लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा

Submitted by चिनूक्स on 31 July, 2008 - 09:42

हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे.
या वर्षाखेर निदान १ कोटी रू. जमू शकले, तर त्या व्याजातून हा प्रकल्प स्वयंपूर्ण होऊ शकेल.

या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती आपल्याला,
http://www.maayboli.com/node/2479

http://lokbiradariprakalp.org
इथे वाचायला मिळेल.

चेक पाठवायचा असेल तर,
आपला चेक
Dr. Digant Amte,
Lok Biradari Prakalp,
At: Hemalkasa,
Post : Bhamragad,
Dist : Gadchiroli,
Pin code : 442 710, (M.S., INDIA)
Maharashtra State, India.
Tel : +91-7134-220001

या पत्त्यावर registered AD ने पाठवा. हेमलकसाला courier/speed post जात नाही. आणि साध्या पोस्टाने गहाळ होण्याची शक्यता.

आपला चेक Lok Biradari Prakalp या नावाने काढावा.
परदेशातून चेक पाठवणार असाल तर 'Maharogi Seva Samiti, Warora' या नावाने काढावा, व तो लोकबिरादरी प्रकल्पासाठी आहे, असा स्पष्ट उल्लेख करावा.
आपण पाठवलेली रक्कम एखाद्या विशिष्ट कामासाठी खर्च करण्याची आपली इच्छा असेल, तर कृपया तसा उल्लेख करावा.

ऑनलाईन पैसे पाठवायचे असतील तर,

Details of Overseas Funds Transfer to Maharogi Sewa Samiti, Warora,
through SWIFT
*Beneficiary Name:
Maharogi Sewa Samiti, Warora
*Beneficiary Address:
At-Post: Anandwan, Tah: Warora,
Dist: Chandrapur,
Maharashtra State (India)
Pin: 442 914
Phone: +91-7176-282034, 282425
Fax: +91-7176-282034
E-mail: anandwan@gmail.com
*Beneficiary Bank Account Number:
048010100301343
*Beneficiary Account Name:
Maharogi Sewa Samiti, Warora
*Beneficiary Bank Name:
Axis Bank Limited
* Beneficiary Bank Address:
M. G. House, Rabindranath Tagore Road,
Besides Board Office, Civil Lines,
Nagpur - 440 001
Maharashtra State,
India
Phone No.: +91-712-2555647 / 2601699
*Beneficiary Bank Swift Code:
UTIBINBB048

***
पैसे पाठविताना कृपया 'लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसासाठी' असा स्पष्ट उल्लेख करावा..

अन्यथा, 'लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा' या नावाने भारतातून काढलेले चेक्स/डीडी स्वीकारले जातील.
'MSSO'सुद्धा याबाबतीत आपली मदत करू शकेल.

यासंबंधी आपण काही मदत करू शकत असल्यास कृपया जरूर संपर्क साधावा..

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्मय, ईथे बीबी उघडलास ते छान झाले. पुण्यात payable चेक पाठवला तर त्यांना charges लागतील ना? by any chance कोणी तिकडे जाणार आहे का? किंवा तिकडचे कोणी इथे येणार असेल तर cash पाठवू. नाहीतर मग DD पाठवते..

हो. १० तारखेला प्रकल्पाची एक मैत्रिण जाणार आहे तिथे. १-२ मायबोलीकरांनी माझ्याकडे चेक्स दिले आहेत. ते तिच्याबरोबर हेमलकसाला पाठवणार आहे मी.

अरे मग मी पण तुझ्याकडेच देऊ का? तु पुण्यात कुठे असतोस. माझ्या भावाला मी तुझ्याकडे पाठवु शकतो.

केदार,
मी शिवाजीनगरला राहतो. मी जाऊन आणू शकेन चेक. माझा फोन नंबर मी पाठवतो तुला. चालेल?

प्रकाश आमटे यांना मॅगॅसेस पुरस्कार जाहीर झाला आहे त्या बद्द्ल त्यांचे हार्दीक अभीनंदन

मुंबईतील कुणी मायबोलीकर पुढाकार घेतोय का?

