भारत एक खोज

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इन्डिया वर आधारित वैदिक काळापासून भारताचा प्रवाह दर्शविणारी 'भारत एक खोज ' नावाची एक विलक्षण मालिका १९८५ च्या दरम्यान दूरदर्शन वर येऊन गेली. ५३ भाग होते तिचे. दिग्दर्शक शाम बेनेगल. शिवकालावरही एक एपिसोड होता. दूरदर्शनच्या सर्वोत्कृष्ट मालिकापैकी ही एक. दर रविवारी सकाळी या ऋग्वेदातल्या ऋचा गम्भीरपणे सुरू होत आणि भाग सुरू होई. स्वतः नेहरू येऊन निवेदन करत. (रोशन सेठ म्हणजे अगदी नेहरूच.).
एपिसोडच्या सुरुवातीस व शेवटी या ऋचा असत. यातील शेवटचा काही भाग मालिका सम्पताना शेवटच्या म्हणजे ५३ भागातला आहे.

नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमापरो यत |
किमावरीव: कुहकस्यशर्मन्नम्भ: किमासीद्गहनं गभीरं ||

सृष्टीसे पहले कुछ नहीं था...
सत भी नही, असत भी नही

अंतरिक्ष भी नहीं , आकाश भी नहीं था...
छिपा था क्या ,कहां,किसने ढका था....
उस पल तो आगम,अटल जल भी कहां था...

सृष्टीका कौन है कर्ता ?...
कर्ता है वा अकर्ता ?
ऊंचे आकाशमे रहता...
सदा अध्यक्ष बना रहता...
वोही सच मुचमे जानता
या नही भी जानता...
है किसीको नही पता....
नही पता,
नही है पता, नही है पता ......

हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत ।
स दाधार पृथ्वीं ध्यामुतेमां कस्मै देवायहविषा विधेम ॥

वो था हिरण्यगर्भ सृष्टीसे पहले विद्यमान...
वोही तो सारे भूत जातीका स्वामी महान...
जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर....
ऐसे किस देवता की उपासना करे हम हवि देकर?

जिसके बलपर तेजोमय है अम्बर
पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर....
स्वर्ग और सूरज भी स्थिर....
ऐसे किस देवता की उपासना करे हम हवि देकर?

गर्भमे अपने अग्नि धारण कर पैदा कर...
व्याप था जल इधर, उधर ,नीचे, उपर
जागर्थ देवोंका एकमेव प्राण बनकर..
ऐसे किस देवता की उपासना करे हम हवि देकर?

ओम! सृष्टी निर्माता स्वर्ग रचैता, पूर्वज रक्षा कर...
सत्य धर्म पालक अतुल जल नियामक रक्षा कर...
फैली है दिशायें बाहों जैसी, उसकी सबमे, सबपर..

ऐसे ही देवता की उपासना करे हम हवि देकर..
ऐसे ही देवता की उपासना करे हम हवि देकर.........

सृष्टीसे पहले कुछ नहीं था...
सत भी नही, असत भी नही

अंतरिक्ष भी नहीं , आकाश भी नहीं था...
छिपा था क्या ,कहां,किसने ढका था....
उस पल तो आगम,अटल जल भी कहां था...

नहीं थी मृत्यु, जी अमरता भी नहीं..
नही था दिन, रात भी नही ..
हवा भी नही , सांस थी स्वयमेव फिर भी....
नही था कोइ, कुछ भी, परम तत्वसे अलग, या परे भी......

ओम....

कर्म बनकर बीज पहले जो उगा...
काम बनकर वो जगा...
कवियों, ज्ञानीयोने जाना....
असत और सत का निकट सम्बंध पहचाना

पहले संबंधमे हिरण्यगर्भ नीचे परम तत्व उसपर
उपर या नीचे
वह था बना हुआ पुरुष ,और स्त्री बना हुआ...

उपर..
नीचे...

सृष्टी ये बनी कैसे, किससे, आयी है कहांसे?

