चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तो गंप पाहिला होता.मला जरा डॉक्युमेंटरी वाटला.बहुधा मनाचं 98% कंडिशनिंग बॉलिवूड असल्याने असेल.
>>>>
+७८६
मी सुद्धा ईथले वाचून फॉरेस्ट गंपचा ट्रेलर पाहिला. साधारण तसाच वाटला.
माझ्यासाठी ईंग्लिश पिक्चर म्हणजे जुरासिक पार्क, टायटॅनिक, शार्क मासा, डे आफ्टर टूमॉरो असे स्टीव्हन स्पिलबर्ग स्टाईल किंवा जिम कॅरीचे विनोदी वा जॅकीचॅनचे करामती पिक्चर... अश्या पठडीतील मी नाही बघू शकत जो समजायला ईंग्लिशही समजावे लागते.
त्यामुळे हा जर खरेच चांगला असेल तर मी सुद्धा उत्सुक आहे लालसिंग चड्ढा बघायला.

बाकी त्यातला हिरो बघून सेम आमीरच आठवत होता. म्हणजे ते एक्प्रेशन आमीरच्याच थ्री ईडियट्स वा पीके मधील वाटतात.

सगळे फक्त 3 इडियट , पिके लिहीत आहेत

तो धूम 3 मधला बोबड्या राहिला की

तोही त्याच प्रकारचा होता

तेंव्हा सगळे रोगट हिरोचे सिनेमे येत होते

गजनो मेंदूरोग
बर्फी कुठला रोग
आंधळा हृतिक रोशन
धूम 3 बोबड्या
मंदरोगी सलमान खान

रूम फार क्लेशकारक सिनेमा आहे. >>>> सहमत..वाईट वाटत राहतं खरं.

Ambulance सुरू केला होता.. ऐक्शन, बैंक रॉबरी पण इतका छान नाही वाटला..अर्ध्या त बंद केला.

जितके जास्त चित्रपट आजारपणाबद्दल येतील तितके बरे असते.
सर्व वर्गांपर्यंत माहिती जास्त श्रम न घेता पोहचते. फक्त चित्रपट सेन्सिटिव्ह प्रकाराने बनलेला असायला हवा.

'देवोंके देव महादेव' मधे ब्रह्मदेव व इतर देवता हे विष्णू व महादेव दोघांनाही वंदन करायचे पण विष्णू व महादेव मात्र एकमेकांना नजरेनेच 'आय आय कॅप्टन' करायचे. Lol >>>>. हा हा हा हा .................

सगळे फक्त 3 इडियट , पिके लिहीत आहेत
तो धूम 3 मधला बोबड्या राहिला की
>>>>

अच्छा, धूम ३ पाहिला नाहीये. बरेचदा ट्रेलर बघूनच एक अंदाज येतो चित्रपटाचा. बकवास असणार ते. धूम ३ बाबत तेच झाले. आमीरने असा धूम वगैरे चित्रपट करायचाही नव्हता खरे तर..

बई दवे,
आता ते लालसिंग चड्ढा च्या वेळी पुन्हा का बॉयकॉट आमीर सुरू झालेय? कथेत काही वादग्रस्त आहे का? की ते आपले नेहमीचेच मागचेच?

मूळ सिनेमा इंग्रजीत असेल तर डब करून दाखवता येईलच की

म्हणजे आधीच एक सुपरहिट सिनेमाची जशीच्या तशी नक्कल करून नवा सिनेमा बनवायचा आणि तो आपली कलाकृती म्हणून सादर करायचा, जरी मंजुरी घेऊन केला असला तरी

म्हणजे तुमच्याकडे विषय कमी पडलेत का नवीन काही सुचत नाही
बरं मध्यवर्ती संकल्पना तीच ठेऊन भरतीयकरण केलं असत किंवा वेगळ्या धाटणीत आणला असता तरी समजण्यासारखे होते

तंतोतंत तसाच सिनेमा फक्त व्यक्तिरेखा भारतीय यातलं लॉजिक कळत नाही

आणि हे केवळ तो टॉम हँक्स आहे किंवा त्याला अवॉर्ड मिलेलंत किंवा तो इंग्रजी आहे यासाठी नाही
उद्या टॉम हँक्स ने लगान जसाच्या तसा उचलून त्याचे अमेरिकेकिरण केलं म्हणजे बेसबोल ची मॅच ब्रिटिश लोकांच्या विरुद्ध वगैरे (देव करो असले दळभद्री विचार त्याला न येवोत Happy ) तरीही त्याला लॉजिक नसेल

अतुल कुलकर्णी ने पटकथा लिहिली म्हणजे काय केलं

भारतीय रूप दिलेले परदेशी कलाकृती-बेस्ड सिनेमे : याचं आवडतं उदाहरण म्हणजे विशाल भारद्वाजचे शेक्सपियरच्या नाटकांवर आधारलेले सिनेमे.
-----
इथली चर्चा वाचून मला पुन्हा एकदा फॉ.ग. बघावासा वाटतोय. तो बघणारच.
ला.च. सुद्धा आला की बघणार. (याचा ट्रेलर मी मुद्दाम पाहिलेला नाही. आमिर खान, अतुल कुलकर्णी म्हणजे काहीतरी सेन्सिबल असेल अशी आशा आहे.)

फॉ.ग. ची महती ठाऊक असणारे भारतात केवळ एक-दोन टक्के असतील, बाकी सगळे आमीर खानचा सिनेमा म्हणून बघतील, हा ऋन्मेषचा मुद्दाही पटण्यासारखा आहे.

