भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह तुमची कोविड ची वारी झालेली दिसतेय? बिचारा ओडिन. २ दिवस त्याला कळालेच नाही इतपत स्ट्रिक्ट क्वारन्टाइन केले ? हे जमणेच अवघड आहे .
पानवाल्याकडचा किस्सा भारी Happy

सुदैवाने आमच्याकडे वरती खाली अशी सिस्टीम आहे, वरच्या खोल्याना स्वतंत्र टॉयलेट बाथरूम असल्याने मला वरच्या मजल्यावर डांबून बाहेरून कडीच घातली होती. फक्त जेवण खाणं आणून द्यायचे.
असाही तो खालीच जास्त वेळ बागडत असतो,मागे पुढे अंगण आहे, झाडं आहेत. फक्त झोपायला आमच्यासोबत वरच्या खोलीत येतो.
त्यामुळे येड्याला कळलंच नाही, आणि दादू आणि आई सगळे खालीच झोपत होते त्यामुळे त्यांच्यासोबत हाही तिथेच मुटकुळे करून.
आईकडून दरवाजा उघडा राहिला तेव्हा आला आणि त्याने पाहिलं मला. तेव्हा त्याला आवरताना नाकी नऊ आले. त्याला बहुदा वाटलं मी गावावरून आलो ते थेट इथेच.

हो त्यांनाही होतो पण तो खूप आधीपासूनच आहे
कारण याचा बूस्टर डोस बघितला होता त्यात कोविड होता, तेव्हा आपल्या लशी यायच्या होत्या. मी व्हेटना विचारल की आपल्या आधी यांची लस आली का, तर म्हणे नाही ही कानाईन कोविड वेगळा आहे

पण आपल्याकडून त्यांना किंवा त्यांच्याकडून आपल्याला होत नाही, त्यांच्या त्यांच्यात इन्फेक्शन होऊ शकतं म्हणे

सोनी लिव्ह असेल तर त्यावर life off the leash सिरीज बघा
मुंबईतले एक कपल त्यांच्या दोन भूभ्याना घेऊन भारत फिरतात
आणि सगळीकडे कसे राहतात,लोकांना भेटतात, त्यांचा एक लॅब आणि एक गोल्डन रित्रीव्हर कसे एन्जॉय करतात यावर आहे

धमाल आहे

https://youtu.be/o9r17UUYDW8

https://vcahospitals.com/know-your-pet/coronavirus-disease-in-dogs

अदिती हे बघा

पण आपल्या भुभुच्या बूस्टर डोस मध्ये असते त्यावर लस त्यामुळे फार काळजीचे कारण नाही
दर वर्षी न चुकता बूस्टर देणे मस्ट
त्यात कारण गॅस्ट्रो वर पण असते आणि तो जास्त त्रासदायक आहे

कोणी क्लिफर्ड द रेड बिग डॉग पहिला का??

अतिशय धमाल सिनेमा आहे, लहान मुलांना आवडेल खूपच
आणि भुभु प्रेमी असाल तर अगदीच

ते रेड भुभु सेम ओड्या सारख दिसतं आमच्या

https://youtu.be/4zH5iYM4wJo

जॅक लंडन चे याच नावाचे पुस्तक आहे त्यावर आधारित आहे का
मला खूप त्रास झाला ते वाचताना
अक्षरशः रडूच येत होतं
तेच नसेल तर नको बाबा, नई बघणे व्हायचं

The call of the wild (2020) पाहिला का?>>>

हो... खूप हळवा करणारा आहे... विशेषतः प्राणीप्रेमीना. मला तर त्या मोठ्या भूभूला पटकन दत्तकच घ्यायचे होते.

I wish that every strey dog in the world should meet an old man like Harrison Ford ....

The call of the wild मधे तो सिजिआय कुत्रा आहे तो बघून विचित्र वाटले होते, बघितला नाही संपूर्ण.
इकडे काल जोरदार विंटर स्टॉर्म झाले. भरपूर स्नो झाला. जनरली माउई ला आवडतो स्नो. काल गंमत झाली त्याची. स्नो ६-७ इन्च पडला आहे पण वार्‍याने उडून कुठे मोठे तर कुठे लहान ढीग झालेत. तर माउई स्नो बघून सकाळी सकाळी उत्साहात बाहेर गेला. पॅटिओ च्या पायरीवरून खाली उतरला तर भस्कन निम्मा आतच गेला Happy घाबरलाच मग एकदम अन घरात आला तातडीने. मग(पॉटी चे वांधे झाल्याने!) फुल्ल अ‍ॅन्क्शस होऊन एकदा बाहेर अन एकदा माझ्या तोंडाकडे बघत बसला होता. नवर्‍याने कोट ग्लव्ज बूट्स वगैरे जामानिमा चढवून बाहेर जाऊन थोडी पायवाट आणि एक लहान बॅकयार्ड चा पॅच असा स्नो क्लियर केला. तसा खूष होऊन लगबगीने माव्या बाहेर जाऊन काम उरकून आला मग Happy आता स्नो वितळेपर्यन्त ३-४ दिवस बाहेर वॉक नाहीच, हे असेच काम चालवावे लागते!

