भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो बरोबर आहे
इथेही कोकणात सगळ्या पोरींनी ओड्याला आवळून चिवळून फोटो काढले तरी काही करायचा नाही
पण बाप्या माणसांनी जवळ बसूनफोटो काढायचा म्हणलं तर चक्क पाठ फिरवून निघून जायचा
एका पोराने तर अक्षरशः रडून हैराण केलं आई बापाना की डॉगी सोबत फोटो काढायचा
आणि ओडी एक सेकंड त्याच्या जवळ बसायला तयार नाही
मोठ्या मुशीकिलीने कसा तरी जमवला
तेच नंतर तीन मुली आल्या त्यांनी जाम आवळून धरला होता तिघीत, तेही पाण्यात नेऊन आणि ओडीन महाराज अजिबात तक्रार करत नव्हते

म्हणलं कसला दंबीस आहेस रे

भारीये ओडिन! समुद्रात पण पोहायला अजिबात घाबरत नाही म्हणजे नवल वाटते! चेहर्‍यावरचे भाव मात्र अजून पपीसारखेच वाटतायत Happy

गोड गोड मंडळी आली का?
बेस्ट फोटो आलाय ओडीन आणि ऑस्कर चा...
दोघांच्या चेहेर्‍यावरचे भाव कसले निरागस आहेत

चेहर्‍यावरचे भाव मात्र अजून पपीसारखेच वाटतायत>>>
हो ना, त्यामुळेच आगाऊपणा खपून जातो
तिकडे गेल्यावर पूर्णवेळ माझ्या मागे मागे फिरत होता, आईबाबांकडे लक्षही दिले नाही
हाक मारली तरी जायचा नाही
आई म्हणे आता घरी गेल्यावर ये परत माझ्याकडे दहीभात मागायला मग बघते
तरी काही नाही
आणि घरी येताच जणू हा आता झालं म्हणत लगेच त्यांच्या जवळ जाऊन लाडात येऊन परत रुटीन सुरू

खूप छान आहेत बाळे.माझे स्वताचे असे निरीक्षण आहे की लहान बाळे आणी लहान मुले कुत्र्याना खूप आवडतात.भटकी कुत्रीही त्यांना माया लावतात.अशी 8 ते 10 भटकी कुत्री आम्ही(मुलीने)पाळलेली आहेत.खूप माया आहे त्यांना आमच्याविषयी.जाईल तेथे मागे येणे मुलगी कोणाशी बोलायला लागली की सरळ अंगावर धाऊन जातात.गावी जाऊन आलो की गोल करुन अंगावर उड्या मारतात.मागे निवडणूक लागली तेंव्हा 2 पकडून नेली.खूप वाईट वाटले.आता 5 आहेत.

सोसायटी मधे एका माउ ने पिल्ले दिली आहेत.... पोरगी दिवसभर तिकडेच पडीक असते...
काल घरी येउन, " भुभु नाही तर ठीक आहे माउ तरी पाळुयात की... त्यांचं काही करावं लागत नाही, ते शी शु पण बाहेर जाउन करतात ई ई " पटवायचा प्रयत्न करत होती. शेवटी ढसाढसा रडायला सुरुवात केली...
"प्लीज आई...तु माउ आणलंस तर मोबाईल कडे बघणार पण नाही" असे पण मला इमोशनल करुन झाले.. तिचे रडणे बघुन मला खुपच वाईट वाटतय.. पण माउ पाळणं खरच शक्य नाहिये... आता शाळा सुरु झाली की दिवसभर घर बंद असणार मग कसं आणायचं माउ ?
तिला कसं समजाउ कळत नाहिये... भुभु माउ प्रेमींना प्रश्ण आहे की माउ पाळण्यासाठी काय prerequisite असायला हव्यात ?

