मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात आपल्या सरकारने तळीरामांची फारच पंचाईत करून ठेवली होती. आता तळीरामांना मात्र रोजच्या रोज नेहमीचा खुराक मिळायलाच लागतो. हे लोक करोनाला बिलकुल घाबरत नसतात. जर दोन दोन महिने दारूची दुकाने जर बंद रहात असतील तर या तळीरामांनी काय करावे बरं ? यावर कोणीतरी, काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. तो उपाय मी अथक प्रयत्नाने शोधून काढला आहे.
सध्या बाजारात कलिंगड विकणारे भरपूर बसलेले असतात. कलिंगड आतून कसे छान लाल आहे हे दाखवण्यासाठी, ते कलिंगडाला, विशिष्ट प्रकारे सुरी खुपसून त्रिकोणी काप / फोड काढतात. ही फोड / काप कलिंगडाच्या ढिगार्यावर ठेवतात.
आता हे कलिंगड दिवसभर तसेच उघडे रहात असते. त्याच्यावर धूळ, माशा वगैरे बसतात . त्यामुळे कलिंगड कोणीही विकत घेत नाही. मी मंडईजवळ राहत असताना आमच्या मंडईतल्या एका मित्राला विचारलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की ही कलिंगडे वाया जात असतात . आम्ही रोज ती फेकून देतो. माझ्या मनात असा विचार आला की रोज हे लोक किती कलिंगडे फेकून देत असतील ? याचा काहीतरी उपयोग व्हायला हवा ! त्यावर दिवसरात्र संशोधन करून मी हातभट्टी कशी बनवावी याचे संशोधन केले आहे. त्याची रेसिपी अशी आहे.
प्रथम या कलिंगडाची त्रिकोणी फोड बाजूला काढून आत मध्ये नवसागर गूळ किंवा सध्या बाजारात मिळणारे यीस्ट टाकून ठेवायचे. ( अंदाजे एक चमचा ). आणि त्रिकोणी फोड परत जागेवर लावून ठेवायची. शक्यतो हे कलिंगड गरम हवेत ठेवावे. ( फ्रिज च्या मागच्या बाजूला हवा खूप गरम असते). साधारणपणे हे यीस्ट एक किंवा दोन दिवसात पूर्ण कलिंगडाला फरमेंट करते .
अश्या फरमेंट झालेल्या कलिंगडाचा गर किंवा लगदा प्रेशर कुकरमध्ये ठेवून गॅस चालू करावा . त्यानंतर कुकरची शिट्टी काढून शिट्टी च्या जागी एक प्लास्टिकची नळी जोडावी . ही प्लास्टिकची नळी ओट्यावर ठेवलेल्या दोन बर्फाच्या ट्रे मधून खाली ठेवलेल्या बाटलीत सोडावी. कुकरमधून भरपूर वाफ यायला लागली की बाटलीमध्ये तुमची पहिल्या धारेची तयार होते. एक लक्षात घ्या ही भयंकर स्ट्राँग असते. तीस मिली जरी प्यायली तरी तुम्हाला भयंकर कीक येऊन फेफरे येऊ शकते . त्यामुळे एक लिटर पाण्यामध्ये दहा थेंब टाकून तिला डायलूट करावे लागते (अनुभवाचे बोल आहेत). एका कलिंगडात साधारण दोन खंबे सहज होऊ शकतात ! तुम्ही कलिंगडा ऐवजी द्राक्ष संत्री-मोसंबी चिकू किंवा कोणतीही सडकी फळं पण वापरू शकता !
नविन उद्योगांना राज्य सरकार जमिनी, विकत किंवा भाड्याने.देवू इच्छित आहे. राज्याचे आॅक्सिजनवर असलेल्या अर्थशास्त्रास सांभाळणारा हा उद्योग असल्यामुळे राज्याचे आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता दाट आहे. मी स्वत: आत्मनिर्भर होताना इतरांना निर्भर करत आहे. माझी कल्पना प्रत्यक्षात कधी उतरतेय याची वाट पाहत आहे. आतापर्यंतच्या संशोधनात हेच एकमेव संशोधन ज्यात सामाजमनाचे भान ठेवले गेले आहे.
माझी ही रेसिपी कॉपीराइट केलेली आहे. या रेसिपीचा कोणीही कमर्शियल वापरासाठी उपयोग करता कामा नये. या रेसिपीचे सर्व अधिकार माझ्याकडे आहेत . मी सरकारकडे स्टार्टअप साठी लवकरच अर्ज करीत आहे.