कोइ क्या जानता है बता सकता है?
देवोंको नहीं ज्ञान...
वो आये सिजानमे क्यों?

सृष्टीका कौन है कर्ता?
कर्ता है या अकर्ता?.......

प्रकार: 

सहीच Happy

ह्या दोन्ही ऋग्वेदातली हिरण्यगर्भ आणि नासदीय सुक्तातल्या ऋचा आहेत ना?
फार मस्त वाटायचं भारत एक खोजचं हे शीर्षक गीत ऐकतांना एकदम भारावल्यासारखं.
अजूनही ते ऐकतांना भारावल्यासारखं तर होतंच पण एक नॉस्टॅलजिक लहर येऊन शहारून जायला होतं. चाणक्याचं संगीत ऐकतांनाही तसंच. Happy

धन्यवाद रॉबिनहूड...हे श्लोक कशामधून घेतले आहेत सांगाल का? उपनिषदांमधले श्लोक आहेत का हे?
याची You tube लिन्क पण द्या ना कोणितरी...मला सध्या शक्य नाहीये नाहीतर मीच दिली असती..

ह्या दोन्ही ऋग्वेदातली हिरण्यगर्भ आणि नासदीय सुक्तातल्या ऋचा आहेत ना?
होय...

यू ट्यूबवर ...
http://www.youtube.com/watch?v=TYEZLvTqQjQ

आणि..
http://www.youtube.com/watch?v=VIoOiT6u320&feature=related

फारच सुरेख सिरियल होती ही. ही कुठे मिळू शकेल संपूर्ण ? आणि धन्यवाद रॉबिनहूड, ही संपूर्ण कविता इथे टाकल्याबद्दल Happy काय ताकदीची आहे नाही? अन त्याची चाल ताल ही मस्त होता. अजून कानात घुमते ती !

नासदानी .... : हे ऋग्वेदातील १० व्या मंडलातील सूक्त आहे... त्याला नासदीय सूक्त म्हणतात.

हिरण्यगर्भ... : हे 'क' चे म्हणजे प्रजापतीचे सूक्त आहे.. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने 'क' या वर्णाचा आधी निर्माण केला... तेंव्हा इतर काहीही आस्तित्वात नव्हते.. त्यामुळे या सूक्तात 'कस्मै देवाय हविषा विधेम' असे वर्णन आहे.. म्हणजे 'क' नावाच्या देवाला आम्ही अभिवादन करतो. ऋग्वेदात देवतांच्या यादीत देखील 'क' या नावाचा देव आहे. हिंदीमध्ये 'ऐसे किस देवता की उपासना करे हम हवि देकर'' असा प्रश्नार्थक अर्थ का घेतला आहे, हे समजत नाही. कदाचित असाही त्याचा अर्थ असू शकेल. पण मराठी भाषांतर आणि ऋग्वेदातील देवता यादी यात मात्र 'क' म्हणजे प्रजापती असा उल्लेख आहे.

रॉबीनहुड,
खुपच छान बाफ सुरु केला तुम्ही.
सर्व मालिकाच डोळ्यासमोर तरळुन गेली.
वरील ऋचा /कवितेचा बर्‍यापैकी अर्थ समजला. पण मी व माझ्यासारखे काही लोक विज्ञान शाखेचे विद्यार्थी असल्याने संपुर्ण अर्थ समजु शकलो नाही.
तसेच काही शब्द उदा.हवि देकर, आगम, हिरण्यगर्भ इ. चां अर्थ काय होतो? यावर जरा माहिती मिळाली तर बर होईल. Happy

हवि देणे- यज्ञामध्ये अर्पण केली जाणारी वस्तु म्हणजे हवि... अन्नपदार्थ, दूध, तूप, सोमरस इ. वापरले जाई.

सहीच!! धन्यवाद रॉबिनहूड..
माझी सगळ्यात आवडती मालिका होती ती. यूट्यूब वर अनेक वेळा हे शीर्षकगीत ऐकलंय पण परत एकदा वाचताना अंगावर रोमांच उभे राहिले.

