पुण्यातील खादाडी

Submitted by च्रप्स on 17 October, 2022 - 13:43

पुण्यात बराच काळ घालवला आहे मात्र शुद्ध शाकाहारी फेज मध्ये... पुढील काही महिन्यात आता पुण्यात जायचे योग आहेत - अमेरिकेत चिकन खाणे सुरु केले मात्र जेव्हाही भारतात गेलो मांसाहार केला नाही... या वेळी मात्र मांसाहारी खादाडी लोकेशन्स हव्या आहेत... औंध बाणेर जवळ स्पेशली ..
जाणकारांनी माहिती द्यावी.. शाकाहारी चांगल्या खादाडी देखील चालतील...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्जा, राहुल - औंध.
जॉर्ज - कॅम्प
लेडीज क्लब - कॅम्प
नवाब एशिया - बंड गार्डन , पूना क्लब समोर.

सर्जा आहे का अजुन!
बार्बेक्यू नेशन, कल्याणी नगर. नगर रोड. हे नेहेमीच आवडतं.
सिगरी डीपीरोडला होतं ते बंद झालं. डिपी म्हणजे ढोले पाटील, औंधचा डीपी रोड न्हवे.

इन्स्टा ग्राम रील्स मध्ये रोज खूप भारी ऑप्शन येतात पुणे खादाडी वर. ते तुम्हाला चालत असेल तर बघा. माझ्यातरी मनावर वाइट परीणा म झालेला नाही. फक्त पाउस पाणी बघून बाहेर पडा इतकेच.

Facebook वर Pune Eat Outs (PEO) नावाचा एक ग्रूप आहे तो join करा..... पाहिजे तितके रिव्ह्यूज मिळतील अगदी फोटोसहीत Happy

Facebook वर Pune Eat Outs (PEO) नावाचा एक ग्रूप आहे तो join करा.....>>>> मी हेच लिहिणार होते. PEO म्हणजे खादाडीची डिरेक्टरी आहे. Alphabetically नाही, पण भरपूर tempting फोटो सहित आहे. आणि भरपूर reviews सहित

ब्लू नाईल , महेश लंच होम
दोन्ही नेहरू मेमोरियल जवळ.

मी पूर्ण शाकाहारी आहे. हे मित्रांच्या आवडीतली ठिकाणे आहेत... कदाचित म्हणूनच ओल्ड स्टाईल वाटू शकतील .

वी इडलीवाले बाणेर
गुडलक डेक्कन
ब्लु नाईल कॅम्प
दोराबजी कॅम्प
वहुमन कॅफे रुबी हॉल
एस पी बिर्याणी टिळक रोड
मॅड हाऊस ग्रील केपी
जिमी हू केपी
बोटेको केपी
जगदंब खेड शिवापूर
कावेरी मार्केटयार्ड
टरटुलीया बाणेर
केरळ कॅफे बाणेर
मदिना पूना कॉलेज
बागबान कॅम्प
संदीप जे एम रोड

एक पुस्तक आहे
वेटिंग आहे राव नावाचं
त्याचा प्रत्येक चॅपटर हे एका हॉटेल चं वर्णन आहे.(पुण्यातल्या)

एक लवंगी मिरची म्हणून युट्युब चॅनेल आहे म्हातारासा माणूस पुण्यात फिरत आहे. स्प्रू हा पण फिरत रेस्टॉ. रिव्यु करत असते. पण बडबड जास्ती जी बोअर होते. सध्या एक हॉट रेस्टॉ. म्हणजे कोथरू ड मधील सांदण हे दोन अक्षर सांद वर व ण खाली असे का लिहिले आहे असे मला मालकांना विचारावयाचे होते. इथे फार जबरी ब्रेफा व नॉवे ल्टी म्हणजे शाहाळ्यातील नारळाची ते एक भाजी बनवतात गोड्सर अस्ते. ह्या बद्दल वरील दोघांनी लिहिले आहे. इतरही कोकणी व कोस्ट ल जेवण मिळते. व मराठी जेवण. नक्की जा व लिहा इथे.

कॅकॅप्म्पातले इराणी कॅफे,
स्ट्रीट फुड खाय्चे असेल , तर सुरुवात अख्तन सामोसे पासुन करु शकता. इथे चिकन खिमा, कोळंबी आदी प्रकारचे सामोसे मिळतात.
बाकी कोंढवा भागाचा थोडा रीव्ह्यु घेतला की अजुन बर्याच जागा सापडतील .
वहुमन कॅफे, ब्रेकफास्ट साठी, त्याच्या अपोझिट असेल्ले चायनीज चे हॉटेल ही छान आहे.

तिरंगा म्हणुन एक नॉनव्हेज रेस्टॉरंट २००० च्या आसपास निघाले होते बुधवार पेठेत किंवा त्या आसपास.
तिथे खाल्ले होते तेव्हा, मस्त होते. तेव्हा ते बरेच प्रसिद्ध झाले होते.

अजून आहे का, नूतनीकरण वगैरे झाले का ?