भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरच्या कुत्र्यां ना ह्याची सवय नसते व मागे पडत जातात उपासमारीने मरू शकतात. तर त्याला बघून मला पोटात तुटायला लागलेच होते. बॅगेत शोधले तर एक दोन च्यु स्टिक ट्रीट सापडल्या त्या त्याला दिल्या त्याने अगदी एलिगंट मॅनर मध्ये त्या घेतल्या. अजून खरे तर भूक होती त्याला.
मग कामावरून आल्यावर बॅग भरून खाली गेले. त्याला व अजून एका त्यातल्या त्यात गरीब कुत्री एक आहे तिला खाउ घातले व पाण्याचे भांडे ठेवले. त्यात आमच्या कुत्र्याचा मस्त वॉक झाला.

ह्या सोडून दिलेल्या कुत्र्याच्या डोळ्या भोवती काजळ रेखल्या सारख्या रेषा आहेत . म्हणून त्याचे तात्पुरते नाव काजल. आज पिशवीतून खाउ नेला तर महाशय दिसले नाहीत. आता परत जाताना बघू . ह्या ला मा ण्सांची सवय आहे. व स्किन अगदी शांपूने धुतल्यावर होते तशी स्वच्छ व
हाताला मौ लागते. का बरे सोडले असावे.

आज जमले तर फोटो काढेन.

अश्विनीमावशी, काजलचे वाचुन पोटात तुटले. खुप चांगले काम केलेत तुम्ही. पुर्ण जबाबदारीची जाणीव, तयारी नसताना निव्वळ हौस म्हणुन पेट्स आणुन मग असे सोडुन दिले जातात हौस फिटली की. वाईट वाटते.

ओह काजल चे आता वाचले
अश्विनीजी तुम्ही खूप छान काम करत आहात
मनापासून सॅल्युट

या बाळाचे काय झालं पुढे? कोणी करत आहेका आडोप्त
नैतर मुंबईत एकजण आहे त्या रेस्क्यू चे काम करतात
त्यांना कळवतो

धन्यवाद दोन दिवस दिसला नाही. इथल्या गृपात फिट होउन गेला तर बरेच आहे. ते दंगा करतात पण तसे खुनशी नाही आहेत.

बरेचसे किस्से झालेत गेल्या काही दिवसात एकेक करूनलिहितो

ओव्हर अकटिंग Happy
मी एकदा दळण टाकायला निघालो असताना चुकून बाहेरच्या गेटची कडी नीट लावली गेली नाही. पाचच मिनिटात मी आलो परत आणि गाडीवरून येताना मला रस्त्यात एक पांढरा लॅब दिसला लांबून. म्हणलं आपल्या गल्लीत कोण आला नवा
थोडं पुढं जाऊन बघतोय तो ओड्या मोकाट हिंडत होता
आणि कहर म्हणजे त्यानं गाडीचा आवाज ओळखला, मला बघितलं आणि आता आपल्याला बाहेर हिंडताना बघितलं तर ओरडा बसू शकतो हे कळल्यामुळे चक्क माझ्या समोर पळत आत गेला गेट मधून
मी पाठोपाठ गेट उघडून आत आलो तर जणू काही घडलंच नाही असा शेपटी हलवत आला माझ्याकडे
म्हणलं अरे ढेकळ्या, माझ्या डोळ्यादेखत पळून आलायस आत, किती ती ओव्हर अकटिंग करशील Happy

त्याला हे करावं कसं सुचलं असेल हे मला अद्यापही कोडं आहे
त्याचे तेव्हाचे ते एक्सप्रेशन आठवून मला आता लिहितानाही हसायला येत आहे

मस्तः माझा अपडेट काजल ठीक आहे गृप मध्ये सामावला आहे. सर्वच मजेत आहेत. नवे पपीज सर्व गायब झाले. ते जन्मले तिथे राहून काही अन्न
मि ळ णार नाही. फक्त त्यांची आई आता दिसते. एकदम फिट दिसते. मी गावाला गेले तेवा आमचे येडे केनेल मध्ये राहुन आले. आता तिथून दंगा करायचे शिकून आले आहे. ओरडा आरडा वाढला आहे. ऑफैसातील मन्या मांजराचे फोटो मी # कॅट्स ऑफ ट्विट र वापरून टाकले तर भरपूर लाइकस येत आहेत. बरोबर छान विनोदी कॅप्शन टाकते.

