Submitted by च्रप्स on 3 February, 2022 - 07:55
नमस्कार - मदत हवी आहे...
पुण्याहून रात्री 8 वाजता दिल्ली फ्लाईट आहे आणि दिल्लीहून रात्री 3 ला अमेरिकेला... या कनेक्टिंग फ्लाईट्स आहेत...
RTpcr टेस्ट दिल्ली च्या फ्लाईट च्या 24 तास आधी लागेल कि पुण्याच्या 24 तास आधी?
Rtpcr टेस्ट ला 12 तास लागेल म्हणतायत पुण्यातील एक लॅब- यापेक्षा लवकर कुठे मिळेल..
पुणे एअरपोर्ट वर टेस्ट करून मिळते का?
दिल्ली एयरपोर्ट ला जाऊन टेस्ट करता येईल का?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पूर्वी युनायटेडची फ्लाईट
पूर्वी युनायटेडची फ्लाईट नूवर्कहून रात्री उशिरा निघून मुंबईत उशिरा पोचायची. मला घरी पोचायला रात्रीचे २ वाजायचे म्हणून मी एअर इंडियाने जायला लागले. पण आता युनायटेडच्या वेळा बदलल्या ते बरं आहे.
रीया, तुझा आणि माझा नवरा एकाच फ्लाईटने परत आले.
युनायटेडला रॅपिड अँटिजेन चालते. आरटीपिसीआर लागत नाही.
मी ८ - ९ वर्षांपूर्वी नेवार्क
मी ८ - ९ वर्षांपूर्वी नूवर्क - मुंबई ने प्रवास केला होता. तसे पहाता पहिल्यांदा उस्गावात त्याच फ्लाईटने आलो. तेव्हा त्यांचे जेवण बरे असायचे. रिसेंटली मात्र एमिरेट्स ने जेवणाचे लाड करून लाडावून ठेवले होते
फ्लाईटमधल्या जेवणाचं एवढं काय
फ्लाईटमधल्या जेवणाचं एवढं काय ते!!! सगळीकडे थोड्या फार फरकाने तसलंच आणि तितकंच बोरींग जेवण देतात.
covid test चे नियम airline
covid test चे नियम airline प्रमाणे कसे बदलतात ? Destination देशाचे नियम airline ने पाळणे अपेक्षित आहे. अमेरिकेसाठी cdc वेबसाईटने रॅपिड अँटीजेन acceptable म्हणून सांगितली आहे.
https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/travelers/testing-internationa...
Rapid tests are acceptable if they are a viral test that meet the requirements under the Order.
You must be tested with a viral test to look for current infection – these include an antigen test or a nucleic acid amplification test (NAAT).
Phrases indicating a test is an antigen test could include, but not are not limited to:
Rapid antigen test ...
जर airline (जसे Air India) स्वतःचे आणखी नियम लावत असेल (जसे रॅपिड अँटीजेन चालणार नाही, आरटीपीसीआरच लागेल) तर मला वाटतं त्यांना तसे करायचा अधिकार असेल. पण त्यांचे नियम व्यवस्थित airline च्या वेबसाईट वर दिले असतात का?
एअर इंडिया ला समजवायला कोण
एअर इंडिया ला समजवायला कोण जाणार म्हणून सगळे rtpcr करून जातायत..
१४ फेब पासुन ८२ देशातुन
१४ फेब पासुन ८२ देशातुन वॅक्सिनेटेड लोकाना भारतात येताना pre-departure RT-PCR टेस्ट करावी लागणार नाही. यात अमेरिका, युके, सिंगापुर सारखे देश आहेत.
भारताबाहेर जाताना मात्र टेस्ट
भारताबाहेर जाताना मात्र टेस्ट लागेलच ना?
१४ फेब पासुन ८२ देशातुन
१४ फेब पासुन ८२ देशातुन वॅक्सिनेटेड लोकाना भारतात येताना pre-departure RT-PCR टेस्ट करावी लागणार नाही. >> फक्त २ डोस झालेत ते सर्टिफिकेट टाकावे लागेल.
भारताबाहेर जाताना मात्र टेस्ट लागेलच ना? >> अजून तरी सी डी सी ने काही बदल केलेला नाही.
होय. अजून cdc ने काही बदल
होय. अजून cdc ने काही बदल नाही केलाय. पण लवकरच बदल होईल कदाचित. https://travel.state.gov/content/travel/en/international-travel/emergenc...
काल दुपारी चिंचवड मध्ये
काल दुपारी चिंचवड मध्ये pathcare च्या collection center मध्ये ११ वाजता टेस्ट केली . संध्याकाळी ६ वाजता रिपोर्ट आला. रिपोर्ट मध्ये QR-code पण आहे. मी ज्या देशात जाणार आहे त्या देशात QR-code पाहिजे आहे जेणे करुन तो स्कॅन करुन रिपोर्ट बरोबर आहे ते तपासता येते.
