तर आता सुपर्मार्केट व कोपर्यावर च्या वाण्याकडे वाइन मिळायला लागली आहे. तुमच्या आव्डीची वाइन कोणती? कुठे घेतली कितीला हे जरूर कळ वा . लोकेशान द्यायचे नसेल तर देउ नका.
मला माबो वरची चिकन इन व्हाइट वाइन रेसीपी बनवायची आहे. त्यासा ठी कोणती वाइन घेउ?
व एक चांगली शांपेन हवी आहे. जनरल सेलिब्रेशन फॉर लाइफ गोल्स साठी .
कोणत्या वाइन बरोबर काय अन्न घ्यावे, कधी तिचे चिलिन्ग टेंपरेचर काय असावे. कोणते चीज व फळे असावेत ह्या सर्वांचे एक शास्त्र आहे.
व नियम पण आहेत. कोणती वाइन कोणत्या ग्लासात कशी सर्व्ह करावी ते ही नियम आहेत. ते लिहा.
परदेश स्थ माबोबर तुमच्या वाइन अनुभव कथा लिहा व वाइन सेलर/ वाइन कूलर्स शांपेन ग्लासेस चे फोटु टाका. हम भी देखेंगे.
सावधानीचा इशारा: ऑनलाइन वाइन खरेदी करू नका त्यात अनेकदा फ्रॉड होतो.
फ्रेंच इटा लिअन ग्रीक बरोबरीनेच अमेरिकन व भारतीय वाइन्स ची माहिती लिहा. द्राक्ष्याचे वर्श महत्वाचे. जुन्या काळात माझ्याकडे वाइन्स फॉर डमीज पुस्तक होते. जे मी आबिद रोड वर सेकंड हँड घेतले होते.
कॅलिफोर्निआ मध्ये नापा व्हॅलीत वायनरीज आहेत त्या बरोबरीने वाइन टेस्टिन्ग इवेंट पण असतात . माझ्या न्युज फीड मध्ये त्याची माहिती कायम येत असते. त्यामुळे तिथे जाउन एक वीकेंड वाइन टेस्टिन्ग करणे हे बकेट लिस्टीत आहे.
हीअर्स टु लव्ह एंड गुड लाइफ.
कोणती वाइन कशा बरोबर घ्यावी
कोणती वाइन कशा बरोबर घ्यावी
ह्याचे एकमेव उत्तर आपल्याला जो पदार्थ आवडतो त्या बरोबर.
आपली स्वतःची आवड काही असते की नाही.
की काय वाइन बरोबर खायचे हे पण आपल्याला समजत नाही म्हणून दुसरा सांगेल तो पदार्थ आवडात नसला तरी खायचं
मीट बरोबर रेड आणी फिश आणी सी
मीट बरोबर रेड आणी फिश आणी सी फुड बरोबर व्हाईट वाईन हा एक सिंपल रुल. and it should be dry or half dry वाईन
मला shiraz from south australia फार आवड्ते. बाकी जास्त करुन वाईन फ्रोम स्पेन आणी ईटली जास्त आवडतात.
समर मध्ये मस्त सी फुड किंवा क्रिमी सालमन पास्ता आणी व्हाईट वाईन वाईन एकदम मस्त .
आमच्याकडे समर सुरु झाला की बरेच वाईन फेस्टिवल असतात. सो लोकल वाईन बर्याच टेस्ट करता येतात.
मी आतापर्यन्त कधीच वाईन
मी आतापर्यन्त कधीच वाईन प्यायले नाहीये पण ईथल्या पोस्टी वाचून , प्यायची नाही पण केवळ माहितीसाठी जरा रिसर्च करायची ईच्छा होतेय
.
अनिंद्य, उबो, अंजली , अनघा आणि ईतर बर्याच जणांचे प्रतिसाद फार रोचक वाटले.
