भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण सध्या अ‍ॅनिमल कम्युनिकेशन शिकते आहे. प्रॅक्टिस म्हणून २०-२५ भूभू आणि माऊंशी संवाद झाले आहेत Happy
मजा वाटते त्यांच्याशी बोलायला. खूप मस्त वाटतं

अक्षया कवळे, माझा experience चांगला नव्हता, माझा lab cancer मुळे आजारी होता तेव्हा त्याला शेवतचा निरोप देताना त्याला काय वाटतंय, त्याला माहिती पडलंय का की हा serious आजार आहे, आम्ही helpless आहोत त्याला वाचवायला हे सर्व त्याला communicate karav असे वाटत होते म्हणून तिच्याशी कॉन्टॅक्ट केला, मैल का response आला की date fix karun online communicate करूया. (COVID period होता) नंतर date fix करण्यासाठी परत मैल केला तर 4 दिवस काहीच reply नाही, परत reminder mail केला तर respond करून date time final केलं but tya नंतर काहीच नाही, दिलेला वेळ असाच गेला, नो reply आणि दुसऱ्या दिवशी माझा lab गेला. मनातले मनातच राहिले, त्याच्यापण आणि आमच्यापण. खूप वाईट वाटले, highly unprofessional behaviour vaatle मला.

अनुदी>>>दुसऱ्या दिवशी माझा lab गेला. मनातले मनातच राहिले, त्याच्यापण आणि आमच्यापण.<<<
याबाबत एक सांगायचे आहे. माबो वरची कविन प्राण्यांशी संवाद साधते. काही मैत्रिणींना खूप चांगला अनुभव आहे. या संदर्भात एका मै चा अनुभव आवर्जून सांगावा वाटला.
तिचा भूभू आजारी होता अन त्याचे आजारपण बरे होणारे नव्हते. त्याला त्रास कमी व्हा या दृष्टीने व्हेट आणि घरच्यांनी शेवटचा निर्णय घेतला. अन भूभू शांत झाला. पण मै च्या मनात हूरहूर राहिलेली. अगदी तुमची आहे तशीच. तिच्या दिवंगत भू भू शी कविने संवाद केला. अन या सगळ्याबद्दल भूभूला काहीही वाईट वाटत नाहीये हे सांगितले. त्या मै ला फार दिलासा मिळाला.
मी स्वत: हे सगळे लिहितेय याचे मलाच आश्चर्य वाटतेय. कारण मृत्यू नंतर काही नाही या मताची मी आहे. पण कविन अन ती दुसरी मै यांना फार जवळून ओळखते. त्या दोघींवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे अनुभव वेगळच सांगतात.
तुम्हाला हवं तर कविनशी जरूर संपर्क साधा. ही जाहिरात नाही. केवळ तुमची हूरहूर पोहोचली म्हणून सांगितले.
बाकी वाचकांना - यावरून हे कसं खरं/ खोटं यावर वाद होऊ नयेत. पटलं तर घ्या, न पटलं तर सोडून द्या. जगात आपल्याला न पटणाऱ्या असंख्य गोष्टी असतीत. अन इतरांना त्या पटत असतात. सो अॅग्री टू डिफर हे आधीच मान्य करते.

I still cry for my weanie dog and know she is waiting for me at the rainbow bridge.

अरे वा क्यु ट पपी. जर्मन शेपर्ड ना. काय नाव आहे?

काल संध्याकाळी एक मजा झाली. पेट पुराण अजून डोक्यात होतं. हपिसातून येताना एक किटी दिसली. बारीक व उपाशी टाइप दिसल्याने. लगेच तिला उचलून घरी आणले ती विरोध करत होती. पन बकू व्यंकू डोक्यात होतं पण घरात कुत्र्याला बघून ती इतकी फिस्कारली. खाली ठेवल्या ठेवल्या धूम पसार. तिच्यामागे आमचे कुत्रे बिना लीशचे त्यात माझी भरलेली बॅग आमच्य कुत्र्याच्या पाण्यात पडली जनरल गोंधळ. माझा प्लान तिला थोडी पेडिग्री देणे व एका वाटीत फ्रिजातले दूध काढून देणे इतकीच होती.