या मालिकेत निवेदना साठी ओम पुरीचा 'सघन' आवाज वापरला होता. त्यात ओम पुरी , पल्लवी जोशी, अंजन श्रीवास्तव वगैरे कलाकार असल्याचे आठवते.

याचे सन्गित वनराज भाटिया नावाच्या मोठ्या पन 'अनुल्लेखित' सन्गितकाराचे हे.
काश्यपगोत्रोत्पन्नान्नि उत्तम माहिति दिलि हे. पण मला एक शन्का हे. क हे प्रजापति असे धरले तर परत 'देवाय' का लिहिले ? नुस्तेच कस्मै चाल्ले अस्ते. आपन रामाय देवाय असे थोडिच म्हणतो ?

कस्मै देवाय... :

ऋचेमधील अक्षर्/मात्रा संख्या जुळवायला केले असावे... रामरक्षेतही 'रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे' असे आहे की.. सूक्ताच्यावर देवतेचे व ऋषीचे नाव असते, तिथेही 'क' असेच नाव आहे..

इथेही प्रश्नार्थक अर्थ आहे... पण वरती देवाचे नाव मात्र क आहे..
http://www.sacred-texts.com/hin/rigveda/rv10121.htm

विकिवर पण प्रश्नार्थक अर्थच आहे..

http://en.wikipedia.org/wiki/Hiranyagarbha_sukta

या ठिकाणी मात्र प्रजापतीचा उल्लेख आहे.
http://www.holynewsholy.com/4.html

आणि इथे पान ८० वर मूळ संस्कृत सूक्त आहे.. बघितल्यावर कसं बरं वाटतं.... आमचे आज्जे पणजे असलं वाचायचे आणि आम्ही विकिपेडियावरचे विंग्लिश भाषांतर नाहीतर मराठी भाषांतरावर समाधान मानणारे! Sad
http://sanskritdocuments.org/mirrors/rigveda/pdf/r10.pdf

वनराज भाटिया दादाच माणूस होता.निशान्त, मंथन, भूमिका मधील त्याने दिलेली प्रीती सागर ची गाणी किती अप्रतिम आहेत. दुर्दैवाने ती गाणी रेकॉर्ड रूपात आलीच नाहीत. त्यामुळे आजही तुम्हारे बिना जिया ना लगे घरमे, म्हारो गाव काठियापारे,पियाबाज प्याला पिया जाये ना., सावनके दिन आये सजनवा आन मिलो,ही प्रीतीची क्लासिक गाणी डॉक्युमेन्टेशनच्या अभावी काळाच्या उदरात गडप होणार असे दिसते. त्याच्या कॅसेट्स सीडी एम पी ३ काहीही मिळत नाहीत . आहेत का कुणाकडे?

हूड ह्या मालिकेचे प्रसारण १९८५ सालचे नसावे. मी ही मालिका माझ्या कळत्या वयात बघितली आहे,
आणि ८५ मध्ये मी बडबडगीतांमधूनही बाहेर आलो नव्हतो. Proud

मला वाटतं ८८-८९ चा काळ असावा. त्यानंतरही एक-दोन वेळा ह्या मालिकेचे पुनःप्रसारण झाले होते.

१९८८ बरोबर आहे. मी तेव्हा जळगावला होतो अन दुसर्‍याचा टीव्ही पाहत असे. गुरुदास मानही त्याच काळात पहिल्यान्दा दिसला .. लेकिन वो किस्सा फिर कभी.

मधुन्-मधुन पहायचो... असं वाचनात आलेलं की या सिरियल मध्ये महाराष्ट्राचा खरा ईतिहास डावलला गेला; एस्पेशिअली छत्रपतींचा आणि मराठ्यांचा. जाणकारांनी अधीक प्रकाश टाकावा.