ह्या विषयावर भाउ तोरसेकरांचा
ह्या विषयावर भाउ तोरसेकरांचा व्हिडीओ फारच विनोदी आहे.
माझी पण वाइन प्यायची इच्छा
माझी पण वाइन प्यायची इच्छा खूप तीव्र आहे , कोणास ठाऊक कधी पूर्ण होईल !
घरी वाइन बनवाय्चा रेसीपीचा
घरी वाइन बनवाय्चा रेसीपीचा धागा
<<
एक रेड्डिट नावाचा प्रकार आहे साधारणतः मायबोलीसारखा. तिथे आपल्या हितगुज विषयवार ग्रूपसारखे सब-रेड्डिट असतात. त्यात एक r/prisonhooch नावाचे सब आहे. इथे सर्व प्रकरची हातभट्टी घरी गाळण्याबद्दल चर्चा व माहिती मिळेल.
हा धागा आला आणि योगायोगाने आमच्या एका वहिनींनी त्यांच्या शेतातल्या जांभूळ लिंबाच्या घरी बनवलेल्या वाईनचा वानवळा पाठवला. तो पाहून प्रसाद मिळाला असे म्हणा.
वाईनच्या चवीबद्दल.
वाईनच्या चवीबद्दल.
आपल्याला साधारणतः वाईनची चव आवडत नाही.
कित्येक रुपये किमतीची डायरेक्ट फ्रान्समधून आणलेली वाईन आमच्या एका वहिनींनी चक्क साखर घालून टॉलरेबल चवीची केलेली आठवते आहे.
अर्थात प्रत्येकाच्या चवीचा प्रश्न आहे. व्हिनिगर इतपत आम्बट असलेल्या, किंवा सरळ सरळ सायडर प्रकार मला तरी झेपत नाहीत.
मला डेझर्ट वाईन नामक प्रकार आवडतो. "लेट हार्वेस्ट" प्रकारची वाईन द्राक्षांत गोडवा भरलेला असल्याने मधुर चवीची असते. ती ट्राय करून बघा. ही माझ्या सर्वाधिक आवडीची आहे.
सस्त्यातली हवी असेल तर कोणत्याही कंपनीची 'पोर्ट' वाईन मागा. तुमचा विश्वास बसणार नाही इतकी स्वस्त लाल वाईन असते, अन कडक "लागते". तेव्हा सांभाळून. गोड आहे म्हणून ढसाढसा पिऊ नका. कोणतीही असली तरी साधारण २०० मिलि इतपत च एका वेळी घ्यावी. जास्त झोकायची असेल तर आपापला कोटा पहावा.
शँपेन हा वाईनचाच प्रकार आहे, पण ही वाईन बियरसारखी बबली असते. फसफसणारी. त्यातही ब्रट आणि सेको असे दोन प्रकार असतात. एक पिंक पण असते साधारणतः दोघांच्या मधल्या चवीची. 'सेको' अर्थातच जास्त गोडवा असणारी, अन जिभेला झेपेलशी असते. ब्रट जास्त आंबटसर.
कुकिंग वाईन्स सहसा अल्कोहोल जास्त असणार्या आंबटसर चवीच्या असतात. कुकताना त्यातली दारू "उडूण" जाणे अपेक्षित असते.
तात्पर्य.
वाईन आणताना आधी थोडा अभ्यास करून जावा.
उदा. गूगलवर What does Chenin Blanc wine taste like? विचारलं, तर उत्तरात
Chenin Blanc in its most classic form in the Loire Valley is full of floral and honeyed aromas and quince and apple-like flavours with good zippy acidity. << असले कवित्वपूर्ण वर्णन "शलाँऽ ब्लाँ" वाईनच्या चवीचे असले, तरी त्यातलं शेवटचं 'गुड झिप्पी अॅसिडीटी' उर्फ आंबट्टढाण पणा ओळखून असावे.