ओड्या लै भारी. # ओड्याच्या खोड्या

अमा तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमचं ट्विटर हॅण्डल द्या इथे.>> Funnybee heart weanieOTRB rainbow.

heart and rainbow are emogies you can search by funnybee. and like my cat pictures. thanks

स्ट्रे डॉग बद्दल पण लिहायचं होतं

गेले दोन आठवड्यापासून कॅनाल रोड ला एक भुभु बघतोय
त्याला मालकाने सोडलं आहे का काय झालं आहे कळत नाहीये
एकाच जागी बसून तो वाट बघत असतो, गळ्यात केशरी पट्टा आहे
आणि माणसांना जाम घाबरतो, मी अनेकदा प्रयत्न केला त्याला पोळी, भाकरी, ब्रेड, बिस्किटे देऊन दोस्ती करायचा पण तो अक्षरशः धूम ठोकतो आणि थोड्या वेळाने परत तिथेच येऊन बसतो
मी त्याचे फोटो काढून रेस्क्यू संघटनेला पाठवले, त्यानी स्करयुलेत केले पण म्हणाले या पेक्षा जास्त काही नाही करता येत
त्याला जखम नाहीये काही, पण रोडावत चालला आहे (असं मला वाटतंय) इंडी डॉग असल्याने कोणी त्याला आडोप्ट नाही करणार असे म्हणाले रेस्क्यू वाले

मला इच्छा आहे त्याला घरी आणायची पण घरचे ऐकणार नाहीय आणि मला झेपणार पण नाही

त्या साठी अजून काय करू शकतो?

भुभु आणि माउ प्रेमिनो, सोनी लिव्ह वर नवीन सिरीज आलिये... "पेट पुराण" नक्की बघा..
मस्त आहे एकदम...
ती सिरीज बघितल्या पासुन मला पण एखादं भुभु तरी आणावं असं वाटु लागलंय... ( बरय माझी मुलगी मायबोली वर नाहिये .. तिनं माझं हे वाक्य वाचलं तर तिला धक्काच बसेल Wink ) ... पण झेपणार नाही मला भुभु असं वाटतय त्यामुळे धाडस होइना...
आजच सोसायटी च्या ग्रुप वर एक " गोल्डन रीट्रीव्हर" चे पपीज मिळतील, हवे आहेत का अशी पोस्ट पाहिलिये..
हवेत का कोणाला ?

आशुचँप , रेस्क्यु संघटनाही न्यायला नाही म्हणाल्या असतील तर मग तो आहे तेथे त्याला खाणे पिणे ठेवणे एवढेच सुचते आहे. प्राण्यांचे अनाथाश्रम असावेत, आपण काढावेत असे खुप वाटते. कधी जमेल कोण जाणे.

इथे कोणाला मनीमाऊ चे spaying चा अनुभव आहे का ?
व्हेट डॉक्टर नी आमच्या माऊचे करायला सांगितलंय. किती वेळ लागेल? तिथे तिला सोडून यावे लागेल का ? आमची माऊ अतिशयच बुजरी आहे... आम्ही घरचे लोक सोडून कोणाच्या वार्याला पण थांबत नाही. घरचे कोणी दिसले नाहीत तर खूप बेचैन होते. म्हणून तिची काळजी वाटतेय.

माझ्या माऊचे केले आहे धनवंती. इथे सकाळी सोडून आलो होतो व्हेटकडे आणि संध्याकाळपर्यंत झालं की ते फोन करतात. (रेगुलर चेकपला ही असंच असतं) तसही spaying च्या वेळी भूल देतील. होपफुली काही प्रॉब्लेम येणार नाही.