चिनोक्स तुझ्या प्रतिसादामधे पहा. मला पण इंटरेस्ट आहे ह्यात.

हेमलकशाला मागील ३ आठवड्यांपासून मी संगणक वर्ग सुरू केलेत. चांगला प्रतिसाद आहे. ३० मुलंमुली येताहेत.
त्या मुलांना मराठीत लिहिलेली संगणक / माहिती तंत्रज्ञान या विषयावरची पुस्तकं द्यावीत असं वाटतंय. त्यातल्यात्यात नवनीतची पुस्तकमाला चांगली आहे. पण महाग आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला १ संच (रु. २००) द्यायचाम्हटलं तरी एकूण रु. ६००० लागतील.
कोणाला दुसरा एखादा चांगला पण कमी खर्चाचा पर्याय माहीत आहे का?
सध्याच्या विद्यार्थ्यांचा ३ महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हायच्या आत काहीतरी करता येईल का?

नूतन.. छान.
मला २ पर्याय सध्या दिसतात.
एक तर काही संच विकत घेउन उरलेल झेरॉक्स करणे.
दुसरे, दुकानदाराना कशासाठी हवेत ते सांगणे आणि सवलतीत ३० संच देऊ शकतील का ते विचारून पहाणे.
काय झाले ते जमल्यास इथे कळवावे.

नूतनः तुम्हाला मेल केली आहे, कृपया उत्तर द्या.

नुतन, मी पण मेल लिहिली तुम्हाला. प्लिज पहा.

हेमलकशाच्या ‘लोक बिरादरी प्रकल्पा’च्या फ़ोटोंचं आणि बांबू वस्तूंचं प्रदर्शन सध्या कोल्हापुरात आणि पुढच्या आठवड्यात सांगलीत भरतंय. लोक बिरादरी प्रकल्पाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या प्रगतीचे फ़ोटो या प्रदर्शनात समाविष्ट केले आहेत. तिथल्या आश्रमशाळेतल्या मुलांनी बनवलेल्या बांबूच्या आणि इतरही काही कलाकुसरीच्या वस्तू या प्रर्शनात विकीसाठी ठेवल्या जातात.
या उपक्रमातून ‘लोक बिरादरी प्रकल्पा’साठी आर्थिक निधी उभा राहातो, तसंच अनेकांपर्यंत या आगळ्या कामाची माहिती पोचते.
आपण सारे मायबोलीकर या प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी खूप काही करू शकतो. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आपापल्या ओळखीची जी माणसं असतील त्यांच्यापर्यंत या प्रदर्शनाची माहिती पोचवूया, तिथल्या प्रसारमाध्यमांमध्ये या उपक्रमाचा बोलबाला होईल याची व्यवस्था करूया. अनिकेतदादा तिथे हे सारे प्रयत्न करतोच आहे. पण त्याच्या मदतीला आपलेही हात लावूया. आपापल्या दैनंदिन कामातून वेळ काढून काही फ़ोन्स, इ-मेल्सद्वारा आपण या प्रदर्शनाची माहिती अनेकांपर्यंत पोचवूया. मुलांनी केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून आर्थिक निधी तर उभा राहीलच. पण एकान्तात वसलेल्या हेमलशातल्या चिमुकल्या हातांची किमया दूर दूर पोचेल.
रोज सकाळी १० ते रात्री ९.३० पर्यंत, विनामूल्य प्रवेश.
कोल्हापूर - अक्षता मंगल कार्यालय, ताराराणी चौक, ७ ते १० नोव्हेंबर २००८.
सांगली - मराठा समाज सभागृह, डॉ. आंबेडकर मार्ग, बसस्टॅण्डजवळ, १३ ते १६ नोव्हेंबर २००८.
- नूतन

मित्रहो, आज संध्याकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिरात माननीय प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांच्याशी गप्पा-गोष्टीचा कार्यक्रम अक्षरधाराने आयोजित केला आहे. जरुर या.. चिन्मय (चिनूक्स) तिथे आहे (शक्यतो पुस्तकांच्या स्टॉलवर असेल.)

