वाइन्स, रेड व्हाइट रोझे कुठे , कशी, कधी, कितीला? सर्व माहिती

Submitted by अश्विनीमामी on 30 January, 2022 - 05:52

तर आता सुपर्मार्केट व कोपर्‍यावर च्या वाण्याकडे वाइन मिळायला लागली आहे. तुमच्या आव्डीची वाइन कोणती? कुठे घेतली कितीला हे जरूर कळ वा . लोकेशान द्यायचे नसेल तर देउ नका.

मला माबो वरची चिकन इन व्हाइट वाइन रेसीपी बनवायची आहे. त्यासा ठी कोणती वाइन घेउ?
व एक चांगली शांपेन हवी आहे. जनरल सेलिब्रेशन फॉर लाइफ गोल्स साठी .

कोणत्या वाइन बरोबर काय अन्न घ्यावे, कधी तिचे चिलिन्ग टेंपरेचर काय असावे. कोणते चीज व फळे असावेत ह्या सर्वांचे एक शास्त्र आहे.
व नियम पण आहेत. कोणती वाइन कोणत्या ग्लासात कशी सर्व्ह करावी ते ही नियम आहेत. ते लिहा.
परदेश स्थ माबोबर तुमच्या वाइन अनुभव कथा लिहा व वाइन सेलर/ वाइन कूलर्स शांपेन ग्लासेस चे फोटु टाका. हम भी देखेंगे.

सावधानीचा इशारा: ऑनलाइन वाइन खरेदी करू नका त्यात अनेकदा फ्रॉड होतो.

फ्रेंच इटा लिअन ग्रीक बरोबरीनेच अमेरिकन व भारतीय वाइन्स ची माहिती लिहा. द्राक्ष्याचे वर्श महत्वाचे. जुन्या काळात माझ्याकडे वाइन्स फॉर डमीज पुस्तक होते. जे मी आबिद रोड वर सेकंड हँड घेतले होते.

कॅलिफोर्निआ मध्ये नापा व्हॅलीत वायनरीज आहेत त्या बरोबरीने वाइन टेस्टिन्ग इवेंट पण असतात . माझ्या न्युज फीड मध्ये त्याची माहिती कायम येत असते. त्यामुळे तिथे जाउन एक वीकेंड वाइन टेस्टिन्ग करणे हे बकेट लिस्टीत आहे.

हीअर्स टु लव्ह एंड गुड लाइफ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हिवीआना मॉल ठाणे इथे एक मोठे दुकान आहे बेसमेंटात तिथे वाइन्स मिळ तात. स्टार बझारच्या आत कोपर्‍यात आहे. आता डिमार्ट मध्ये पण मिळेल काय ? चौकशी करून लिहा लोक्स.

निफा सुला नाशीक चे ब्रेंड का?
नापा व्हॅली सारखे सुला वैन्स चे पण प्याकेज असते बहुतेक. माझी एक एक्स कलीग तिथे काम करते. तिला विचारून लिहिते. त्यांची वेब साइट पण आहे. वहां नही तो यहीं सही.

वाइन घ्यायच्या आधी ग्लासेस घ्या . व्हाइट चे वेगळे रेड चे वे गळे. शांपेन चे वेग ळे. सर्व आयकियात किंवा अपनी दुकन वर उपलब्ध आहेत.

किती रुपयांना कोणती वाईन असते तेही लिहा. वाण्याच्या दुकानात अन् डी मार्टात मिळेल म्हटल्यावर चिकन बनवताना वापरता येईल. कोणी वाईन वापरून चिकन किंवा मटण बनवले असेल तर रेसीपी पण लिहा.

मुळात वाईन म्हणजे द्राक्ष रस न उकळलेला. पण आंबलेला.
स्वस्त झाली द्राक्षे की घेऊन ठेवायची जुन्या माठात. दर सीजनला साठवत जायची आणि दादरा बांधून तारीख टाकायची.
हाय काय अन नाय काय.
माठांचा खप वाढेल.

शर्करा युक्त पदार्थ चे किणवन प्रकारे नी वाइन मध्ये रुपांतर होते आणि वाइन चे उर्थवपतान केले की ब्रांडी तयार होते.

