महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सेने हिंदुत्व सोडले म्हणजे काय केले.
हिंदू विरोधी ते वागत आहेत का?
हिंदू विरुद्ध ते पोलिस कारवाई करत आहेत का?
हिंदू विरोधी निर्णय सरकार घेत आहे का?.
मग सेने नी हिंदुत्व सोडले म्हणजे काय?.bjp सोडली की हिंदू विरोधी पक्ष होतो असा काही गैर समज काही लोकांनी करून घेतला आहे असे वाटते

हे सगळं केवळ फडणवीसच्या मी पुन्हा येईल च्या महत्वाकांक्षेपायी चालू आहे. >>>>
+१
मूळात फडणविसांचं राजकारण २०१४ पासूनच गंडलंय. सेनेशी युती तोडूनही सेनेने मोदी लाटेविरोधात ६३ आमदार जिंकवले ह्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. सेनेची ताकद काय आहे हे न कळल्याने त्यांनी २०१९ पर्यंत सेनेला दुय्यम वागणूक दिली. सेनेने रालोआत भाजपनंतर सर्वात जास्त खासदार जिंकवूनही त्यांना केंद्रात अवजड मंत्रीपद मिळालं. ह्याचा बदला न घेती तर ती सेना कसली?? सेनेने २०१९ ला परफेक्ट डाव साधला नी भाजपला बाहेर फेकलं. ईथेही सेनेला १ किंवा २ वर्षे मुख्यमंत्रीपद भाजपने दिलं असतं तरी सेना वरमली असती. पण मी पुन्हा येईनचा हट्ट नडला नी सगळंच मूसळ केरात गेलं. आता महाराष्ट्रात पुन्हा निवडणूका झाल्या तरा भाजप यायची शक्यता नाही. आलीच तरी सेनेचं समर्थन घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यात पुन्हा सेनेला असं आमदार फोडून दूखावलं तर मात्र सेना काय करेल ह्याचा भरवसा नाही. मोदी आणी शहांना महाराष्ट्रातून फक्त खासदार हवेत बाकी त्याना फडणवीस मामू बनले न बनले तरी काहीही फरक पडत नाही.

bjp सोडली की हिंदू विरोधी पक्ष होतो असा काही गैर समज काही लोकांनी करून घेतला आहे असे वाटते >>>
फक्त अंधभक्तांनी.

मग सेने नी हिंदुत्व सोडले म्हणजे काय?//

हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीसना मुख्यमंत्री बनवा हा तर मोठाच जोक आहे. हिंदुत्व आणि फडणवीस यांचा नळाच्या आशीर्वादाने पाऊस पडण्याइतकाच संबंध आहे.
हिंदुत्व म्हटलं की जुन्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि आजच्या काळात मोदी, शहा, योगी.
फडणवीस तर सीएम असताना भाजपच्या समर्थकांमध्ये डेव्हीड फर्नांडिस म्हणून ओळखले जायचे. फडणवीस ना मराठी माणसासाठी लढलेत, ना हिंदुसाठी लढलेत. ते फक्त स्वतःच्या करियरसाठी कार्यरत होते. भ्रष्ट नाहीत पण इतरांच्या भ्रष्टाचाराला सत्तेसाठी पाठीशी घालत असतील , जातीयवादी नाहीत पण इतरांच्या जातीयवादाला सत्तेसाठी पाठीशी घालत असतील तर काही अर्थ नाही.

फडणवीस ना मराठी माणसासाठी लढलेत, ना हिंदुसाठी लढलेत. ते फक्त स्वतःच्या करियरसाठी कार्यरत होते.>>+११

केंद्र सरकार नी बंडखोर आमदार ना crpf ची सुरक्षा दिली,केंद्र सरकार ठाकरे विरुद्ध जो बोलेल त्याला केंद्राची सुरक्षा देत आहे

ह्यांना काय वाटत महाराष्ट्र पोलिस सक्षम नाहीत की महाराष्ट्र म्हणजे परका देश आहे आहे ह्या लोकांना धोका आहे
राज्यांच्या कारभारात फुकट ढळवळ हे केंद्र सरकार करत आहे

सेने हिंदुत्व सोडले म्हणजे काय केले.
हिंदू विरोधी ते वागत आहेत का?
हिंदू विरुद्ध ते पोलिस कारवाई करत आहेत का?
हिंदू विरोधी निर्णय सरकार घेत आहे का?.
मग सेने नी हिंदुत्व सोडले म्हणजे काय?.bjp सोडली की हिंदू विरोधी पक्ष होतो असा काही गैर समज काही लोकांनी करून घेतला आहे असे वाटते >>>>>>>>>>>>
सेनेने हिंदुत्व सोडले म्हणजे , मशिदी वरील स्पिकरच्या त्रासामुळे अभ्यासात व्यत्यय होतो म्हणून त्यांना सांगायला गेलेल्या करिश्मा भोसले या मुलीच्या समर्थनार्थ उभे न राहता उलट तिच्यावरच केस ठोकणे .......

