भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माव्या म्हणजे कार्टून आहे एक

पण भूभ्याना खायला घालणे हा एक अतिशय आनंददायी प्रकार आहे
मी ओडीन चे खाणे तयार करत असतो त्यावेळी त्याला इतका आनंद झालेला असतो की बागडत असतो अक्षरशः
आणि त्याला गो ची कमांड दिली नाही तर तसा बसून राहतो
एकदा मी त्याला जेवायला वाढले आणि गडबडीत निघालो
थोडा वेळाने बघतोय तर बापू तसेच बसलेला
म्हणलं काय झालं याला, आवडीचे चिकन तर आहे
मग लक्षात आले की आपण गो म्हणलं नाही, तोवर बिचारा तसाच बसून होता
अशा वेळी जे काय प्रेम वाटतं इतक्या गुणी बाळाबद्दल ते सांगता येत नाही
भरून येतं अगदी

आईगं बिच्चूडा्! एक पिक्चर मधला सीन आठवला, खेळा खेळात स्टॅच्यू दिलेला असतो ओव्हर म्हणायला विसरतो, तर ती मुलगी की मुलगा संध्याकाळ पर्यंत तशीच उभी असते ( हिंदी पिक्चर युद्धाचा होता बहुतेक)

सो क्यु ट. आमच्या कडे पण खाणे मेजर कार्यक्रम . भूक लागल्याचा एक सिग्नल म्हणजे कुत्रे एका विशि श्ट पद्धतीने जीभ बाहेर काढून ओठावरून फिरवतात.

आमच्याकडे एका प्लेfunction at() { [native code] } त ती स्टीलची स्नॅक प्लेट असते त्यात पेडिग्री एक बिस्किट पुडा व एक चिकन लेग असे बफे असते. स्वीटी हवे ते हवे त्यावेळेस घेते. हिची एक सवय म्हण जे झोपताना बरोबर काही तरी फूड आयटम घेउन मगच डोळे मिटा यचे. त्यासाठी काहीतरी जमिनीवर टाकून ठेवावे लागते. व आपण त्यावरून पडणार नाही हे बघत राहावे लागते.

आता बेड उंच झाल्याने झोपायला आल्यावर मागून पाय उचलुन वर हाकला मग बसून सेटल झाल्यावर अरे आपण काहीच आणले नाही हे लक्षात येते मग परत उचलून खाली ठेवा मग पळ त प ळ त अंधारात जाउन काही तरी आणायचे ते वर बसून क्विल्ट् वर सांदत सांदत खायचे.

मग कू कू करत इकडे तिकडे केविल वाणे बघायचे. की आई उठून शेजारी पाणी ठेवलेले अस्ते तो बोल उचलून वर ठेवते मग पाच सात मिनिटे श्लोप श्लोप श्लोपी श्लोप श्लोप करत पाणी पिणार मग पाच मिनिटात गाढ झोप. उशीवर् डोके व क्विल्ट वर. ते चेक करून आई गेम खेळत बसते. हुस्ष. म्हातार पणीचे लाड.

मी ज्या पपीज बंच ला खायला घालत होते ती मोठी झाली. आता डोळ्यात अनोळख आली आहे. व गाव भर फिरणे चालू आहे. भेटतातच असे नाही. बिल्डिन्ग मधील कोणीतरी बेसमेंटात एक पाइप गळत असतो त्या खाली एक मडके ठेवले आहे त्यात पानी जमत असते.

काल एक मांजर प्रेमी भेटला.

हे भू भू चं खाणं तयार करणे म्हणजे काय असतं. कारण आमच्या माऊ ला तर कॅट फूड असतं तेच देतो आम्ही. आणि चिकन ग्रेव्ही चे ट्रीट असतात ते देतो,.

भू भू साठी पण डॉग फूड असत ते घरी आणून परत शिजवून घ्यावे लागते का?