अन वरती एका प्रतिसादात अगदी लिंकवून सो कॉल्ड वाईन कनिश्यर लोकांची चेष्टा केली आहे त्यात तथ्य आहे हे जाणून आधी खिशाला परवडेल अशी छोटुली बाटली आणून चव ओळखीची करावी. नाही तर आणलेली वाईन व्हिनेगर म्हणुन वापरायची वेळ येते.
डेसर्ट वाईन म्हणजेच फ्रुट
डेसर्ट वाईन म्हणजेच फ्रुट वाईन का? फ्रुट वाईन टेस्ट केलेली आहे. गोड असते.
परवा आमचे शेजारी, एक बंगाली
परवा आमचे शेजारी, एक बंगाली जोडपे व त्यांची छोटी जेवायला आलेले होते. त्यांनी दिली. आम्ही दोघेही घेत नसल्याने, काय करावे हा प्रश्न आहे. मे बी कोणाकडे गेले तर देइन. सध्या फ्रीजमध्ये पडून आहे.
<<
१. चांगली वाईन आहे. प्याल तर मजा येइल. झिंगण्यासाठी नाही, पण कटिंग चहाइतकी चवीदाखल पिऊन पहा.
२. फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा. फार दिवस राहिली तर लाकडी बूच क्रंबल होते, अन मग गाळण्याने गाळून वाईन प्यावी लागते.
सगळ्यात महत्वाचे.
सगळ्यात महत्वाचे.
हे घरात नसेल तर नुसती वाईनची बाटली आणू नका वाण्याच्या दुकानात गेलोच आहोत म्हणून.
शँपेन तरी घरच्या तलवारीने उघडता येते. इतर वाईन्स नाहीत.
डेसर्ट वाईन म्हणजेच फ्रुट
डेसर्ट वाईन म्हणजेच फ्रुट वाईन का?
<<
जेवणानंतर डेझर्टसोबत सर्व्ह केलेली, गोडसर चवीची.
आईस वाईन. एकदम सडपातळ बाटली
आईस वाईन. एकदम सडपातळ बाटली असते आणि भयंकर महाग असते. पण चवीचं वावडं असेल तर प्यायला मस्त लागते. जेवण झाल्यावर तर मस्त गोडुस चव रेंगाळत रहाते जीभेवर.
आरारा म्हणताहेत तशी लेट हार्वेस्ट द्राक्षांवर स्नो पडला की तोवर त्यातील पाण्याचं प्रमाण कमी कमी झालेले असते. त्यांची बनवतात, नाएग्रा/ओंटरिओ मधली फेमस आहे.
वाईनसोबतचा चखना :
वाईनसोबतचा चखना :
रेड वाईन रेड मीट : मटन पोर्क बीफ इ. ४ पायाचे, चिकनचे लेग पीस. ( कधीकधी चिकन रेड व व्हाईट दोन्ही प्रकारात क्लासिफाय होते. ब्रेस्ट व्हाईट मीट अन लेग्ज रेड मीट)
व्हाईट वाईन - व्हाईट मीट : उर्फ मासे, समुद्री प्राणी उदा स्क्विड, प्रॉन्स इ. पक्षी.
पण हे चखन्यासाठी नव्हे.
"आपल्यात" जेवणासोबत नव्हे तर आधी दारू ढोसून मग जेवण करायची पद्धत आहे. दारूसोबत 'चखना' लागतो.
वाईनसोबतचा बेसिक चखना म्हणजे चीज.
चीज प्लॅटर अन सोबत आवडती वाईन, बॅकग्राउंडला किंवा ओठांत गझल, अन सखी/ सख्खी दोस्तकंपनी.
ब्रह्मानंद!
***
इति वाईन मास्तरकल्लास ज्यु. सुफल संपूर्ण.
गरम गरम बगेट (सावर- डो, चिवट
गरम गरम बगेट (सावर- डो, चिवट आणि किंचित कडक) थोडं बटर किंवा ऑऑमध्ये अर्ब घालून त्यात बुचकळून एकेक घास आणि वाईन आवडते.
