Rtpcr टेस्ट पुण्यात

Submitted by च्रप्स on 3 February, 2022 - 07:55

नमस्कार - मदत हवी आहे...
पुण्याहून रात्री 8 वाजता दिल्ली फ्लाईट आहे आणि दिल्लीहून रात्री 3 ला अमेरिकेला... या कनेक्टिंग फ्लाईट्स आहेत...
RTpcr टेस्ट दिल्ली च्या फ्लाईट च्या 24 तास आधी लागेल कि पुण्याच्या 24 तास आधी?
Rtpcr टेस्ट ला 12 तास लागेल म्हणतायत पुण्यातील एक लॅब- यापेक्षा लवकर कुठे मिळेल..
पुणे एअरपोर्ट वर टेस्ट करून मिळते का?
दिल्ली एयरपोर्ट ला जाऊन टेस्ट करता येईल का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोविलकर लॅब मधे सकाळी १०ला टेस्ट केली तर सहा पर्यंत रिपोर्ट मिळतो . पण पुढे अमेरिकेसाठी विमान असेल , तर एक दिवस आधी किंवा सकाळी दिल्लीला जायला हवे असे वाटते

In Delhi, IndiGo flies to Delhi.

*Health Screening:*

In view of the surge in number of COVID-19 cases, random sample collection will be done for passengers arriving from states where there has been a spurt in number for COVID-19 cases. Passengers will be allowed to exit after sample collection.

Thermal screening will be done for all passengers upon arrival

If you are travelling on a connecting flight and not leaving the airport in transit station then please refer to the detailed guidelines of the respective final destination arrival state

*Quarantine:*

Passengers who are found positive will be quarantined at home or CCC/CHC/Hospital for 10 days.

*International Passengers:*

For international arrivals (foreign country to India) please visit the following link for detailed guidelines

https://www.goindigo.in/information/international-travel-guidelines.html...

*Passenger Obligation:*

*Domestic Passengers:*

All passengers must download Aarogya Setu App

*International Passengers:*

For international arrivals (foreign country to India) please visit the following link for detailed guidelines

https://www.goindigo.in/information/international-travel-guidelines.html...

RCPTR च हवी असं नाही. Rapid चालते, एअरपोर्ट ला 2 तासात रिपोर्ट्स मिळतात. अमेरिकेच्या flight च्या 24 तास आधी टेस्ट लागेल.

गोविलकर लॅब मधे सकाळी १०ला टेस्ट केळी तर सहा पर्यंत रिपोर्ट मिळतो
>>
हे नक्की का? आम्हाला नाही मिळणार सांगितलं.

कधी आहे तुमची फ्लाईट? माझ्या नवऱ्याची या रविवारी आहे. तो रॅपिड करूनच जाणार आहे (मागच्या 2 वेळेला positive आला म्हणून तो गप्प घरात बसला आता या रविवारी निगेटिव्ह आला तर जाईल). तो गेला की काय चाललं ते सांगेन.

तुम्ही आधी गेलात तर तुमचा अनुभव लिहा

अमेरिकेत फक्त rtpcr लागते असे वाचले मी म्हणून विचारले...
चालेल.. नक्की कळवा ... फ्लाईट माझ्या आज्जी आजोबांची आहे... 20 फेब...

निघायच्या दिवशी सकाळी गोळवलकर लॅबमध्ये RTPCR करा. संध्याकाळपर्यंत इमेलवर रिपोर्ट भेटून जाईल. त्यांना सांगा की फ्लाईटसाठी हवा आहे म्हणजे ते देतील वेळेत. ते घरी माणूस पण पाठवतात. त्याचे भरपूर पैसे पडतात त्यापेक्षा लॅबमध्ये सकाळी लवकर जाऊन करा.
रॅपिड टेस्ट चालते असं म्हणतात पण एअर इंडियाचा कोणी कर्मचारी RTPCR च हवी म्हणून अडून बसला तर त्याला पटवण्यात वेळ फुकट जाईल त्यापेक्षा RTPCR च करून घ्या.
शक्य असल्यास रिपोर्ट आल्यावर लगेच त्याचा प्रिंट काढून ठेवा.

कुठे आहेस? पुण्यात की चिंचवडात? हल्ली थोडा जास्त वेळ लागत आहे. 2 आठवड्यापूर्वी बेंगलोरला गेलो होतो तेंव्हा सकाळी लवकर देऊन पण अगदी रात्री 8 वाजता रिपोर्ट आला. चिंचवडात असशील तर 2 ठिकाणचे नंबर देतो.