कोरोना प्रतिबंध काळात घरी केक बनवणे जोरात झालं. आता वाईनमेकिंगही लोक शिकतील. स्वत:च्यासाठी बनवण्यासाठी लायसन लागत नसेल.

हा धागा कोणत्या दुकानात कुठे कोणती वाइन मिळते ह्यावर आहे . एस आर्डी घरी वाइन बनवाय्चा रेसीपीचा धागा वेग ळा काढा कृपया धन्यवादन.

वाइन विकत घेण्यासाठी सरकारने दिलेले वाइन लाइसन्स असणॅ अपेक्षित आहे.

परवा आमचे शेजारी, एक बंगाली जोडपे व त्यांची छोटी जेवायला आलेले होते. त्यांनी दिली. आम्ही दोघेही घेत नसल्याने, काय करावे हा प्रश्न आहे. मे बी कोणाकडे गेले तर देइन. सध्या फ्रीजमध्ये पडून आहे.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLW8BtRFDzYfBmMjFs-0WoeF0lSz3GhyNFhJHGfivD0T0WTrM8lwgaFwLgoc2Ndg3oF6cKKfverngnzQhpzOqKdPkFPusD9szGackDkf4yDJbZlf2tAFzEPD2BTAIkuJlHMZxWLqx0t13M0PDMANcvE5cg=w247-h625-no?authuser=0
-------------------------------
बाबा बनवायचे घरी वाईन. अजुनही बनवत असतील. काय सुंदर टेस्ट असायची. द्राक्षांची रेड!!! बाबा - बागकाम करणे, वाईन बनविणे, बॉन्साय बनविणे, नाटके लिहीणे असे मस्त छंद बाळगुन आहेत. द्राक्षं फरमेन्ट करुन करतात एवढेच माहीत आहे. बाकी अंधारात पलंगाखाली वगैर त्या मोठ्ठ्या चीनीमातीच्या बाटल्या ठेवत असत.

Thank you Samo for posting. Merlot goes well with salmon and mushroom dishes. And blue veined cheeses. Open and enjoy this one.

प्रसाद शिरगावकर म्हणून फेसबुकवर एक जण आहेत , त्यांनी बऱ्याच वाइन घरच्या घरी बनवल्या आहेत. जांभूळ , आलं वगैरे. त्यांच्या फेसबुक प्रोफाइलला भेट दिल्यास पाहता येतील

वाण्याच्या दुकानात वाइन विका ही सुचना मा. शरद पवारानी य वर्षापुर्वी केली होती. ती प्रत्यक्षात उतरायला शेवटी त्यान्चे राज्य यावे लागले.

आमच्या गावचा वाणी कधी दुकानात वाइन ठेवणारे देव जाणे, तोवर इथ्ल्या रेसिप्या वाचुन दुधाची आय मिन वाइनची तहान वाचनावर भागवावी लागणार...

....कोणत्या वाइन बरोबर काय अन्न घ्यावे, कोणते चीज व फळे असावेत ह्या सर्वांचे एक शास्त्र आहे.....

वाईनसोबत फूड पेयरिंग वगैरे फ्रेंचांनी भारीच कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय Happy पण आमच्या वाईनप्रेमी मंडळातर्फे जे आजवर समजले त्यानुसार खाण्याबद्दल ते वाईनला Complement करणार की Contrast हे आधी ठरवावे. दोन्ही ट्रेंड्स जोरात आहेत.

ओल्ड स्कूल स्टाईल = वाईन आणि फूड एकमेकांना 'अनुरूप' असण्याचे फार महत्व. गेली १०-१५ वर्षात वारुणीप्रेमी थोडे बोल्ड झाल्याकारणे कॉन्ट्रास्ट पेयारिंग्स वाढले आहे म्हणे. उदा. रोझ वाईनसोबत आपले काली मिरी पनीर / चिकन टिक्का किंवा थाय नूडलसुद्धा आणि हे खुद्द युरोपात !!

Shiraz सोबतच्या खाण्यात लसूण हमखास वापरतात हे बघितलंय, सर्वांनाच माहिती असेल.

