भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करेक्ट पिटबुल्स नॅनी डॉग्ज होते. प्रेमळ जात आहे/होती पण सिलेक्टिव्ह ब्रीडींग त्यातही डॉग फाईटस करताच्या ब्रीडींगमुळे फार खुनशी जात झालेली आहे . लोक टरकून असतात. पिटबुल्स्नी उगाचच लोकांना फाडल्याच्या कहाण्या टनावारी आहेत.

पिटबुल पेक्षा मला रॉटवायलर जास्त प्रेमळ वाटतात
काही काही तर इतके मायाळू दिसतात ना
जास्त शांत आणि बॅलन्स असे

पिटबुल त्याचा मालक सोडून कोणावरही दात लावू शकतो
हे जे मला चावायला बघणारे होते ते पिल्लू असताना माझ्या पायात घुटमळत रहायचं, अंग घासायचं
एरव्ही ही तसा फार अग्रेसिव्ह नव्हता
म्हणून मी कॉलर धरायचे धाडस केले
आणि गम्मत म्हणजे बॉल घेतला मालकाने काढून आणि
त्याने राग धरला माझ्यावर
नशिबाने मालक जवळच होता आणि त्याने नो म्हणताच जागीच थांबला, तसाच अंगावर चालून आला असता तर माझ्याकडे त्याला थोपवायला काहीही नव्हतं, लचका तर खात्रीने काढला असता

सध्या माहेरी आलेय, तर मुलांना घेऊन हल्ली रोज नदीवर जातो सगळे,काल पण संध्याकाळी असेच गेलो, मुलं मस्ती करत होती पाण्यात,तिथे बाजूला अजून एक ग्रुप होता मोठा,3 कपल 5 6 मिडीयम एज ची मुलं असा,सोबत त्यांचा पेट भुभु पण होता,तो नुसता नदीच्या काठाला यायचा आणि मागे जायचा,ती मुलं त्याला पाण्यात ओढत होती तर हा बिथरून मागे जायचा,मी म्हटलं हा असा का करतोय तर म्हणे हा घाबरतो हो पाण्याला Uhoh
मी म्हटलं ओडिन कसला पोहतो माहितेय तर सगळे माझ्या तोंडाकडे कोण ओडिन Rofl
आता मायबोली पुराण सुरू नको करायला म्हणून अहो कुत्रे खूप छान पोहतात वगैरे वगैरे सारवासारव केली
सांगायचा मुद्दा हा की ओडिनचा पाहण्याचा आणि इतरही बरेच किस्से डोक्यात खूप पक्के बसलेत

शुभ प्रभातः रॉट वायलर अगदी क्लासिक ब्रीड. पण सोसायटी/ अपार्ट मेंत ला सुटेबल नाही. सर्वात पॉवरफुल बाइट ती रॉटवायलरची. ह्याला भरपूर व्यायाम ट्रेनिन्ग व शिस्त्तीची गरज असते. मोठा फार्म फार्म्हाउस असेल तर तिथे ठेवायला आयडिअल.

माझ्या बिल्डिन्ग शेजारी दीप मंदीर थिएटर बंद पडलेले होते. तिथे एक डान्स बार चालायचा . तेव्हा तिथे राहणारे, मुलींवर कंट्रोल ठेव्णारे जे गुंड होते त्यांनी एक रॉटी पाळला होता. त्याचे बिचार्‍याचे नावच हरामी असे ठेवले होते. पण हा गोड्च होता. आम्ही सकाळी वॉकला जायचो. तेव्हा हा बार च्या गॅलरीत बांधलेला असायचा पण आम्च्या कडे प्रेमाने बघत असे. त्याला कधी माणसाचा प्रेमळ स्पर्श झाला असेल का असे मला वाटायचे.

ते डान्स बार कल्चर दारू / मुलींवर टॉर्चर वगैरे कुत्र्यासाठी आजिबात बरोबर कल्चर नाही पण त्याचे मालक दुसरे होते त्यामुळे मी काही मध्ये पडले नाही. जमेल तसे त्याला एखादी ट्रीट बिस्किट पाकीट देत असे प्रेमाने बघत असे. एव्हरी डॉग रिस्पाँड्स टू अ मॉम एंड डॅड. आपण दयाळू उदार प्रेमळ पॅक लीडर बनू शकतो. आपल्याला ही ट्रेनिग्न लागते किंवा अंतरंगात तशी भावना लागते. ते सहजच प्रतिसाद देतात. हे कुत्र्या मांजराचेच नाही सर्व प्राणी जगताचे आहे. टेक दॅट लीप ऑफ फेथ . आतले प्रेमाचे वैश्विक झरे वाहू लागतील.