इथे कोणाला मनीमाऊ चे spaying चा अनुभव आहे का ? <<<>>>>
आमच्या माऊचं neutering केलय. एका मैत्रीणीच्या माऊचं spaying केलं होतं. ते अनुभव ऐकलेत.
neutering पेक्षा जास्त वेळ लागतो. काही डॉ. बसायला सांगतात, काही जाऊन यायला सांगतात.
रिकव्हरीलाही जास्त दिवस ( साधारण ५/६ ) लागतात कारण प्रोसिजर मोठी असते. कॉलर लावायला सांगतील कारण जखमा चाटतात. कॉलरला ऑप्शन म्हणजे एखादे पातळ सुती स्वच्छ कापड गुंढाळणे.
थोडं लक्ष ठेवायला लागतं. घराबाहेर सोडायचं नाही, औषधं द्यायची ( जे खूप कठीण आहे कारण मांजरं धुम पळतात ),

बाकी आत नेल्यावर एकदा अ‍ॅनेस्थेशिया दिला की त्या बिचार्यांना काहीही समजत नाही. ( दिल्यावरही त्यांचे डोळे उघडेच राहतात पण ते बेशुद्ध असतात , बघायला फार फार वाईट वाटत>).. घरी आणलं तेव्हाही आमचं माऊ गुंगीतच होतं.
अ‍ॅनेस्थेशिया उतरू लागला की ते बिचारे घरभर धडपडत फिरतात. काही समजत नसतं त्यांना पण एका जागी बस, फिरु नको हे कसं सांगणार, शी शू पण जमिनीवर करु दे कारण नीट जाग येईपर्यंत. (फक्त ती स्टेज फारतर तासभर टिकते. त्यात वर चढू वगैरे देऊ नका.) मग नीट भानावर येतात.
हॉस्पीटलमधुन घरी आणल्यावर बेडवर / ऊंचावर ठेऊ नका. खालीच चादरी घालून झोपवा कारण शुद्धीवर येतांना वरुन धडपडू शकतात. बाल्कनी/ टेरेस असेल तर दारे बंद करुन ठेवा नीट जागे होईपर्यंत. खाण्याची सक्ती करु नका ( खरं तर डॉ पाणी पण देऊ नका सांगतात ).

आणि हो, प्रोसिजरला न्यायच्या १२ तास आधी काहीही खायला, प्यायला द्यायचं नसतं. जरा जड जातं आपल्यालाच पण त्या अंदाजाने अपॉईंटमेंट घ्या. ( आम्ही घोटभर पाणी दिलं होतं तो अगदी व्याकूळ झाला म्हणून).

वाचताना कठीण वाटलं तरी तेवढं कठीण नाहीये. औषधं, कौतुकं फक्त आपल्याला लागतात, ते बिचारे स्वतःच बरे होतात.

इथे ( भारतात ) मांजरींना कॅट हॉस्टेल मध्ये ठेवण्याचा कोणाला अनुभव आहे का ? ही हॉस्टेल घरगुतीच असतात. मी एक रात्र ठेवलय पण तेव्हा आमचं पिल्लू खूप लहान होतं, तो रात्रभर एवढा ओरडत होता की दुसर्या दिवशी सगळी कामं सोडून मी परत आले.
नंतर अजुन एक रात्र १ दिवस दुसरीकडे ठेवलं. तिथे राहीला, पण रुळला नाही, बराच वेळ कपाटावर बसून होता.
आता कुठे बाहेर जायचं ठरवता येत नाहीये. एका अ‍ॅनीमल कम्युनिकेटरची मदत घेतली तेव्हा, मी राहीन कॅट हॉस्टेलमध्ये असं म्हणाला आहे. एकदा परत प्रयोग करुन बघू.

