्रग कार्टेल , दिल्लीतला माफिया व रणदीप हूडा आहे. आवडला नाही.
@प्राईम
पॅच ॲडम्स
रॉबिन विल्यम्स नेहमीप्रमाणे सुंदर, जिवंत अभिनय. वेड्यांच्या दवाखान्यातला डॉक्टर व त्याला आलेले अनुभव !!
100फूट जर्नी
हा मी मागेही सुचवला होता, पुन्हा आलाय. हेलन मिरेन व ओम पुरी यांची जुगलबंदी. रूरल फ्रांस मधे काढलेले भारतीय रेस्टॉरंट व फ्रेंच रेस्टॉरंट यांची स्पर्धा, हलकाफुलका व वेगळा आहे. नक्की बघा.
हॅरी पॉटर चित्रपटांना (म्हणजे
हॅरी पॉटर चित्रपटांना (म्हणजे पुस्तकांना नाही, फक्त चित्रपटांना) शिव्या घालतय पब्लिक का ... >> चित्रपटांना. पुस्तक मी तरी एकच वाचलं आहे. ते चित्रपटापेक्षा बरं होतं.
एक ते आठ मूव्हीत जादू बघून ते लहान पोरांचं आहे मोठेपणी कसली जादू असं काही वाटतंय? >> नाही, नाही, तसलं काही नाही.
पण काय वेळ आली आहे! पूर्वी राष्ट्रगीत आवडत नाही त्यांना पाकिस्तानात पाठवायचे लोक. आता हॅरी पॉटर आवडत नाही त्यांना पण! हम जाए तो जाए कहां?
हम जाए तो जाए कहां?>> अझक बान
हम जाए तो जाए कहां?>> अझक बान ला पाठिवतील.
मला आवडतात हॅरी पॉटर पुस्तके. चित्रपट पण फार मन लावुन बघितले आहेत. सातवा भाग एक मात्र जरा जड गेला कारण डॉबी !!
सातवा भाग दोन बघायला मिळाला नाही कारण मुले मोठी झाली व आपन हून बघुन आली. वीकांताला बघायचा प्लान आहे. परवालाच पार्ट फोर बघितला. पुस्तकात बारके बारके भाग फार मस्त लिहिले आहेत.
आणि तेव्हापासून
आणि तेव्हापासून
हॉगवर्ट्स मे रहने वाले ब्रह्मास्त्रपे टिका नही किया करते
ही म्हण पडली.
'टिका' म्हणजे मला
'टिका' म्हणजे मला ब्रह्मास्त्र सोडल्यावर हॉगवार्टज् पिप्स टिकत नाहीत वाटले.
मी मधे कुठेतरी येते , हॅरी पॉटर त्रिशंकू क्लबात. मी तुम्हाला भिंत बांधून देईन, त्यावर चढा हर्पा.
पण मी भक्तांमुळे अजून एक संधी देणार आहे. पहिले तीन बघितले आहेत. सगळे एकदा नीट बघणार आहे . मला पंचेस नीट कळले नाही व बरोबरीने मारता आले नाही की फोमो येतो, त्याकरता तर नक्कीच बघायचंय.
पॅरीस मधे काढलेले भारतीय
पॅरीस मधे काढलेले भारतीय रेस्टॉरंट व फ्रेंच रेस्टॉरंट>>नाही paris नाही रूलर फ्रान्स मधले आहे,
ब्रह्मास्त्र बघताना बरंच काय
ब्रह्मास्त्र बघताना बरंच काय काय लिहू वाटलं होतं. पण जाऊ दे, घोस्टने सगळेच मनसुबे धुळीला मिळवले.
घोस्टचा इफेक्ट घालवायला सरफरोश बघितला पुन्हा. पुन्हा म्हणजे कितव्यांदा हे मोजले नाही.
बदल केला.
.
हॅपॉ तिसरा भाग सर्वात
हॅपॉ तिसरा भाग सर्वात सॉफिस्टिके टेड आहे डिरेक्षन बाबतीत. व क्लायमॅक्स वगैरे. खरं तर तिसर्या भागापरेन्त पुस्तकेही तशीच लहानी, मुलांची साहसे असतात तशी होती. भाग चार पासून थिंग्ज बिकेम बिगर. ट्राय विझर्ड ट्रुरना मेंट जबरदस्त. त्यात तेव्हाचा हार्ट थ्रॉब आहे सेड्रिक डिगोरी.
व ह्यातील व्होल्डे मॉर्ट चे आगमन मला तेवा फार भीतिदायक वाटले होते. ( पर्सनल रीझन्स) पाच इफ्फी आहे. सहा आठवत नाही पण त्यात पुस्तकात जुने धागे दोरे जुळुन यायला लागतात व सात इज स्पेक्टाक्युलर अॅज अ बुक. सातव्यातले चॅप्टर २५ अनेकदा वाचले आहे. ऑसम राइटिन्ग. शी रिअली गॉट अ विनिंग प्रोपर्टी. हे बुक आले तेव्हा सर्व मुलांसाठी क्रॉसवर्ड मध्ये प्रि बुक करुन लायनीत उभे राहुन दोन कॉपी घेतल्या होत्या. व समजावुन सांगत वाचल्या होत्या. मस्त अनुभव. बुक्स विन ओव्हर मुव्हीज एनी डे.
भिंत - कल्पना रम्य आहे. पण मी
भिंत - कल्पना रम्य आहे. पण मी ती भिंत चालवायचा विचार करायला लागलो, तर समोरून चांगदेवांऐवजी चो-चँगदेवी येतील आणि भिंतीत चिणून मारतील मला.
बाळ हॅरीला आईच्या प्रेमाचे
बाळ हॅरीला आईच्या प्रेमाचे कवच. ही संकल्पना निर्विवाद ऑसम.
हपा, तुझ्या नाम साधरम्याने
हपा, तुझ्या नाम साधरम्याने तुला एक डाव माफी!
@अस्मिता, कियानु हल्ली फनी TikTok करत असतो. पाहिलेस की नाही?
फेसबुक बघितलंय , टिक टॉक नाही
फेसबुक बघितलंय , टिक टॉक नाही फारसं.
बघेन.
Pages