आमचा मोती सुध्दा सकाळी उठल्या बरोबर बाहेर दरवाज्या जवळ बसुन माझी वाट पहातो, जसा साखळीचा आवाज झाला रे झाला धावत येऊन माझ्या अंगावर चढतो. गेट उघडले कि सुरु इथे हुंग तिथे हुंग, कर टांग वर, फार लांब गेलो कि नित्यक्र्म आटोपतो आता बस म्हटले की घराकडे वळतो. मांजर, तिच्या पिला सोबत मस्ती करतो, त्या जास्त धाक दाखवितात हा फक्त गुरगुरतो. सकाळ झाली की मांजर तिची पिल्ल माझ्या मागे मागे दुध प्यायला हजर असतात.

ट्विटर वर असे कुत्र्यांचे उप द्व्याप खूपच आहेत. ट्वि टर मला खूप सूचना देत असते की टाइम लाइन वाढ्वा . पण मला कुत्री मांजरीच बघायची असतात. उगीच का ताप वाढवा!!

आमच्या कडे नवीन गादी घेतली चांगली वाली. स्लीप वेल, स्पाइन सपो र्ट. बरोबर दोन उश्या टाम टुम फ्री आल्या. तर आमची स्वीटू बाई एकदम खूश . व वर चढून रजई वर पडून झोपून गेली. मला अगदी " ले!! " मोमेन्ट कारण हिला वर चढ उतर करायला नको पाठीला त्रास व्हायला नको म्हणून आम्ही खाली गादी टाकून / कार्पेट वर क्विल्ट टाकून असे झोपायचो. मध्यंतरी इथे थंडी होती तेव्हा जमीन गार व्हायची व गारठा आम्हाला बाधत होता. गादी आल्या पासून बोन पेन्स गायब व हिला पण त्याचा उपयोग होत आहे. मौ उशा क्विल्ट असले की खूश.

काल हपिसातुन यायलाच सात झाले मग वॉकीज राहिले. आता पहाटे उठून कारेक्रम उरकून सोफ्यावर परत झोपुन गेले आहे स्वीटी. मी पण आता पोस्टून उजेड होई परेन्त झोपणार. शुभ सकाळ रात्री.

आमच्या गल्लीत आज लग्न होते आणि त्यानिमित्त बँड वगैरे लावून वरात होती. पण तो बँड ओड्याला अजिबात म्हणजे अजिबात आवडला नाही आणि त्याने हे बंद करा च्या सुरात जे काही भुंकायला सुरुवात केले ते ऐकेच ना. म्हणलं अरे आधीच तो आवाज वर तुझा आवाज, तु तरी गप्प बस. पण त्याला बहुदा प्रचंड इरिटेट होत होते त्या आवाजाने, नुसता सैरभैर पळत होता आणि भुंकत होता. बिचारा, त्याला मग शेवटी गाडीवर घातला आणि लांब चक्कर मारून आणली. येईपर्यंत बँड थांबला होता म्हणून बरे.

सगळ्या पोस्टी मस्त. भरत यांनी पाठवलेल्या लिंकच्या खाली अजून एक व्हिडिओ आहे. त्यात भुभुच्या खायची व्यवस्था एकदम भन्नाट आहे. बटण दाबले की खाऊ पुढ्यात. साठा भरून ठेवला की झाले. हवे तेंव्हा भुभु स्वत:च वाढून घेऊन खाऊ शकतात. Happy
उघडे राहिले, घाण झाले, सांडले, लवंडले, गरजे पेक्षा जास्त झाले, खरकटे राहिले, वगैरे भानगडी नाहीत.

>>>>> त्याला बहुदा प्रचंड इरिटेट होत होते त्या आवाजाने, नुसता सैरभैर पळत होता आणि भुंकत होता. बिचारा,
त्रास होत असणार Sad

बटण दाबले की खाऊ पुढ्यात. साठा भरून ठेवला की झाले. हवे तेंव्हा भुभु स्वत:च वाढून घेऊन खाऊ शकतात. >>> एवढी शहाणी हवीत ना पण ती. लाडावलेल्या भुभूज चे नखरे असतात. माउई ला ईटिंग टाइम! असं म्हटलं की जेवायची वेळ झाली हे कळतं. मग तो मी कसे त्याचे जेवण तयार करतीय ते बघतो लक्ष देऊन. पण जेवण वाढून त्याच्या खायच्या जागी ठेवले की जावे ना खायला गप, पण नाही. ते खाणे तिथे ठेवले की हा आधी जिथे असेल तिथे आडवा पडतो अन माझी वाट पहातो. मग मी जाऊन ५ सेकंद त्याला बेली रब, चेस्ट रब वगैरे दिला की मग काहीच न झाल्यासारखा उठतो अन जातो खायला Lol काय एकेक डोक्यात चालते काय माहित! Happy

जिथे असेल तिथे आडवा पडतो अन माझी वाट पहातो. मग मी जाऊन ५ सेकंद त्याला बेली रब, चेस्ट रब वगैरे दिला की मग काहीच न झाल्यासारखा उठतो अन जातो खायला Lol काय एकेक डोक्यात चालते काय माहित! Happy>>> हेहेहेहे लाडू आहे. क्युटच

Pages