होय, अमितव.
होय, अमितव.
ब्रेड हे सगळ्यात महत्वाचे बेसिक पेअरींग आहे.
"ब्रेकिंग ब्रेड" इज नॉट कंप्लीट विदाऊट वाईन, सिन्स द बिगिनिंग ऑफ ह्युमॅनिटी.
म्हणूनच वाईनला फूडप्रॉडक्ट क्लासिफिकेशन देऊन किराण्याच्या दुकानात विकायची परवानगी दिलेली आहे.
>>>>>>>>गरम गरम बगेट (सावर-
>>>>>>>>गरम गरम बगेट (सावर- डो, चिवट आणि किंचित कडक) थोडं बटर किंवा ऑऑमध्ये अर्ब घालून त्यात बुचकळून एकेक घास आणि वाईन आवडते.
मी एकदम ब्रेड/पोळी लव्हर आहे. ब्रेडी काहीही आवडतं. सावर डो तर यमीच. वाचून तोंपासु.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=UidFA-dP8GQ - रेड रेड वाईन
https://www.youtube.com/watch?v=0gi67iPUtaI - यु गो टु माय हेड (ज्युली लंडन)
https://www.youtube.com/watch?v=SQ_sTa3aseA - आय गेट अ किक आऊट्टा यु
I get no kick from champagne
Mere alcohol doesn't thrill me at all
So tell me why should it be true
That I get a kick out of you
शुभ प्रभातः सामो जी तुम्ही
शुभ प्रभातः सामो जी तुम्ही लिंक दिल्या आहेत त्या व्हिडीओ चे कॉपी राइट चेक केले का? ते शेअर करायला परवानगी आहे का? कृपया माय बोलीच्या कॉपीराइट नियमां नुसारच पोस्ट करा ही नम्र विनंती.
जीवनातील वाइन खरेदी व सुखद अनुभव शेअ र करा नं
व्हिडी ओ लिंक्स दिल्या की वाचक तिक्डेच जातो व परत इकडे येणे जरा अवघड होते.
ऑस्ट्रेलियात उत्तम वाईन्स
ऑस्ट्रेलियातही उत्तम वाईन्स बनतात. ज्या युरोपियन वाईनला तुम्ही ४०-५० डॉलर द्याल त्याच दर्जाची किम्बहुना त्यापेक्षा चान्गली येथे २५-३० डॉलरला मिळेल. एकदा पिऊन पहा. अनेक ऑस्ट्रेलियन वाईनमेकर युरोप व अमेरिकेतल्या वाइनरिज्मधे काम करत आहेत. युरोपमधे पारम्पारिकपद्धतीने वाईन बनवली जाते तसे ऑस्ट्रेलियात नाही. कारण येथील परम्परा फक्त २०० वर्शान्ची आहे. अमेरिकन वाइन विरुद्ध फ्रेन्च वाइन यावर एक DVD पण आहे तिचे नाव Bottle Shock. It is a film based on the 1976 wine competition termed the "Judgment of Paris", when California wine defeated French wine in a blind taste test. It stars Alan Rickman. तसेच wine confused या नावाचा एक DVD featuring the well known British comedian John Cleese हा हि मिळाल्यास पहा. At the 2020 International Wine Challenge, four Australian wines have been selected among the top 30 wines. These included a 2018 Chardonnay from Tasmania, 2016 St Hugo Cabernet Sauvignon, Morris Old Rare Liqueur Premium Topaque, a Topaque, from Rutherglen and a 2019 Shiraz , Lake Cooper Estate of Victoria. Australian wines have consistently fared well on the world stage. (प्रतिसाद जास्त लाम्बला आहे. तरी क्षमस्व.)