मालिकेत महाराष्ट्राचा ईतीहास डावलला हे म्हणणं तितकसं बरोबर नाही. वैदिक काळापासून ते १९४७ च्यास्वातंत्र्यसंग्रामापर्यंतच्या महत्वाच्या ऐतिहासिक घटना आणि प्रसंग यांचा अंतर्भाव यात होता.
शिवाजी महाराज आणि औरंगजेबावरची प्रकरणेही या मालिकेत होतीच.
मालिकेत एवढा प्रचंड मोठा कालखंड चित्रित केला आहे की ५३ भागात हे सर्व बसवणे मोठे जिकिरिचे झाले असणार.

'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' मध्ये महाराष्ट्राशी संबंधित किती ऐतिहासिक घटनांचा उल्लेख आहे ते माहित नाही. हूड किंवा ज्यांनी ते वाचले आहे ते नक्की सांगू शकतील.

ईतीहास खरा की खोटा याबद्दल म्हणत असाल तर त्यावरच्या वादविवादातून फारच क्वचित काही निष्पन्न होते. आणि लेखक दिग्दर्श्क कुठले माहिती स्त्रोत वापरतो त्यावर पण बरेच काही अवलंबून असते.

रॉबीन,
मस्त!!
अकोल्याला माझ्या घरी तेव्हा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टी व्ही होता, हा कार्यक्रम मी कधीच सोडला नाही.

मुंबई मधे नेहरू तारांगणा च्या बाजुला असलेल्या इमारती मधे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथावरचे अतिशय भव्य असे प्रदर्शन आहे. तारांगण पहायला जातांना जरा वेळ ( किमान २ तास) मोकळा ठेवुनच जावे. आपला देश कसा आहे ते समजण्या साठी आवर्जून पहावे असे ते प्रदर्शन आहे.

भारत एक खोज, रामायण, महाभारत, चाणक्य अश्या मालिका बघतच आमची पिढी बडबडगीतातुन गडबडयुगात प्रवेशकरती झाली........ मग फिर वही तलाश नावाची एक मालिका होती. अन ते कॉलेज डेज, किस्स्सा शांती का.....
काय मजा यायची, दुसर्‍याच्या घरी जाउन टीव्ही पहायला...... घर मालक जा जा म्हणले तरी आम्ही काही हलायचे नाव घेत नव्हतो..... बिच्चारे Happy मालक!

पुर्वी मालिका १३,२६, ५३ अश्या कमी भागात असत. आता जर त्यांनी पुन्हा भारत एक खोज बनवली तर ५३० भाग दाखवु शकतील...!

यातले बरेच भाग युट्युब वर दिसतात......!

चमन +१. या ग्रन्थाचा स्कोप एव्हडा मोठा हे कि ५३ काय ५३० भाग सुध्दा कमिच पडले अस्ते. आपल्या आणि न्हेरुन्च्या सुदैवाने तेव्हा डेलि सोप नावाचा प्रकार भारतात न्हवता आनी बेनेगल यान्चेसारखा दिग्दर्शक होता.

हुडसाहेब, खुप खुप आभार.. ही मालिका मी अजिबात चुकवत नसे.....आणि शीर्यकगीत खुप आवडीचे होते.

तेव्हा इतिहास वगैरेकडे इतकं लक्ष नव्हतं. मी यातल्या गोष्टींसाठी पाहायची....:)

नेहरूना इंग्रजाळलेले वगैरे म्हणणार्‍याना डिस्कव्हरी ऑफ इन्डिया हे झणझणीत अन्जन आहे. त्यातील इंग्रजी भाषेच्या सौन्दर्याकरीताही ते पुस्तक वाचनीय आहे. आम्हा नगर्‍याना हा ग्रन्थ अहमदनगरमधये लिहिण्यात आला हा विशेष आनन्द आहे. आजही ती खोली जतन केलेली आहे. मी प्रथम मराठीत वाचले. मराठी आणि इंग्रजी त पुस्तक असले तर मी प्रथम मराठीच वाचतो. इन्ग्रजीचा विज्युअल इफेक्ट मला येत नाही...

Pages