ह्या इमारतीत एक कुत्री दोन कुत्रे पण राहायचे सर्वच फार टेरिटोरिअल होते. बिल्डिन्ग पाडली व हे सर्व गायब झाले प्री लोक डाउन मग लॉकडाउन मध्ये इथे सात आठ काळे पपीज दिसायचे. दोन लेबर व दोन सिकु रिटी अडकले होते ते ह्याम्ना बघायचे. काळे फिरते ठिपके हळू हळू मोठे झाले आता त्यांची दुसरी पिढी चालू असेल. मजबूत फास्ट पळणे दंगा करणे गरज तितकेच खाणे. दमले की आहे तिथेच पडून झोपणे. मज्जानु लाइफ.

आपण दयाळू उदार प्रेमळ पॅक लीडर बनू शकतो. आपल्याला ही ट्रेनिग्न लागते किंवा अंतरंगात तशी भावना लागते. ते सहजच प्रतिसाद देतात. हे कुत्र्या मांजराचेच नाही सर्व प्राणी जगताचे आहे. टेक दॅट लीप ऑफ फेथ . आतले प्रेमाचे वैश्विक झरे वाहू लागतील.>>>>
वाह, कसलं मस्त लिहिलं आहे हे
खूप आवडले

>>>फक्त हे पब्लिक आइसक्रीम खाताना ताटली कुठे तरी टेकवून ठेवा नाहीतर चाटत चाटत पार फ्रिज खाली जाएपरेन्त चालूच प्रकरण.
Lol हे अनुभवलंय. आमच्या मांजरांकडनं व्हायचं असं. दुधाची ताटली चाटत चाटत पार पुढे ढकलली जात असे कुठेतरी.

ओडीन बाळाला घेऊन आंजर्ले ला आलोय
इथे रिसॉर्ट च्या समोरच समुद्र आहे 10 पावलांवर
त्यामुळे त्याला मोकळा सोडताच जाऊन डुंबून येतोय
आणि फुल्ल सेलिब्रिटी झालाय
इतक्या लोकांनी फोटो काढलेत की तो अमच्यासोबत आलाय का आम्हला तो घेऊन आलाय हेच कळत नाहीये Happy

आंजर्ले ला कोणते रिसॉर्ट ?
भुभुला रूम मधे allow करतात का?
माझा बुकु बाहेर नाही राहणार.
मागे कन्नुर ला पेट allowed आहे म्हणाले आणि एन वेळी रूम नाही , बाहेर चालेल म्हणाले,
नवरा म्हणाला मी पण बाहेरच झोपतो, मग allow केले.

केतकी बीच रिसॉर्ट

हो खोलीत आहे अलौड, मस्त एसी लावून झोपतोय तो
इतकंच काय आम्ही येताना किलोभर चिकन शिजवून आणलं ते त्यांनी फ्रीज मध्ये ठेवलं आहे
त्याच्यासाठी खास भाकरी बनवतात किंवा भात
इथे त्याचा एक डॉबर मॅन आहे त्यामुळे त्यांना सवय आहे
आणि ओड्या बिनधास्तपणे समुद्रात खोलवर जाऊन पोहतो याचे काकूंना इतकं कौतुक वाटतंय
त्यांनाच काय आलेल्या सगळ्यांनाच
बाकीचे भुभु खरेच पोहत नाहीत का? ओड्या जगावेगळा असल्यासारखे वाटतंय
आम्ही तर लीश पण लावत नाही, मस्त इकडे तिकडे हिंडतोय
मांजरे भरपूर आहेत त्यामुळे त्याच्या मागेपळतोय
भुभु ची एक गँग पण आहे, पहिल्याच दिवशी अंगावर आली सगळी, आधीचा ओड्या असता तर पळाला असता
पण आता तो कुणालाच जुमानत नाही
बेधडक चालून गेला

काल काटे काढून सुरमई कुस्करूनदिला तोही जाम आवडला आहे
आज परत मागत होता म्हणलं पोटाला झेपेल एवढंच खा Happy

Thanks a ton Ashuchamp!
फुड बद्दल सान्गितले ते खुप बर झाल,
बुकु ready made food नाहि खात,
Chicken/mutton/Fish+ veges (smtimes rice ) खातो.
फक्त meat पण खातो. पण dry readymade food like royal canine, ND, Pedigree nahich खात.
मागच्या आठवड्यामधे Jerhigh Meat as Meal try केले, त्याला आवडले पण पोट खराब झाले त्याचे.

