घरच्या घरी हातभट्टी कशी करावी ?

Submitted by मामू on 31 May, 2020 - 10:11

मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात आपल्या सरकारने तळीरामांची फारच पंचाईत करून ठेवली होती. आता तळीरामांना मात्र रोजच्या रोज नेहमीचा खुराक मिळायलाच लागतो. हे लोक करोनाला बिलकुल घाबरत नसतात. जर दोन दोन महिने दारूची दुकाने जर बंद रहात असतील तर या तळीरामांनी काय करावे बरं ? यावर कोणीतरी, काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. तो उपाय मी अथक प्रयत्नाने शोधून काढला आहे.

सध्या बाजारात कलिंगड विकणारे भरपूर बसलेले असतात. कलिंगड आतून कसे छान लाल आहे हे दाखवण्यासाठी, ते कलिंगडाला, विशिष्ट प्रकारे सुरी खुपसून त्रिकोणी काप / फोड काढतात. ही फोड / काप कलिंगडाच्या ढिगार्‍यावर ठेवतात.
आता हे कलिंगड दिवसभर तसेच उघडे रहात असते. त्याच्यावर धूळ, माशा वगैरे बसतात . त्यामुळे कलिंगड कोणीही विकत घेत नाही. मी मंडईजवळ राहत असताना आमच्या मंडईतल्या एका मित्राला विचारलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की ही कलिंगडे वाया जात असतात . आम्ही रोज ती फेकून देतो. माझ्या मनात असा विचार आला की रोज हे लोक किती कलिंगडे फेकून देत असतील ? याचा काहीतरी उपयोग व्हायला हवा ! त्यावर दिवसरात्र संशोधन करून मी हातभट्टी कशी बनवावी याचे संशोधन केले आहे. त्याची रेसिपी अशी आहे.

प्रथम या कलिंगडाची त्रिकोणी फोड बाजूला काढून आत मध्ये नवसागर गूळ किंवा सध्या बाजारात मिळणारे यीस्ट टाकून ठेवायचे. ( अंदाजे एक चमचा ). आणि त्रिकोणी फोड परत जागेवर लावून ठेवायची. शक्यतो हे कलिंगड गरम हवेत ठेवावे. ( फ्रिज च्या मागच्या बाजूला हवा खूप गरम असते). साधारणपणे हे यीस्ट एक किंवा दोन दिवसात पूर्ण कलिंगडाला फरमेंट करते .

अश्या फरमेंट झालेल्या कलिंगडाचा गर किंवा लगदा प्रेशर कुकरमध्ये ठेवून गॅस चालू करावा . त्यानंतर कुकरची शिट्टी काढून शिट्टी च्या जागी एक प्लास्टिकची नळी जोडावी . ही प्लास्टिकची नळी ओट्यावर ठेवलेल्या दोन बर्फाच्या ट्रे मधून खाली ठेवलेल्या बाटलीत सोडावी. कुकरमधून भरपूर वाफ यायला लागली की बाटलीमध्ये तुमची पहिल्या धारेची तयार होते. एक लक्षात घ्या ही भयंकर स्ट्राँग असते. तीस मिली जरी प्यायली तरी तुम्हाला भयंकर कीक येऊन फेफरे येऊ शकते . त्यामुळे एक लिटर पाण्यामध्ये दहा थेंब टाकून तिला डायलूट करावे लागते (अनुभवाचे बोल आहेत). एका कलिंगडात साधारण दोन खंबे सहज होऊ शकतात ! तुम्ही कलिंगडा ऐवजी द्राक्ष संत्री-मोसंबी चिकू किंवा कोणतीही सडकी फळं पण वापरू शकता !

नविन उद्योगांना राज्य सरकार जमिनी, विकत किंवा भाड्याने.देवू इच्छित आहे. राज्याचे आॅक्सिजनवर असलेल्या अर्थशास्त्रास सांभाळणारा हा उद्योग असल्यामुळे राज्याचे आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता दाट आहे. मी स्वत: आत्मनिर्भर होताना इतरांना निर्भर करत आहे. माझी कल्पना प्रत्यक्षात कधी उतरतेय याची वाट पाहत आहे. आतापर्यंतच्या संशोधनात हेच एकमेव संशोधन ज्यात सामाजमनाचे भान ठेवले गेले आहे.
माझी ही रेसिपी कॉपीराइट केलेली आहे. या रेसिपीचा कोणीही कमर्शियल वापरासाठी उपयोग करता कामा नये. या रेसिपीचे सर्व अधिकार माझ्याकडे आहेत . मी सरकारकडे स्टार्टअप साठी लवकरच अर्ज करीत आहे.
… मामू

Group content visibility: 
Use group defaults

कारण मुळातच मांस खाणे हे काही वाईट नाहीये.