खूप प्रश्न आहे डॉग फूड बद्द्ल पण जेव्हा पूर्णपणे घ्याचं ठरेल तेव्हा बाकीचे

मी किबल्स देत नाही, दिलंच तर संध्याकाळी एक वाटी, खेळून किंवा पळून आल्यावर

पोळ्यांच्या मावशी येतात त्यांना जास्तीचे पैसे देऊन भाकऱ्या घेतो करून
त्यात चिकन शिजवून कुस्करून घालतो, कधी फ्रेश टू होम मधून चिकन लिव्हर, हार्ट, आणि गिझर्ड वेगवेगळ्या मागवतो आणि त्याचा एकेक तुकडा घालतो
भात असेल तर चिकन भात
ते सगळं झालं की त्या जेवणात कधी एक चमचा लिव्ह52 घालतो सिरप, कधी जवसाचे कधी खोबरेल तेल किंवा एक गोळी कॉड लिव्हर ऑइल ची (यामुळे त्यांची स्किन तुकतुकीत राहते, फर दाट होते)

व्हेज असेल तेव्हा भोपळा, गाजर, रताळे उकडून घालतो आणि एक अंडे

हे सगळं करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याचा दशांश वेळेत तो सगळा चट्टामत्ता करतो आणि शेपटी हलवत अजून आहे का विचारतो Happy

माउईचे खाणे मेनली किबल, व्हेट तेवढेच द्या म्हणतात , पण माउई ड्राय किबल खात नाही. त्यामुळे त्याला नुसते किबल न देता मी बॉइल्ड चिकन+ थोड्या व्हेजीज मिक्स करून असे देते. आठवडा भर पुरेल इतके चिकन आणि भाज्या ( गाजर, सेलरी, भोपळा, रताळे, यातल्या १-२ भाज्या) बॉइल करून मी डब्यात घालून प्रोशन्स मधे फ्रीज करते. मग ऐन वेळी फक्त एक पोर्शन मायक्रोवेव्ह मधे वॉर्म करून घ्यायचा. आणि ते किबल वर घालून द्यायचे. त्यामुळे तयार करणे फार काही मोठी प्रोसेस नाही, दोन मिनिट लागतात.

माझ्याकडे भविष्यात कुत्रा आला तर तो माझ्यापेक्षा हेल्दी खाईल आणि फिट असेल हे नक्कीच. तो मला पाळेल का विचारायला हवं Wink

हो माउईचे चिकन आणि भाज्या मी बॉइल करते तेव्हा आम्हीही नेहमी तेच म्हणतो, आपण पण असेच जेवले पाहिजे Happy
अजून मजेशीर सवय म्हणजे जेवल्यावर माव्याला २ अ‍ॅपल चे तुकडे खायची सवय आहे Happy खाणे खाऊन झाले की लगेच जिथे मी अ‍ॅपल्स ठेवते तिथे काउंटर पाशी जाऊन उभे रहातो. मग आधी एक तुकडा द्यायचा. तो अगदी खूश होऊन तो तुकडा घेऊन टपाटपा करत बाहेर्च्या खोलीत त्याच्या आवडत्या जागी जाऊन खातो कडाम कुडुम. मग दुसरा तुकडा घ्यायला टपाटपा करत पुन्हा हजर! Lol मग तिसर्‍यांदा नाही येत. त्यामुळे आम्ही म्हणतो माउईला काउंटिंग येते Happy

पोट बिघडले( कुत्र्याचे) तर अदमुरा दही भात. आंबे मोहोरचा ताजा गरम वाफेभरला भात व तूप पण आव् डीने खातात. मटन खिमा दोन चमचे एकावेळी. आपण पोळ्या करताना एक एक्स्ट्रा केली तर ती नंतर देता येते.( आम च्याकडे खाली टा कून ठेवायचा एक आयटेम आहे अर्धी पोळी) मग ती त्रिभु वन मिळाल्या सारखे शोधून उचलून आणायची.

पोर्शन वगैरे कळते का शंका आहे. नसेल बहुधा. कारण खूप कुत्री आख्खा पिझा, आख्खे चिकन टेबल वर/ काउंटर वर सापडले म्हणून खाऊन आजारी पडलेली माहित आहेत. जनरली कुत्र्यांना अ‍ॅक्सेस करता येईल असे फूड सोडू नये म्हणतात.

माझ्याकडे भविष्यात कुत्रा आला तर तो माझ्यापेक्षा हेल्दी खाईल आणि फिट असेल हे नक्कीच

Happy Happy Happy

आमच्याकडे हीच परिस्थिती आहे, ना तो कुठलेही जंक फूड खात, ना तेलकट तुपकट, ना मसाला, मीठ ना मैदा

गोड खातो पण तेही आम्ही त्याला लिमीटमध्येच देतो.