… मामू
बायका कुरडाया करण्याकरिता
बायका कुरडाया करण्याकरिता गहू भिजवतात ते पाणी वापरुन व्होडकादेखील बनवता येईल.
भन्नाट
भन्नाट
दारू कशी प्यावी हा धागा
दारू कशी प्यावी हा धागा मायबोलीवर होता...
आता दारू कशी बनवावी याची चर्चा होऊ लागली तर मला माझी सारी ताकद पणाला लाऊन हा धागा ऊधळून टाकावा लागेल.
मग सई स्वप्निल शाहरूख एमेन्सी गर्लफ्रेँड रुमाल मिलिंद सोमन अरबाझ खान हिमेश रेशमिया मोदी काँग्रेस ठाकरे आरे सारे या धाग्यात आणावे लागले तरी मी ते आणेन...
हे तुमचे इन्व्हेन्शन आहे?फारच
हे तुमचे इन्व्हेन्शन आहे?फारच छान.(जर जोक करत नसाल तर)
ब्रिवरी लायसन्स घेऊन चालू करून टाका युनिट.
अजून कोणी ही कल्पना वापरली नाहीये
धागा खरा असेल तर तुम्ही ती इथे लिहिणंही कितपत सुरक्षित आहे माहीत नाही.
उद्योगासाठी शुभेच्छा.
एका कलिंगडात साधारण दोन खंबे
एका कलिंगडात साधारण दोन खंबे आणि त्यातही तीस मिलीमध्येच फेफरे आणायची सोय म्हणजे मग अजून काय पायजे... येऊ द्या लवकर तुमचा स्वदेशी कॉलिंग्वोडका मार्केटमध्ये... बादल्या घेऊन येऊ आम्ही...!

कलिंगडाची कुल्फी करा रे..
कलिंगडाची कुल्फी करा रे.. पोरं बाळं आवडीने खातील.. त्यांचे आनंदाने भरलेले चेहरे बघा.. बेवडे कसले बनवत आहात जे फळ निसर्गाने त्याचा आस्वाद चाखायला दिलेय ते अश्या पद्धतीने त्यात बिघाड करू नका..
अभिषेक लावच तुझे सगळे प्रयत्न
अभिषेक लावच तुझे सगळे प्रयत्न पणाला, जितके लावशील तितका धागा पहिल्या पानावर राहील. उद्देश्य सफल
छान प्रयत्न चॅम्प
छान प्रयत्न चॅम्प
पण मी लक्ष ठेऊन राहणारच ईथल्या प्रतिसादांवर
कारण
मी या धाग्यावरून कायमची रजा घेतली तरी ईतर हजेरी लावणारच आणि एकेक आयड्या शेअर करणारच आणि धागाही धावता राहणारच..
पण आता अडखळत चालणार हा धागा
असो
कोणाच भलं व्हायला थोडा वाईटपणा घ्यावा लागला तर तो घ्यावा
ऋन्मेष - हा धागा वाचून कोणी
ऋन्मेष - हा धागा वाचून कोणी घरी दारू बनवायला जाणार नाही.
दारूला विरोध करून दारू कोणीही सोडत नाही. दारू माणूस स्वतःच सोडतो. जसा मी !
आणखी एक - प्रत्येक दारू पिणारा बेवडा नसतो.
धागालेखक - साखर टाकलीत तर आणखी चांगली होऊ शकेल.
ऋन्मेष - हा धागा वाचून कोणी
ऋन्मेष - हा धागा वाचून कोणी घरी दारू बनवायला जाणार नाही.
दारूला विरोध करून दारू कोणीही सोडत नाही. दारू माणूस स्वतःच सोडतो. जसा मी !
आणखी एक - प्रत्येक दारू पिणारा बेवडा नसतो.
धागालेखक - साखर टाकलीत तर आणखी चांगली होऊ शकेल.
ली झिकी च्या एका व्हिडीओत ती
ली झिकी च्या एका व्हिडीओत ती क्राफ्ट बीअर बनवते त्याचे साद्यंत चित्रण आहे गव्हा पासून . एका एपिसोड मध्ये ते सर्व मिळऊन लिटरली घरासमोअर च भट्टी लावतात व गावठी हार्ड लिकर बनवतात. बीअर वाला एपिसोड बघून मला निदान आपण घरी बीअर तरी बनवून बघावी असा विचार आला होता. पुढच्या लॉक डाउन मध्ये कामी येइल.