असं तू ठरवलं आहेस ना?
एखाद्या शाकाहारी ला विचार तो मनुष्य कसा शाकाहारी आहे, आपले मोठे आतडे, चपट्या दाढा आणि एकूण शरीर हे शाकाहारी म्हणूनच बनलेले आहे
कित्येक सेलिब्रिटी मांसाहार करू नका म्हणून आवाहन करतात
तडफडून प्राणी मरतात, आयांपासून लेकरे तोडून त्यांना निर्दयपणे चिरले जाते, रक्त गाळत तडफडत जीव जातो
आणि हे तू सगळे मिटक्या मारत खातोस
कित्येक मुक्या प्राण्यांचे तळतळाट, आक्रोश आणि अश्रू असतील त्या घासा घासा मागे याचा खाताना कधी विचार केला आहेस का

असं तू ठरवलं आहेस ना?
>>>>>

मी नाही हे जगानेच ठरवले आहे. म्हणून एखद्याला मांसाहारी म्हटले की तो सारवासारव करत नाही की मी कधीतरीच खातो ओ वगैरे... पण एखाद्याला बेवडा वा दारुडा म्हटले की त्याला आपल्या बचावाला आपण काही फार नाही पित हे सांगावे लागते. कारण त्यांना तो शिक्का आपल्या माथ्यावर नको असतो. असे का? याचे उत्तर शोधा.

हो हो सॉरी
अभिषेक कडे दुर्लक्ष करा
दारुबद्दल बोला

मांसाहार चांगला हे तू म्हणतोयस
तो कसा चांगला हे सांग
>>>>>

वरची तुमची ती मांसाहारावरची सेण्टी पोस्ट टाकताना तुम्ही हे विसरलात की वनस्पतीही सजीव असतात. त्यांना कचाकचा खाताना बरे तुम्हाला वेदना होत नाहीत. बिचारे मुके जीव बोलू शकत नाहीत तर त्यांना हवे तसे चिरडाल कुस्कराल ठार कराल.

अहो निसर्गाचा नियम आहे. एक सजीव दुसरया सजीवाला खाऊन जगतो. कोणी दगडमाती खाऊन जगणारा असेल तर बोला. त्यामुळे हा कळवळा कामाचा नाही.

आता माझ्या मुद्द्यावर येऊया,
मांसाहार चांगला हे मी सांगू शकतो.
एखादी शाकाहारी व्यक्ती तो वाईट हे सांगून शाकाहाराचेही कौतुक करू शकते.
आपापली वैयक्तिक मते.
दोघांनाही आपापल्या खाद्यसंस्कृतीचा अभिमानच असतो.

पण् मुद्दा हा आहे की दारूड्या या पदवीची दारू पिणारयांनाच लाज वाटते तशी ती मांसाहार करणारयांना मांसाहारी म्हटल्याची लाज वाटत नाही वा शाकाहार करणारयांना शाकाहाराची वाटत नाही.

आता मी चहात फरसाण टाकून खातो. समोरची व्यक्ती त्यालाही वाईट बोलेल. तो त्याचा दृष्टीकोण. पण मला त्याची लाज वाटणार नाही. ना ते चांगलेच आहे हे सिद्ध करायची गरजही भासणार नाही.

जर कोणी मला अति चहा पितो म्हणून चहांबाज म्हटलेच तर मला त्याचेही काही वाटणार नाही.

पण ईथे दारू पिणारयांनाच दारूडा बेवडा या शब्दाची ॲलर्जी असते... ती का? का? का?

>>एका चारशे ग्रामस कलिंगडात चाळीस ग्रामस कार्बोहाइड्रेडस असावेत फारतर. >>कलिंगडाचे वजन एक ते दीड किलो असतं ! चारशे ग्रॅमचे कलिंगड कोणच्या बाजारात मिळतं ? असो !हे माझं पहिलंच लेखन आहे. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
… मामू

मामू, ते एक उदाहरण आहे. दीड किलोच्या फळात १५० एमेल. ( पण खंभा निघायचा म्हणजे ७५० एमेल ना?)

