चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृणाल - अंकुश चौधरी चे चित्रपट स्किप मारण्यातच भलाई असते...
>>>>
हो, मराठीतली काही मंडळी अजूनही नव्वदीच्या दशकातलेच चित्रपट काढण्यातच धन्यता मानतात.
अंकुश आवडतो, पण असले चित्रपट नाही आता झेपत

काल प्राईमवर ग्रे >>> हो बरे झाले अर्धा सोडला. आमच्या घरच्यांनी हा पुर्ण पाहिला. मी काम करत तिथेच बसलो असल्याने माझ्याही कानाडोळ्यांवर पडला. हा सुद्धा शून्य नावीन्य आणि तितकीच कल्पकता असलेला चित्रपट होता. घरचे मात्र आपण मराठी चित्रपट टीव्हीवर बघून मराठी चित्रपटसृष्टी जगवतोय, मातृभाषेचे ऋण फेडतोय अश्या आवेशात बघतात.

द कॅबिन इन द वुड्स

हॉरर कॉमेडी सिनेमे अगदी क्वचितच प्रभावी पणे भीतीदायक होतात, त्यांचा कल मुख्यत्वे लोकांना हसवण्यावर जातो. इथे अतिशय सुरेखपणे समतोल साधला आहे, आणि सिनेमा अधेमध्ये विनोद पेरतसुद्धा आपला भयपटाचा ठेका आजिबात सोडत नाही. इतक्या प्रभावी हॉरर-कॉमेडीचं आणखी एकच उदाहरण सुचते आहे- भूलभुलैय्या.

हा सिनेमा म्हणजे भयपट चाहत्यांसाठी प्रेमाने बनवलेली भेट आहे. कथा अश्या प्रकारे लिहीली आहे की बऱ्याच भयपट संकल्पना ह्या सिनेमांत एकवटल्या आहेत.

पाच तरुण मुलामुलींचा ग्रुप पिकनिक म्हणून जंगलातल्या एका घरी गेले असतात. तिथे विचित्र घटना घडू लागतात. यापुढे काहीही लिहिणे स्पॉयलर होईल.

भीतीदायक/मजेशीर सिनेमा.

काल एकटीनेच थिएटरला जाऊन The Unbearable Weight of Massive Talent बघितला.. फुल्टू धमाल मूव्ही आहे.. ग्रूपमधे जाऊन बघण्यासारखा.. निकोलसच्या फॅन्सने जरूर बघावा

झुंड आज उत्तरार्ध पाहिला. छान आहे दुसरा भाग. फार आवडला
गाणीही पिक्चरमध्ये सगळीच छान वाटली. त्या डॉन भावनाभाभी हिरोहिरोईनची जोडी बघून स्लमडॉग मिलेनिरची आठवण येत होती.

Ferdinand pahila... Cartoon movie ahe... Mast ahe... Lahan mulana nakki avdel. Ek premal manachaya bail urf valu chi gosht ahe. Bullfighting chya game madhe jabardasti dhakalala gelela, pan shevati ranch var bhetlelya aplya saglya bail mitranna ani bakri maitrini la tithun baher kadhto. Cruel game ahe ha.. Deadly for bulls.

रनवे34 पहिला.चांगला आहे.अमिताभ चे उच्चार मध्ये मध्ये कळत नाहीत.
अजय देवगण बेस्ट.त्या पत्रकाराला थोडं जास्त काम मिळेल असं वाटलं होतं.

1917
पहिल्या महायुद्धातील युद्धकथा आहे. दोन ब्रिटिश जवानांना, लान्स कार्पोरल स्कोफील्ड आणि ला. का. ब्लेक यांना एक जवळपास अशक्य अशी कारगिरी करायची आहे. शत्रू मुलखातून एका रात्रीत जाऊन सैन्याच्या दुसर्‍या तुकडीला वेळेत एक निरोप पोहोचवायचा आहे, ज्याने १६०० जवानांचे प्राण वाचू शकतील. त्या दुसर्‍या तुकडीत ब्लेकचा मोठा भाऊ सुद्धा आहे त्यामुळे सैन्याच्या ऑर्डर बरोबर एक वैयक्तिक पदरपण आहे.
अनेक श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग, युद्धाचे, ते घडून गेल्यानंतरचे रॉ व्हिज्युअल्स... पण त्या रॉ नेसचं जराही भांडवल न केलेले असे. अजिबात रोमँटसाईझ न करता युद्ध कसं असेल ते बघुन अनेक व्हिज्युअल्स डोक्यातुन कधीच पुसली जाणार नाहीत अशी आहेत. लहान लहान प्रसंग, शत्रू-माणुसकी यात सीमारेषा असावी नसावी... विचारांचा भुंगा डोक्यात सोडून पुढे जातात.
स्क्रीनप्ले आणि चित्रण फार आवडलं. एकून चित्रपटच आवडला.
जॉर्ज मॅकीने स्कोफील्डचं काम फार सुंदर केलं आहे. डीन-चार्ल्स चॅपमनचा ब्लेकही छान. शेवटी कंबरबॅच आणि रॉब स्टार्कही बारक्या रोल मध्ये आहेत.

१९१७ मस्त आहे. वन टेक आहे असे वाटावे असे केले आहे. (नंतर समजले की खरोखर वन टेक नाही. पण पाहताना इतका भव्य सिनेमा वन टेक मध्ये कसा घेतला असेल म्हणून मी दिपून गेलेलो.)

वन टेकचे नंतर वाचले. बघताना स्टोरीत गुंतुन गेलो होतो, त्यामुळे ते लक्षात आले नाही. श्वास रोखून धरायचं क्रेडिट त्याला ही असेल असं आता वाटतं.