गोष्टी हेमलकशाच्या . . . या नावाने तिथले माझे अनुभव शब्दबद्ध करायचा प्रयत्न करतेय. ’प्रयत्न’ अशासाठी म्हणतेय कारण माझ्या मनात या आठवणी क्षणार्धात उगवून येतात पण तुमच्याशी त्या Share करायच्या म्हणजे शब्दांत literally बांधायला हव्यात. या प्रक्रियेत थोडसं काहीतरी हरवून तर नाही ना जात असं वाटत राहातं. आपोआप ’ये हृदयींचे ते हृदयी’ पोचायला हवं.
असो. तर म्हणून ’प्रयत्न’ तर करून पाहाते.
खरंतर uday123, sunidhi, sarivina, S P वगैरे सार्‍या मायबोलीकरांना धन्यवाद देण्यासाठी आणि त्यांच्या कष्टार्जित मदतीची, वेळेवर दिलेल्या अमूल्य मार्गदर्शनाची नेमकी काय ’विल्हेवाट’ मी अंतिमत: लावली हे त्यांच्यापर्यंत पोचवायला मी बांधीलही आहे. पण अगदीच formal reporting चा दर्प येऊ नये त्यासाठीही हा ’प्रयत्न’.
खरंतर मायबोलीच्या माध्यमातून एवढा भरघोस प्रतिसाद मिळालाय की भारावूनच जायला होतंय. आजच्या काळात विश्वासच बसू नये एवढी ऊब, एवढा वैचारिक सहवास यातून लाभतो. चिन्मयकडून कळलं की अनेक ज्ञात-अज्ञात हात या प्रतिसादामध्ये सहभागी आहेत. त्या सार्‍याच अनामवीरांच्या ऋणांचा सुखद भार डोक्यावर आनंदाने घेऊन -
गोष्टी हेमलकशाच्या . . . साठी ही link
http://www.maayboli.com/node/4806
- नूतन

नूतन,
तुम्हाला मेल केली आहे. तुम्ही तुमचे विचारपुसचे स्टेटस डीसएबल्ड केलेले अस्ल्यामुळे तिथे निरोप देता आला नाही म्हणुन इथे लिहीलय.

हेमलकशाच्या बाबतीत खूप जणांकडून 'काहीतरी करावसं वाटतंय, काय करता येईल ते सुचवा' अशा बर्‍याच मेल्स आल्या होत्या. साधारणपणे मला जे सुचतंय ते सर्वांना सांगावं असं वाटलं, म्हणून हा प्रपंच -
हेमलकसा, जि. गडचिरोली इथे डॉ. प्रकाश आमटेंचा ’लोकबिरादरी प्रकल्प’ आहे. आदिवासींसाठी दवाखाना आणि शाळा, तसंच वन्य प्राण्यांसाठी Rescue Center चालवलं जातं. www.lokbiradariprakalp.org
मी तिथे सकाळी ९ ते ५ दवाखान्यात डेटा एण्ट्री आणि संध्याकाळी ७ ते ९ मुलांसाठी संगणक वर्ग चालवतेय.
डेटा एण्ट्रीसाठी २००६ मध्ये एका हितचिंतकाने VB प्रोग्राम (Backend ला Access) बनवून दिलाय. त्यात नव्या गरजांप्रमाणे छोटे बदल करते. अगदीच complicated changes असतील तर पुण्यातल्या एका प्रोग्रामरकडून बदल करून घेऊन, email द्वारा correspondence करून ते बदल मूळ प्रोग्राममध्ये incorporate करते. साधारणपणे ३ आठवडे हेमलकशाला आणि एक आठवडा पुण्यात असा बेत असतो.
करण्याजोगं खूप आहे. मनुष्यबळ तर कमी आहेच. पण वस्तूरूप किंवा आर्थिक मदतही आवश्यक आहेच.
* शाळेबाबत-
१) निवासी शाळा - ६०० मुलंमुली - सरकारी मदत अपुरी. साधारणपणे प्रत्येक मुलामागे वर्षाला रु. ८००० खर्च येतो. एका मुलाचा खर्च भागेल एवढं डीपॉझिट ठेवू शकता. (१०% वार्षिक व्याजदर धरला तर ८०,००० रुपये.)
२) संगणक वर्गासाठी latest configurationचा किमान एक संगणक, LCD projector आणि मोठा स्क्रीन.
३) मराठी सीडीज्‌, पुस्तकं यासाठी रोख रक्कम किंवा या वस्तू.
४) या मुलांच्या अंगात दोन जन्मजात गुण आहेत - चांगले athelete असतात आणि ताल, नाद, लय यांची उत्तम जाण. या दोन्ही बाबतीत उत्तम मार्गदर्शन आणि शिक्षण यांची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी CDs द्वारे काही मदत करता येईल का? मेकप, ड्रेपरी इ. गोष्टी (second hand पण चांगल्या अवस्थेतल्या असल्या तरी चालतील) देता येतील का?
* दवाखान्यासाठी -
१) दोन Touch Screens with proper software - Pharmacist व Injection room मध्ये पेशंट रजि. नंबर एंटर केल्यावर Case paper display व्हावा, पण त्यात त्या terminal वरून editing करता येऊ नये अशी सुविधा.
२) आताच्या प्रोग्राममध्ये काही सुधारणा, किंवा संपूर्ण नवी system किंवा संपूर्ण नवी system बनवण्याचा खर्च - विशेषत: चांगल्या software developer ची फ़ी.
३) Voice to text converter किंवा Medical Transcription ची hardware-software बाबत मदत, मार्गदर्शन.
* Wild Animal Rescue Center साठी -
१) Food Expenses or supply of dry food for wild animals?
२) Medical expenses or supply of vet medicines
सध्यातरी मला एवढंच सुचतंय. खरंतर या सार्‍या उपक्रमांमध्ये आपण अजून काय-काय करू शकतो त्याचं - sort of open group thinking - व्हावं
- नूतन