सेनेने हिंदुत्व सोडले म्हणजे , बाळासाहेबांच्या त्यांच्या हयातीत काश्मिरी हिंदू बद्दल असलेल्या आपुलकी विरोधात जाऊन मुक्ताफळे उधळणे .......

सेनेने हिंदुत्व सोडले म्हणजे , बंगाल मध्ये हिंदूंची देवळे उध्वस्त करणाऱ्या , दुर्गा यात्रेत जाळपोळ करणाऱ्या आणि हिंदूंना टार्गेट करून मारणाऱ्या लोकांच्या तृणमूल पक्षाच्या ममते ला इथे बोलवून तिच्याशी गुजगोष्टी करणे .....
सेनेने हिंदुत्व सोडले म्हणजे , भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे माहीत असून भाजपला शह देण्यासाठी दिल्लीत एकत्र आलेल्या पण सतत एकमेकांचे पाय ओढणाऱ्या तरसांच्या टोळीस जाहीरपणे साथ देणे .......
सेनेने हिंदुत्व सोडले म्हणजे ,मायनो के सामने हिजडे झुकते है असे बाळासाहेबांचे जाहीर वक्तव्य असून देखील अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासाठी मायनो आणि मतिमंद पुढे लाळ घोटेपणा करणे ........
गांधी घराण्यातील लोकांच्या जयंत्या ना उठाकडून शुभेच्छा देण्याची तत्परता दाखवणे , ते ही त्यांनी आजपर्यंत बाळासाहेबा बद्दल दाखवलेली नसताना .....
हा गुण वेगळाच !
काश्मिरी फाईल्स सिनेमातील दृष्या प्रमाणे असे काही झालेच नाही असे सांगणाऱ्या नाटक्या ढोंग्या ना साथ देणे , हिंदू देवतांवर आणि महाराजांवर टीका करून पोट भरणाऱ्या काम्र्या ला झिपरु द्वारे आदराने वागवणे ......

गाढवाच्या पाठीवर मूर्ती ठेवली की लोक नमस्कार करतात , फोटोग्राफर चांगला असेल तर लोक गाढवाला नमस्कार करतात , असा बरोबर फोटू काढू शकतो

तसे भाजपे हे हिंदुत्व वाहून नेणारे गाढव आहेत, त्यांना लोकांकडून बळजबरी नमस्कार करून हवा आहे, म्हणून ते हिंदुत्व , मंदिर , स्तोत्र , ईतीहासातील मेलेला राजा इ उचलून सैरावैरा फिरत असतात.

गाढवावर बसून प्रवास करणाऱ्याला उभ्या आडव्या लाकडाला खिळे ठोकून लटकवले तरी तुमची लोक त्याच्यापुढे नतमस्तक होतात ना ? मग हिंदूचे काय चुकले ?
Happy
अंधश्रद्धा प्रत्येक धर्मात आहे !!!!!

हो , पण आता इतर राज्यकर्ते त्यांच्या नावाने मते मागत नाहीत

15 ऑगस्ट 1947 ला सगळ्या धर्मातील सगळ्या राजा महाराजांचा हिशोब चुकता केलेला आहे , त्यांनी खाऊन जे खरकटे उरले , त्यातून जनतेने लोकशाही उभी केली आहे

देशात अनेक धर्म ,जाती,भाषा,संस्कृती असणारी लोक आहेत.
हे सत्य आहे ते बदलता येणार नाही.
हिंदुत्व,muslimatv, बोधतव असले प्रकार देशाच्या हिताचे नाहीत.
सरकार नी फक्त कायदा सुव्यवस्था,फास्ट न्याय,कोणालाच डोक्यावर घेवू नये आणि कोणाला कोणाला चिरडू पण नये..
देशाची आर्थिक स्थिती,सामाजिक न्याय,ग्रामीण भागात विकास,आर्थिक असमतोल दूर करणे...हेच करावे.
हिंदुत्व ,किंवा muslimatv देशाला हुकूम शाही कडे घेवून जाईल.
खुप धोका आहे त्या मध्ये.

