महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ठाकरे सरकार आल्या पासून bjp वेड्या सारखी करायला लागली.
केंद्र सरकार नी आपल्या अधिकाराचा पूर्ण गैर वापर करून महाराष्ट्र नेहमीच अडचणीत कसा येईल हे केले..
राज्य सरकार पुढे केंद्र सरकार नी अनंत अडचणी निर्माण केल्या.
लोकांचे डोळे उघडे आहे...
राजकीय लढाई होती ना मग ती त्याच पातळीवर असायला हवी होती...
राज्य विरुद्ध नाही.

पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतली ,राज्यपाल चे फ्लोर टेस्ट चे आदेश फाट्यावर मारले गेले , राजकीय हिंसा / हत्या झाल्याच तर केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावावी लागेल .
राष्ट्रपती राजवट भाजप ला नकोय , ते ४७ आणि भाजप चे १०५ सहज सरकार बनवतील .
म्हणूनच झीप्रू तणाव वाढवण्याची विधाने करून शेणक्याना जाळपोळ करण्यास प्रवृत्त करतोय असे दिसतेय .

कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात शेने बद्दल काळजी आहेच ना ! >>>
ईतकी काळजी होती तर सोडायचं होतं २.५ वर्षे मुख्यमंत्रीपद. किंवा आता बाहेरून पाठींबा द्यायची मागणी करा भाजपकडे.

म्हणजे ह्यांना भारताचे पंतप्रधान म्हणायचे की पाकिस्तान चे.
आपल्याच देशातील राज्य विषयी इतका द्वेष. >>>
ते ट्रंप ला केम छो म्हणाले होते. ते गुजरात चे पंतप्रधान आहेत. अनेक कार्यालये मुंबईतून अहमदाबादला हलवत होते.

राज्याचा किंवा शेणेचा झालेला एकच फायदा सांगा ! >>> भाजपच्या काळ्या पर्वापासून सूटका तसेच राज्याचे मुख्यमंत्रीपद.

राज्यात बिजेपीला सत्तेत वाटा, केंद्रात सेनेला वाटा.>>>>
सेनेने भाजपसोबत कदापीही जाऊ नये.

भाजप समर्थकांनी राणे बाप लेकाचे समर्थन केल्याचे कधी दिसले का ?
चूक ते चूकच म्हणायला शिकले की गुलामगिरीची भावना गळून जाईल हो !
हे भाजपी आले कोठून ?
वेळोवेळी काँग्रेस राष्ट्रवादी सेना आणि भाजप ला मतदान केलंय यांनी .

पुरोगामी .
तुम्ही म्हणता तसे सर्व घडले.
Bjp aani शिंदे गट मिळून सरकार स्थापन झाले.
फक्त 2.5 वर्ष च राहिली आहेत
सत्ता स्थापन होई पर्यंत शिंदे गटाचे लाड bjp पुरवेल.
पण एकदा सत्ता स्थापन झाली की काही किंमत देणार नाही.
अधिकार आता आहेत तितके पण नसतील

त्याला कारण
शिंदे गट कडे प्रभावशाली नेतृत्व नाही.
काही झाले तरी ठाकरे च प्रभाव सेने कडे आहे.
शिंदे चा प्रभाव फक्त ठाण्यात .बाकी त्यांच्या कडे कोणी प्रभावशाली नाही ज्याला महाराष्ट्र ओळखतो.
अशा कमजोर गटाला bjp किती किंमत देईल हे वेगळे सांगायला नको.

भाजप समर्थकांनी राणे बाप लेकाचे समर्थन केल्याचे कधी दिसले >>>>>
कधीच नाही फक्त तिकीट देऊन केंद्रातमंत्राीपद दिले.

राऊत मुळे (नालायक शब्द वापरण्याचे टाळले बर का Happy ) राज्याचा किंवा शेणेचा झालेला एकच फायदा सांगा !
किराणा मालाच्या दुकानात दारू मिळणार होती , हे सोडून>>>
सेनेचा मुख्यमंत्री झाला. सन्मानाने सत्तेत सहभागी होता आल.
राज्याचा फायदा - मुंबई तील महत्त्वाची कार्यालये गुजराथ मध्ये गेली नाहीत . अजून बरेच फायदे आहेत.

राज्याचा किंवा शेणेचा झालेला एकच फायदा सांगा ! >>> भाजपच्या काळ्या पर्वापासून सूटका तसेच राज्याचे मुख्यमंत्रीपद.>>>>>>>
चला मान्य करू भाजप च्या काळया पर्वा पासून सुटका करून घेतली पण सेनेचे कडवे हिंदुत्व पण गळून पडले त्याच काय ? हिंदुत्वा शिवाय सेना निवडणुका जिंकेल असे वाटते ?
का उठा च्या वक्तव्य आम्ही आमचे हिंदुत्व सोडलेले नाही वर सेनेचे सगळे मतदार विशेष ठेवतील ?
तेही हिंदुत्व विरोधी राहुल , ममता जाहीर बोलत असताना ?

