पहिल्लं वहिल्ल्लं काय पण !!

Submitted by गारंबीचा शारूक on 16 May, 2022 - 12:23

माणूस पहिलं पहिलं पण काही विसरत नाही.
जसं कि पैली शाळा, पैल्या टीचर, कॉलेजचा पैला दिवस, पैला क्रश
पैला पिक्चर, पैली डेट, पैला पैला प्यार.
पैली नोकरी, पैला पगार, पैल्या पगारात केलेली मज्जा
पैली बायको, पैलं मूल
पैला सोशल मीडीया, पैला ड्युआयडी, पैला धागा, पैला प्रतिसाद. पैला लाईक.
पैलं गटग, पैला ववि अजून काय काय.

हे जे पहिलं पहिलं असतं ते झोपेतून उठवून विचारलं तरी मी सांगू शकतो. तुमचं असं काही आहे का ? पहिलं वहिलं ?
येऊ द्या मग.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलं असं काय सांगावे ज्यात इतरांना इंटरेस्ट असेल? गर्लफ्रेंड तर नव्हतीच. अंगात हिंमतच नव्हती. एकीला मित्रांनी जबरदस्तीने विचारायला भाग पाडले होते, विचार नाहीतर तू लाईन मारतोस हे सांगू अशी धमकी दिली होती. मी तिला जाऊन सांगितले प्रसन्न वाल्यांची कॉलेज स्टुडंट्स साठी डिस्काउंट स्कीम चालू आहे. नाव देणार का? तिने जे उत्तर दिले तेच मित्रांना सांगितले.
विचारले का? या प्रश्नाला मी बिनधास्त हो म्हणालो.
"काय म्हणाली ती?"
"घरी विचारून सांगते *
आत्ता हे लिहिताना सुद्धा गुलाबी गुलाबी वातावरण झाले आहे. मनात लाटा उसळताहेत. अगदी तसेच वाटते आहे. फक्त टर टर आवाज मिसिंग आहे.

पैला नशा पैला कुमार Lol (हे माहित असेल बहुतेकांना)
पैलापैला प्यार है पैलीपैली बार है
देखा है पैली बार साजनकी ...
तु पैलापैला प्यार है मेरा

महाबळेश्वर ला शाळेची ट्रिप गेली होती तेव्हा आमचा को एड शाळेचा एकदम प्रिमिअम वर्ग. तर एका वर्ग भाउने( भाउच राहिला) मार्झोरिन मधून चिकन सेंडविचेस आणले होते तर त्यातील एक मला मिळाले. ते जीवनातील पहिले चिकन सँडविच व नॉनव्हेज. १९८० ची गोश्ट आहे.

पहिला पिक्चर हाथी मेरे साथी. त्यात राजोस खन्नाला बघून प्रेमात पडायला झालं व ट्रक डायवर लोकांवर पण प्रेम बसले ते अजूनही आहे. पूर्वी पुण्यात कुठून तरी नुसतीच ट्रकची चॅसिस घेउन एकदम दहा बारा डायवर यायचे. डोक्याला घट्ट बांधलेला रंगीत रुमाल, काळा गॉगल
कंव स्टैल असा एकदा ट्रक भिंगवायचा आहे. ( बकेट लिस्ट आयटेम)

आता उलटी गिनती चालू झाल्या ने आपण करून घेतलेले हे शेवटचे चश्मे, घेतलेला बेड शेवटचा व मॅट्रेस पण शेवटची च. हीच लिस्ट मोठी झाली आहे. परवा हैद्राबादेत मिंग्ज कोर्ट मध्ये अमेरिकन चॉप सुई खाल्ली ती तिथली शेवटची.

कॉलेजमध्ये असताना पहिली ट्रीप मुलं -मुली मिळून केलेली लोणावळ्याला . तो पर्यन्त फक्त मुली , किन्वा को-एड शाळेत असताना शिक्षक सोबत असायचे . घरी आई-बाबांना ट्रीप ला जाउ का विचारताना पण ईतक टेन्शन आलेलं . पण त्यानी नीट विचारपूस करून परवानगी दिलेली.

नोकरीला लागल्यावर पहिल्या पगारातून बहिणीसाठी सँडल्स घेतले होते. - त्यावेळी पगार २५०० आणि ६०० रूपयाचे सँडल्स . ईतक भारी वाटलं होतं ना . एकदम मोठी बहिण असल्याच फिलीन्ग . एका दूकानात चौकशी करताना , एक शूज तिला खूप आवडलेले . पण तिथल्या माणसाने - हे खूप महाग आहेत असं सांगत आम्हाला दाखवायलाही नकार दिला आणि किमंत ही नाही सांगितली धड . आम्ही रागाने तिथून बाहेर पडलो . आजतागायत त्या दूकानात परत गेलो नाही .
स्वतःच्या पगारातून त्यावेळी ९० रू ची लॅकमेची लिपस्टीक खरेदी केली होती . पहीली महागातली ब्रॅण्डेड खरेदी .