राजकारणात हरल्या नंतर सुद्धा मीडिया समोर अर्वाच्च भाषा न वापरता करेक्ट कार्यक्रम करणारा खरा राजकीय नेता असतो .
शाखा सांभाळण्याची औकात असलेल्यांना राज्य सांभाळायला दिले की असेच असते .

खासदार असून नवनीत ला दोन दिवस जेलची हवा खायला लावणाऱ्या शेणेच्या या राज्यसभा सदस्याला इडी उचलणार नाही कशा वरून ?
महाराष्ट्रातील धुरळा एकदा बसला की कायद्यावर बोट ठेवून सर्वात अगोदर चक्की पिसायला झिप्रू च जाणार !
पॉइंट नोट करून ठेवा !>>>>>>> झिपर्‍या खूप म्हणजे खूपच वेडा झालाय. Proud अफाट आणी बेताल बडबडीमुळे याने सेना संपवली. याचे म्हणजे झिप्रुचे फॅन सोडले तर सगळे याच्या नावाने बोटे मोडतायत. कालचे भाषण कहर होता.

Ed कायद्याने चालते की केंद्र सरकार च्या इशाऱ्यावर .
Bjp नी सुरू केलेली ही पद्धत त्यांना पण महागात पडेल.
आज नाही तर उद्या सत्ता जाईल च तेव्हा पण असेच ed चे समर्थन करा.

Black cat .
ह्या सर्व घोषित मालमत्ता आहेत ,कायदेशीर इन्कम चे पुरावे असणार
असे घोषित मालमत्ता वरून ठरवून नका.
ह्या न्यायाने आपले पंतप्रधान,आणि अमित shah पण साध्या तलाठी पेक्षा गरीब वाटतील.
अघोषित मालमत्ता सर्व च राजकीय नेत्यांच्या हजारो करोड मध्ये असतील.
आणि त्या मध्ये bjp चे नेते,मंत्री,सरकार चे जे घर गडी आहेत ते अधिकारी, bjp चे मित्र हे सर्वात पुढे असतील.

एखाद्या फटीची दरी कशी करावी हे शिवसेनेकडून शिकाव....उरल्या सुरल्या शक्यतेला व्यवस्थित सुरन्ग लावला प्रवक्त्यानी बर ते त्याच्या फाटक्या आणी ^&* वाणीसाठी आहेच प्रसिद्ध निदान ज्यु ठाकरे यानी तरी यात पडायला नको होत, जेव्हा सावरायला पाहिजे तेव्हा पसरवतात गमतच आहे.
खरतर पहिल्या फोनमधेच मविआ गेली उडत पहिले बन्डखोराना वळवुन घरी आणायला पाहिजे होते, पक्ष टिकला तर पुढे सरकार टिकवता आलेच असते. याबाबतित पवाराना मानल पाहिजे या वयातही त्याची पक्षावरची पकड कणभरही सुटली नाहिये.
अर्थात फ्लोअर टेस्ट हे खर आव्हान आहे तोवर काहिही होवु शकत आणी जेव्हा अशा शक्यता असतात तेव्हा तरी निदान परतिचे दोरच कापुन टाकू नयेत.

मालक

https://www.loksatta.com/photos/news/2992059/photos-of-shivsena-rebel-ml...

साक्षात सद्गुणांचे पुतळे >>>>>>>>>>>>
ह्या चाय बिस्कुट पत्रकाराने पवार आणि ठाकरे कुटुंबावर देखील असाच माहितीपूर्ण रिपोर्ट प्रदर्शित करावा !

तुम्ही करा

35 वर्षे तुमचे पार्टनर होते , की ठाकरेंनी सगळी मालमत्ता 2019 नंतर मिळवली ?

स्वतःचा पार्टनर भ्रष्ट आहे, हिंदुप्रेमी नाही , दाऊदच्या मित्राचा मित्र आहे, हे म्हणे 35 वर्षे समजले नव्हते.

आणि दाऊदचा मित्र कोण , तर ह्यांच्या विश्वगुरूंचे गुरू

राऊत यांचा तो व्हिडिओ सोईस्करपणे एडिट करून तयार केला आहे असे वाचनात आले.

परत येतील ती त्यांची केवळ शरीरे, आत्मा आधीच मेला आहे असे काहीसे ते बोलले.

अर्थात आजच्या परिस्थितीत त्यांनी तोंड सांभाळावे हे उत्तम.

राऊत यांचा तो व्हिडिओ सोईस्करपणे एडिट करून तयार केला आहे असे वाचनात आले.

परत येतील ती त्यांची केवळ शरीरे, आत्मा आधीच मेला आहे असे काहीसे ते बोलले.>>> ती नतरची सारवासारव आहे त्याची.