मला पण लागणार आहे याची गरज. मी मार्च मधे जात आहे. लंपन चिंचवडमधले चालतील नं माहितीकरता इथे देऊन ठेवाल का?

Swapnil Path Lab - +91 7776916707
मेडीलाईफ - +91 99232 82090

कोणीतरी पूर्ण माहिती द्या , जायची यायची व ते सुविधा एअर वर अपलोड करायची, आणि ... इथे ७२ तास आधी म्हणताहेत. मी चालले आहे.
अंजली+१

नावसुध्दा बघत नाहीत टेस्ट रिपोर्ट किंवा सर्टफिकेटवरच , फक्त ' निगेटिव्ह ' शब्द आहे ना ते वाचतात. ही गर्दी नसतानाची परिस्थिती, गर्दी असेल तर काय करत असतील कुणास ठाऊक. पुणे एअरपोर्ट (?) वर टेम्परेचर सुध्दा चेक केले नाही आणि हे म्हणजे 2 आठवड्यापूर्वी, जेव्हा अगदी मोठ्या प्रमाणावर होता कोरोना.

रॅपिड चालते हे माहित नव्हते...
म्हणजे सकाळी 9 ला केली तरी चालेल.. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 ला us फ्लाईट आहे...>>

रॅपिड चालत नाही. सॉरी रिया पण ही माहिती पुर्णपणे चुकीची आहे. RTPCR compulsory आहे. रॅपिड कधीच आज पर्यंत चाललेली बघितली नाही.
च्रॅप्स, पुण्यामध्ये घरी येवून टेस्ट करून देतात. (हवा असेल तर नंबर पाठविते.) परंतु फ्लाईट दिल्लीची असेल तर , दिल्ली मध्ये केलेली बरी. इन केस फ्लाईट डिले वगैरे झाली तर.
माझी युनाईटेड ची फ्लाईट मुंबईला होती. इथून जाताना ७२ अवर्स च्या आत टेस्ट केलेली. परंतु फ्लाईट कॅन्सल झाली. नेक्स्ट डे झाली. परंतु माझ तिकिट कॅन्सल झाल. वेळ फक्त १ तासाचा फरक फक्त पडत होता तरीही.
प्लीज प्लीज, नाव सुद्धा बघत नाहीत वगैरे खर आहे. परंतु रिस्क घेवू नका. एस्पेशिअली माझ्यासारखे फॅमिली इमर्जन्सी साठी जाणार असाल तर. अगदी युद्धाला जाण्यासारखी जय्यत तयारे करून जा. डॉक्युमेंट्स व्य्वस्थित असतील तर अज्जिब्बात त्रास नाही होत. युनाईटेडची फ्लाईट १५ तासाची म्हणुन मी काळजीत होते. परंतु एकदम मस्त आणि अज्जिब्बात कंटाळवाणी झाली नाही फ्लाईट.

प्लीज प्लीज, नाव सुद्धा बघत नाहीत वगैरे खर आहे. परंतु रिस्क घेवू नका>> नाही हो आपण करतोच टेस्ट, नाव बघत नसले तरीही. अगदी बारकोड सकट खोटे रिपोर्ट 5 मिनिटात मिळतात हल्ली. पण आपण त्या वाटे जात नाही. मराठी लोक्स सहसा असले काही करत नाहीत.

कोणीतरी पूर्ण माहिती द्या , जायची यायची व ते सुविधा एअर वर अपलोड करायची, आणि ... इथे ७२ तास आधी म्हणताहेत. मी चालले आहे.>>
अ‍ॅप डाऊनलोड करा. आरोग्य सेतु. एकदम सोपे आहे तिथे डॉक्युमेंट अपलोड करणे. पेपर कॉपी जरूर ठेवा बरोबर.

https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/travelers/testing-internationa...

कृपया cdc वेबसाइट पहा
ह्यात २४ तास न म्हणता 1 day prior to departure म्हटले आहे.
A.G. Diagnostics पुण्यात भांडारकर रोडवर उत्तम आहेत. त्यांचा सकाळी ९ ते १० खास प्रवासासाठी टेस्ट लागणाऱ्या ग्राहकांसाठी स्लॉट असतो. म्हणजे टेस्ट करायला गेल्यावर इतर सिम्प्टोमॅटिक लोकांशी संबंध येण्याची शक्यता कमी. सॅम्पल सकाळी दहाच्या आत घेतले तर रिपोर्ट संध्याकाळी पाच-सहा वाजता मिळतो.
कनेक्टिंग फ्लाईट असल्यामुळे पुण्याहून निघणाऱ्या विमानाच्या आदल्या दिवशीची टेस्ट चालायला हवी. पण तुमचा अमेरिकेचा प्रवास पुण्याहून प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी आहे. तर बॅकअप म्हणून पुण्याहून प्रवास ज्या दिवशी आहे त्या दिवशी सकाळी सुद्धा पुन्हा एकदा टेस्ट करून घ्यायला हरकत नाही. ५०० रुपये फी आहे.