पहिलंच लेखन आहे. म्हणून टिंगल असं काही नाही. फक्त एक अंदाज मांडला.
----------------------
शाळेत असताना सायन कोळिवाडा जवळच होता आणि वर्गमित्र त्या भागातलेही होते. हातभट्टी व्यवसाय जोरात असायचा. दहाफुटी दहाबारा खड्ड्यांत काळा गुळ कुजत असायचा. एका खड्ड्यातले रसायन उकळून झाले की दुसरा घेत. गुळ म्हणजे ९८% कार्बोहैड्ट्रेट. त्यातून बरीच पहिल्या धारेची निघायची.
कलिंगडाची अथवा कुठल्या फळाची दालू होणारच नाही असं म्हणत नाही. पण यील्ड ( परिवर्तन ) परवडायला हवे. सरळ लायसन आणि ट्याक्स किंवा गुपचूप केल्यास हप्ते एकूण हिशोब काय?

दारू शाकाहार आहे रे... म्हणून तुला आवडत नाही...फळे, फुले आणि धान्यापासून बनते... आपले देव देखील आवडीने घ्यायचे..

कोंबडी फर्मेंट करून दारू बनत असती तू आवडीने पिली असतीस...मांसाहारी माणसा..

मांसाहारी अभिषेक, मला दारुडा राव पाटील म्हणालात तरी माझी हरकत नाही.
>>>

ईटस् नॉट अबाऊट यु ॲण्ड मी...
आमच्याईथे ऑफिसपार्टीत दारू पिऊन ओकणाराही बोलतो मी कधीतरी पार्टीलाच पितो. मी बेवडा नाही.

कोंबडी फर्मेंट करून दारू बनत असती तू आवडीने पिली असतीस...मांसाहारी माणसा..
>>>>

चूक
कोंबडीचे खाण्याचेही सर्व प्रकार मला आवडत नाहीत.
याचा अर्थ कोंबडी आहे म्हणून तिचे काहीही केले तर चालेल हा तर्क चुकलाय.

आपले देव देखील आवडीने घ्यायचे..
>>>>

देव हि काल्पनिक संकल्पना आहे.
आपण आपल्या सोयीने त्यांची प्रतिमा हवी तशी रंगवू शकतो

उदाहरणार्थ काही देवांच्या वाराला मांसाहार चालत नाही तर काजी देवांनाच मांसाहाराचा नैवेद्य दाख्वला जातो.

मॉरल - देवांना काय चालते काय नाही हा निकष लागू नाही. अन्यथा आशूचॅम्प यांनी वर ती मांसाहार म्हणजे निर्दयीपणा हि पोस्ट मांसाहार करणारया देवांनाही लागू होईल.

बापरे मी-अनु, हिरा... कायकाय प्रक्रिया झाली असेल कलिंगडात त्या पातळीवर जाण्यापुर्वी. टोमॅटोला वगैरे बुडबुडे आलेले पाहिले आहेत.

निरु Happy ... मनावर घेऊ नका. सहज म्हटल होतं. Happy

आता गंभीरपणे लिहायचे तर ते कलिंगड नुकतेच म्हणजे एक दिवस आधी आमच्या लॉक डाऊन काळातल्या भाजी-फळे पुरवठादाराकडून घेतले होते. त्यावरचे ते पंक्चर अगदी बारीक होते. सुईने टोचल्यासारखे. हा पुरवठादार आमचा नेहमीचा नाही. आमच्या भागातल्या राजकीय दृष्ट्या सक्रिय माणसाने लोकांची सोय व्हावी म्हणून आमच्या परिसरातल्या अनेक सोसायट्यांमध्ये त्याला लावून दिले आहे. असो.

त्यावरचे ते पंक्चर अगदी बारीक होते. सुईने टोचल्यासारखे.

ते कदाचित कृत्रीमरित्या गोड बनविण्यासाठी सॅकरीनचे इंजेक्शन टोचतानाचे छिद्र असु शकेल.

यात नवीन काही वाटत नाही. आमच्या शेजाऱ्यांनी या लॉकडाऊन मध्ये आल्याची दारू (अद्रकी), गुळाची दारू आणि आंब्याची दारू बनवली. पिणाऱ्या लोकांना खूप आवडली (म्हणे).