ओडीन पण नाही खात
आम्ही लहान असताना दिलं तेवढंच
आताही हिमालय चे आणतो पण कधीतरी असेच एखादी वाटी देतो

पण एरवी चिकन भाकरी भात दही ताक आणि गाजर, रताळे, भोपळा शिजवून

आम्ही स्पेअर ला असावं म्हणून श्वान फूड पण आणला आहे
ते सीलपॅक असताना रूम टेम्प्रेचर ला ही टिकते 12 महिने
ते चिकन अंडी हर्ब्स आणि फिश ऑइल मिक्स रेडी फूड असते
तेही जाम आवडतं ओड्याला

इथं रेंज चा खूप इशू आहे
फोटो अल्पोड होत नाहीये
घरी गेल्यावर टाकतो

इतक्या लोकांनी फोटो काढलेत की तो अमच्यासोबत आलाय का आम्हला तो घेऊन आलाय हेच कळत नाहीये Happy
हे बाकी शॉल्लेट.

काल काटे काढून सुरमई कुस्करूनदिला तोही जाम आवडला आहे

ओड्या नालायक आहे बास....(किंवा चटोरा आहे Wink )

अर्रे वा! भारीये ओडिन! मस्त मज्जा करतोय! ते रिसॉर्ट पण छान आहे, डॉग ला आणू तर दिलेच आणि शिवाय फूड ची वगैरे मदत करताय्त म्हणजे टू गूड!

बाकीचे भुभु खरेच पोहत नाहीत का? ओड्या जगावेगळा असल्यासारखे वाटतंय>>>>
लॅब्रेडोर्स निसर्गतः चांगले पोहोणारे असतात.

आमच्या बाळाचे नाव सिंबा आहे. सध्या घरभर बागडणे सुरु आहे आणि पठ्ठयाला मराठी पण समजायला लागले आहे. घरात कुणीही "चला" हा शब्द काढायचा अवकाश हा लगेच उठून उभा राहतो. आता त्याची शाळा (ट्रैनिंग) सुरु होईल पण त्या आधीच सीट, शेक हॅन्ड शिकला.

आधी शेक हँड आणि मग पॉटी ट्रेनिंग ऐकून मजेशीर वाटले Happy सिम्बा चे फोटोज येऊ द्या अजून! ओडिन चे पण ट्रिप चे फोटो बघायचेत.
माउई पण "चला" असा शब्द काढला की जाम एक्साइट होतो Happy

पोचलो घरी
जाता येता सात तास प्रवास होता
पण टच वुड, ओडीन ने एकदाही त्रास नाही दिला
असेही त्याला प्रवासात किंवा त्या आधी अजिबात खायला दिले नाही
फक्त पाणी त्यामुळे ओकी वगैरे नाही

मस्त खिडकीतून बाहेरची मज्जा बघत राहिला पूर्ण वेळ, कंटाळा आला की माझ्या मांडीवर डोकं ठेऊन झोपायचा