सीमा, माझ्या माहितीप्रमाणे ही अमेरिकेला फ्लाय केलं तर व्हायरल टेस्ट (ज्यात अँटिजेनही मोडते) लागते. लँड बॉर्डरला कुठलीच टेस्ट लागत नाही.
युद्धाला जायची तयारी करुन जा ला +१. २४ तासाच्या आतली पीसीआर इज बेस्ट! कारण आयत्यावेळी कोण नियम बदलेल, प्रवासाचा रुट कसा बदलेल, शंभर एअरलाईन त्यांचे हजार एजंट, त्यांची दहा हजार सतत बदलते नियम यातुन फूल प्रुफ गेलेंलं उत्तम.

रॅपिड टेस्ट
cdc वेबसाइट पहा
https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/travelers/testing-internationa...
"Rapid tests are acceptable if they are a viral test that meet the requirements under the Order."

परंतु AG Diagnostics रॅपिड टेस्ट करत नाहीत. ते फक्त RTPCR करतात.

२४ तासाच्या आतली पीसीआर इज बेस्ट! कारण आयत्यावेळी कोण नियम बदलेल, प्रवासाचा रुट कसा बदलेल, शंभर एअरलाईन त्यांचे हजार एजंट, त्यांची दहा हजार सतत बदलते नियम यातुन फूल प्रुफ गेलेंलं उत्तम.>> अनुमोदन. म्हणूनच म्हटले बॅकअप म्हणून पुण्याहून प्रवास ज्या दिवशी आहे त्या दिवशी सकाळी सुद्धा पुन्हा एकदा टेस्ट करून घ्यायला हरकत नाही.
जर दुसऱ्या देशातून कनेक्शन असेल तर all bets are off . त्या देशाचे नियम सुद्धा बघायला हवेत. मी जपान मार्गे आलो. कनेक्टिंग फ्लाईट म्हणजे जपानमध्ये प्रवेश असे ते धरत नाहीत. म्हणून जपानची कोणतीही टेस्टिंग requirement नव्हती. पण जर जपानमध्ये कनेक्टिंग फ्लाईटसाठी विमानतळ बदलावा लागला असता (नारिता -> हानेडा ) तर जपानमध्ये प्रवेश समजला गेला असता आणि त्यांचा टेस्टिंग requirements पाळाव्या लागल्या असत्या.

मी जी माहिती दिली ती भारतातून अमेरिकेत जाण्यासाठी. अमेरिकेतून भारतात जाण्यासाठी भारताच्या वेगळ्या requirements आहेत.

हो अमेरिकेतून भारतात (थेट) जायला आरामशीर ७२ तासांत केलेली चालते. फक्त ती इंटरनॅशनल फ्लाइटच्या वेळेपासून ७२ तास. म्हणजे आधी एखादे डोमेस्टिक अमेरिकन कनेक्शन असेल तर ते धरायचे नाही. अमेरिकेत मी राहतो तेथे तरी RTPCR फुकट आहे व साधारण १-२ दिवसांत रिझल्ट येतो.

भारतातून उलटे येताना टाइट सिच्युएशन दिसते. २४ तास म्हणजे.

सीमा, माझ्या माहितीप्रमाणे ही अमेरिकेला फ्लाय केलं तर व्हायरल टेस्ट (ज्यात अँटिजेनही मोडते) लागते. लँड बॉर्डरला कुठलीच टेस्ट लागत नाही.>>
अमितव मला कळल नाही काय म्हणायच आहे ते. लिंक वाचत बसत नाही. मला इतकच म्हणायच आहे कि RT PCR test लागते. रॅपिड टेस्ट जी लगेच्च १० मिनटात रिझल्टस देते ती चालत नाही. हे आता घरातील पाच जण ,पाच वेगवेगळ्या वेळी गेल्या वर्षभरातून जाऊन आल्यावरच्या अनुभवावरून सांगत आहे.

धन्यवाद लंपन... सेव्ह केले नंबर.

माझी फ्लाईट व्हाया म्युनिक आहे. १.१५ तासाचा च लेओव्हर आहे. होप तेवढ्या वेळात काही टेस्ट फलाणा ढिकाणा करायला लावायला नको.

सध्या प्रवास नको पण आर्सीपीटीर आवर असं झालंय.
किती ते वेगवेगळे नियम Uhoh

Pages