घरच्या घरी वाईन बनवणे मला
घरच्या घरी वाईन बनवणे मला थोडेसे रिस्की वाटते. भांडे नीट धूवून कोरडे केलेले नसले तर बॅक्टेरिया मुळे फूड पॉयझनिंग होईल का?
सामो तुमच्याकडे आणलेली
सामो तुमच्याकडे आणलेली बेरिन्जर कम्पनीची वाईन ही जरी अमेरिकन असली तरी ती कम्पनी आता Treasury Wine Estates नावाच्या एका Australian global winemaking and distribution business with headquarters in Melbourne या कम्पनीची आहे. Treasury Wine Estates was formerly the wine division of international brewing company Foster's Group.
घरच्या घरी वाईन बनवणे मला
घरच्या घरी वाईन बनवणे मला थोडेसे रिस्की वाटते. भांडे नीट धूवून कोरडे केलेले नसले तर बॅक्टेरिया मुळे फूड पॉयझनिंग होईल का?>> शक्यता आहे. मी फ्लेवर मध्ये काम करते. लार्ज स्केल प्रॉ डक्षन मध्ये खूपच कडक क्युसी टेस्टिन्ग नियम आहेत प्रॉडक्षन पॅ किन्ग ह्यासाठी रूल्स असतात. ते घरी फॉलो केले जात नाही
शिवाय सध्याची गरज जे ऑलरेडी प्रोफेशनल वाइन ग्रोअर्स व मेकर्स आहेत त्यांना सपोर्ट करणे हा आहे. वाइनचे टेस्टिन्ग व लेबलिन्ग प्रॉडाक्षाण ह्याची जी ग्लोबल आथोरिटी आहे त्यांचे रूल्स आहेत ते फॉलो केले तरच त्या लेबलचा सन्मान होतो. ऑस्ट्रेलि अन वाइन्स बद्दल अ अजून लिहा दिगोचि. नाव व वर्श लिहा. अंदाजे किंमत. म्हणजे आम्ही इथे लोकल वाण्यास इंपोर्ट करायला सान्गू.
ते सुला वाइन्स वीकेंड ला कोण येइल माझ्या सोबत गटग करूत की. चिल वीकेंड. वहिनींस्नी घेउन या. माबो वहिन्यांनो या. गर्ल्स झिम्मा टीम
करू. इरादे नेकिच है मेरे .
मी काही वाइन पर्सन नाही पण शिकत आहे. घरी सांग्रिया वगैरे बनवि नारे पब्लिक आहे.
https://www.sulavineyards.com
https://www.sulavineyards.com/ ही साइट.
हाय अमा, त्या यु ट्युब च्या
हाय अमा, त्या यु ट्युब च्या लिन्क्स आहेत. यु ट्युबच्या लिन्क्स करता कसला कॉपीराईट असतो? मी ते व्हिडिओज क्लेम करत नाहीये की डाउनलोड करत नाहीये. युट्युबनेच शेअरींग ची सोय दिलेली आहे की.
तुम्हाला गाण्यांच्या लिंका दिलेल्या आवडलेल्या दिसत नाहीत. माफ करा तुमच्या धाग्यांवर अशी आगळीक पुन्हा होणार नाही. _/\_
YouTube can do a copyright
YouTube can do a copyright strike on maayboli . Please just check the existing rules before posting.
लिंक देऊन कॉपिराईट स्ट्राईक!!
लिंक देऊन कॉपिराईट स्ट्राईक!!!
कुठले रुल्स? कुठे आहेत ते?
हे माहीत नव्हते.
हे माहीत नव्हते.
https://turbofuture.com/internet/Embed-YouTube-Videos---Copyright-Infrin...
अॅडमिन प्लीज ती लिंक उडवाल
अॅडमिन प्लीज ती लिंक उडवाल का?
लिंक वेगळं आणि एम्बेड वेगळं.