शेजारी नेहमी कॅट ला बघतात मदत म्हणून तिथे बेल मारली की हिला दोन मिनिट बघा तर तिथे कुलूप. मग मुकाट कुत्र्याला फिरवून आणले. व बघितले तर हे किटू दाराशी बसलेले. मग कुत्र्याला आत ढकलू न कुलूप घातले व लिफ्ट मधून त्या पिल्लाला ग्राउंड फ्लोअर ला सोडले. नाहीअर ते बिल्डिन्ग मध्येच हरवले असते.

बकू व्यंकू फँटसी रिजेक्टेड. पण ते मस्त फिस्कारत होते कुत्र्यला बघून.

आज अपडेट. मागे माळावर तीन आता मोठे झालेले पपी दोन सोनेरी मुलगे व एक बिस्किटी मुलगी व एक मोठ्ठा काळा बाप्या कुत्रे होते. ते दहा दिवस गायब होते. पण आज सकाळी दिसले.

नेहमी औषध लावुन घेणारे कुत्रे नेमाने येते. व अगदी कान सुद्धा साफ करून घेते. घरातली कुत्रे नखरे करतात त्या मानाने.

अनुदी : )
विपु मधे तिच्या सदस्यत्वाची लिंक दिली आहे ती बघा. म्हणजे तिला विपु करू शकाल

हरितात्या - मस्त गोंडस बाळ आहे हे
नाव काय ठेवलं आहे?

मी इंस्टावर ऑस्कर चे व्हीडिओ बघत असतो अक्षरशः टेडी दिसतो तो
बाकी टोईज मध्ये झोपला तर ओळखता येणार नाही
आणि जाम मिश्कील भाव असतात Happy

ओडीन चा पोहण्याचा किस्सा

त्याला कॅनाल ला नेलं होतं तेव्हा नेहमीप्रमाणे त्याचं धडाम करून पाण्यात उडी मारून पोहणे सुरू होतं
तिथे फिरायला एक जण पिटबुल ला घेऊन आलेला, तोही कौतुकाने बघत होता, मग विचारले की कसे शिकवले, आमचा प्रिन्स अजिबात उतरत नाही पाण्यात.
मग त्यांना ते ब्लाँको ला बांधून ओड्याला कसा सोडला पाण्यात त्याची गोष्ट सांगितली, तर म्हणाले मग आता या दोघांना बांधला तर जमेल का?
मी पहिला तो पिटबुल, एक वर्षाचा होता पण चांगला भरलेला होता, मसल्स वगैरे अगदी
म्हणलं बघू ट्राय करून, पण आम्ही ओडीन पिल्लू असताना केलं होतं, हे ग्रोन अप आहेत दोन्ही डॉग्ज. तरी करून बघू प्रयोग म्हणून एकाच लीश ने दोघांना बांधले आणि मी बाटली पाण्यात टाकली.
ओड्या पाण्यात उडी मारायला लागला तर पिटबुल घाबरून त्याला मागे ओढायला लागला. दोघांची चांगलीच रस्सीखेच सुरू झाली. तोवर बाटली वाहून चालली म्हणल्यावर ओड्या इतका अस्वस्थ झाला की त्याने दणकून जोर लावला आणि अक्षरशः त्या दांडग्या पिटबुल ला दरदरा खेचत पाण्यात घेऊन गेला आणि वर फुल्ल स्पीड ने पोहत जाऊन बाटली घेऊन आला. तोवर मागे प्रिन्स साहेब पाय मारत कसेतरी पाण्याच्या वरती राहायला बघत होते. कमाल म्हणजे दोघांचे वजन घेऊन कॅनॉल च्या वाहत्या पाण्यात ओडीन आरामात पोहला.
तेव्हाच मला जाणवलं की जरी दिसत नसली तरी आमच्या बाळाच्या अंगात चांगलीच ताकद आहे. पिटबुल ला जमिनीवरून खेचत नेऊन, परत पाण्यात ओढत नेऊन आणणे सोप्पे नव्हते.
बाहेर आले तर परत रस्सीखेच, पण मी मग ओडीन ला मोकळा केला, म्हणलं ओढाताण करताना गळ्याला जखम होईल उगाच
झालं तेवढं बास

घरी येऊन ओडीन चा पराक्रम सांगितलं तर आई म्हणाली सारख चिकन हादडतो म्हणून बोलता ना त्याला, आता कळलं ना चिकन कसं अंगी लागलं आहे ते Happy

एकूणच ओडीन आजीचा खूप लाडका आहे>>>
खूपच, त्याचे सगळं खाणेपिणे बरोबर मापात बसवून दिलं आहे
अंडी किती, चिकन किती, बटाटा रताळे गाजर आणि बीट, भोपळा किती, दहिभात किती

