क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग याबद्दल काहीच माहीत नाही असा मनुष्य विरळाच. येत्या काळात मनुष्यजातच नष्ट होण्यापासून वाचवायची असेल वा किमान तो मृत्यु लांबवायचा असेल तर आपण सर्वांनी आपापल्या परीने यात योगदान देणे गरजेचे.
पण बरेच लोकांना ही एक अशी वैश्विक समस्या वाटते की जी देशांच्या सरकारने धोरणे आणि कायदे करूनच सोडवता येईल. आपण रोजच्या दैनंदिन आयुष्यात जे वर्तन करतो त्यातले काय आणि किती प्रदूषणास हातभार लावते आणि ते कसे आणि कुठवर कमी करता येईल हे आपल्यापैकी बरेच जणांना ठाऊक नसते. जसे की फटाके आणि वाहनांपासून प्रदूषण होते हे सर्वांना चटकन कळते. पण मांसाहार देखील कार्बन फूटप्रिंट वाढवतो हे सगळ्यांनाच ठाऊक नसते. मलाही हल्लीहल्लीच कळले. त्यातही मांसाहारच्या तुलनेत मत्स्याहार प्रदूषण वाढीस कमी हातभार लावतो हे कळले. त्यामुळे आता मला मांसाहाराचा पुर्ण त्याग शक्य नसेल तर मी किमान मत्साहाराचा वाटा वाढवू शकतो. एसी हवाच ही माझी बिलकुल गरज नाही तर मी त्याचा वापर माझ्यापुरता तरी पुर्ण बंद करू शकतो. आणि फॅमिलीला समजावू शकतो. गाडीबाबतही हेच लागू. जर आजवर मी गाडीशिवाय पब्लिक ट्रान्सपोर्ट, सायकल आणि देवाने दिलेले हातपाय वापरून जगलो आहे तर पुढेही निव्वळ ऐपत आहे म्हणून स्टेटस दाखवायला गाडी घ्यायचे टाळू शकतो. मुले आज लहान आहेत. त्यांना फटाक्यांची आवड आहे. ते लगेच जोरजबरदस्तीने बंद करणे पटत नाही तर हळूहळू वर्ष दर वर्ष प्रमाण कमी करत ते लवकरच बंद करू शकतो. त्यांना त्याजागी दुसरे पर्याय देऊ शकतो. सोसायटीतील मोठ्यांना विनंती करू शकतो की तुम्हीही फटाके वाजवू नका जेणेकरून लहानांना तो मोह होणार नाही...
अश्याच विचारांची आणि कल्पनांची देवाणघेवाण करायला हा धागा. आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो याची चर्चा करायला हा धागा. आपण याबाबत काय केले आहे हे अनुभव शेअर करायला हा धागा.
सर्वांनाच सारेच जमणार नाही. प्रत्येकाची जीवनशैली आणि आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे अमुकतमुक आम्हाला जमते तर तुम्हाला का नाही असे बोटं ठेवण्यात अर्थ नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने सामाजिक भान राखले तरी एकूणात पडणारा फरक मोठा राहील.
फक्त ४३२ व्यू आहेत त्या ४
फक्त ४३२ व्यू आहेत या ४ नोव्हेंबरच्या विडिओला. कोणी बघत नाही त्याला काय बघायचे आणि काय सिरीअसली घ्यायचे. व्यू बघूनच विंडो क्लोज केली
हिचा मुलगा आईस्क्रीम, चिप्स
हिचा मुलगा आईस्क्रीम, चिप्स खात नाही, एसी वापरत नाही म्हणून तो फटाके डिजर्व करतो. हे लॉजिक अर्थात धागाकर्त्यांना आवडेलच.

>>>>
...म्हणून डिजर्व्ह करतो असे मी माझ्या कुठच्या पोस्टमध्ये लिहिलेले जे लॉजिक हे मला आवडेल? माझी अश्या शब्दांची / अर्थाची / आशयाची पोस्ट दाखवाल का?
बाकी आमच्याकडे आईसक्रीम, चिप्स, एसी आणि फटाके हे चारही प्रकार खाल्ले, वापरले, वाजवले जातात .. पण मुलांकडून.. माझ्या जीवनशैलीत या चौघांना स्थान नाही कारण मला आवड नाही, सर्दी होतो, खोकला होतो, थंडी वाजते वगैरे वगैरे...
अमितव, धन्यवाद! हा लेटेस्ट
अमितव, धन्यवाद! हा लेटेस्ट व्हिडिओ बघितला नव्हता. कठीण आहे! तिचे आधीचे व्हिडिओ चांगले आहेत. दुर्दैवाने आपल्या भारतीयांना परंपरा आणि विज्ञान यांच्यातून निवड करताना परंपरेचा मोह काही टाळता येत नाही हेच खरं
चिल रुंमेश. तुला चिडवायला
चिल रुंमेश. तुला चिडवायला म्हणालो, डोळा मारायचा राहिला. तुझा फटाक्यांचा मुद्दा समजलेला आणि पटलेला आहे.