झिपरू च्या मुळे राज्याचे मुख्यमंत्री पद मिळाले !
किती दिवस ?
अडीच वर्ष फक्त ?
पण राष्ट्रवादी बरोबर चोंबडेगिरी करून सेनेचे ३८ आमदार घालवले ना ?

सेनेचे कडवे हिंदुत्व पण गळून पडले त्याच काय ? हिंदुत्वा शिवाय सेना निवडणुका जिंकेल असे वाटते ? >>>>
भाजपला सोडले म्हणजे हिंदूत्वाला सोडले असे समजनारे फक्त अंधभक्त आहेत. कुठलाही सेना समर्थकनी मराठी माणूस भाजप म्हणजे हिंदूत्व असे मानत नाही.

अडीच वर्ष फक्त ? >>> असं कुणी सांगीतलं??

पण राष्ट्रवादी बरोबर चोंबडेगिरी करून सेनेचे ३८ आमदार घालवले ना ?>>>>
पहाटे नाक कापलं गेलं तसं ह्यावेळीही नाक कापलं जानार आहे भाजपचं काळजी करू नका.

फा लोकसत्ता ची मेन हेड लाईन आहे, >>> ओके. लोकसत्ता व लोकमत दोन्ही वाचत आहे. मला काल असे काही स्पेसिफिक दिसले नाही. पुन्हा बघतो.

अजून काहीतरी मिसिंग पीस आहे यात. शिंद्यांकडे ३७ खरोखरच असतील तर आता कशाला थांबले आहेत? आता तर राज्यपालही बरे होउन आले ना? मग दोनच शक्यता उरतात - अजून ३७ नाहीत, किंवा नक्की काय करायचे याबद्दल वाद आहेत - सेनेतच राहून भाजपच्या बाजूला वळवायचे, स्वतंत्र पक्ष, की भाजप मधे सामील

३७ नसतील तर पहिले एक दोन दिवस पर्याय होता सन्मानाने परत येण्याचा. आता दोन्ही साइडची वक्तव्ये पाहिली तर ते दोर कापलेले आहेत.

ती शहाजी बापू पाटलांची क्लिप फार भारी आहे. ते काय हॉटेल वगैरे जास्त मीम्स मधे आले. पण बाकी क्लिप जास्त इंटरेस्टिंग आहे. गणपतराव देशमुख, उद्धव ठाकरे, फडणवीस सर्वांबरोबरचे संबंध, तालुक्यातील कामांना निधी न मिळणे, सिंचन योजनेला (बाळ) ठाकर्‍यांचेच नाव द्यायचे होते तरी त्याला १४ पत्रे पाठवूनही ते न होणे, गणपतराव देशमुखांच्या श्रद्धांजली सभेत यांनाच बोलायची संधी न देणे व अजित पवार अर्धा तास दुसर्‍याच विषयावर बोलणे वगैरे मनोरंजक गोष्टींचे उल्लेख आहेत (यांनी म्हणे भाषण तयार केले होते व प्रॅक्टिसही केली होती "जीवन त्यांना कळले हो...." हे वाक्य सुरूवातीला ऐकून सभागृह रडले असते वगैरे Happy ). इतकी वर्षे एनएसयुआय, काँग्रेस पासून सेनेमधे कामे केली पण पाटलाच्या सुनेला नवीन लुगडं मिळणे अवघड झाले आहे, आता कंटाळलो होतो, राजीनामा देणार होतो वगैरे खरे असेल तर तीही रिअ‍ॅलिटी विशेष आहे.

हे प्रातिनिधिक असेल तर हे आमदार इतक्या मोठ्या संख्येने शिंद्यांबरोबर जाण्याचे कारण कळते. ते अजूनही उद्धव ठाकर्‍यांना थेट दोष देत नाहीत. इतरही काही आमदारांचा टोन साधारण असाच आहे.

माझ्या कॉलेज मधे फलटण वगैरे साइडचे मित्र होते. त्यांच्यासारखे उच्चार बर्‍याच दिवसांनी ऐकले. या क्लिप मुळे आणखी माहिती शोधली, तर हे मूळचे काँग्रेसचे. शेकापच्या गणपतराव देशमुखांविरूद्ध वर्षानुवर्षे उभे राहून पडत. मग १९९५ च्या लाटेत बाकी ठिकाणी सेना-भाजप आली पण सांगोल्यात हे काँग्रेसमधून थोडक्यात मार्जिनने निवडून आले. मग पुन्हा काही वर्षे पडले कारण नंतर पुन्हा गणपतराव देशमुखच आले निवडून. मग २०१९ साली त्यांनी पुढे लढायचे नाही ठरवल्यावर (पण तरीही त्यांच्याच नातवाला उमेदवारी दिल्यावर) हे सेनेतून आले, पुन्हा जेमतेम मार्जिनने. या सगळ्यात त्या देशमुख कुटुंबाशी यांचे संबंध चांगलेच राहिले.