मग वाचताना समजलं की लेखक/ दिग्दर्शकालाही प्रेक्षकांनी स्टोरीत गुंतायला हवे होते, त्यामुळे वन-टेक वाटावे असे लांबच लांब शॉट्स टाकले असूनही त्यांनी त्याची जराही पब्लिसिटी केली न्हवती. जेणे करुन प्रेक्षकांचा त्यावर फोकस जाऊ नये. म्हणून वर लिहिलं न्हवतं. तर ते डोक्यात ठेवू नका. Happy

त्याची सुरुवातच जबरदस्त आहे
निवांत मोकळं हिरवे कुरण, शांतता, असं एकदम हेवनली
आणि मग निरोप येतो आणि दोघेजण चालत निघतात
हळूहळू सैनिक दिसू लागतात,अगदी तुरळक
मग थोडे जास्त,मग खंदक खाली उतरत जातो आणि एकदम धाडकन आपण युद्धभूमीवर येतो
हे जे ट्रेसफॉर्मेशन दाखवलं आहे ते निव्वळ जबरदस्त
आणि यात ते अगदी सहज गप्पा मारत निघालेत

हा जो सहज गप्पा मारण्याचा, सैनिक युद्ध चालू व्हायची वाट बघत बिड्या फुकत/ झोपा काढत बसलेत/ प्रवास करताना त्रासलेले आहेत/ कामचुकारपणा करणारे आहेत हा जो भाग सहज दाखवला आहे तसाच होत असेल. ते पण किती ग्रेसफुली दाखवलं आहे.
आपल्याकडे सैनिक म्हटलं की बेटकुळ्या दाखवत हौईज द जोश करुन बोंबलतात किंवा संदेसे आते है करत आसू गाळतात. डिटरमिनेशन असलं तरी त्याचं २४ तास ठिबकसिंचन झालंच पाहिजे प्रकार असतो आपल्याकडे. अर्थात बाकी काही दाखवलं तर सैनिकांच्या कदाचित नाही तरी आम पब्लिकच्या भावना दुखावतीलच.

हा जो सहज गप्पा मारण्याचा, सैनिक युद्ध चालू व्हायची वाट बघत बिड्या फुकत/ झोपा काढत बसलेत/ प्रवास करताना त्रासलेले आहेत/ कामचुकारपणा करणारे आहेत हा जो भाग सहज दाखवला आहे तसाच होत असेल. ते पण किती ग्रेसफुली दाखवलं आहे.
>>> येस्स! खूप आवडला होता हा सिनेमा.

डिटरमिनेशन असलं तरी त्याचं २४ तास ठिबकसिंचन झालंच पाहिजे प्रकार असतो आपल्याकडे >>> Lol

सैन्य आणि आई हे दोन्ही "होली काउ" आहेत आपल्याकडे पिक्चर्स मधे. त्यांना कधीही ब्लॅक्/ग्रे शेडस मधे दाखवत नाहीत. "बेटा" सारखे, "शौर्य" सारखे एखाददुसरे अपवाद. त्यामानाने अमेरिकन पिक्चर्स मधे बिनधास्त दाखवतात. तेथे राष्ट्रविरोधी वगैरे कोणाला वाटत नाही.

मात्र त्यावरून "बघा अमेरिका काय काड्या करते" असे मग काहीजण म्हणू लागतात. इतर हुकुमशाही राष्ट्रे जणू मानवतेचे पाइक असल्यासारखे. तेथे कोणी असले पिक्चर काढत नाही Happy

मग वाचताना समजलं की लेखक/ दिग्दर्शकालाही प्रेक्षकांनी स्टोरीत गुंतायला हवे होते, त्यामुळे वन-टेक वाटावे असे लांबच लांब शॉट्स टाकले असूनही त्यांनी त्याची जराही पब्लिसिटी केली न्हवती. जेणे करुन प्रेक्षकांचा त्यावर फोकस जाऊ नये. म्हणून वर लिहिलं न्हवतं. तर ते डोक्यात ठेवू नका. >> मला आठवतय त्याप्रमाणे गिंबल टाईप्स काही तरी वापरलेले शूटींग साठी.

तो विमानाचा सिन
आणि रात्रीच्या अंधारात पडक्या इमारती मधून धावत जातानाचा सिन

अक्षरशः अंगावर काटा येतो

संवाद पण भारी आहेत
यांचे उंदीर आपल्या उंदरांपेक्षा जाडे आहेत Happy

सैन्य आणि आई हे दोन्ही "होली काउ" आहेत आपल्याकडे पिक्चर्स मधे. त्यांना कधीही ब्लॅक्/ग्रे शेडस मधे दाखवत नाहीत. >>>

आपल्याकडे सैनिक म्हटलं की बेटकुळ्या दाखवत हौईज द जोश करुन बोंबलतात किंवा संदेसे आते है करत आसू गाळतात. >>>

अगदी अगदी, मी मागे युद्धपट विषयावर धागा काढला होता त्यात तेच म्हणलं आपल्याकडे भावनेने ओथंबून वाहणारे चित्रपट निघतात, त्याला युद्धपट म्हणणे जीवावर येते

स्टालिनग्राड सिनेमात पहिल्यांदाच युद्धभूमीवर आलेल्या जर्मन सैनिकाला अचानक झालेल्या गोळीबाराचा धसका बसून कपड्यातच संडास होते
किंवा हातघाईची मारामारी सुरू असताना चुकीने आपलेच सैनिक मारले जातात तेव्हाची भावना

हे सगळं अगदी तटस्थपणे दाखवतात ते, आपल्याकडे असं काही होईल याची शक्यताच नाही
झालं तर दिग्दर्शक देशद्रोही ठरवलं जाईल

Pages