....कोणत्या वाइन बरोबर काय अन्न घ्यावे, कोणते चीज व फळे असावेत ह्या सर्वांचे एक शास्त्र आहे.....>>> Rofl
हे मिथक आहे. कुठल्या वाईनबरोबर काय खावे, हा खरं तर मार्केटिंग मधून आलेला मुद्दा आहे.वाइन क्वालिटी हा पण असाच प्रकार आहे. ब्लाइंड टेस्टिंगमध्ये तज्ञांना पण ओळखता आले नाही की कुठली वाईन जास्त चांगली आहे. इतकेच कशाला, व्हाईट वाईन रंग टाकून लाल केली, स्वस्त वाईन महाग बाटलीत भरून दिली तर ब्लाइंड टेस्टमध्ये ते ओळखता येत नाही, हे सिद्ध झाले आहे. बाटलीतली वाईन चांगली की पॅक मधील चांगली, याने पण ग्राहकांना फरक पडत नाही.

हा सगळा मार्केटिंगचा प्रकार आणि वाईन पिणाऱ्यांचा snobbish पणा आहे. खिशाला परवडेल आणि ज्याची चव आवडेल ती वाईन पिणे, सगळ्यात उत्तम आणि सोईस्कर.

वरती एका प्रतिसादात वाईन फ्रीजमध्ये ठेवल्याचा उल्लेख आलाय. माझ्या माहितीनुसार वाईन फ्रीजमध्ये ठेवत नाहीत/ठेऊ नये. वाईनची बॉटल कित्येक वर्षे नेहमीच्या कपाटात रूम टेम्परेचरला व्यवस्थित राहू शकते फक्त (थेट) सूर्यप्रकाश त्यावर पडू नये इतकीच काळजी घ्यावी लागते. अर्थात हे माझ्या माहितीनुसार. बाकी यातले दीर्घअनुभवी/जाणकारच नेमकं काय ते सांगू शकतील.

हे मिथक आहे. कुठल्या वाईनबरोबर काय खावे, हा खरं तर मार्केटिंग मधून आलेला मुद्दा आहे.वाइन क्वालिटी हा पण असाच प्रकार आहे. ब्लाइंड टेस्टिंगमध्ये तज्ञांना पण ओळखता आले नाही की कुठली वाईन जास्त चांगली आहे. >>>> या घटनेवर Bottle Shock नावाचा धमाल मूव्ही आहे. नक्की पहा.

वरती एका प्रतिसादात वाईन फ्रीजमध्ये ठेवल्याचा उल्लेख आलाय. माझ्या माहितीनुसार वाईन फ्रीजमध्ये ठेवत नाहीत/ठेऊ नये. >>> व्हाईट वाईन थंड ('करून' नाही) प्यावी असा रीवाज आहे. रूम टेंपरेचरला व्हाईट वाईनची चव बदलते. रेड वाईन रूम टेंपरेचरला प्यावी असा संकेत आहे.

D0A64030-DE44-4323-B3D3-1F42BA47FA82.jpeg
एक सहज माहिती म्हणून भारतातील पाहिली वाईन लेडी अचला जोशी च पुस्तक वाचा . खूप मस्त आहे.

मागे लोकसत्तेतील पुरवणीत वाईनसंबंधी लेख आला होता.कुठली वाईन कशातून प्यावी इ.लिहिणार शेफ होता.
अगदी हाताच्या उष्णतेने वाईन ची टेस्ट बदलते.त्यामुळे कोणत्या वाईन साठी लांब दांड्याचे पेले वापरावे इ.हे रोचक वाटले होते. ख्खोदेजा.

रेड वाईन जास्त पिऊ नका. ड्रॅकुला बनाल. रेड वाईन मिळाली नाही की रक्त प्यावसं वाटतं आणि माणूस ड्रॅकुला बनतो. वेळीच सावध व्हा.

रेड वाइन बरोबर रेड मीट व्हाइट बरोबर व्हाइट. शांपेन बरोबर काविआर. मस्त जगा रे.

सर्व प्रकारचे ग्लासेस भारतात आयकिय दुकानात व ऑन लैन उपलब्ध आहेत.

Pages