अमितव ओके.
अमितव ओके.
तसाही मी चिलच असतो. म्हणून मी पुढे स्माईली न चुकता टाकली
आपल्या भारतीयांना परंपरा आणि विज्ञान यांच्यातून निवड करताना परंपरेचा मोह काही टाळता येत नाही हेच खरं
>>>>
देवधर्माशी सांगड घातली गेली की अवघड होते. अभारतीयांनीही ज्या ज्या प्रथापरंपरांना देवधर्माशी जोडले असेल तिथे त्यांच्याही भावना स्ट्राँग असतील. उदाहरणार्थ तुम्ही त्यांना हॅलोवीन वा वॅलेंटाईन साजरा करायच्या पद्धतीत काही बदल सुचवले तर ते मान्य करतील. पण चर्चमध्ये येशूला पुजतानाच्या प्रथापरंपरांमध्ये बदल सुचवाल तर ते मान्य होणार नाही.
Energy च्या ऐका प्रकार मधून
Energy च्या ऐका प्रकार मधून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करताना प्रदूषण होते.
मग हे उर्जे चे रुप परिवर्तन होताना काही एनर्जी वेस्ट जाते त्या मधून biproduct निर्माण होतात.
हे सर्व घटक प्रदूषण निर्माण करतात.
अशा घटना नैसर्गिक रित्या पण घडतात आणि कृत्रिम रित्या मानव घडवून पण आणतो.
नैसर्गिक रीत्या ज्या घटना घडतात त्यांना निसर्गाचे कठोर नियम लागू असतात.
त्या नियंत्रित असतात आणि समतोल पण असतात.
पण मानव जेव्हा हे प्रकार घडवतो ते अनियंत्रित असते आणि समतोल पण नसते.
त्या मुळे प्राणी,वनस्पती हे ग्लोबल वॉर्मिग करतात.
असा जे प्रचार करत आहेत .
ते संशोधक नीच, लाचार,आणि स्वार्थी लोक आहेत.
ते पूर्ण दुर्लक्षित करणे.
फक्त मानव निर्मित energy's चे रूपांतर करण्याचे प्रकार चालू आहेत
तीच समस्या आहे
थांबवा हे सर्व.
वनस्पती ग्लोबल वार्मिंग करतात
वनस्पती ग्लोबल वार्मिंग करतात असं कोण, केव्हा, कुठे म्हणालं?
प्राणी आपले आपण जगले असते तर प्रश्न नव्हता. जंगल राज नियमाने प्राण्यांची संख्या काबूत रहात होती तशी राहिली असती.
पण तिथे ही मानव ऍनिमल फार्मिंग करून पैदास वाढवणे आणि पशुखाद्य शेती करणे (मोठी झाडे तोडून करण्यास कुरण) हे सर्व मिळून ग्लोबल वार्मिंग वाढवते. थोडक्यात ते ही मानव निर्मितच आहे.
तुम्ही सगळ्यांनी माझं वेड्याच
तुम्ही सगळ्यांनी माझं वेड्याच ऐका. पृथ्वी प्रदूषणमुक्त करण्याच्या नसत्या भानगडीत पडू नका. मोठ्या अडचणीत याल आणि इतरांना पण आणाल.
ग्लोबल वॉर्मिंगने गर्मी
ग्लोबल वॉर्मिंगने गर्मी वाढलीय
गर्मी वाढलीय तर एसीचा वापर वाढलाय
त्याने पुन्हा ग्लोबल वोर्मिंगच वाढतेय
एसी परवडायला पैसे कमवावे लागताहेत
पैसे कमवायचे तर स्पर्धेत धावावे लागतेय
धावायचे तर स्पीड हवा
स्पीड हवा तर गाडी आली, विमानप्रवास आला
पुन्हा ग्लोबल वॉर्मिंगच वाढली
ग्लोबल वॉर्मिंगपासून स्वतःला वाचवायच्या नादात आपण ग्लोबल वॉर्मिंगच वाढत सुटलोय
हे एक दुष्टचक्र आहे !
अश्या रीतीने ऋन्मेऽऽष ह्यांनी
अश्या रीतीने ऋन्मेऽऽष ह्यांनी उष्मगतिकाचा दुसरा सिद्धांत (मराठीत, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स्) अतिशय सोप्या शब्दात सर्वांना सांगितला आहे.
Entropy of the universe is
Entropy of the universe is increasing हे नित्य सत्य आहे.
