
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
ओहह… शुभेच्छा तुम्हाला ही
ओहह… शुभेच्छा तुम्हाला ही अवघड परिस्थिती हाताळायला.
मी ८-१० दिवस डीजेकडे ऑश्कु
मी ८-१० दिवस डीजेकडे ऑश्कु ला भेटून आले. भयंकर क्यूट बाळ आहे ते. माउईच्या मानाने अगदीच तान्हे पिल्लू. त्याला अजून टेरीटरी कळत नाही की बाहेरच्या माणसावर भुंकायचे समजत नाही. मी पहिल्यांदाच त्याला भेटले तरी धावत माझ्याकडे आला, दोन पायावर नाचून उचलून घे म्हणाला, आणि तोंड चाटुन काढले, पार चाटुन दम लागला त्याला
खेळताना बारीकसा भुंकला तरी स्क्वीकी टॉय सारखा आवाज येतो
बॅकयार्डात सशासारखा सुर्र्र्रर्र पळत सुटतो. बाहेर वॉक ला नेले तर गाड्या, माणसांच्या मागेच धावत सुटतो.

अजून एक मजा म्हणजे बाहेर फिरायला नेले की बिचार्याची जरा पंचाईतच होते . लोकांच्या फ्रन्ट यार्डात, बगिच्यात वास घेत चालतो आणि एकदम शेपूटच घालतो! बहुधा आधी तिथून गेलेल्या भुभूज चे स्ट्राँग "मेसेजेस" असावेत ! त्यामुळे अजून काही त्याला बाहेर शू शी करायला जमलेले नाही! तो कार्यक्रम घरी येऊन
आता आल्यावर माउईला भेटले तर माउई एकदम मोठ्ठा डॉग वाटायला लागला मला!
हहहह कसलं क्युट
हहहह कसलं क्युट
खरंय अगदी फर टॉय च वाटतोय
आमच्या बाळाला फार वाईट वाटलं
आमच्या बाळाला फार वाईट वाटलं मावशी परत घरी जाताना, धमाल केली दहा दिवस !
मैत्रेयी कडून भरपूर टिप्स /ट्रेनिंगही घेतले !
ऑष्या खरच अॅनिमेटेड आवाजात भुंकतो आणि स्टफ टॉयच वाटतो , अफ्टरॉल त्याचा बाप टॉय पुड्ल च आहे
मी पहिल्यांदाच त्याला भेटले
मी पहिल्यांदाच त्याला भेटले तरी धावत माझ्याकडे आला, दोन पायावर नाचून उचलून घे म्हणाला, आणि तोंड चाटुन काढले, पार चाटुन दम लागला त्याला >>> हो बघितला होता व्हिडियो, एकदम प्रेमाची बरसात.
फारच गोंडस आहे दीपांजली.
फारच गोंडस आहे दीपांजली.
आइ ग काय गोड आहे लेकरु.
आइ ग काय गोड आहे लेकरु.
आज्जीच्या आज भिशीच्या
आज्जीच्या आज भिशीच्या मैत्रिणी येणार आहेत घरी


तिने सकाळीच दादूला सांगितले, अजिबात तुझे मित्र घेऊन घरी दंगा नकोय, काय ते बाहेर जाऊन खेळ, तास दोन तास फिरायकच नाही अजिबात
ठिके म्हणाला आणि ओड्याचे काय?
आज्जी म्हणाली - त्याला राहू दे, तो त्रास देत नाही आणि पसारा पण करत नाही, मला आता बोर झालं तुझा मोबाईल दे खेळायला म्हणत नाही आणि आणि सारखा मी आता काय खाऊ विचारत पण नाही
दादू म्हणे मी पहिला नातू आहे लक्षात आहे ना तुझ्या
आशु
आशु
ऑस्कर , एकदम लाडोबा आहे.
ऑस्कर , एकदम लाडोबा आहे. क्यूट.
मैत्रेयी, परत गेल्यावर माऊईने वास घेऊन निषेध नोंदवला की नाही ? कुत्र्यांना कळत ना बहुतेक ओनर दुसऱ्या कुत्र्याकडे जाऊन आला ते?
आशुचॅम्प , दादुला सहानुभती . ओड्याच तर एकदम कानामागून आला आणि तिखट झाला अस झालेय
माऊई आणि ऑस्कर मावसभाऊ झाले
माऊई आणि ऑस्कर मावसभाऊ झाले की मग
जाई, हो हो. माउई मी आल्या
जाई, हो हो. माउई मी आल्या आल्या कुई कुई करत भुंकत धावत आला, पण दोन फुटावर थबकलाच एकदम, मग गोल फिरून वास घेतला जरा वेळ .दुसर्या भुभू चे लाड करून आले हे लक्षात आले असावे बहुतेक.