धनश्री चांगली माहिती

आमच्या इथेही एक स्ट्रे फिमेल आलीये
लहान आहे पण फार लाघवी आहे
खायची प्यायची आबाळ आहेच त्यामुळे दिलं ते आवडीने खात असते
तिची माझी गट्टी जमली ते एकदा रात्री मी जेवण झाल्यावर शतपावली घालत होतो तर तिथे बाहेर रस्त्यावर कुणीतरी भाताचे पार्सल टाकून दिलेलं किंवा पडलं ही असेल
तर ही खटपट करत ती पिशवी फोडून भात खायला बघत होती
मी थोडा वेळ तिची गम्मत बघत राहिलो मग राहवेना तस मी पुढे गेलो आणि म्हणलं थांब मी देतो पिशवी उघडून
आता अनोळखी स्ट्रे डॉग च्या तोंडातली पिशवी काढून घेणं ही रिस्क होती, अचानक ते चावू शकतात हे माझ्या तेव्हा डोक्यातच आलं नाही
आणि तीही शांतपणे बसून राहिली, जणू तिला कळलं मी मदत करतोय ते
मी भात एका कागदावर काढून दिला तो तिने मिटक्या मारत संपवला आणि आनंद व्यक्त करत गेली
नंतर मग मी ओड्याला फिरवायला काढलं की येतेच
आणि जर गेट च्या आत खेळत असू तर ग्रील मध्ये डोके घालून आमचा खेळ बघत बसते
आणि आता ओड्या कसा माझ्या अंगाशी करतो तसं आता तीही करायला शिकलीय
मस्त माझ्या अंगावर उड्या मारते, पाय अंगावर ठेवते, चाटायला बघते
मी तिचे नाव स्टेला ठेवलं आहे पण मी आणि पोरगा तिला लेडी देवानंद म्हणतो
ती लाडात आली की अशी तिरकी तिरकी मान करत आपल्याकडे येते
अशक्य कॉमेडी आहे तो प्रकार

पण आता ओड्या पासून तिला लांब ठेवावं लागतं आहे, त्याला आता जाणीव व्हायला लागली आहे
अवघड आहे सगळं Happy

औषधं, कौतुकं फक्त आपल्याला लागतात, ते बिचारे स्वतःच बरे होतात.>>>>+++१११

एका अ‍ॅनीमल कम्युनिकेटरची मदत घेतली तेव्हा, मी राहीन कॅट हॉस्टेलमध्ये असं म्हणाला आहे.>>>>>>>>>> हे कंप्लिटली नवीन आहे. असं कॅट हॉस्टेल्स असतात हेही माहित नव्हतं.

एका अ‍ॅनीमल कम्युनिकेटरची मदत घेतली तेव्हा, मी राहीन कॅट हॉस्टेलमध्ये असं म्हणाला आहे.>>>>>>>>>> हे कंप्लिटली नवीन आहे << +११

हो अ‍ॅनिमल कम्युनिकेटरबद्दल अजिबात माहिती नव्हते. आणखी त्याबद्दल सांगू शकाल का?
निअर फ्यूचरमध्ये मांजर नक्की नक्की आणणारे मी.

असं कॅट हॉस्टेल्स असतात हेही माहित नव्हतं. <<<>>>>> हॉस्टेल्स म्हणजे घरातच ठेवतात मांजरींना. जनरली ज्यांच्याकडे मांजर आहे ते लोक एखादी मांजर ठेऊन घेतात. फक्त neutering / spaying झालेलं असावं असा आग्रह असतो. लिटर बॉक्स, सँड, खाणं तुम्ही देणार की त्यांच्याकडचं वापरणार ह्याप्रमाणे दिवसाचे रेट्स असतात.
अ‍ॅनिमल कम्युनिकेटर >><<<<<< काही जण प्राण्यांशी संवाद साधू शकतात , म्हणजे तसे प्रोफेशनल शिक्षण घेऊन. ह्याचा उपयोग जास्त करुन प्राणी हरवले, खूप आजारी असले तर होतो. खूप अमेझींग अनुभव ऐकलेत / वाचलेत. म्हणजे प्राणी सांगत नाहीत, त्यांच्या ( कम्युनिकेटरच्या ) डोळ्यासमोर येणार्य काही इमेजेस, चित्र ह्यांच्या मदतीने कम्युनिकेटर आपल्याला मार्गदर्शन करु शकतात.
फेबुवर अक्षया कवळे , शर्मिला आपटे, प्राची चितळे ह्यांची पेज बघा. मी प्राची चितळेची मदत घेतली होती. अक्षयाची पुस्तकेही आहेत., युट्युब चॅनल आहे, ती कोर्सही घेते. मी सध्या तिचा ५ दिवसांचा बेसिक कोर्स करतीये. उत्सुकता म्हणून.

Pages