लेख मस्त जमला आहे मामू. ऑनलाइन विक्री करणार का? नेचर्स बास्केट व ऑनलाइन बीअर व वाइन उपलब्ध आहे.
एका चारशे ग्रामस कलिंगडात
एका चारशे ग्रामस कलिंगडात चाळीस ग्रामस कार्बोहाइड्रेडस असावेत फारतर. बाकी पाणी. त्यातून चाळीस एमेल शुद्ध मद्यार्क होऊ शकेल. हा दोन खंब्याचा ऐवज?
बाहेर येणारी वाफ पाच पाच एमेल पेटवून पाहावी लागेल. ९५% च्या खाली मद्यार्क आल्यावर ते पेटणार नाही.
माझ्या गावी ओढ्याच्या काठावर
माझ्या गावी ओढ्याच्या काठावर एका गोंड व्यक्तीने लावलेली मोहाची भट्टी बघितलेली आठवली. त्याचा मुलगा तिथेच मासेही धरत होता.. चाखण्याची सोया असेल कदाचित!
रच्याकने, हातभट्टीची प्रोसेस
रच्याकने, हातभट्टीची प्रोसेस फार सोपी आहे. किण्वन आणि उर्ध्वपातन.. विचार करतोय मोहाच्या ऐवजी गुलाबफुले वापरून प्रोयोग करून पाहावा का?
या पेक्षा वाईन बनवणे सोपे
या पेक्षा वाईन बनवणे सोपे वाटत आहे
या हंगामात किमान जांभूळ आणि कोकम याची वाईन बनवणार असे ठरवले आहे
किण्वन आणि उर्ध्वपातन..>>
किण्वन आणि उर्ध्वपातन..>> अगदी. कुकरचा इतका छान वापर होऊ शकतो ह्या आयडीयाच्या कल्पनेला धन्स.
माझ्याकडे परवाच एक कलिंगड
माझ्याकडे परवाच एक कलिंगड क्रॅक असल्याने वाया गेले.त्यातून फेस आणि आवाज येत होता.बारीक तुकडे कापून कंपोस्ट मध्ये फेकले.
शक्य असते तर तुम्हालाच दिले असते.
ऋन्मेष - हा धागा वाचून कोणी
ऋन्मेष - हा धागा वाचून कोणी घरी दारू बनवायला जाणार नाही.
>>>>>>
जाणार !
जसे पाकृचे धागे बघून लोकं तो पदार्थ बनवायला जातात.
दारूला विरोध करून दारू कोणीही सोडत नाही. दारू माणूस स्वतःच सोडतो. जसा मी !
>>>>
तुमचा अनुभव कधी लिहिताय याची वाट बघतोय.
माझे काम बहकणारया आणि चुकीच्या वाटेने जाणारया लोकांना सावध करत राहणे. भले ते मला इग्नोर करोत वा माझा राग करोत.
व्यसनी लोकांबद्दल कळकळ आणि सहानुभुती दाखवतानाच जर ते त्या स्टेजला जाण्याआधीपासूनच त्यांना सावध करत राहिलो तर ते आणखी चांगले नाही का.
बाकी मी कोणाचा हातातला ग्लास खेचून खाली ठेवत नाहीये. एखादा माझा खास मित्र असेल आणि तो माझा अधिकार असेल तरच हे करू शकतो.
आणखी एक - प्रत्येक दारू पिणारा बेवडा नसतो.
>>>>>
व्याकरणानुसार दारू पिणारया व्यक्तीला दारुडा म्हणतात. जास्त पित असेल तर अट्टल, टाकी वगैरे विशेषण वापरू शकतो. बाकी दारूडा किंवा बेवडा हा शब्द अपमानास्पद वाटावा यातच दारू हे वाह्यात पेय आहे हे सत्य दडले आहे
बोलत रहा
बोलत रहा

पोस्ट टाकत रहा
आणि या धाग्याचा प्रसार करत रहा
जे काही टक्के लोक (माझ्यासारखे जे तिसऱ्या पानाच्या पुढे जायचे कष्ट घेत नाहीत ) ते तुझ्या कृपेने जास्तीत जास्त या धाग्यावर येतील
अनु, कलिंगडातुन आवाज येत होता
अनु, कलिंगडातुन आवाज येत होता? काय भयंकर कलिंगडं आणता तुम्ही?