ते पृथ्वीच जाऊ द्या जरा तुमचे
ते पृथ्वीच जाऊ द्या जरा तुमचे धाग्यांचे प्रदूषण कमी करा>>>>>>
+१११११
आणि मग हे प्रदूषण नका करू
आणि मग हे प्रदूषण नका करू कोणाला सांगणार तर रंगपंचमीला रंगाच्या बंदुकीतून पाव लिटर पाणी घेऊन फिरणाऱ्या पोरांना आणि दिवाळीत आपटी बार फोडणाऱ्या पोरांना.>>>>>>
पोरे कशाला? मी बाई आहे तरी आपटी बार फोडते.
आता पर्स मध्ये पण ठेवणार आहे. रस्त्यावरची भटकी कुत्री मागे लागली की आपटेन दोन चार. 
फक्त नद्या चे पाणी प्रदूषित
फक्त नद्या चे पाणी प्रदूषित करू नका.कारण पाणी पिण्यासाठी नदी चे पाणी हाच एकमेव पर्याय आहे.
नद्या प्रदूषित झाल्या तर मात्र अत्यंत गंभीर स्थिती निर्माण होईल.
कोणतेच सांडपाणी,कारखान्यातून निघणारे रसायन युक्त पाणी ,शहरांचे सांड पाणी बिलकुल नदीत गेले नाही पाहिजे.
हे करणे शक्य आहे .
आणि अत्यंत गरजेचे पण आहे.
विविध धातू.
जे पृथ्वीच्या पोटात असतात ते नैसर्गिक रित्या बाहेर येत नाहीत पण माणूस ते धातू बाहेर काढतो..त्या मुळे एक खूप प्रदूषण होते ते पूर्णतः मानव निर्मित आहे.
नैसर्गिक रीत्या ते झालेच नसते.
म्हणून कमीत कमी धातू वापरले जावेत.
हवेत कमीत कमी विषारी वायू मिसळतील ह्याचे काळजी घ्यावी.
हे सर्व करावेच लागेल.
सर्वांना समजेल असे उदाहरण
रोज ९० ml च दारू पिली तर शरीर दारू पासून होणाऱ्या धोक्या पासून स्वतःला वाचवू शकते तेव्हढी ताकत अवयव मध्ये असते.
लिव्हर,किडनी वैगर.
पण रोज ४०० ml दारू पिली तर शरीर स्वतःला वाचवू शकणार नाही.
त्याच सूत्रानुसार ठराविक दर्जा च्या आणि ठराविक प्रमाणात होणाऱ्या प्रदूषण वर पृथ्वी चे नैसर्गिक कवच,यंत्रणा पृथ्वी ला होणाऱ्या धीक्या पासून वाचवू शकते.
पण त्या पेक्षा जास्त प्रदूषण झाले तर मात्र निसर्ग काही करू शकत नाही स्वतः मध्येच बदल करतो.
तो बदल साजिवसाठी हानिकारक च असतो.
दिवाळी आणि फटाके या विषयामुळे
दिवाळी आणि फटाके या विषयामुळे अचानक आपण प्रदूषणाबाबत जागरूक होतो. (हा टोमणा नाही. असल्यास मलाही लागू आहे.)
त्यामुळे धागा वर काढत आहे.
लोकं वाद न घालता प्रामाणिकपणे लिहितील ही अपेक्षा.
गेल्या वर्षात माझ्याकडून काय झाले आणि काय नाही हे मी लिहितो लवकरच...
प्रदूषण कमी होणे आता शक्य
प्रदूषण कमी होणे आता शक्य नाही.परतीचा रस्ता बंद झाला आहे.
आता आहे ते प्रदूषण उच्च पातळीवर जावून आता अस्तित्वात असलेली जीव सृष्टी पूर्ण नष्ट होणे. ह्या मार्गावर आपण आहोत.
मंगळावर पण हेच झाले
.पुढे कधी निसर्गाच्या कधी मनात आले तर नवं जीवन परत चालू होईल
मंगळवार पण हेच झाले?
मंगळवार पण हेच झाले?
केव्हा, कधी, कुणी आणि का?
वेलांटी द्यायची राहिली असेल
वेलांटी द्यायची राहिली असेल शेवटल्या अक्षरावर, समजून घ्या. काल काय झाले ते सांगत असावेत ना.
मंगळ ग्रहावर जीवसृष्टी नष्ट
मंगळ ग्रहावर जीवसृष्टी नष्ट झाली याला काही पुरावा?
मानव
मानव
हा समजल. गूूगल सारखी AI म्या
हा समजल. गूूगल सारखी AI म्या मानवाला असायला पाहिजे होती. मी आपल ठरवलं कि त्यांना मंगळावर अस म्हणायचं.
