मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात आपल्या सरकारने तळीरामांची फारच पंचाईत करून ठेवली होती. आता तळीरामांना मात्र रोजच्या रोज नेहमीचा खुराक मिळायलाच लागतो. हे लोक करोनाला बिलकुल घाबरत नसतात. जर दोन दोन महिने दारूची दुकाने जर बंद रहात असतील तर या तळीरामांनी काय करावे बरं ? यावर कोणीतरी, काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. तो उपाय मी अथक प्रयत्नाने शोधून काढला आहे.
सध्या बाजारात कलिंगड विकणारे भरपूर बसलेले असतात. कलिंगड आतून कसे छान लाल आहे हे दाखवण्यासाठी, ते कलिंगडाला, विशिष्ट प्रकारे सुरी खुपसून त्रिकोणी काप / फोड काढतात. ही फोड / काप कलिंगडाच्या ढिगार्यावर ठेवतात.
आता हे कलिंगड दिवसभर तसेच उघडे रहात असते. त्याच्यावर धूळ, माशा वगैरे बसतात . त्यामुळे कलिंगड कोणीही विकत घेत नाही. मी मंडईजवळ राहत असताना आमच्या मंडईतल्या एका मित्राला विचारलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की ही कलिंगडे वाया जात असतात . आम्ही रोज ती फेकून देतो. माझ्या मनात असा विचार आला की रोज हे लोक किती कलिंगडे फेकून देत असतील ? याचा काहीतरी उपयोग व्हायला हवा ! त्यावर दिवसरात्र संशोधन करून मी हातभट्टी कशी बनवावी याचे संशोधन केले आहे. त्याची रेसिपी अशी आहे.
प्रथम या कलिंगडाची त्रिकोणी फोड बाजूला काढून आत मध्ये नवसागर गूळ किंवा सध्या बाजारात मिळणारे यीस्ट टाकून ठेवायचे. ( अंदाजे एक चमचा ). आणि त्रिकोणी फोड परत जागेवर लावून ठेवायची. शक्यतो हे कलिंगड गरम हवेत ठेवावे. ( फ्रिज च्या मागच्या बाजूला हवा खूप गरम असते). साधारणपणे हे यीस्ट एक किंवा दोन दिवसात पूर्ण कलिंगडाला फरमेंट करते .
अश्या फरमेंट झालेल्या कलिंगडाचा गर किंवा लगदा प्रेशर कुकरमध्ये ठेवून गॅस चालू करावा . त्यानंतर कुकरची शिट्टी काढून शिट्टी च्या जागी एक प्लास्टिकची नळी जोडावी . ही प्लास्टिकची नळी ओट्यावर ठेवलेल्या दोन बर्फाच्या ट्रे मधून खाली ठेवलेल्या बाटलीत सोडावी. कुकरमधून भरपूर वाफ यायला लागली की बाटलीमध्ये तुमची पहिल्या धारेची तयार होते. एक लक्षात घ्या ही भयंकर स्ट्राँग असते. तीस मिली जरी प्यायली तरी तुम्हाला भयंकर कीक येऊन फेफरे येऊ शकते . त्यामुळे एक लिटर पाण्यामध्ये दहा थेंब टाकून तिला डायलूट करावे लागते (अनुभवाचे बोल आहेत). एका कलिंगडात साधारण दोन खंबे सहज होऊ शकतात ! तुम्ही कलिंगडा ऐवजी द्राक्ष संत्री-मोसंबी चिकू किंवा कोणतीही सडकी फळं पण वापरू शकता !
नविन उद्योगांना राज्य सरकार जमिनी, विकत किंवा भाड्याने.देवू इच्छित आहे. राज्याचे आॅक्सिजनवर असलेल्या अर्थशास्त्रास सांभाळणारा हा उद्योग असल्यामुळे राज्याचे आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता दाट आहे. मी स्वत: आत्मनिर्भर होताना इतरांना निर्भर करत आहे. माझी कल्पना प्रत्यक्षात कधी उतरतेय याची वाट पाहत आहे. आतापर्यंतच्या संशोधनात हेच एकमेव संशोधन ज्यात सामाजमनाचे भान ठेवले गेले आहे.
माझी ही रेसिपी कॉपीराइट केलेली आहे. या रेसिपीचा कोणीही कमर्शियल वापरासाठी उपयोग करता कामा नये. या रेसिपीचे सर्व अधिकार माझ्याकडे आहेत . मी सरकारकडे स्टार्टअप साठी लवकरच अर्ज करीत आहे.
… मामू
माझ्याकडे याची साग्रसंगीत
माझ्याकडे याची साग्रसंगीत रेसीपी आहे. (पयल्या धारेची :)) )
वाह्यात पेय हा शब्दप्रयोग
वाह्यात पेय हा शब्दप्रयोग आवडला
हे पेय dambis चेहरा करून मिश्कीलपणे माझ्याकडे बघत आहे असा भास झाला

लुत्फ़-ए-मय तुझ से क्या कहूं
लुत्फ़-ए-मय तुझ से क्या कहूं मानव
हाए कम-बख़्त तू ने पी ही नहीं
या वाह्यात पेयातूनच
या वाह्यात पेयातूनच ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेतला म्हणतात. जे फ्रेंचांना नाही जमलं.
<हाए कम-बख़्त तू ने पी ही
<हाए कम-बख़्त तू ने पी ही नहीं >
डायलॉगच मारायचे असतील तर हे शस्त्र सोडून अहिंसा स्वीकारलेल्या सम्राट अशोकला "हाए कम-बख्त तू लढा ही नही" म्हटल्या सारखे आहे.
तुलनेत मुद्दाम अतिशयोक्ती केली आहे जशी मूळ डायलॉग मध्ये आहे, पण मी दारूला स्पर्श न केलेली व्यक्ती नाही. आणि काढ्याने होत आहे रे अशा धाग्यावर अग्रेसरपणे विरोध करत तुटून पडणाऱ्यांपैकी नसलो तरी तिथे नसते दावे न करु नयेत, योग्य ते डिस्क्लेमर टाकावेत, महासाथ सुरू असताना असले दावे पोस्टच करू नयेत असे सांगण्यात मी पुढे असतो.
तिथे 'काय माहित कोणी तरी खरेच या काढ्यांचे प्रयोग करतील, कुणाला काही झाले तर? (इत्यादि) / लोकांना उगाच सुरक्षित वाटून ते ढिले पडतील, त्याला जबाबदार कोण?' असे खडे सवाल विचारणारे (मीही त्यातल्या एक), दारूच्या धाग्यावर मात्र वेगळेच धोरण बाळगतात हे दाखवण्याचा उद्देश होता.
----------
तुम्ही अशी इकडे एक, दुसरीकडे वेगळी भूमिका असे करत नाही, हे चांगले असले तरी दारूचे उदात्तीकरण करू नये असे सुचवेन. "मला आवडते, जराशी नशा म्हणा की inhibitions दूर होण्यामुळे येणारे रिलॅक्सेशन म्हणा, काहीच काळा करता का होईना स्ट्रेस पासून मिळणार रिलीफ म्हणा/ अजुन काही " यासाठी मी पितो असे म्हटल्याने कोणी शेम शेम थोडीच म्हणणार आहे.
मानव- काढा बेकार आहे.. त्याचे
मानव- काढा बेकार आहे.. त्याचे उदात्तीकरण मी कधीच करणार नाही...
Pages