"आमदार" म्हंटल्यावर एक टर्रेबाज व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येते तसेच हे दिसतात. पण ही बॅकस्टोरी इंटरेस्टिंग आहे.

प्रातिनिधिक असेल तर हे आमदार इतक्या मोठ्या संख्येने शिंद्यांबरोबर जाण्याचे कारण कळते. >> प्लॅन्टेड क्लिप आहे रे फा. का पेडगावला जायची घाई करतो नेहमी? Wink

पवार हे शेवटी कसलेले नेते आहेत.
संसदीय लोकशाही चे नियम,कायदे,खाचाखोचा त्यांना चांगल्या माहीत आहेत.
सुरवतीला ठाकरे पण पराभव वूती दाखवत होते ..पण पवार ची एन्ट्री झाली आणि ठाकरे च्या बोलण्यात आत्म विश्वास आलं

पवार नी नक्की bjp आणि बंडखोर ह्यांना धोबी पछाड टाकली आहे.
नियम आणि कायद्या विषयी पुर्ण अज्ञान रंगा बिल्ला ल आहे.
म्हणून ते नेहमीच फसतात.

प्लॅन्टेड क्लिप आहे रे >>>>
हो ते संभाषण मुद्दामहून लिक केले असावे असेच wataty.

आधी 2 दिवस SS मध्ये सामसूम दिसत होती. पण कायद्यावर बोट ठेऊन शह देता येतोय हे दिसल्यावर राऊटांचे सायकॉलॉजीकल वॉर चालू झाले आहे.

प्लॅण्टेड क्लिप मधे लोक पेरलेली वाक्ये बोलतात. इथे १५ मिनीटे माणूस निवांत बोलतोय. त्यात ज्या घटना सांगितल्या आहेत त्या या क्लिपमधे बोलण्याची काहीच गरज नव्हती.

कळसूत्री बाहुल्यांसारखे बोलले असते तर पहिले उठांना टार्गेट केले असते. हे तर त्यांच्याबद्दल चांगलेच बोलत आहेत.

एक वो मनमोहन सिंग जी थे पता सब कूच्छ था लेकीन जादा बोलते नाहि थे.

Aur ek है घंटा कुछ भी पता नाहि लेकीन बकवास पुरे जहा की.

बाय द वे १६ बंडखोर का धरले जात आहेत? बाकीच्यांचे काय? की ते दोन्ही डगरींवर पाय ठेवून उभे आहेत? Happy

नियम आणि कायद्या विषयी पुर्ण अज्ञान रंगा बिल्ला ल आहे.
म्हणून ते नेहमीच फसतात>>>
भाषणात करतात तशी फेका फेकी कोर्टात करता येत नाही म्हणून फावत नसावे.

बंडखोरांना दुसऱ्या पक्षात सामील व्हावे लागेल.
बीजेपीत गेले तर त्यांची उपयुक्तता संपल्यावर त्यातले बरेच अडगळीत जातील हे त्यांनाही माहित असेलच.
दुसरा पर्याय मनसे किंवा प्रहार..
त्यापेक्षा समेट होऊन आपल्याच घरी परतणे कधीही चांगले. दोन पक्षांचे सरकार असेल तर सत्तेत जास्तीचा वाटा. केंद्रात भागीदारी. तोंडावरच्या मुंबै पालिकेच्या निवडणुकात बीजेपीची साथ, इडीची इडापीडा टळेल. आणि हिंदुत्वही सेफ..
मंत्रीपदाचा लोण्याचा गोळा सोडुन सेनेचे मंत्री फिरायला गेल्यासारखे आसामकडे जात आहेत हे पाहुन ठरलेला प्लॉट वाटतो.

तोंडावरच्या मुंबै पालिकेच्या निवडणुकात बीजेपीची साथ, >>>
बिजेपी असली नसली तरी सेनेला मुंबईत फरक नाही पडत.

पाहिले तर bjp चे हिंदुत्व म्हणजे काय .
आठ, वर्ष झाली bjp सत्तेवर येवून पण हिंदू ल त्याचा काही फायदा झाला आहे .
असा कोणाला अनुभव नाही..
उलट खाचिकरण च झाले आहे.
Bjp चे हिंदुत्व म्हणजे नक्की काय भानगड आहे.