कोविडच्या गंमतीजमती आमच्या कडे अशा झाल्या. संध्याकाळी नवऱ्याला कणकण वाटू लागली म्हणून मी, तो आणि मुलगी (२१ वर्षे) सर्वांनी RAT केली. त्यात मी आणि नवरा पॉझिटिव्ह आणि मुलगी निगेटिव्ह असा रिझल्ट आल्याने आम्ही दोघे वरच्या मजल्यावर आयसोलेट झालो. त्या रात्री कुत्रे निओ (१२ वर्षांचा गोल्डन) आणि ब्लू (१० महिन्यांचा हस्की) मुलीच्याच खोलीत झोपले. घरी सासूबाई आणि त्यांची मदतनीस मुलगी असल्याने अधिक काळजी घेणे आवश्यक होते. दुसऱ्या दिवशी सर्वांचीच RTPCR केली. संध्याकाळी रिझल्ट येणार होता. तोपर्यंत मुलीनंच सगळं पाहिलं. सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे, कुत्र्यांचं जेवण वगैरे. आमचा चहा, नाश्ता, जेवण, पाणी वर आणून देणे तीच करत होती. ब्लू ला काही फरक पडला नव्हता. पण निओ मात्र दर वेळी तिच्या मागे वर यायचा आणि पहायचा. थोड्या वेळानं त्यानं आमच्या खोलीच्या दाराशीच ठाण मांडलं. त्याच्या चेहऱ्यावर असे भाव होते ना, की तो आता पोलिसांनाच फोन करणार आहे. ह्या मुलीनं आपल्या आजीला एका खोलीत आणि आई बाबांना दुसऱ्या खोलीत बंद केलंय, आणि त्यांना जेवण फक्त देतेय, बाहेर काही येऊ देत नाहीये. हे सगळं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. इतके मजेदार भाव होते ते. संध्याकाळी मुलीचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आला, तेव्हा आम्ही सगळेच वरच्या मजल्यावर आयसोलेट झालो. दोन्ही कुत्रे आमच्या खोलीत येऊन निश्वास टाकत पहुडले तेव्हाच त्यांना (आणि आम्हालाही) बरं वाटलं.

आम्ही आमच्या भुभु ला रेडी डॉग फूड्च देतो. ते ही ठरलेला ब्रॅन्ड च. त्याला बाकी अज्जिबात काही चालत नाही. अगदी ट्रिट्स सुध्धा . पेट्को मधे नेउन त्यन्च्या ट्रिटच्या ओपन स्टॉक मधला सगळं एक एक ट्राय करुन बघितल पण काहीही आवड्ला नाही त्याला. त्याला आम्ही सेंट म्हणतो. कसल्याही गोष्टीची आसक्ती नाहीये. टॉय, बसण्याची जागा कसल्याही बाबतीत पझेसीव्ह नाहीये. त्याचे कोणी फ्रेंडस आलेत की आरामात शेअर करतो...