नंतर झाले मग चाटणे, उड्या मारणे.
लोकांना तुमच्या बाळाची तब्येत
लोकांना तुमच्या बाळाची तब्येत कशी कमी आहे हे सांगण्यात काय आनंद होतो
एकजण भेटले म्हणे तुमचा लॅब इतका बारीक का आहे, खात नाही का नीट?
आता ओड्या तसा व्यवस्थित बाळसं धरून आहे पण बाकी जाडजूड लॅब्स बघायची सवय झालेल्या लोकांना तो बारीक वाटतो
मग मला त्यांना सांगावं लागतं आम्ही व्हेट कडे नेतो रेग्युलर, तो व्यवस्थित मापात आहे आणि लॅब्स असेच असायला हवेत वगैरे
अरे देवा.. माणसांना फिजिकल
अरे देवा.. माणसांना फिजिकल अपिअरन्स वरून फु.स. देतातच लोक, कुत्र्यांना तरी स्पेअर करा भोचकपणातून
आमच्या सोसायटीमध्ये, शेजारी,
आमच्या सोसायटीमध्ये, शेजारी, नातेवाईक यांच्याकडे असलाच आहे पण तो एकदम असा धिप्पाड आहे वगैरे हे त्यांना ठसवायचं असतं
आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडे असतात भुभु ते आजवर कधीही मला असलं काही म्हणाले नाहीयेत
ज्यांच्याकडे नाहीत त्यांनाच जास्त उरका असतो
मी आपला शांतपणे हो का, अरे वा चांगलं आहे की मग
पण इतक्याने त्यांना भागत नाही, तुम्ही एकदा भेटा त्यांना आणि विचारा काय देतात खायला
ते सुरू करा याला
मी मनात म्हणतो ओड्याचे रोजचे खाणे यांना सांगितले तर चक्कर येईल
पण इतकंच म्हणतो हो हो बरं झालं सांगितले ते विचारतो कधी भेटले तर
एकजण भेटले म्हणे तुमचा लॅब
एकजण भेटले म्हणे तुमचा लॅब इतका बारीक का आहे, खात नाही का नीट?
हे संभाषण चालु असताना ऑड्याला निरखा एकदा. १००% ओठ मुडपुन(अगदी बारीक चॅक्क असा आवाज काढत असेल) काहीपण बोलतात लोकं असा भाव आणत असेल चेहर्यावर.
किंवा........................
म्हणजे माझा बाबा मला कमी खावु घालतो ई.ई. ( चेहरा, मान, कान आणी खाली झुकवलेल्या पापण्यांसहीत दुख्खी डोळे..व्हाट्स्प बघत असेल तर) ( कृ. ह. घ्या)
हॅ, असलं काहीही करत नाही तो
हॅ, असलं काहीही करत नाही तो
तो त्याच्याच धुंदीत बागडत असतो मस्त
लोकांचं राहू दे, मी त्याला लेक्चर देत असतो तेही धडपणे ऐकून घेत नाही
मी त्याला सांगत असतो की माझंकाम सुरू असताना, फोन वर बोलत असताना भुंकयाच नाही, मला ऐकू येत नाही वगैरे
तर खुशाल पसरतो आणि तंगड्या वर करून लोळतो
तुझं बोलून झालं की सांग असा अविर्भाव असतो त्याचा
काल एक दिवस पुण्याला जायचे
काल एक दिवस पुण्याला जायचे होते . मग सकाळी स्वीटीस केनेल मध्ये ठेवले. हा फार अवघड क्षण आहे. ते बरोबर येतं बिचारं पण रिक्षातुन उतरले की कळते आज इथे राहायचे आहे. मग नोंदणी करेपरेन्त बघत बसली आणि रडू लागली. हे नको म्हणून आधीच एकदा पुण्याची ट्रीप क्यान्सल केलेली. काल जमले नसते तर मग अवघडच होते. काम उरकून परत आलो मग घराजवळच उतरून आटो करुन तिला घेउन आले. केनेल वाली बाई उगीचच गप्पा मार त बसते. पण आम्हाला एकमेक न भेटायची घाई जबरी. कसे बसे तिला टाळून पैसे देउन भाएर आलो. मग रिक्षा मिळना.
पन नो वरीज. पुनर्भेटीचा आनंद लै भारी. रिक्षावाला पण दयाळू भेटला. घरी आल्यावर सर्व सेटिन्ग फिट झाले प्रत्येक जण आपापल्या जागी मजेत.
आज आत्ता पण लॉबी लेव्हल ला फिरवून आणले बेस्ट. थोडे उन्ह असते पन पब्लिक नाही. नवे वास घ्यायल मिळतात .
