चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! धन्यवाद सांगितल्याबद्दल! रविवारी लागणार होता टीव्हीवर. पण त्या दिवशी पाहुणे आले होते त्यामुळे विसरून गेलो.

बधाई दो काल बघायला सुरूवात केली पण १० मिनिटातच बंद केला.. भूमी पेडणेकर आता फारच बोअर व्हायला लागली आहे.. तेच तेच यूपी स्टाईलमधे बोलणं.. थोडंफार वेगळे रोल्स घ्यावेत तीने

बधाई दो बघितला. ठीक आहे, पण फारच प्रेडिक्टेबल आहे. सगळं मोजुन मापून पीसी घडतं. २०% विरोध, २०% कन्फ्युजन, २०% विनोद, २०% राग आणि उरलेले १० -१० % प्रेम आणि समजुतदारपणा.
समलैंगिकता हा फार घिसापिटा विषय झाला आहे. त्यांना किती सोसायला लागतं यावर टीपं गाळून मला लेक्चर ऐकायचं नाहीये, पण सध्या ओव्हरडोस झालेला आहे त्याचा. स्क्रिप्ट स्मार्ट असतं, तर मजा आली असती तर ते पण नाही. स्टाँग फीमेल कॅरेक्टर हवं म्हणून एकसुरी करुन टाकतात फॉर्म्युला असल्यासारखं. शेवट पर्यंत बघितलापण ठीक आहे झालं.

समलैंगिकता हा फार घिसापिटा विषय झाला आहे
>>>
हो, हे खरे आहे. एकीकडे या विषयावरचे चित्रपट घिसेपीटे होत आहेत. पण त्याचवेळी त्यांना समाजात वावरताना येणारे प्रॉब्लेम अजूनही जैसे थे आहेत.
असो, भुमी आणि आर आर साठी बघितला जाणारच. ईथल्या संमिश्र प्रतिक्रिया बघून आता अपेक्षा कमी झाल्यात हे एक चांगलेय..

बॉलिवूडवाले धडाधड याच विषयावर सिरीज आणि मुव्हीज बनवू लागलेत सतत. कंटाळवाणं झालंये ते.
चंदीगढ करे आशिकी, बधाई दो, फेमगेम मधे पण ...

ते न्यू नॉर्मल दाखवलं तर काहीच हरकत नाही. फेम गेम मध्ये काही वेगळं वाटलं नाही, सहज घडत गेलं.
हे मुद्दाम त्याचा इश्यू करुन त्यावर शाळा घेतल्यागत केलंय याचा कंटाळा येतो.

बधायी दो बघू नका.. ताटीम वेस्ट आहे...

83 वीकएंड मध्ये बघेन... कपिल जुन्या काळातील विराट होता असे ऐकून आहे.. शून्य माहिती आहे त्यामुळे बघायला मजा येईल....

बधायी दो बघू नका.. ताटीम वेस्ट आहे... >>>>>>>>>>>बिलकुल इंटरेस्टिंग नल्ळ, त्यामानाने 'शुभ मंगल ज्यादा सावधान' छान होता .

शुभ मंगल ज्यादा सावधान'
>>>
यीईव.. मला तर बिलकुल नाही आवडला. शुभमंगल सावधान छान होता.. ज्यादा सावधानमध्ये काहीच्या काही आचरटपणा वाटला.
किंबहुना बधाई दो बाबत देखील तसाच पिक्चर निघाला तर म्हणून भिती वाटते.

एटीथ्री पाहिला, आवडलाय, त्यावेळेचे थ्रिल अनुभवता आले, कपिल देवची एक वेगळी स्ट्रॉन्ग पर्सनॅलिटी आहे, भेदक मोठे डोळे, दाताची ठेवण्,उन्चापुरा, भारतदस्त वेगळा आवाज हे सगळ जवळपासही नसताना रणविरने कपीलची भुमिका चान्गली केली आहे, बाकी सगळ्याच्या भुमिका छान आहेत,
दिपिकाला उगाच घुसडलय, एका ठिकाणी मधेच प्रेक्षकात बसलेला कपिल दिसतो, छोटा सचिन , अमरनाथ मॅच बघतोय हे टच आवडले.
गाणी आहेत पण दन्गलसारखी जोशपुर्ण नाहित अगदी एकही गाण लक्षात राहात नाही.

काल जलसा पाहिला प्राईमवर.
विद्या बालन आणि शेफाली दोघींची एक्टींग मस्त.
चांगलाय सिनेमा.

काल नेटफ्लिक्सवर ८३ बघायला गेला. पण कपिलच्या १७५ नंतर नेट गेला. खरे तर मी आणि बायकोने थिएटरला पाहिलेला. आणि लेकीने आदल्या रात्री आम्ही झोपलेले असताना एकटीने पाहिलेला. न पाहिलेली एक आईच होती. पण तरीही नेट गेल्यावर पहिल्यांदाच बघतोय आता पुढे काय होणार अशी उत्सुकता असल्यासारखे दिवसभर वाटत होते.

आज पुढचा भाग पुन्हा थोडे मागे जाऊन कपिल ईनिंगपासून पाहिला. त्यानंतरचा श्रीकांत पार्टीत कॉमेडी ईमोशनल स्पीच देतो तो सुद्धा आवडीचा सीन. खूप दिवसांनी घरी तीन पिढ्यांनी एकत्र बसून एखादा चित्रपट दुसऱ्यांदा पाहिला. घरंच क्रिकेटप्रेमींचे आहे.

विशेष म्हणजे कितीही चांगले गाणे असले तरी ढकलायची जी सवय हल्ली लागली आहे ते या दोन दिवसात रिमोटला हातही नाही लागला. लहरां दो गाणे अध्येमध्ये ऐकतो. पण चित्रपट बघताना बाकीचीही सिच्युएशनला सूट होत असल्याने त्याच फ्लोमध्ये बघितली गेली.

काल जलसा पाहिला प्राईमवर.
विद्या बालन आणि शेफाली दोघींची एक्टींग मस्त.>> हो छान आहे +१ विद्या आणि शेफाली दोघी आवडत्या आणि तोडीस तोड आहेत

मी जलसा बघायला घेतला होता. सुरवातीला अपघाता नंतर फ्रेम बदलते आणि विद्या बालन मुलाखत घेतेय तो सिन लांबल्या सारखा वाटला मग बंद केला.

आता बघेन परत.

नेटफ्लिक्स / हॉटस्टार / प्राईम वर नवीन काय आहे?
इतर भाषेतील पण चालेल. Happy

Rescued by Ruby
मस्त चित्रपट आहे नेटफलिक्स वर
एका भुभुच्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे
लहान मुलांनाही खूप आवडेल असा आहे

The Visit
तरुण भावंडे त्यांच्या आजोबा-आज्जीला भेटायला आजोळी(दूरच्या गावात) येतात. त्याआधी त्यांनी कधीही आजोबा-आज्जीला पाहिलेले नसते. काही कारणांनी मुलांचे आई-वडील त्याच्या सोबत आलेले नसतात. आज्जीची वागणूक खूप विचित्र असते. रात्री झोपेत ती घरभर फिरत असते. आज्जी अशी का वागते ह्याचा तपास ती मुले करायचा प्रयत्न करतात आणि एक भयानक वास्तव त्यांच्या समोर येते. मस्त आहे चित्रपट.

TV वर

गुड टाईम म्हणून रॉबर्ट पॅटिन्सनचा सिनेमा बघितला. एकदम वेगळा सिनेमा. धक्कादायक आहे चांगलाच.

Pages