आम्ही ज्योईला त्याचं जेवण म्हणून किबलच देतो. व्हेटच्या म्हणण्यानुसार इथली पेट स्टोअर बरच मार्केटींग करतात की कुत्र्यांना काहितरी वेट फूड, सप्लिमेंट द्यायला हवी वगैरे पण ते त्यामागे त्यांच्या व्यवसायाचा विचार करतात. जर मान्यतापात्र किबल असेल तर ते कुत्र्यांची हेल्थ लक्षात घेऊनच तयार केलेलं असतं त्यामुळे तेच खायची सवय लावा, जेणेकरून त्याला डॉगी होस्टेलमध्ये ठेवायची वेळ आली तर खायचे हाल होत नाहीत.
अर्थात ते रोज खाऊन त्याला कंटाळा येतोच. मग आम्ही कधी कधी त्यावर दही, भोपळ्याची प्युरी, त्याच्या चिकन ट्रीट्स आहेत त्यांचे बारीक तुकडे असं काही काही घालत असतो. तो सकाळी ९ वाजता आणि संध्याकाळी ६-६:३० अश्या दोनवेळी जेवतो. ३-४ वाजता खेळून फिरून झालं की स्नॅक्स म्हणून चिज, पोळीचे तुकडे वगैरे काहितरी खातो. उन्हाळ्यात ताकही देतो.
पोट बिघडलं असेल तर दही भात.
त्याला इडली पण खूप आवडते. हल्ली इडलीचा वास ओळखता यायला लागलाय. इडली पात्र उघडलं की लगेच धावत येतो. पोळ्यांच्या डब्याचा आवाज, पोळपाट लाटण्याचा आवजही ओळखतो !
अ‍ॅपल फारस आवडत नाही. अ‍ॅपलची फोड दिली की नुसतच खेळत बसतो, खात नाही. पण गाजर, पेअर वगैरे खातो.
शिवाय माझं पेट असल्याने गोडही आवडतच. अर्थात आम्ही फार देत नाही. पण मध्यंतरी श्रीखंड चाटवलं होतं. शिवाय एकदा गुलाबजाम आणि घासभर शिरा दिला होता. सगळ्याचा एकदम चट्टामट्टा Happy
आम्ही जेवणाच्या बाबतीत एक गोष्ट कटाक्षाने पाळतो ती म्हणजे आम्ही काही खात असताना त्यातला एखादा घास / तुकडा वगैरे त्याला घालत नाही. त्याला त्याचं खाणं आधी देतो किंवा आमचं खाऊन झाल्यावर देतो.
इति ज्योई जेवण पुराण समाप्त. Happy

एकूणच अमेरिकेत किंवा अन्य देशी किबल्स देण्याचे प्रमाण जास्तआहे असं वाटतंय

त्या बद्दल बरेच काही वाचलं आहे आणि रॉ फूड ची समांतर चळवळ उभी राहत आहे हेही

त्यांच्या मते भूभ्याना शिजवलेलेअन्न, किबल्स किंवा अन्य ट्रीट देणेच चूक आहे, ते प्राणी आहेत, त्याना निसर्गात मिळते तेच जेवण म्हणजे चामडी सकट मांस, हाडे वगैरे देणे योग्य

मी इंस्ता वर आशा लोकांना फॉलो करतो

फक्त फॉलो करतो Happy

त्यांच्या मते भूभ्याना शिजवलेलेअन्न, किबल्स किंवा अन्य ट्रीट देणेच चूक आहे, ते प्राणी आहेत, त्याना निसर्गात मिळते तेच जेवण म्हणजे चामडी सकट मांस, हाडे वगैरे देणे योग्य >>>>> हो, मी थोडंफार ऐकलं आहे त्याबद्दल. पण मग इथल्या दृष्टीने विचार करायचा तर कुत्र्यांना घराच्या आत ठेवणे हेच अननॅचरल आहे. आपण त्यांना नैसर्गिक हवामानाऐवजी हिटेड, कंडीशन्ड हवेत ठेवतो.
शिवाय एका परिसरातली ब्रीड दुसरीकडे नेऊन पाळणे वगैरेही अनैसर्गिक झाले. उदा. इथला जेमतेम उन्हाळाही हस्कींना सहन होत नाही आणि हल्ली भारतात हस्की पाळतात!
ह्याबाबतीत कुठपर्यंत जावं ह्याला काही लिमिट नाही.

हो म्हणूनच म्हणलं मी फक्त त्यांना फॉलो करतो

पण त्यांच्या पोस्ट मस्त असतात, त्या वाचून मी आणि ओड्या कॅनडा च्या जंगली पाणथळ भागात लाकडी केबिन बांधून राहतोय
ओड्या शिकार करून आणतोय आणि मी लाकूड तोडून सरपणाची सोय करतोय, मग त्याला कच्च आणि मला भाजलेले मांस आम्ही वाटून खातोय असल काहितरी स्वप्न पडतं Happy