बीजेपीचे प्रत्येक निवडणुकात टारगेट असते. मुंबै पालिका ताब्यात घेतली तर सेना कासावीस होईल हे ते जाणुन आहेत.
राज्यात लहान भाऊ मोठा कधी झाला सेनेला समजलेच नाही तेव्हा मुंबै पालीका निवडणुका काय सोप्या राहतील सेनेसाठी?

भाजपला सोडले म्हणजे हिंदूत्वाला सोडले असे समजनारे फक्त अंधभक्त आहेत. कुठलाही सेना समर्थकनी मराठी माणूस भाजप म्हणजे हिंदूत्व असे मानत नाही. >>>>>>>
मुळात गेल्या अडीच वर्षांत सेना हिंदुत्व घेवून /टाळून जनते समोर गेलेलीच नाही , जेंव्हा जाईल तेंव्हा कोण आंधळे , गुलाम , रा काँग्रेस ने बनवलेलं येड हे सगळे कळेल .
भाजप वर राग व्यक्त केल्याने मते वाढतील असे समजणेच निव्वळ येडेपणा आहे .
म्हणूनच लायकी न बघता फक्त भाजपला विरोध करण्यासाठी युपी आणि गोव्यात निवडणुका लढवून दात पाडून घेतले !
हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर चीट कुन राहिले असते तर इतकी वाईट परिस्थिती झाली नसती .

पूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्र वर आहे. bjp कसा केंद्रीय यंत्रणा वापरून महाराष्ट्र सरकार ल त्रास देत आहे हे सर्व देश बघत आहे.. यूपी सोडली तर बाकी राज्यातील मतदार सुजाण आहेत..
Bjp ची इमेज खराब होत चालली आहे.
आघाडी सरकार वाचले नाही तरी bjp देशात नक्की बदनाम होत चालली आहे.
त्या पेक्षा शाहण्या विरोधी पक्ष सारखे bjp वागली असती आणि फक्त योग्य ठिकाणी सरकार च विरोध केला असता .
तर bjp बदनाम झाली नसती.

बाय द वे १६ बंडखोर का धरले जात आहेत? बाकीच्यांचे काय? की ते दोन्ही डगरींवर पाय ठेवून उभे आहेत? >>>>>>>
बाहेर गेलेले आमदार सेनेकडे शिल्लक राहिलेल्या १६ आमदारांना बंडखोर म्हणत असतील Happy

यूपी सोडून बाकी कोणत्याच राज्याचे उदाहरण bjp वाले देणार नाहीत..
दक्षिण भारतातील एका पण राज्याचे नाव घेणार नाहीत.
अगदी घरात म्हणजे दिल्ली मध्ये केजरीवाल नी bjp ल पाणी पाजले आहे.
ममता नी बंगाल मध्ये ह्यांची डाळ शिजून दिली नाही...
फक्त ती यूपी.चेच नाव घेणार.

म्हणूनच लायकी न बघता फक्त भाजपला विरोध करण्यासाठी युपी आणि गोव्यात निवडणुका लढवून दात पाडून घेतले ! >>>>
शिवसेना हा पक्ष आहे नी तो भारतात कुठेही निवडणूक लढवू शकतो. लायकीचं म्हणाल तर भाजपची केरळात काय लायकी? तरी निवडणूका लढवून भाजप तिथे दात पाडून घेतोच ना? केरळात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. भाजपला कुत्रं विचारत नाही.

हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर चीट कुन राहिले असते तर इतकी वाईट परिस्थिती झाली नसती .>>>>
सेना हिंदूत्वाच्या मूद्द्याला चिकटून नाही हे अंधभक्त सोडले तर ईतर कुणीही बोलत नाही.

अजून काहीतरी मिसिंग पीस आहे यात. शिंद्यांकडे ३७ खरोखरच असतील तर आता कशाला थांबले आहेत? //

जे लीगल मुद्दे शिंदेंना अडचणीचे आहेत (पवारांनी मांडलेले) त्याचा विचारच बहुधा फडणविसनी केला नसावा. आणि आता आपला मार्ग सोपा नाही हे कळल्यावर काय करायचं ते कळत नसावं. उतावळा नवरा सिच्युएशन असेल.
हे सगळं केवळ फडणवीसच्या मी पुन्हा येईल च्या महत्वाकांक्षेपायी चालू आहे. आयडियोलॉजी किंवा पॉलिसी दृष्टिकोनातून पाहता सेना-राष्ट्रवादी प्लस पटोले-जगतापांची काँग्रेस सत्तेत असताना भाजपला आपलं वेगळं सरकार बनवण्याची गरजच नाही. सगळं भाजप समर्थकांना हवं तसंच तर चालू आहे.
करप्शन , अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुद्दे असतील तर मग फडणवीस आता त्याच लोकांना सोबत घेणार ना ज्यांच्यावर करप्शनचे आरोप केले. मग करप्शन चालूच राहणार असेल तर मविआ लाच करू दे की.

Pages