चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर आर आर कसा आहे

सकाळी 6 पासून शो आहेत , 3 तास 2 मिनिटे मुवि , इंटर्व्हल एक आहे की 2

83 पहिला काल
ठीक ठाक आहे
काही ठिकाणी ओढून ताणून विनोद निर्मिती केली आहे

शेवटच्या सामन्याचा थरारही कमी पडला असे वाटलं
त्यापेक्षा मज्जा आधीच्या मॅचेस बघताना आली

दीपिका पदुकोण ला बळच जास्त फुटेज, त्यापेक्षा ती मदनलाल ची बायको गोड होती, साडी नेसून नाचते ती, ती कोण आहे(

पावनखिंड बघवला गेला नाही. सिद्दी जोहर म्हणजे कॅप्टन जॅक स्पॅरो किंवा किंग ऑफ पर्शिया मधला तो शेख आमेर (ऑस्ट्रिच पक्षाचा मालक) वाटतो. आणी शस्त्र वापरल्या नंतर तर निन्जा असासिनचीच आठवण येते. नुसत्या रक्ताच्या चिळकांड्या.

विथ ड्यु रिस्पेक्ट.....शिवाजी महाराज म्हणुन चिमां बुटका वाटतो.

विथ ड्यु रिस्पेक्ट.....शिवाजी महाराज म्हणुन चिमां बुटका वाटतो.
>>>>
हे ईंटरेस्टींग वाटले म्हणून गूगल केले
शिवाजी महाराज ५ फूट ६ ईंच
चिन्मय मांडलेकर ५ फूट ५ ईंच
असे दाखवत आहे, कोणाकडे आणखी वेगळी माहीती असेल तर हे कर्रेक्ट करू शकता.

.

https://shekharsrivastavaofficial.wordpress.com/2019/12/08/5-lesser-know...
इथे प्रभू रामचंद्रांची उंची 10 ते 12 फूट असल्याचा उल्लेख आहे.
वाल्मिकी रामायणात ती 8 फूट दिली आहे.

महाराजांची उंची कोणत्या साईटवर आहे? लिंक द्या.

ब्लॅक कॅट ऋन्मेष सर सांगतील ते. तुम्हालाही सापडले असेल तर वर मी जशी लिंक दिली तशी लिंक द्या. गुगल वर करोडो साईट्स असतात.

आता हा विषय अजून भरकटवू नका आणि इथेच थांबा, प्लीज>> अशी आर्जवे नकोत. सरांनी मनावर घेतले तर चिकवा सहा पण आताच विणून ठेवतील Wink

शिवाजी महाराजांची उंची ही न मोजता येणारी आहे, आज पूर्ण जगाला हेवा वाटेल अशी त्यांची उंची होती , अमेरिकेत बोस्टन विद्यापीठात शिवाजी दि मॅनेजमेंट गुरू या विषयावर 100 मार्कंचा पेपर घेतला जातो, पाकिस्तान मध्ये राजा कसा असावा हे पुस्तक शिकवले जाते,व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.यावरून राजांची उंचीची कल्पना येते,
वजन हे न मोजता येणारे आहे कारण त्यांच्या शब्दावर स्वराज्यासाठी जीव देणारे मावळे होते या मावळ्यांचा जीवावर राजे स्वराज्य स्थापन करू शकले

छत्रपती शिवरायांची उंची आभाळा एवढी होती आणि जुलमी मोघल सत्ता चिरडून टाकण्या इतकं वजन होतं.

ऐतिहासिक संदर्भ साधनांवरुन पुढिल ठोस निष्कर्ष सांगता येतील.
(http://www.pandharpurlive.com/2015/02/blog-post_27.html?m=0)
* छत्रपती शिवाजी महाराजांची उंची साडे पाच ते सहा फूट होती. :-छत्रपती शिवरायांचे दैनंदिन राहणीमान अत्यंत साधेपणाचे होते. त्यांचा दैनंदिन पोशाख हा त्याकाळातील सर्वसामान्य लोकांप्रमाणेच साधेपणाचा होता.

* छत्रपती शिवराय हे संपुर्ण जीवनभर निर्व्यसनी होते.

* छत्रपती शिवराय हे दिवसातून एकच वेळ जेवन करीत असत.

* मोहिमांच्या वेळी कसल्याही प्रकारचा डामडौल नसे. ते फक्त दोन तंबू असत. 1664 च्या सुरतेच्या मोहिमेत तर राजे तंबू शिवाय एका झाडाखाली बसलेले आढळतात.