कसले मस्त
दोघेही कसले सही एन्जॉय करत आहेत
त्यांचं आनंद पोचतोय फोटोमधून

MT च्या अतिगोड माउवी ने माझं पूर्णपणे ट्रान्स्फॉर्मेशन केलय, From dog phobia person to dog lover!
जे मला ओळखतात अगदी लहानपणापासून ते आत्ता पर्यन्त , सगळ्यांना माझा फोबिया माहित होता , लांबून जरी कुत्रा दिसला तर डायरेक्शन बदलून रस्ता बदलणारी मी, एखादं कुत्रं चुकून जवळ आलं तर जे कोणी बरोबर दिसेल त्याच्या मागे लपणारी मी.. माव्याने ते पूर्णच बदलून टाकलय.. I’m not the same person any more !
तसे फोबिया जायची सुरवात खरं तर पँडेमिक मधे झाली, करोना भयंकर कंटिजिअस आहे समजल्यावर वॉक ला जाताना माणसांना घाबरायला लागले आणि कुत्रांची भिती थोडी कमी झाली Wink
मग MT ने माउवी घेतला. मी ठरवलं कि बाकी कुठल्याही कुत्रांची भीती वाटो, हा आपल्या घरचा आहे, याला नाही घाबरायचं Proud
माव्याला प्रत्यक्षात भेटायची वेळ आत्ता आली नोव्हेंबर मधे, तो दिड वर्षाचा झाल्यावर !
बुस्टर शॉट झाल्यावर नवरा इंडियाला त्याच्या माहेरी जाणार होता म्हणून त्यानी माझेही अमेरिकेतल्या माहेरचे २ आठवड्याचे तिकिट बुक केले Happy
माव्याला घाबरायचं नाही ठरवलं होत तरी शंका होती कि What if I am Scared and what if he rejects me !
त्यांच्या घरात पाऊल टाकताच माव्याने भुंकून गोंधळ घातला पण काय गंमत माहित नाही, मला अजिबातच भीती नाही वाटली, ५ मिनिटं त्याला भुंकू दिलं आणि मग त्याला ट्रिट दिली, मग एकदम जादूच झाली माव्या एकदम लाडात येऊन शेपूट हालवत जवळच येऊन बसला, MT आणि सानिका काडून चेस्ट रब, बेली रब च्या टिप्स मिळाल्या मग काय नेक्स्ट १० मिनिटात माव्या माझा लाडका भाचा झाला , माझ्या बरोबर जेवायला बसला, खेळायचा हट्ट केला, अगदी झोपे पर्यन्त मागेमागे.. दुसर्‍या दिवशी सकाळी उठवायलाही आला, मग काय नुसते खेळणे आणि दंगा !
उरलेले सगळे दिवस फक्त माव्याच्या आजुबाजुला.. माव्याने १ मिनिट एकटं सोडलं नाही!
दोन दिवसातच I started walking dog, माझे अपडेट्स बघून नवर्‍याला आणि सगळ्यांनाच प्रश्नं पडला ..Who are you ? माझ्या एले फ्रेंड्स कन्युनिटी गृप्समधे तर म्हणे अफवाही पसरल्या.. ब्रेकिंग न्युज..दीपालीने कुत्रा घेतलाय ! Biggrin
माव्याने खरच जादू केली, कुत्र्यांना इतकी घाबरणारी मी, रोज त्याला बोटं चाटू द्यायचे ( दह्याची), पहाटे झोपायला माझ्याकडे, माला पंजा मारून मान वाकडी करत सतत ‘खेळायला ये ‘ असे बोलवणे हे तर बघून मी चाट पडायचे.. प्रचंड क्युटपणा.. हा तर ह्युमन बेबीच आहे, तस्सच कम्युनिकेशन आहे , दररोज माझ्याच मांडीवर झोपायला यायचा !
माझे सॉक्स, हेअरबँड्स काढू खेळायला घेणे /त्याची चिरफाड करणे, माझी चप्पल पळवून त्यावर झोपणे ..फार धमाल केली , माव्याला आंघोळ घालायलाही मदत केली मी , एकदमच लाडोबा भाचा !
मी परत जाताना बिचारा रडला आणि बराच वेळ खिडकीत एकटा बसून राहिला Sad
आता बघू परत कधे भेटतोय.. पण माव्यामुळे आता कॉलनीतली कुत्रीही माझ्याकडे वळून बघतात, खेळायला येतात.. जणुकाही समजतय त्यांना माझी भिती गेली हे !
मला एअरपोर्टवर जो मित्र सोडायला आणि आणायला आला होता तो म्हणे ‘Are you the same person I dropped off to LAX airport’?

Pages