कमीत कमी कंटेंट्स आणि द्राय यीस्ट एवढंच वापरलं होतं. तिन्ही रेसिपी whatsapp वर फेमस आहेत. तुम्हाला आली नाही का कुठून फॉरवर्ड होत होत?

या रेसिपी प्रसाद शिरगावकर यांच्या आहेत
त्यांनी जांभूळ, कोकम च्या पण सुंदर वाईन्स बनवल्या आहेत
दारू कशी प्यावी या धाग्यावर विस्तृत दिल्या।आहेत

या रेसिपी प्रसाद शिरगावकर यांच्या आहेत
>> हो बरोबर. मलाही आल्या होत्या खूप ग्रुप्सवर.

रच्याकने हे लिखाण यांनी विनोदी मध्ये टाकलंय. पण ते स्वतः आणि कमेंट्स देणारे सगळे सिरियसली बोलत आहेत.

>>दीड किलोच्या फळात १५० एमेल. ( पण खंभा निघायचा म्हणजे ७५० एमेल ना?)>> १ लिटर मध्ये १० थेम्ब असं म्हणतोय.  १५० ml ७५० x २ = १५०० ml पाण्यात मिक्स करायची . म्हणजे २ खंबे बरोबर होतात . अनुभवाचे बोल आहेत. रसायन खूप स्ट्रॉंग होतंय . पूर्वी पुण्यामध्ये शिवाजीनगर ला एक भैया झटका भेळ द्यायचा . डाव्या खांद्यावर डोकं ठेवून  सॉलिड मान हलवायचा. तसं डोकं हलायला लागतंय . एकदा चव तर बघा !
 मामू

या स्टार्ट अप साठी सरकारकडून जमीन मिळेल का ? संपूर्ण भारतभर सप्लाय साठी किती कुकर लागतील ? ब्यांकेचं लोन मिळेल का ?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
>>>कलिंगडात त्या पातळीवर जाण्यापुर्वी. टोमॅटोला वगैरे बुडबुडे आलेले पाहिले आहेत.>>>

चाकणच्या बाजारात ट्रकचा ट्रक टोमॅटो फेकून दिले जातात...... जर ते टोमॅटो मला मिळाले तर मी जेनेरिक दारू तयार करून फक्त दहा टक्के किमतीस विकू शकेन ! बघा बुवा कोणाला पाहिजे असेल तर आजच ऑर्डर नोंद करा
मामू

Shark Tank वाले बोलवतायेत, मजबूत investment करणारेत वाटत, सहज चोरून ऐकल म्हणून सांगतोय

हंगाशी. हे आस्सं कायतरी कामाचं बोला. युट्यूबवर बगायचं अन साततोटी योजना सुरू.

मोहिनीमंत्र, वशीकरण, मध्यरात्रीची मुंबई, ईब्लीस, चंपक, ठकठक नंतर हातभट्टी असं चौफ्रे वाचन असायला लागतंय.

एखाद्या काढ्याचा धागा आला की पब्लिक गळा काढते. काय पुरावा आहे याचा? किती क्लिनिकल टेस्ट्स केल्यात? साईड इफेक्ट्स काय ते का लिहिलं नाही?
हे वाचून लोकांनी असा काढा करून प्याला आणि त्यांना काही झाले तर त्याला जबाबदार कोण? वगैरे.
पण धागा दारूचा म्हटले की सर्व काही माफ, वरून प्रोत्साहन वगैरे!

घोर कलियुग.
हे पडवळकलिंगड_दि_गार ! अब तेरा क्या होगा?

@ मानव,
कारण काढा हे औषध आहे. ईथले वाचून कोणीतरी ऊपचार म्हणून ते करण्याची आणि ते चुकीचे निघाल्यास त्या नादात उलट नुकसान होण्याची भिती असते. म्हणून तो सर्व निकषांवर काटेकोरपणे तपासूनच घ्यायला हवा.

याऊलट दारू मुळातच एक वाह्यात पेय आहे जे शरीराला अपायकारक असते. पिणाऱ्याने ते स्विकारले असते. मग अजून कमी जास्त झाले तरी काय फरक पडतोय असा साधारण ॲटीट्यूड असल्याने फार चीरफाड केली जात नाही.

Pages