एका वाक्यात एक चुकीचा शब्द
एका वाक्यात एक चुकीचा शब्द असला तरी ते वाक्य ज्या भाषेत लिहलेले आहे.
ती मातृभाषा असणाऱ्या लोकांना त्या चुकीच्या शब्द. नी काही फरक पडत नाही.
ते वाक्य योग्य प्रकारे च ते वाचतात.
कधी कधी चुकीचा शब्द लक्षात पण येत नाही.
बघा प्रयोग करून.
शब्द एकटा च असेल तर मात्र अडचण असते.
तो वाक्यात असेल तर काही फरक पडत नाही
काही बदल हे कायम स्वरुपी
काही बदल हे कायम स्वरुपी होतात.
ते नंतर बदलता येत नाहीत.
आता पर्यंत जो मानवी हस्तक्षेप पृथ्वी च्या वातावरणात झाला आहे त्या मुळे वातावरणात काही बदल कायम स्वरुपी झाले आहेत.
आता चूक सुधारून पण ते बदल reverse होणार नाहीत.
30 वर्ष भरपूर दारू पिवून लिव्हर खराब झाल्या वर दारू सोडून काही फरक पडत नाही.
समजावे म्हणून उदाहरण दिले आहे.
आता आहे ते प्रदूषण उच्च
आता आहे ते प्रदूषण उच्च पातळीवर जावून आता अस्तित्वात असलेली जीव सृष्टी पूर्ण नष्ट होणे. ह्या मार्गावर आपण आहोत.
अस काही होणार नाही ह्याची मी खात्री देतो. का? पुढे वाचा-
माझा दिल्लीचा एक मित्र पुण्यात माझ्याकडे रहायला आला होता. एक दोन दिवसातच त्याला गुदमरल्या सारखे होऊ लागले. मी त्याला डॉक्टर कडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी बराच विचार केला आणि म्हणाले
"ह्यावर काही इलाज नाही. तुम्ही एक करा. तुमचा मित्र जिथे झोपतो त्या खोलीत कडबा आणून धूर करा. त्याला गाढ झोप लागेल. पुण्याच्या हवेत ऑक्सी्जन चे प्रमाण जास्त असल्याने त्यांना त्रास होतोय."
अधिक माहितीसाठी डार्विन वाचा.
डार्विन च मायबोली वाचून नवीन
डार्विन च मायबोली वाचून नवीन थिअरी मांडत होता.
नाव फक्त स्वतःचे द्यायचा..हे गुपित आहे
डार्विन ने पुड्या सोडल्या आणि
डार्विन ने पुड्या सोडल्या आणि लोकांना खरे वाटते...
शब्द एकटा च असेल तर मात्र
शब्द एकटा च असेल तर मात्र अडचण असते.
म्हणून मी शक्यतो एकटा पाठवतच नाही
so sad. आपल्याकडे वैद्न्यानिक
so sad. आपल्याकडे वैद्न्यानिक दृष्टीकोन नाही. so sad! बर तर हा प्रयोग करून बघा.
साहित्य = एक पातेले, एक बेडूक मध्यम आकाराचा, आणि (बेडकी),खूप सारे पाणी. आणि भरपूर वेळ किमान ३५ वर्षे.
कृति= एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. त्यात तो बेडूक सोडा. बेडूक टूणकन उडी मारून बाहेर येईल.
आता पातेल्यात गार पाणी घ्या. त्यात एक बेडूक आणि (बेडकी) सोडा. ते सुखाने तेथे नांदतील. आता पाणी हळू हळू गरम करायला लागा. अशा प्रकारे गरम करा कि ३५ व्या वर्षाच्या शेवटी ते उकळायला लागेल. तुम्हाला अस दिसेल कि बेडकांची ३५ वी पिढी तेथे उकळत्या पाण्यात सुखाने नांदते आहे.
अधिक माहितीसाठी वाचा= Epigenetics.
बेडकाचे आयुष्य सरासरी दोन ते
बेडकाचे आयुष्य सरासरी दोन ते पाच वर्ष असते.
ढोबळ विचार केला तरी 60 वी पिढी 35 वर्ष नंतर असेल .इतक्या कमी वेळात मोठा बदल होणे शक्य च नाही.
तुमची उदाहरणे वाचून डार्विन परत जन्म घेवून लगेच आत्महत्या करेल.
डार्विन ची तरी लाज राखून उदाहरणे ध्या
डार्विन ने पुड्या सोडल्या आणि
डार्विन ने पुड्या सोडल्या आणि लोकांना खरे वाटते.
>>>>>>>>
मग काय? इंटेलिजन्ट डिझाईन, पृथ्वीवर माणूस उपराच, की अजून वेगळे काही?
Pages