परवा वीकेंड ला मी अगदी झोपेतुन उठून ( दुपा रच्या!!) कुत्र्याला फि रवायला नेले अर्धवट झोपेतच होते. हातात फक्त किल्ली व टिशू. नेम का काजल दिसला. हा पूर्ण फिरे परेन्त आमच्याबरोबर राहिला पण माझ्या अगदि खिशात सुद्धा एक बारका ट्रीटचा तुकडा एखादे बिस्किट काहीच नव्हते. बिचारा लिफ्ट परेन्त आला . वर येउन खाउ घेउन परत गेलो तर साहेब गायब.

आज सकाळी दिसला ग्राउंड फ्लोअर ला. त्याला पहिले स्टिक ट्रीट दिली व थोडी पेडिग्री दिली. एक काका फिरत होते वस्सकन अंगावर येतात कि काय असे वाट्ले पण आजकाल मीच जास्त सर्किट दिसत असल्याने कोणी काही म्हणत नाही मला.

काल पासुन मी ट्विट र वर माय डॉग ऑ फ द डे चालू केले आहे. एकेक कुत्र्याचा फोटो टाकतात त्यातील शोधुन त्याला मुकुट जिफ देते व रिट्वीट करते. ओड्या तर काय गॉड आहे इथला. ऑस्कु प्रिन्स

मीच जास्त सर्किट दिसत असल्याने कोणी काही म्हणत नाही मला.>>>>
मामी Happy Happy

काल पासुन मी ट्विट र वर माय डॉग ऑ फ द डे चालू केले आहे. एकेक कुत्र्याचा फोटो टाकतात त्यातील शोधुन त्याला मुकुट जिफ देते व रिट्वीट करते>>>>
म्हणजे काय आपण रेटिंग द्यायचं असतं का?
मी जास्त ऍक्टिव्ह नाहीये ट्विटर वर

मला स्वतःला प्राण्यांची खूप भीती वाटते.. कुत्रे चावून इंजेक्शन घेतल्यामुळे जास्तच. पण इथले सगळे भुभु आणि माऊ बाळे पाहून आणि त्यांच्या विषयी वाचून एकदा तरी सगळ्यांना भेटावे असे वाटायला लागले आहे.. किती गोड आहेत सगळेच!

आवर्जून इथे येऊन त्यांच्या गमतीजमती वाचतेय!

स्मिता, माझ्याकडे 2 मांजरी आहेत, त्या 7 ते 8 तास आरामात एकटया राहतात. त्यांतली एक जी आई आहे ती तर अगदी 24 तास पण एकटी राहू शकते कारण आम्ही सगळे लोक कामा निम्मित बाहेर. पण दुसरी मात्र लॉक डाऊन बेबी (म्हणजे लॉक डाऊन मध्ये झालेली) आहे. तिला आमचा खूप लळा आहे. पण आता परत आम्ही बाहेर जातो तेव्हा राहते छान.

माउ पाळण्यासाठी काय prerequisite असायला हव्यात <<>>>> माऊंना जास्त काही लागत नाही. एक लिटर ट्रे आणि माती. मातीची मोठे पॅक्स मिळतात म्हणून सारखे आणावे लागत नाहीत. काही माऊ टॉयलेटही वापरतात. त्यांना जनरली शिकवायला लागत नाही.
माऊ एकट्या आरामात राहतात. प्रत्येक ठिकाणी दिवसभर कोणी ना कॉणी असेलच असे नाही. जाताना त्यांना खाऊ, ताजे पाणी भरुन ठेवले, खिडक्या वगैरे लाऊन घेतल्या ( वारा , उजेड येईल इतपत उघड्या ठेऊन ), उशीर होणार असेल तर दिवे लाऊन ठेवले तर त्या आरामात राहतात. माझी एक मैत्रीण आठवडाभर बाहेरगावी गेली होती माऊला घरात ठेऊन. तिची मेड रोज २ वेळा येऊन खाऊ, पाणी भरुन आणि लिटर ट्रे साफ करुन जायची. तेवढ्यावरही पुरले. शिवाय माऊ फार मस्ती करत नाहीत , फारतर एखादी वस्तू पाडणे वगैरे. पण त्या दिवसभर मोस्टली झोपतात सो काळजी करु नका.
शक्यतो स्ट्रे माऊ पाळा. त्यांना बिचार्यांना कोणी नसते. नीट वॅक्सीनेशन वगैरे करुन घ्या फक्त.