मी पण दारु पिणार्यांना दारुडा/डी म्हणते. शाकाहारी, मांसाहारी तसं...
विनोद न कळणं वाईटच...
विनोद न कळणं वाईटच...
पण तो कळूनही कंटाळवाणा पध्दतीने स्वतःला इतरांवर लादण्याची मनोवस्था जास्तच वाईट, नव्हे का..?
आँ निरु मी काय केलं? फक्त
आँ निरु मी काय केलं? फक्त जवळच्या मित्रमैत्रीणींनाच म्हणते आणि त्यांनाही माहिती असतं मी मजा करते ते. अनोळखी मानवाला नाही म्हणत जाऊन.
ज्याची मराठीची बोंब आहे तो आज
ज्याची मराठीची बोंब आहे तो आज व्याकरणावर बोलताना पाहुन डोळे पाणावले
अहो नाही सुनिधी...
अहो नाही सुनिधी...
हे तुमच्यासाठी नाही.
मी टाईप करेपर्यंत नेमकी तुमची पोस्ट आली.
कृपया गैरसमज नसावा.. _/\_
अगं खरंच सुनिधी.मी घाईत न
अगं खरंच सुनिधी.मी घाईत न बघता आणलं होतं.त्यावेळी उन्हाळा पण एकदम पिक ला होता. आणि डायनिंग टेबलवर ठेवून विसरून गेले.मग छोट्या मेम्बराने येऊन सांगितलं की त्या कलिंगडाची भीती वाटतेय आणि त्यातून करकर आवाज येतोय.
मग ते कापलं.अगदी दुसऱ्या बाजूचा भाग पण वापरण्यातला नव्हता.
परवाच पेपरमध्ये एका कलिंगडाचा स्फोट झाल्याची पण बातमी वाचली.
मामुसाहेब इथे धागे
मामुसाहेब इथे धागे काढण्यापेक्षा लवकरच हा प्रकल्प सुरु करा. आणि उद्घाटनाला बोलवा सगळ्यांना.
मी पण दारु पिणार्यांना
मी पण दारु पिणार्यांना दारुडा/डी म्हणते. शाकाहारी, मांसाहारी तसं.
>>>>
एक्झॅक्टली
आता यात मी फक्त सणवारालाच मांसाहार करतो, रोज रोज नाही तर मला मांसाहारी बोलू नका याला काही अर्थ नाही.
मी तर वर्षाचे ३६५ दिवस मांसाहार करतो वा करू शकतो. आणि मला अट्टल मांसाहारी कोणी बोलले तरी त्याचे काही एक वाईट वाटत नाही
कारण मुळातच मांस खाणे हे काही वाईट नाहीये.
जे काही टक्के लोक
जे काही टक्के लोक (माझ्यासारखे जे तिसऱ्या पानाच्या पुढे जायचे कष्ट घेत नाहीत ) ते तुझ्या कृपेने जास्तीत जास्त या धाग्यावर येतील
>>>>
माझाही हाच हेतू आहे
लोकांनी या धाग्यावर वारंवार यावे आणि माझ्या सगळ्या पोस्ट वाचाव्यात.
आमच्याकडेही स्वयंपाक घरात
एकदा आमच्याकडेही स्वयंपाक घरात ठेवलेल्या एका कलिंगडामधून स्स सर्र असा आवाज येऊ लागला. वाटलं पाली झुरळं उंदीरपिल्लू असलं काही प्रकरण शिरलं की काय घरात. त्या आधी स्टवच्या बर्नर्सकडे धाव घेतली. तिथे सर्व ठीकठाक होतं. मग शोधाशोध. बरीच भांडी, सामान बाहेर निघालं. मग बारकाईने कानोसा घेत घेत कलिंगडापाशी पोचलो. तर त्या फळाला एक बारीक छिद्र किंवा पंक्चर दिसलं. त्यातून गॅस बाहेर पडत होता आणि गॅसबरोबर थोडे थोडे पाण्याचे फवारेही निघत होते. झटकन उचलून सिंकजवळ ठेवतो ना ठेवतो तोच फट्ट आवाज करून ते फळ फुटलं. घाणेरडा वास पसरला.
ती दारू होती काय?
घाणेरडा वास पसरला.
घाणेरडा वास पसरला.
ती दारू होती काय? Lol
>>>
शक्य आहे
Pages