पण तिथल्या माणसाने - हे खूप महाग आहेत असं सांगत आम्हाला दाखवायलाही नकार दिला आणि किमंत ही नाही सांगितली धड.
>>>>

हा अनुभव नुकतेच कमवायला लागल्यावर मलाही आलेला. माणसांची किंमत अंगावरच्या कपड्यांवरून. पण असा अनुभव दुकानात येतो, मॉलमध्ये मात्र तुम्ही फाटकी मळलेली जीन्स घालून गेलात तरी ते आदरानेच तुम्हाला महागडे कपडे दाखवतात.

पहील्या नोकरीत वट्ट ६००० रुपये मिळत. काय मस्त वाटे. खरच आलम दुनियेचा राजा असल्यासारखे.
>>>>
मस्तंय, आणि आम्ही राजा असूनही फकीरासारखे होतो. पहिला पगार साडेदहा हजार हातात होता. पण बॉन्डमुळे पहिले तीन महिने ६ हजार कट होणार असल्याने पहिला पगार हातात साडेचार हजार आला.
त्या पगारात गुणी श्रावणबाळासारखे सर्वात पहिले आईला साडी घेणार होतो. आणि दुसर्‍या पगारात स्वतःला मोबाईल.
पण वेस्टर्न रेल्वेचे सिरीअल बॉम्बब्लास्ट झाले त्यात अडकलो, नशीबाने बालंबाल बचावलो, तरी घरी रात्री दिड वाजता पोहोचलो, तोपर्यंत मी जिवंत आहे की मेलो याचीही घरच्यांना खबर नव्हती. तो अनुभव घेतल्यानंतर आईने पहिल्या पगारात मलाच मोबाईल घ्यायला लावला.

माझा पगार म्हणजे मला मिळालेली पहीली फेरी 2007 साली टेम्पो घेतला होता दादंनी 1500 होती
आता तीन टेम्पोची कंपनी आहे छोटीशी पण
घरचे समाधानी नाहित.
कारण बाप मास्तर होताना!

NEILSAGAR Happy
स्वत:चा व्यवसाय करायला जास्त धैर्य आणि डोके लागते... जे करतात त्यांनाच हे समजते

मला एखादा व्यवसाय सुचवा >> तुमचा स्किलसेट, किती भांडवल गुंतवणार त्याच्यावर अवलंबून आहे.

सगळ्या धाग्यांवर मुशाफिरी झाली. उलटे पालटे करून एक एक नवीन प्रतिसाद पाहून झाले. आता काही टाईमपास होईना. चित्रपटाच्या धाग्यावर तरी काय करणार ? एकही चित्रपट पहायला वेळ नाही. या धाग्यावर प्रतिसाद द्या आणि लाखोंची बक्षीसं जिंका असा धागा यावा असे नेहमी वाटते. पण तसे कुणी करत नाही. अमूक तमूक ओळखा धोतर जिंका अशीही स्कीम पाहण्यात नाही. महिलांना अर्थातच शालू / पैठणी.

तर मग इथेच कुणीतरी पहिला वेगळा प्रतिसाद द्या. पहिल्यांदाच धागा भरकटावा असे मनापासून वाटतेय.

पहिला श्वास.
सरकारी दवाखान्यात जन्म झाला.
बाजूच्या पार्टीशन मधले बाळ दोन दिवस आधीच जन्माला आलं होतं. त्याची आजी तपकीर ओढायची. आणि ओढून झाली की हात वर करून चुटकी मारून बोटातील तपकीर झ्टकायची. माझा जन्म होऊन मी पहिला श्वास घेत असताना आणि तिने चुटकी वाजवून त्या तपकिरीचे कण माझ्या नाकात जायला एकच गाठ पडली आणि मला एवढ्या वाईट सटासट शिंका आल्या की सगळा दवाखाना दचकला. झालं मग लगेच भांडण सुरू आमच्या कडच्या अन त्यांच्या कडच्या लोकांचं.
जन्माला आलो पहिला श्वास घेत नाही तर त्या शिंका आन ते कडाक्याचं भांडण विसरणं शक्यच नाही. म्हणूनच मी भांडखोर झालो.