राऊत यांचा तो व्हिडिओ सोईस्करपणे एडिट करून तयार केला आहे असे वाचनात आले.>> त्यांचे भाषण लाइव्ह दाखवले होते. लोकं हसत आहेत पाहुन फारच जोशात आले होते.

फारएंड, "राउत कोणाला आवडोत न आवडोत - त्यांनी सगळे मराठीत सांगितल्यावर त्यांना "हिंदी मे बताईये" करून सांगणार्‍या हिंदी पत्रकारांना सांगितले पाहिजे की लेको तुम्ही मुंबईत आलाय. मराठी शिका नाहीतर एखादा स्थानिक माणूस नोकरीत घ्या " >>>
बाकी सर्व राहूदे बाजूला, मला उत्सुकता आहे राऊतांनी त्या पत्रकारांना काय उत्तर दिलं याची. हिंदी वार्ताहरांचा हा प्रकार मस्तकात तिडीक नेणारा आहे. बाकीचं राजकारण राहिलं बाजूला, ह्या बाबतीत मी फडणवीसांना एकदा मराठीत केलेले निवेदन पुन्हा हिंदीत केलेले पहिले (बहुतेक ते तेव्हा मुख्यमंत्री होते, नक्की आठवत नाही ) आणि राग आणि शरम ह्यांचा कल्लोळ मनात उठला. एकदा तर (ते मुख्यमंत्री नसताना) "माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद हिंदीतून सुरु करणार आहोत" असं म्हटलेलं ऐकलं. महाराष्ट्रात येऊन मराठी ना शिकता उलट तुम्हीच आमच्यासाठी हिंदीत बोला, ते ही अधिकृत पत्रकार परिषदेत, इतका माज ह्यांना येतो कसा, आणि आपले राजकारणी (ते कुठल्याही पक्षाचे असो) त्याचे लांगुलचालन कसे करतात हे पाहून खूप दुःख होतं.
माझ्या मर्यादित निरीक्षणानुसार हिंदी लादण्याच्या बाबतीत भाजप नंबर १, काँग्रेस नंबर दोन आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेबद्दल माहित नाही. किमान महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष असल्याने ते तरी मराठीच्या बाबतीत आग्रही असावेत असं वाटतं. पण आजकाल कुठलीही अपेक्षा करणं व्यर्थ आहे.

1), Raj thakre नी भोंगे हा विषय घेतला तेव्हा गोदी मीडिया जाम खुश होती.
राज ठाकरे चे मराठी मधील भाषण हिंदी मध्ये translate करून निवेदिका सांगत होती.परत सब title पण होतेच..
मराठी नेत्याने बिन्धास्त मराठी बोलावे.त्यांना गरज असेल तर ते हिंदी मध्ये translate करतील.
दक्षिण भारत,बंगाल मध्ये असेच वागतात.
२)सरकार नाही वाचले तरी चालेल . पण bjp sarkar आले नाही पाहिजे,rashtrpati राजवट लागली तरी चालेल
३) बंड केलेल्या कोणालाच सेने नी ,राष्ट्रवादी नी तिकीट देवू नये
नवीन लोक रिंगणात उतरविले जावे

खुप लोकांची इच्छा आहे राज ठाकरे नी सेनेत यावे.
आणि बाळासाहेबांची जागा चालवावी.उद्धव जी नी सत्तेत सहभागी व्हावे.
राज ठाकरे सेनेत आले तर .
राणे पासून अनेक परत सेनेत येतील.

पण भोंगे तर अजून सुरू आहेत

ते तर चालूच राहणार .अर्धवट,बुद्धिहीन भक्त स्वतःचा मेंदू वापरत नाहीत.
आयटी सेल जे पाठवतो हीच त्यांची बुध्दी ची शिदोरी असते.
त्या मुळे एकच वेळी अनेक समाज माध्यमावर एकच प्रकारचे विचार अनेक भक्त व्यक्त करतं असतात .
पॉइंट एकच असतों

मशिदी वरील भोंगे बंद केले की मंदिरावरील भोंगे पण बंद करायला लागतील.
Speaker वर आरत्या म्हणता येणार नाहीत.
ध्वनी प्रदुषण हा विषय असल्या मुळे अनेक मिरवणुका, वर speaker use करायला बंदी येईल

हे अंध भक्तांना समजणे असे पण कठीण आहे.

अंध भक्त कसे आयटी सेल वर चालतात.
त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मध्ये मध्ये mipa वर चक्कर मारत जा..
तिथे भक्तांचा मोठा ग्रुप आहे.
सर्व आयटी सेल नी चार्ज होतात.
मनोरंजन पण होईल.

Pages