पूर्वी तिला चिकन चा वास पण सहन होत नसे, ढवळून यायचं तिला, व्हेज नॉनव्हेज हॉटेल पण नको म्हणायची, प्युअर व्हेज पाहिजे
आता म्हणजे सर्रास घरात किलो किलो चिकन शिजत, फ्रीज मध्ये डबे भरलेलं असतात, फ्रिजर मध्ये फ्रोजन चिकन
आणि त्यातले काढून ती भाकरीसोबत कुस्करून देते
त्या साठी खरेच खूप मानलं पाहिजे
इतकं transformation अफाट आहे
ओडीन साठी हे अन्न आहे हे जाणून घेऊन तिने चिकन बद्दलची सगळी शिसारी मिटवून टाकली. या वयात हे सोप्पे नाही.

आजींचे खरंच फार कौतुक! पण पेट्स चे प्रेम च पार आमुलाग्र बदलवू शकते याचा अनुभव आहे नक्कीच Happy ओडिन चा पोहोण्यचा किस्सा भारीच! त्या पिट बुल वर फायनली काय परिणाम झाला? वर आला तेव्हा घाबरला होता का? बिच्चारा!
ताकद जबरदस्त असते या भुभूज च्या अंगात. आपल्याला पण नेऊ शकतात दरादरा ओढत.
अमांचा बकू व्यंकू किस्सा फार फनी, डोळ्यासमोर आला प्रसंग Lol

आशुचँप, खूपच कौतुक आहे. अजिबात सोप्पं नाही. आधी त्याला अ‍ॅक्सेप्ट करायचं आणि मग नॉनव्हेज.

वर आला तेव्हा घाबरला होता का? बिच्चारा>>>
हो खूपच, पळत पळत लांब जाऊन उभा राहिला
त्याला वाटलं आता परत पाण्यात ढकलले जाईल आपल्याला

आता इतक्या उशिरा त्याची पाण्याची भीती घालवणे अवघड आहे
पिल्लू असतानाच प्रयत्न करायला पाहिजे होते

इंस्टावर तर कितीतरी भुभुच्या व्हीडिओ मध्ये त्यांना एकूणच अंघोळीची आणि पाण्याची भीती वाटते असं पाहिलं आहे
त्यामुळे जर आपल्या भुभुला असेल भीती तर उगाच अट्टाहास करू नये

फारच, मी एकदा थोड्याकत वाचलोय
कॅनाल ला पूर्वी एक यायचा, तसा मवाळ होता पण त्याची गुरगुर पोटात खड्डा पडणारी असायची
आणि आम्ही जस्ट बॉल फेच खेळत होतो, तो पिटबुल बॉल घेऊन आला आणि त्याचा मालक तोंडातून बॉल काढत होता, तोवर मी त्याची कॉलर धरली होती, बॉल तोंडातून काढताच तो गुरगृला आणि मला जाणवलं की त्याची कॉलर धरून आपण चुकलो आणि मी कॉलर सोडायला आणि झपकन वळून त्याने मला चावायला एकच गाठ पडली
अक्षरशः एक सेंटीमीटर ने माझा हात वाचला
तेव्हापासून कितीही मवाळ वाटला तरी पिटबुल ला हात लावायला जायचं नाही याची खूणगाठ बांधली

१०० वर्शांपूर्वी पिट बुल अमेरिकेत बेबी सिटिन्ग साठी पण वापरले जात. काय बिशाद बाळाच्या टोपली पाशी कोनी येइल पन.
आमच्या कडे अंघोळीचा एकदम तिटकारा. पाणी स्पर्शच नको अशी परिस्थिती आहे.
परवा साधे कुत्रा स्पेशल आइसक्रीम घरीच बनवलेले: दोन कप दूध दोन चमचे दूध पाव्डर, दोन छोटे चमचे साखर. पाव कप क्रीम दोन थेंब व्हॅनिला नॅचरल एक्स्ट्रॅ क्ट. सकाळी हे सर्व मिक्सर मध्ये घुसळून बोल मध्ये डिप फ्रीज मध्ये ठेवले. रात्री दोघिंच्यात फस्त. फक्त हे पब्लिक आइसक्रीम खाताना ताटली कुठे तरी टेकवून ठेवा नाहीतर चाटत चाटत पार फ्रिज खाली जाएपरेन्त चालूच प्रकरण.

Pages