तुमची स्वतः ची तयारी नसेल तर केवळ मुलीला हवे आहे म्हणून मांजर अजिबात पाळू नका,

सुट्टीत मुलगी मांजराशी खेळायला म्हणून दोन तीन तास घरी आणायची, पण त्या अवधीत खुर्च्यांची रेक्झिन कवर वगैरे ची वाट लागली. Pets ची आवड असून सुध्धा मी फ्रिक out झालो आणि मांजर घरी आणणे बंद केले
घरी pets असल्यावर खुर्च्यांची कव्हर, पडदे, फर्निचर चे खुर यांची वाट लागतेच.
त्यात फिमेल cat असेल तर अक्षरशः वर्षा वर्षाला दोन तीन पिल्ले होतात. ती घर सोडून गेली तर ठीक, नाहीतर घरी प्रजा वाढते.

मांजर थेट घरी पाळण्यापेक्षा , बिल्डिंग मध्ये इतर मुलांनी मिळून खाली पाळू, त्याचा vet Ani खाण्याचा खर्च आपण करू म्हणून पर्याय द्या.

तुमची स्वतः ची तयारी नसेल तर केवळ मुलीला हवे आहे म्हणून मांजर अजिबात पाळू नका>>>
सत्य वचन
मांजर च काय कुठलेच पेट नको
मुले फक्त खेळतात आणि नंतरची सगळी उस्तवार आपल्याला करावी लागते

मांजराचा जरी फारसा व्याप नसला तरी वेळच्या वेळी त्यांचे व्हाक्षिणेशन, औषधे, आजारपण, गृमिंग घरात केस पडणे हे सगळं विचार करून मगच निर्णय घ्या

मुले फक्त खेळतात आणि नंतरची सगळी उस्तवार आपल्याला करावी लागते >>

धन्यवाद... कालचं लेकीचं रडं बघुन वाईट वाटलेलं.. पण तुम्हा सर्वांचे मत वाचुन आता मला पेट झेपणार नाही ही खात्री पटली Happy

मांजर थेट घरी पाळण्यापेक्षा , बिल्डिंग मध्ये इतर मुलांनी मिळून खाली पाळू, त्याचा vet Ani खाण्याचा खर्च आपण करू म्हणून पर्याय द्या. >> हे बेस्ट आहे...सध्या त्या बाळांना खुप पालक झालेत... सोसायटीतली समस्त पोरं तिथेच असतात... भांडणे पण सुरु झाली आहेत आपापसात आता... लवकरच माउ आई आणि बाळं कंटाळुन पळुन जातील असे वाटायला लागलेय मला आता Wink

((सध्या त्या बाळांना खुप पालक झालेत... सोसायटीतली समस्त पोरं तिथेच असतात...))
हे लिहिलं आहेत म्हणून इथे पोस्ट लिहितेय
शाळा सुरू झाली की हे सगळे खेळकरी पालक नाहीसे होतात आणि माऊ बाळे एकटी उपाशी रहातात. हे आमच्या सोसायटी मध्ये झाले आहे. त्याची आई पण कुठेतरी गायब झाली होती.
एक दिवशी ते प्रचंड उपाशी पिल्लू पाहून मी त्याला दूधभात खायला घातला. मला तेव्हा श्वासाचा त्रास असल्याने हो ना करत ते घरी आणलं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळपासून पिल्लू गायब झाल होतं , बहुतेक बोका किंवा कुत्र्याने मारलं असणार ...
इतकं वाईट वाटतं अजूनही त्याबद्दल...
त्यामुळे खाली पाळणार असाल तरी लक्ष ठेवावं लागेल.

मुले फक्त खेळतात आणि नंतरची सगळी उस्तवार आपल्याला करावी लागते >> बरोबर आहे पण तो पर्यंत आपणच ईतके इन्व्हल्व झालेले असतो की मुलांनाच लेफ्ट आउट झाल्यासारख वाटतं ... Happy

Pages