मेकप, ड्रेपरी इ. गोष्टी (second hand पण चांगल्या अवस्थेतल्या असल्या तरी चालतील) देता येतील का? >>>>

नवीन घेवुन देण्याबरोबरच मला वाटते अमेरीकेत असलेल्या पालकांनी आपल्या पाल्याचे/त्यांच्या मित्रांचे चांगले हॅलोवीनचे कपडे दिले तर चालु शकेल ना. बर्‍याचदा हे कपडे एकदाच घातले जातात आणि मग पडुन रहातात. शक्य असेल तर ते हेमलकसाला देता येतील.

हो! मेकप, ड्रेपरी इ. गोष्टी - second hand पण चांगल्या अवस्थेतल्या असल्या तरी - चालतील, नक्कीच!

भामरागड परिसरात गेल्या काही वर्षात hepatitis bने बराच धुमाकुळ घातला आहे. म्हणून यावर्षी जून महिन्यात या परिसरातल्या सुमारे ७००० मुलांचे लसीकरण करण्याची योजना डॉ. अनघा व डॉ. दिगंत आमटे यांनी आखली आहे. जून महिन्यात हे लसीकरण व्हावं अशी इच्छा आहे.

या मोहिमेकरता लशीच्या २१०० vials हव्या आहेत. एका vialची किंमत रु. ५० - १०० अशी असते.
आपल्यापैकी जर कोणी एखाद्या औषधाकंपनीत असेल, किंवा तिथे ओळख असेल, तर अल्प किंमतीत किंवा विनामुल्य लशी मिळू शकतील का, याची चौकशी करता येईल का?

मुंबईच्या डॉ. नंदिनी पुरंदरे व रोटरी क्लबातील काही डॉक्टर्स या प्रकल्पात सहभागी होणार आहेत. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे सव्वा लाख रुपये आहे. त्यापैकी काही भाग एखाद्या औषध कंपनीने उचलल्यास बरीच मदत होऊ शकेल.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

chinoox,
मी माझ्या ओळखीत विचारेन याबद्दल.
या प्रकल्पासाठी वैयक्तिक मदत चालेल का? म्हणजे प्रत्येकाने कुवतीनुसार vials साठी मदत दिली तर