ओड्या फिट आहे मग वजनाची काळजी करू नका. मी पण खूप वजन वाढलेले कुत्रे पाहिले आहेत. ते बरोबर नाही. नैसर्गिक रीत्या कुत्रे एकदम फिट असतात. एक पन जास्तीचे फॅट चे वजन नसते.
काल परवा केनेल्स फुल होती. चार दिवसांची सुट्टी असल्याने.
ऑऑ, बिचारी स्विटी! माझेही असे
ऑऑ, बिचारी स्विटी! माझेही असे होते. माउईला व्हेट कडे किंवा ग्रूमर कडे २-३ तासासाठी सोडले तरी कधी एकदा घेऊन येते असे होते.



मुलीला सध्या स्प्रिंग ब्रेक आणि काल फ्रायडेमुळे मलाही वेळ होता तेव्हा केलेला हा उद्योग :
हॅपी ईस्टर
माव्याला फोटोचे काहीतरी एक अट्रॅक्शन आहे. एरव्ही असं हेअरबँड वगैरे घालायचा प्रयत्न केला तर धिंगाणा घातला असता. डोके हलवले असते नाहीतर तो बँड तोंडात घेऊन पळाला असता. पण दिली खरी फोटोला पोज. ते झाल्यावर मात्र मग गेला घेऊन आणि १ मिनिटात त्या हेअरबँड चे दोन तुकडे केले आणि एस्टर एग चा फुटबॉल होऊन ५-१० मिनिटात पिचला देखिल
भारी आलाय फोटो, त्याने हे सगळ
भारी आलाय फोटो, त्याने हे सगळ काही मिनिटासाठी तरी करु दिल म्हणजे कवतिकच करायला पाहिजे.
हहहा कसला गोंडस ससुल्या झालाय
हहहा कसला गोंडस ससुल्या झालाय
चेहऱ्यावर भाव मात्र बिलंदर आहेत
खूप क्युट
मुलीची हौस म्हणून मुलाला
मुलीची हौस म्हणून मुलाला,फ्रॉक घालून त्याचा फोटो काढायचे,त्याची आठवण maui cha फोटो पाहून झाली.
बाकी maui ne फोटोसाठी पोझ छान दिली आहे.
मुलीची हौस म्हणून मुलाला
मुलीची हौस म्हणून मुलाला,फ्रॉक घालून त्याचा फोटो काढायचे>>>
अगदी हेच आलेलं मनात
मुलीची हौस म्हणून मुलाला
मुलीची हौस म्हणून मुलाला,फ्रॉक घालून >>> हाहा तसं नाहीये ते, इकडे बाळांना (आणि पपीज ना) इस्टर बनी सारखे ड्रेस अप करणे कॉमन आहे. इस्टर सेलिब्रेट करत नसले तरी पण
माउवी फार भारी पिझ देतो,
माउवी फार भारी पोझेस देतो, कित्ती सेल्फीज काढल्या होत्या त्याच्या बरोबर

आमच्या बाळाला अज्जिबात आवडत नाही कॅमेराला मुद्दाम पोझ देणे !
हे पहा , ३ महिन्याच्या पाटी बरोबर दिलेल्या निषेध पोझेस
एक से एक आहेत सगळ्याच पोझेस.
मधल्या फोटोची पोझ भारी आहे
मधल्या फोटोची पोझ भारी आहे
ट्रीट कॅमेरा च्या मागे
ट्रीट कॅमेरा च्या मागे ठेवायची मग बघतात बरोबर ते कॅमेरात
>>>>>>>>>ट्रीट कॅमेरा च्या
>>>>>>>>>ट्रीट कॅमेरा च्या मागे ठेवायची मग बघतात बरोबर ते कॅमेरात Happy
अर्रे मस्त आयडिया आहे.
आमच्या लोकल गँग मध्ये आता एक
आमच्या लोकल गँग मध्ये आता एक नवेच आले आहे. हे बीगल सारखे दिसते फार गोड स्वभावाचे आहे व इतर भटक्यांसारखे भांडकुदळ नाही.
बहुतेक घर्चे पेट कोणी तरी सोडुन दिले आहे.
काल मी हपीसला जायला निघाले आटोची वा ट बघत होते तर हा इथे तिथे काहीतरी खायला शोधत होता. थोडी हाडे दिसायला लागली आहेत. कुत्र्यांचे काय होते जर तुम्ही ग्यांगचा भाग नसलात व एकटे पडलात तर अन्न व निवारा पाणी ह्या सर्वांवरच संक्रांत येते. कधी कधी घाबरलेली कुत्री इथे तिथे पळत जाताना दिसतात बघा. मागून गँग पाठलाग करत जाते.
Pages