चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारा बाकीच्या अनेक स्टार किड्स पेक्षा नक्की उजवी आहे.
>>> जान्हवी पेक्षा नाही.. लूक्स मध्ये आणि अभिनयात जान्हवी कधीही बेटर आहे... अभिनयात जान्हवी जुन्या एक्टरेस ला देखील टक्कर आहे...

आमच्या घरी बाहुली आहे रक्तचंदनाची. >> आमच्याकडे पण होती म्हणजे अजुन असेल, चॉकलेटी पेक्षा डार्क कलर जरा काळ्या़कडे झुकणारा असा होता, मुकामार वैगरे वर उगाळुन शिजवुन लेप करत.

अभिनयात जान्हवी जुन्या एक्टरेस ला देखील टक्कर आहे...>>>
झुबेदा, सुलताना यांना का?
मग बरोबर आहे

स्पॉयलर
४था मॅट्रीक्स पाहिला काल.

१ प्रश्न - एजंट स्मिथ The Analyst कडून ट्रिनिटी न निओ ला का वाचवतो?

Tick Tick boom बघितला. म्युझिकल बघायला आवडत असेल तर नक्की बघा, नसेल आवडत तरी बघा म्हणजे नक्की आवडायला लागेल.
ब्रिलियंटली बनवलाय. जोनाथन लार्सनच्या आयुष्यावर चे म्युझिकल आहे. तो न्यू यॉर्क मधला उमेदीचा कंपोजर होता, आणि ब्रॉडवे वर जाई तो काय काय करायला लागलं, ते काय दिवस होते.. ते त्याच्याच कंपोज केलेल्या गाण्याच्या म्युझिकल मधून उलगडते. मला फारच आवडला.
स्पायडी अँड्र्यू गारफील्ड मुख्य भूमिकेत आहे.

मित्राने जबरदस्ती जुना खामोश बघायला लावला. मुन्नाभाई वाल्याचा आहे. रटाळ आणि स्लो आहे.

स्पॉईलर अ‍ॅलर्ट : एक पण गाणे नाही यात.

मुन्नाभाई वाल्याचा >> मुन्नाभाईच्या प्रोड्युसरचा आहे. मुन्नाभाईचा डायरेक्टर राजकुमार हिरानी आहे.

प्रोड्युसर सर्वात महत्वाचा असतो. दिग्दर्शक त्यानंतर येतो. जर प्रोड्युसरच नसेल तर दिग्दर्शक काय करणार ?

Tick Tick boom बघितला. म्युझिकल बघायला आवडत असेल तर नक्की बघा>> मला ला ला लॅंड आणि Moulin Rouge फार आवडलेले.. हा पण बघेन आता

अल्लु अर्जुनची क्रेझ आहे म्हणून त्याचा, अल वैकुन्ठपुरालू पाहिला(तेच ते बुट्टाबोम्मा आणि राउलो राउला) पण इतका काही खास नाही.
फक्त नाच आणि गाणी चांगली वाटली नाचायला. अल्लु अर्जुन नाचतो बाकी मस्त. एकदाच बघण्ण्यासारखा आहे.

सचिन खेडेकरने ह्या मूवीत का रोल घेतला हे न कळण्यासारखे आहे. (बहुधा घराचे हफ्ते भरायचे असतील).

असो.

आशुचॅम्प: bond movies बघत आहात म्हणजे lionsgate subscription असेल असे गृहीत धरून:
The last stand
Magnificent 7

मला तर झोम्बीवली रिव्ह्यू ऐकून दोन साऊथ पिक्चरचे मिश्रण वाटत आहे
उजवा हात ऐकत नसतो + झोम्बि
दोन थीम

ऊजवा हात ऐकत नसतो. https://www.youtube.com/watch?v=0u1H9Z__bW4 सव्यसाची , नाग चैतन्य हिरो, माधवन व्हिलन आहे

नव्हता
आणि झोंबा झोंबी पण नव्हती एरवी अनेक साऊथ सिनेमात असते तशी Happy

अल्लू अर्जुन जसा चालत होता त्यावरून जंगलात त्याला झोंबी चावला असेल आणि पुढच्या भागात हा खुलासा होईल असे वाटले होते.

प्राईमवर Flat No. 609 सुरू केला होता. बरोब्बर अर्धा तास झाला आणि प्रचंड भीती वाटू लागली. बंद करून इकडे चक्कर मारली. या पेक्षाही भयानक पार्श्वभूमी असलेले चित्रपट पाहीले होते. काँज्युरिंग चे जवळ जवळ सर्वच पाहिले. पण असे कधी झाले नव्हते. कदाचित ती घरात एकटी आहे. त्यात पोटुशी आहे. आजूबाजूचे लोक तिला काहीही सांगायला टाळतात. ती पूर्णपणे अनभिज्ञ आहे आणि इथेही घरी कुणीच नाही. कुणी पाहिलाय का हा ?

मी बहुतेक नेटफ्लिक्सवर ‘शाम सिंघम रॉय‘ हा तेलगु सिनेमा पाहिला. सिनेमात खूप नवीन काही नसले तरी पावलापावलाला भडकपणा नव्हता, कोणीतरी तारस्वरात ओरडणारा ‘विनोदी’ भुमिका असलेला कलाकार नव्हता, उगीचच धाडामधूम गाणी नव्हती, भडक नात्यांचा दंगा नव्हता व साई पल्लवी सोडून बाकी कलाकार मला माहिती नव्हते म्हणून मला कंटाळा नाही आला.

आणखी बराच खराब करता आला असता, तो केला नाही म्हणून आवडला

>>> हा सिनेमा आवडण्याचा नवा मापदंड बनू शकतो Biggrin

आत्ताच बघितला पुष्पा .. एकदम गॅंग्स ॲाफ वासेपूर आणि KFG चा फील आला .. ते ही आवडलेले आणि हा ही आवडला.. ते उ अंटे गाणं कालपर्यंत नव्हतं आवडत but then it grows on you.. अल्लू ला नाचताना बघायची इच्छा तेवढी अपूरी राहीली.. पैसे देण्याचा सीन कापून अल्लूचा स्वप्नातला एखादा डान्स टाकला असता तर आज रात्री शांत झोप लागली असती

Pages