* छत्रपती शिवरायांचा दरबारी पोशाख मात्र लक्षवेदी असे. त्यामध्ये शुभ्र पार्श्‍वभुमीवरील वस्त्रांवर फुलाफुलांंचा चिटाचा चोळणा, डाव्या खांद्यावर सोनेरी भरतकाम केलेले चढाव,सोनेरी शिरपेच त्यावरील हिरेजडित तुरा,काळे पीस आणि शुभ्र मोती राजांच्या शिरपेचाच्या विशिष्ठ आकारावरुन राजे सहज ओळखू येत. राजांच्या डाव्या हातात लांब आणि सरळ अशी बहुदा भवानी तलवार आणि उजव्या हातात डाव्या बाजूला खोचलेली कट्यार असा असे.
* छत्रपती शिवरायांच्या चेहर्‍याचे वर्णन असे, काळ्या दाढीमिश्या, बाजूंचे केस लांब, डोळे मोठे व तेजस्वी, नजर अत्यंत भेदक व सावध, बोलताना स्मितहास्य करीत संवाद साधण्याची खुबी. रंगाने गोरे.
* छत्रपती शिवरायांच्या उंचीच्या मानाने हातांची लांबी नजरेत भरणारी.
* राज्याभिषेक प्रसंगी वजन सरासरी 70 ते 72 किलो.

शिवाजी महाराज महान आहेतच पण
अमेरिकेत बोस्टन विद्यापीठात शिवाजी दि मॅनेजमेंट गुरू या विषयावर 100 मार्कंचा पेपर घेतला जातो
ह्याला काही पुरावा आहे का?

ओह सॉरी सॉरी. ते बाजीराव पेशव्यांना अफगाणिस्तान मध्ये आज पण "शेर का बच्चा" म्हणतात. ते पण खरं बरका

Juna to friend marto Val Kilmer ice man

Val Kilmer doesn't die

जुनाच भारी होता
आणि मी पहिल्यांदा कुठं पाहिला असेल
तर आयएटी च्या ओपन एअर थिएटरमध्ये
तो अनुभवच इतका विलक्षण होता

आजही highway to the danger zone
Take my breath away
आणि राईट्स ब्रदर्स चे you have lost that feeling
गाणी अतिशय आवडीची

काही दिवसांपुर्वी लेकीला अंदाज अपना अपना लावलेला. अपेक्षा होती की ती एकदम हसून हसून बेजार होईल. पण तसे काही झाले नाही. कदाचित माझेही पहिल्यांदा तसे झाले नसावे. पण मग काल तिनेच तो पुन्हा लावला. मी झोपायला जात होतो, पण गोविंदा चिपक के चिपक के डायलॉग बोलत एखादा सीन बघूया म्हणून बघत उभा राहिलो ते पाऊणेक तास एकेक डायलॉग मारत उभ्यानेच बघत होतो. तिने मात्र पुर्ण बघितला. येत्या काळात कदाचित पुन्हा पुन्हा बघेल. मग आम्ही एकत्रच त्याचे डायलॉग मारू. पिक्चरची जादूच तशी आहे Happy

मायबोलीवर कोणी असेल का ज्याने हा पिक्चर पाहिला नाही असा...
असल्यास, जरूर बघा.

-तेरवा इश्क (नॉट अ लव स्टोरी) मल्याळम बघितला.सस्पेन्स, थ्रीलर.
-परवा Gantumoote (Baggage) कन्नड बघितला.. १०वीतल्या मुलीचं भावविश्व,रिल आणि रिअल लाईफमधलं कनफ्युजन..चांगला आहे.
-काल लव मॉकटेल-2 कन्नड बघितला.. कॉमेडी, ड्रामा,फिल सिनेमा.. नुसता लव मॉकटेल (पार्ट-१) आधी बघितलेला.. तो पण आवडलेला.
सगळे प्राईमवर आहेत.

शिवाजी महाराज महान आहेतच पण
अमेरिकेत बोस्टन विद्यापीठात शिवाजी दि मॅनेजमेंट गुरू या विषयावर 100 मार्कंचा पेपर घेतला जातो
ह्याला काही पुरावा आहे का? >>>>>>>
झम्प्या हा टाईम पासचा विषय नाही !
बंद कर !!!!

आर आर आर आत्ताच बघितला !
देशभक्ती ला राजमौली चा टच असल्यामुळे जबरदस्त झाला आहे . काश्मिरी फाइल्स प्रमाणेच हा ही mouth publicity वर चालणार !
अजय , चरण राज आणि ज्यू एन टी आर तिघांनीही कामे जबरदस्त केली आहेत , एकमेकांची भूमिका खाण्याचा प्रकार अजिबात नाही
एक मात्र खरं आहे , बॉलिवूड ने गिअर बदलला नाही तर येणार प्रत्येक मुव्ही डब्यात जाईल !
सगळ्यात अगोदर पी आय एल टाकून अक्षय कुमार अजय देवगण , खान त्रिमूर्ती ला सिनेमात काम करण्यास बंदी आणली पाहिजे .

Pages