लिंक वेगळं आणि एम्बेड वेगळं. लिंकने कुणाला शश-प फरक पडत नाही. झाला तर फायदाच होतो. ट्रॅफिक बाहेर जातो वगैरे विचार असतील तर ते अगदीच बुरसटलेले झाले. आजच्या काळात admin ते करत नसावेत. आणि करत असतील तर लिंक देता येणार नाही अशी सोय करणं अर्ध्या मिनिटाचं काम आहे. ते केलं नाहीये सो त्यांना फरक पडत नाही.
कितीला?
कितीला?
WINES (INR)
Imported wines
Woodbridge (California)
- Cabernet Sauvignon- 3250/-
- Moscato - 2750/-
- White Zinfandel - 2750/-
- Merlot - 3250/-
SENSI (ITALIAN)
- Montepulciano - 1830/-
- Chianti - 1990/-
- Vermentino Toscana - 2020/-
- Vegante(vegan wine)- 2750/
- Pinot grigio - 1990/-
- Campoulce Chianti - 2600/-
Cono Sur (Chile)
- pinot noir - 1700/-
- unoaked Chardonnay - 1650/-
- Cabernet Sauvignon - 1700/-
- Tocornal Merlot - 1650/-
Trapiche*(Argentina ????)*
- Malbec - 1770/-
- Oak malbec - 2100/-
- Pinot grigio - 1775/-
- Sauvignon blanc - 1770/-
Serristori( Italy ????)
- Chianti - 1701/-
- Chianti Classico - 2377/-
Vintales *( South Africa)*
- Chenin blanc - 1690/-
- Moscato - 1690/-
French wines
- Chateu G. bordeaux - 2399/-
- Ch. Bonnet Bordeaux - 2600/-
- Ch. La Louvière - 8299/-
- Margaux - 7700/-
- Paul Jaboulet parallele 45- 2900/-
Others
Portia red - 2940/-
Periquita red - 1950/-
Genesis White - 1435/-
Hardy’s Cab Shiraz - 1500/-
Hardy’s Chardonnay - 1500/-
Jacob creek
- Chardonnay - 1500/-
- Cabernet Shiraz - 1500/-
Faustino VII tempranillo - 2220/-
Lancers Rosè- 1780/-
Villa antinori Toscana - 2995/-
Castillo de monseran- 1575/-
Yellow tail merlot - 1975/-
Yellow tail Shiraz - 1975/-
Yellow tail Chardonnay - 1975/-
INDIAN WINES
Sula
- Cabernet Sauvignon- 900/-
- Dindori Shiraz - 1150/-
- Satori Merlot - 725/-
- Zinfandel rosé- 725/-
- Late Harvest - 940/-
- Riesling - 895/-
- Chenin Blanc - 700/-
- Sauvignon Blanc - 725/-
- Samara white - 350/-
- Samara Red - 350/-
- Dia red - 425/-
- Dia White - 425/-
Fratelli
- Cab Franc shiraz - 900/-
- Merlot - 1050/-
- Classic Shiraz - 600/-
- Chenin Blanc - 695/-
- Chardonnay - 850/-
- Sette VII cab Sauvignon-2000/-
- Jnoon Red - 4000/-
- MS Sangiovese rosé- 1050/-
- MS Chardonnay - 1050/-
- MS cab franc/Syrah - 1050
Grover
- La Reserve - 1095/-
- La Reserve Blanc 1095/-
Sparkling Wines
Fratelli Noi - 900/-
Fratelli Brut - 1450/-
Sula seco - 725/-
Sula seco rosé- 725/-
Sula Brut - 1250/-
Casablanca- 1050/-
Chandon Brut - 1650/-
Chandon Brut Rosé- 1650/-
Bolla prosecco - 2100/-
Sensi prosecco 18k - 3900/-
Sensi prosecco 18k - 3990/-
Moët & Chandon imperial - 8163/-
Moët & Chandon Rosé- 9795/-
Moët & Chandon ice - 8793/-
Pages