आवडतं उदाहरण म्हणजे विशाल भारद्वाजचे शेक्सपियरच्या नाटकांवर आधारलेले सिनेमे.>>>>
अगदी हे माझ्याही आवडीचे

मला तर शिरवाडकर यांचे राजमुकुट पण आवडलेलं
मॅकबेथ वर आधारलेलं

गम्प जास्त लोकांनी बघितला असावा
आणि आता असाही तो ओटीटी वर आहे, या सिनेमाच्या निमित्ताने लोकं ओरिजनल बघतील हाही एक फायदा Happy

@मूळ सिनेमा इंग्रजीत असेल तर डब करून दाखवता येईलच की ......
.
नेफी वर हिंदी मध्येच बघितला की ओरिजनल गंप.
चांगले केलेय डबिंग.

रीमेक बद्दलचा बीबीसीचा लेख
https://www.bbc.com/marathi/india-62465131

नागराज मंजुळेने आमीर खान ची एबीपी माझा साठी मराठीत घेतलेली मुलाखत युट्यूबवर आहे. सुरुवातीला आमीर खान ने मराठी बोलायचा प्रयत्न केला आहे. नंतर नागराज ने हिंदी. Happy
फॉगं 2% लोकांनी पाहिला असेल (त्यामुळे धंदा करायला अडचण नाही) असे आमीरने नागराजला लाच का याप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

कॉफी विथ करण मधे पण काही गोष्टी त्याने सेम सांगितल्या आहेत .

Youtube वर 50 historic references in forrest gump असा विडिओ आहे. मुव्ही पाहिला तेंव्हा यातले फारच कमी माहीत होते. तरी सिनेमा आवडला. आता असे संदर्भ आमिर /अतुल कोणते, कसे आणतात ते बघायचं

टॉम हँक्सच्या गाजलेल्या सिनेमांची यादी वाचताना त्याचा सुरुवातीच्या दिवसांमधला आणखी एक सिनेमा आठवला - The Man With A One Red Shoe
थ्रिलर कॉमेडी आहे. कुणी पाहिला आहे का?

बर्‍याच पूर्वी एकदा टीव्ही.वर लागलेला असताना मी थोडासा पाहिला होता. जेवढा पाहिला तेवढा एकदम धमाल होता. पण ओटीटीवर कुठे दिसला नाही नंतर.

आता ते लालसिंग चड्ढा च्या वेळी पुन्हा का बॉयकॉट आमीर सुरू झालेय? कथेत काही वादग्रस्त आहे का? की ते आपले नेहमीचेच मागचेच?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 August//

बरीच वेगवेगळी कारणं आहेत.
पण राईट विंग वाले बहिष्कार घालतात म्हणून मुद्दाम पुरोगाम्यांनी मुव्ही बघितला तर बरं होईल. तेव्हढंच त्यांच्या हातून लेखक कुलकर्णीसर आणि निर्माता मुकेशअंबानीसर यांचं भलं होईल.

अजुन एक अवांतर प्रतिसादाचा गुन्हा न करता हाच प्रतिसाद एडिट करून:
लालसिंग अंकल आणि रक्षाबंधन हे दोन्ही मुव्हीज बहिष्कार लिस्टित आहेत. रक्षाबंधन चं कारण-
https://www.siasat.com/kanika-dhillon-deletes-hinduphobic-tweets-amid-bo...

प्रदीप पटवर्धन गेल्याची बातमी वाचली. त्या निमित्तानं मनात आलेले काही विचार:

दूरदर्शन ते सॅटेलाईट चॅनेल्स ह्या मधल्या काळात जे अभिनेते / अभिनेत्री होत्या, त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं. ते आपल्यातलेच एक वाटायचे. त्यातले बरेचसे आपल्या जवळपास राहायचे, आपल्या आई वडिलांच्या बँकेत, कंपनीत काम करायचे, क्वचित आपल्या वडिलांच्या, काका-मामांच्या शाळेत असायचे. त्यामुळे ती माणसं खरी वाटायची. अश्या खऱ्या लोकांनी त्यांच्या कलाविष्कारातून उभं केलेलं आभासी जग डोळे विस्फारून पाहताना आम्ही त्यात गुंतून जायचो. आपल्या वास्तव आयुष्याच्या परिघाच्या थोडंसच बाहेर असलेलं पण कदाचित आपलं असूही शकेल असं वाटणाऱ्या त्या आभासी जगाशी एक कनेक्शन जाणवायचं.

कदाचित शहरी मध्यमवर्गीय चष्म्यातून पाहिल्यामुळे असं असेलही. पण शहरी मध्यमवर्गीय हा सुद्धा एक प्रेक्षकवर्ग आहे आणि मी त्याचं प्रतिनिधित्व करतो. असो, त्या विषयावर नंतर कधीतरी.

अशी जवळची, आपल्यातलीच एक वाटणारी माणसं जसजशी काळाच्या पडद्याआड जातात तसतसं स्मृतीमधल्या त्या आभासी जगाचा एकेक कोपरा अंधारात जातो.

फेफ Happy अगदी अगदी.
आज प्रदीप पटवर्धन गेल्यावर अशीच एक पोस्ट एका ग्रुपवर एका ओळखीच्या काकांनी टाकलेली. त्यांची बहिण आणि प्रदीप पटवर्धन दोघांनी सातवीत कुठल्या वकृत्त्व स्पर्धेत भाग घेतलेला आणि त्यांना पहिलं बक्षिस विभागून मिळालेलं. अगदी साधी पण तू रिचेबल म्हणतो आहेस तशी/ पर्सनकी कनेक्ट होणारी आठवण. Happy

अशी जवळची, आपल्यातलीच एक वाटणारी माणसं जसजशी काळाच्या पडद्याआड जातात तसतसं स्मृतीमधल्या त्या आभासी जगाचा एकेक कोपरा अंधारात जातो. >> पटलं फेफ.

Pages