ह्या टेस्ट नंतर आज सकाळी ३ वाजता महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाकडुन पण कोविड नसल्याचा रिपोर्ट पाठवला ज्यात pathcar लॅब चा IMCR No आणी QR-code आहे. महाराष्ट्र सरकारच्या QR-code मध्ये सरकाच्या आरोग्य विभागाची साईट ओपन होते आणी माझा रिपोर्ट दिसतो. महाराष्ट्र सरकारच्या रिपोर्ट मध्ये पासपोर्ट नंबर येत नाही.
योगायोगाने काल मुलीची त्याच सुमारास सरकारी दवाखान्यात कोविड टेस्ट केली. चिंचवड सरकारी दवाखान्यात गेट जवळाच सॅपल कलेस्कन करतात आणि भरपुर स्टाफ ठेवल्याने बाकीच्या लॅब पेक्षा कमी वेळ लागतो आणी टेस्ट पण फुकट आहे. त्याचा रिपोर्ट आज सकाळी १ वाजता आला. त्यानी सोमवारी सकाळी येईल म्हणुन सांगितला होता पण आजच आला. मुलीच्या कॉलेज मध्ये दर १४ दिवसानी टेस्ट करणे सक्तीचे असल्याने function at() { [native code] }तापर्यन्त १०-१२ वेळा टेस्ट तरी केली असेल. १-२ वेळा रिपोर्ट येण्यासाठी ३६ तास लागले होते म्हणुन मी माझ्या टेस्ट साठी रिस्क घेतली नाही.
भारतातून अमेरिकेत येताना
भारतातून अमेरिकेत येताना टेस्ट रिपोर्ट अपलोड वगैरे काही प्रकार दिसत नाही. थेट चेक इन च्या वेळेसच दाखवायचा असे दिसते. माझी पुण्याहून दिल्लीला विस्ताराची आहे व नंतर युनायटेड. दोन्हीच्या वेबसाइटवर अपलोड वगैरे काही दिसत नाही.
भारतातून अमेरिकेत येताना
भारतातून अमेरिकेत येताना टेस्ट रिपोर्ट अपलोड वगैरे काही प्रकार दिसत नाही. >>> बरोबर. डोमेस्टिक्ला वेबचेक इन करावं लागतं आणि त्यांचा एक ऑनलाईन फॉर्म असतो तो भरावा लागतो.
कॉउंटर वर दाखवावा लागतो
कॉउंटर वर दाखवावा लागतो रिपोर्ट फारएंड ... चेकिन च्या वेळी... स्कॅन करतात...
थँक्स श्री, च्रप्स. हो
थँक्स श्री, च्रप्स. हो पुण्यात विस्ताराने काउंटरवर पाहिला आणि युनायटेडने दिल्लीत. माझी युनायटेडची फ्लाइट रात्री ११:४५ ची असल्याने "१ दिवस आधी" चा मला बराच उपयोग झाला. आदल्या दिवशी सकाळी गोळविलकर मेट्रोपोलिस मधे टेस्ट केली, त्याचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत आला. ५०० रू. लागले. ते घरीही येतात पण त्या दिवशी ते १० नंतर येउ शकत होते व तेव्हा टेस्ट केली तर रिपोर्ट दुसर्या दिवशी मिळाला असता.
लॉकडाउन च्या काळात भारतात न गेलेल्यांना जबरी कल्चरल शॉक बसू शकतो
जेव्हा केसेस वाढल्या होत्या तेव्हा लोक मास्क व इतर नियम पाळत होते असे ऐकले होते. पण आता सिरीयसनेस गेला आहे. अमेरिकेत लोक एकतर मास्क्स लावतात किंवा त्यांचा साफ विरोध आहे म्हणून लावत नाहीत. भारतात एक तिसरा प्रकार आहे - "लावल्यासारखे करणारे". इन्डोअर सेटिंग मधे, गर्दीत बिनदिक्कत हनुवटीवर खाली आलेला मास्क, किंवा नुसते तोंड झाकले आहे आणि नाक मोकळेच आहे असे व इतर अनेक प्रकारे मास्क चेहर्यावर लटकवलेला तर आहे पण नाक व तोंड झाकलेले नाही अशा अवस्थेत असंख्य जण होते. काही तर नुसते हातात मास्क घेउन फिरत होते. काही ठिकाणी त्या त्या व्यवस्थापनाचे लोक सतत लक्ष देउन आग्रहाने लोकांना मास्क लावायला सांगत होते. पण सगळीकडे नाही.
