बाहुलीसाठी स्कर्ट-ब्लाऊज -क्रोशेकाम (बदलून )

Submitted by पल्लवी ०९ on 2 July, 2022 - 04:14

मी हौस म्हणून क्रोशेकाम करते. शाळेत असतांना आम्हाला शिवणकाम हा विषय होता आणि त्यात आम्हाला शिवणकामासोबत विणकाम देखील शिकवले. लहान मुलांचा स्वेटर आणि मोजे करायची परीक्षा होती. माझी आज्जी खूप हौशी आणि ती सतत काहीतरी विणत असे. मला स्वत:ला विणकाम फारसे रुचले नाही. इथे आल्यावर मुबलक वेळ आणि मुबलक इंटरनेट दोन्ही हाती आले. मग युट्यूब वरची ट्युटोरिअल पाहून क्रोशे करायला शिकले. 
मैत्रिणीच्या मुलीची फर्माईश होती माझ्या बाहुलीसाठी स्कर्ट-ब्लाऊज करून दे. म्हणून हा प्रयत्न. :) 
WhatsApp Image 2022-07-02 at 2.56.54 PM.jpeg

काल एकदाचा मुहूर्त मिळाला. अहाना ची पिगी थोडी ओशाळली होती इतके मोट्ठे अंगापेक्षा बोंगा जास्त कपडे घालून फोटो काढायचे म्हणून. काय करणार बिचारी , मावशीचा अंदांज म्हणजे अंदाजच निघाला! पण शेवटी तिला तयार केला आणि फोटो सेशन झाला एकदाचं ! 
IMG_9427.jpg
टू पीस च्या ऐवजी स्कर्ट चा मिडी किंवा ऑफ शोल्डर ड्रेस झाला Happy टॉप आता दुसऱ्या बाहुलीला होईल!IMG_9428.jpgIMG_9429.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
अवांतर: हे काम करताना डोळे खराब होतील अशी भीती नाही का वाटत. चष्मा लागेल किंवा असला तर नंबर वाढेल वगैरे.

कसलं गोड आहे
लकी बाहुली
आता बाहुली चा पण एक फोटो हवा.

वा, मस्त विणलाय
चंपा, विणकामामुळे चष्मा लागेल वा नंबर वाढेल असं काहीही होत नाही.

किती गोड आहे ! Happy
स्कर्ट ब्लाऊज घातलेल्या मॉडेल चा फोटो पण टाका जमल्यास !! >> +१

धन्यवाद धनवन्ती, अमुपरी , मनिम्याऊ , आंबट गोड, Ajnabi , अश्विनी११ , चंपा ,mi_anu, अवल , मनीमोहोर, राधिका Happy

बाहुलीच्या मातेला भेटायची संधी ह्या वीकएंड ला हुकली. आता बहुदा येत्या वीकेंडला भेट होईल. फोटो नक्की टाकेन मी. चंपा- अजून तरी ह्या कामाचा डोळ्यांना त्रास झाल्याचं जाणवलं नाहीये. तसंही एकदा हात बसला की नुसत्या हातानं काम होतं , डोळे लावून बसावं लागत नाही Happy

अवलताई, तुमच्या क्रोशेकामाची मी खूप मोठी फॅन आहे Happy