फोटो टाकतो थोड्या वेळात

आमच्या ऑष्कु बेबीचे अपडेट्स, साडेचार महिन्याचा झाला !
बाळ दिवसे दिवस जास्तच गोड होत चाल्लय Happy
कॅव्हेलियर आणि पुड्ल मिक्स आहे पण त्याची पर्सनॅलिटी पूर्ण पुड्ल वर गेली आहे, सतत एक्स्ट्रॉ अ‍ॅक्टिव्ह, धावपळ, , शार्प डोकं आणि एक्स्ट्रॉ सोशल , सतत बाहेर जायचं असतं, बाहेर फिरायला गेल्यावर परत यायची इच्छा नसते Proud
परवा जेनेटिक पॅनल टेस्ट केली, त्यामधेही त्याचे पाय पुड्ल सारखे उंच असतील, केस पुड्ल सारखे वेव्ही रहातील असे प्रेडिक्शन आलं आहे.
ऑस्कर आता फुल्ली व्हॅक्सिनीटेड झाल्यामुळे पार्क्स मधे वॉक ला नेतो, इतर कुत्र्यां मधे जितका इंट्रेस्ट तितकाच डॉग ओनर्स मधे असतो , लोकांच्या पाप्या घेऊन दमतो बिचरा Wink
कधीच कोणावर भुंकत नाही, अगदी खूप लांबवर जरी कोणी दिसलं तरी त्याला तो माणुस कधी जवळ येईल आणि याच्याशी खेळेल याची एक्स॑इटमेन्ट सुरु होते, कंट्रोल करावं लागतं कधीकधी इतका त्याला नवीन लोकांना भेटल्यावर आनंद होतो, टु मच सोशल नेचर !
पब्लिक प्लेसेस मधे तर काही विचारुच नका , मॉल मधे गेलो कि अख्या मॉलचं लक्षं वेधून घेतो, सगळे डॉग लव्हर्स येऊन याचे लाड करून जातात आणि हा त्यांचे लाड करतो , काजी पब्लिक तर याच्या बरोबर फोटो काढून घेतात, (त्यात मोस्ट्ली सगळ्या सुंदर बायका , मॉल मधल्या सेल्स गर्ल, फिटिंग रुम लेडिज स्टाफ वगैरे Wink )
मॉर्निंग वॉकला जाताना दिसणारे मेक्सिकन गार्डनर्स, कन्स्ट्रक्शन वर्कर्स हे त्याचे सर्वात फेवरेट, मस्त गॅजेट्स घेऊन येतात, ट्रक आणतात, फॅन्सी टोप्या वगैरे घालतात म्हणून ऑष्कुला ते सर्वात जास्त आवडतात, आमच्या घरी येणारा गार्डनर तर प्रेमातच आहे ऑष्कुच्या !
परवा वॉकला जाताना घडलेला एक स्केअरी किस्सा.. एक अनलिश्ड हस्की कुठून तरी धावत आला आणि आला कि ऑस्करच्या अंगावर, मी पटकन ऑस्करला उचलून घेत्लं, तर हा हस्की माझ्यावर उड्या मारायला लागला, त्याची उंची इतकी होती कि उडी मारल्यावर माझ्या खान्द्या पर्यन्त पोचत होता !
मी खूप घाबरले होते पण ओव्हर रिअ‍ॅक्ट न करता घराच्या दिशेने चालायला लागले , या हस्कीने घरापर्यन्त आमचा पाठलाग गेला , सगळ्या बाजुने माझ्यावर उड्या मारत Uhoh
नंतर माझ्या शेजारणीचं गॅरेज ओपन होतं तिथे शिरला आणि आम्ही घरी आलो, शेजारणीला सांगितलं फोन करून , तिला डॉग फोबिया आहे !
रस्त्यात लोकांना विचारत गेले कोणाचा हस्की आहे, कोणाला माहित नव्हतं, घरी आल्यावर नेबरहुड अ‍ॅप वर टाकली पोस्ट काही रिस्पॉन्स नाही, नंतर कळलं कि हा हस्की २ गल्ल्या सोडून तिसर्‍या गलीत कुठेतरी रहातो आणि नेहेमी एस्केप होतो , नंतर ओनर्स शोधतात किंवा तो आपला आपला घरी जातो, सो होपफुली पोचला तो घरी.. बेजवाबदार ओनर्स !
असो, तर आमची बेबी म्हणून कौतुक करत नाही पण भेटणारा प्रत्येक माणुस म्हणतो कि इतका सोशल/ प्रेमळ डॉगी कधी पाहिलाच नाही Happy , त्याला इमोशनल थेरपी डॉग बनवावा असं वाटतय मला , टेडी बेअर ऑष्कु स्प्रेड्स लव्ह
935682FC-38CF-4796-B668-6475CBD0F6EC.jpeg

खरंच टेडी बिअर आहे
कोण नाही प्रेमात पडणार याच्या? डोळेच इतके मनमिळावू आहेत.
बाकी सगळ्यांचे फोटो येऊदेत पटापट. खूप दिवस झाले बघून.

खूप छान!
ही कुत्रेमंडळी बायकांच्या जास्त प्रेमात असतात का?
आमचा पिंट्या,रस्त्यात स्पेशली झगेवाली पारशी बाई दिसली की भारी माया करायचा.ती बिचारी अक्वर्डून त्याला कुरवळायची.

बायकांच्या प्रेमात असतातच शिवाय बायकांना भुभु बाळां बद्दलअजरा एक्स्ट्रॉ जिव्हाळा असतो, नॅचरल मॅटरनल इन्स्टिंक्ट आय गेस !

Pages