वैयक्तिक मदतसुद्धा चालेल. हा प्रकल्प तसा बराच खर्चिक आहे. त्यामुळे एखाद्या उद्योगसमुहाने खर्चाचा काही भार उचलला तरी उत्तम.

http://www.gskvaccines.com/
इथे जाऊन कोणाला संपर्क करता येतो का ते बघायला हवं. भारतात ग्लॅक्सो-स्मिथक्लाइन कंपनीत विचारता येईल.

http://www.prlog.org/10035993-first-indian-vaccine-manufacturer-to-succe...
इथे गेल्यावर 'भारत बायोटेक' ने तयार केलेल्या हेप बी वेकसीनची माहीती मिळेल.
Issued By : Bharat Biotech International Limited
Website : http://www.bharatbiotech.com
Contact Email : Click to email
Phone : 914023480567
Address : Genome Valley, Shameerpet
City/Town : Hyderabad
State/Province : Andhra Pradesh
Zip : 500078
Country : India
Categories : Biotech
Tags : thiomersal free, thimerosal free, hepatits b vaccine, bharat biotech, revac-bmcf, mecury component free vaccine
Shortcut : www.prlog.org/10035993
ही काँटॅक्ट इन्फरमेशन. कुणी विचारुन बघु शकेल का?

मृण्मयी,

धन्यवाद. Happy
मी उद्या फोन करून चौकशी करतो.

ही मला नूतनकडून मिळालेली माहिती. विपूमधुन इथे डकवते आहे-
दर महा साधारणपणे रु.३० ते ४० हजार रुपये सर्व प्राण्यांच्या खाण्यावर खर्च होतो. स्पेसिफिक या खर्चासाठी म्हणून काही रक्कम देणगीरुपात चेक अथवा डीडी ने पाठवता येईल. (चेक अथवा डीडी वर देणगीमागचा नेमका हेतू स्पष्ट लिहिला तर त्या खर्चखात्यात ती रक्कम जमा टाकता येईल.)
छोट्या बाळांच्या जुन्या फीडींग बॉटल्स-निपल्स प्राण्यांच्या बाळांसाठी वापरता येतात. प्राण्यांची बाळं पटकन मोठी होतात आणि चावून निपल्स खराब करतात, त्यामुळे सतत निपल्स लागतात.
प्राण्याचं रेडीफ़ूड किंवा व्हेट औषधं (एक्स्पायरी डेटची मार्जिन असलेली) चालतील. थंडीत पिंजर्‍यांमध्ये प्राण्यांवर घालायला जुनी ब्लॅंकेटं चालतील. (चांगल्या अवस्थेतली बॅंकेट तर माणसांसाठीही चालतील.)
दवाखान्यात इंजेक्शनमुळे रडणार्‍या मुलांना हसवण्यासाठी, रिझवण्यासाठी वॉलहँगिंग्ज्‌, जुनी स्टफ़्‌ टॉयज्‌ इ. चालेल. त्या त्या पार्सलवर नेमका हेतू आणि डेस्टिनेशन लिहिलं तर नेमक्या ठिकाणी ती ती वस्तू पोचती होईल. लांबून वस्तू पाठवण्यापेक्षा रकमेच्या रूपात ’योगदान’ जास्त सोपं होईल असं वाटतं.

चिनूक्ष,
लोकबिरादरीच्या माहितीस्थळावर अकाउंट नंबर 048010100297165 हा आहे. वरिल व हा दोन्ही बरोबर आहेत का?

डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दिनांक ५ जानेवारी रोजी आयोजित केला आहे.

स्थळ - Sayli International School ground, L.T. Road, M.H.B. Colony, Borivli- West, Mumbai.

वेळ - संध्याकाळी साडेसहा वाजता

आर्थिक स्थिरता यावी म्हणून लोक बिरादरी प्रकल्पासाठी कॉर्पस फंड तयार करीत आहोत. केंद्र सरकारने त्यासाठी मान्यता दिली आहे. रु.५०००/- वरील देणगीदारांना उत्पन्न करात (Income tax) १०० टक्के सूट मिळणारी पावती मिळेल. अधिक माहितीसाठी - http://lokbiradariprakalp.org/contribution.html .