अर्थात भारतातील गर्दी, लोकांशी सतत येणारा संपर्क, सार्वजनिक ठिकाणच्या गोष्टींना आपला सतत होणारा संपर्क याची व्याप्ती पाहता हा संसर्ग टाळणे प्रचंड अवघड आहे हे जाणवते. अनेक दुकानांत पायाने लिव्हर दाबून हातावर सॅनिटायझर लावण्याच्या सोयी पूर्वी सक्तीच्या केल्या होत्या असे ऐकले. अनेक ठिकाणी ते अजूनही वापरात आहे. पुणे-मुंबई हायवे वर एका मॉल मधल्या टॉयलेट्स मधे जी बेसिन्स असतात हात धुवायला तेथील नळ हात लावून सुरू करावे लागत नाहीत. तेथेच खाली पायाने लीव्हर दाबून सुरू होतात. अशा खूप कल्पकतेने केलेल्या सोयी पाहिल्या, ज्या मला अमेरिकेतही दिसल्या नाहीत. पण त्याच मॉल मधे एका दारात लोकांचे तपमान बघायला माणूस बसला आहे, तर दुसरे दार पूर्ण मोकळे, हे ही आहे
फारएंड - वेलकम बॅक
फारएंड - वेलकम बॅक
पुणे-मुंबई हायवे वर एका मॉल
पुणे-मुंबई हायवे वर एका मॉल मधल्या टॉयलेट्स मधे जी बेसिन्स असतात हात धुवायला तेथील नळ हात लावून सुरू करावे लागत नाहीत. तेथेच खाली पायाने लीव्हर दाबून सुरू होतात. ///
+१०००
मुंबईहून पुण्याला जाताना वाटेत एक mall लागते. जवळपास भारताबाहेर गेलोय असं वाटेल इतकं भारी आहे. तिथे ही पायाने प्रेस करून नळ सुरू करण्याची जबरदस्त युनिक आयडिया पाहिली आहे. याच mall मध्ये भरपूर फूड ऑप्शन्स आहेत. श्रीदत्त स्नॅक्स जे पूर्वी पुणे-मुंबई रूटवर होतं ते आता समोर मुंबई-पुणे साईडला या ठिकाणी सुरू केलं आहे. ड्राईव्ह थ्रू स्टारबक्स पण आहे. अर्थात या सर्व सुखसोयी लोकांनी नीट वापरल्या पाहिजेत.
नळाला हात न लावता, नळाखाली
नळाला हात न लावता, नळाखाली हात धरला की आपोआप नळ सुरू होतो असे नळ मॉलमध्ये असतात. पायाने दाबून sanitizer घेण्याची सोय तर जिकडेतिकडे झाली होती. आता बहुतेक ठिकाणी ती सिस्टीम बिघडल्यामुळे लोक आधी पायाने खडखड करून काही होत नाही बघून वरून हाताने दाबतात
एका दारात लोकांचे तपमान बघायला माणूस बसला आहे, तर दुसरे दार पूर्ण मोकळे, हे ही आहे
आम्ही पुण्याहून बंगलोरला कारने आलो नोव्हेंबरमध्ये, तेव्हा ही गंमत महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डरवर बघितली. महाराष्ट्रातून येणाऱ्यांना तेव्हा rtpcr कंपल्सरी होती. आम्ही केली होती. बॉर्डरवर एक पोलीस चेकपोस्ट होतं. तिथे दोन लेन्स होत्या गाड्यांच्या. आम्ही नेमके ज्या लेनमधे गेलो तिथे कुणीही काहीही चेक करत नव्हतं. दुसऱ्या लेनमधल्या गाड्यांना मात्र थांबवत होते! कदाचित आमची लेन रोज जा-ये करणाऱ्यांसाठी किंवा बॉर्डरवरच्या जिल्ह्यांमधल्या लोकांना सूट दिली असेल तर त्यांच्यासाठी असेल. पण हे तिथे कुठेही काहीही लिहिलेलं नव्हतं.
नमस्कार..एक मदत हवी होती...
नमस्कार..एक मदत हवी होती...
येत्या आठवड्यात अमेरिकेला जाणारे कुणी आहे का?एक अर्जंट औषध पाठवायचे आहे..साधारण १०० gm वजन होईल..pls कुणी जाणारे असेल तर मला विपू करा..thnx a lot _/\_
केया पुण्यात असलात तर माझा एक
संपादित
च्रप्स - थँक्स.
च्रप्स - थँक्स.
आता बहुतेक ठिकाणी ती सिस्टीम बिघडल्यामुळे लोक आधी पायाने खडखड करून काही होत नाही बघून वरून हाताने दाबतात >>>
व्हाइटहॅट - मी खोपोलीजवळ थांबलो होतो तोच मॉल असावा तो. बाहेर इतर दुकाने आहेत आणि तेथेच बाजूला हा पॉश वाटणारा कॉम्प्लेक्स आहे. मात्र हे पायाने दाबायचे नळ बाहेरच्या टॉयलेट्स मधे पाहिले.
Pages