'भावा' करता कायपण आजपण उद्यापण

Submitted by हर्पेन on 18 January, 2022 - 07:41

आपापल्या कोण्या एका मित्राच्या फोटोंवर, रापचिक, कड्डक, छावा अशा शब्दांपासून सुरु झालेला प्रवास 'जाळ आणि धूर संगटच' , 'टांगा पलटी घोडे फरार', 'विषय खोल' सारख्या एकोळ्यां मार्गे पुढे जाऊन उखाणे म्हणून चांगलाच रुजला आणि फोफावला.

माझ्या बघण्यात आलेले प्रकार म्हणजे

प्रकार १ - भावाला कोणत्यातरी प्रसिद्ध नटाचे वगैरे नाव देणे

१. फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी
आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी

२. पोह्याला दिली फोडणी, फोडणीत टाकले जिरे-मोहरी, कडीपत्ता अन् हींग,
भाऊच्या फोटोला बघुन पोरी म्हणतात हाच माझा 'कवळा कबीर सिंग'!

३. भाऊंनी केला पोरींना पिन....भाऊंनी केला पोरींना पिन,
पोरी म्हणतात हाच तर आमचा जॉनी सिन..

४. काल भाऊ ने खाल्ली मेथीची दशमी
भाऊ गॉगल लावून दिसतो इम्रान हाशमी

प्रकार २ - भावाचे वर्णन

१. च्यवनप्राष मध्ये टाकतात आवळा, च्यवनप्राष मध्ये टाकतात आवळा,
भाऊंना बघून पोरी म्हणतात, " आला गं माझा कवळा!

२. भावा तुझा फोटो म्हणजे नादखुळा, पब्लिक गोळा
भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा

३. आमचा भाऊ आहे मुलींचा लाडका ससा, आमचा भाऊ आहे मुलींचा लाडका ससा
पण हा सख्तभाऊ नेहमी मुलींना म्हणतो लांबच बसा, लांबच बसा

४. जिरा राईस मध्ये असतो जिरा...
भाऊ ने फोटो टाकला की पोरी म्हणतात हाच आमचा कोहिनूर हिरा.

५. मिर्चीत मिर्ची लाल मिर्ची, मिर्चीचा उडला खक्णा
सगळ्या गावातल्या मुली म्हणतायत कसा बघतोय बघ चिक्णा

६. आटली डाटली बाटली, मुली म्हणतात हाच आमचा जेटली
पण हा भाऊ म्हणतो मला काही नको द्या फक्त मटनाची ताटली

प्रकार ३ - भावावर फिदा असलेल्या किंवा भावाच्या आवडीच्या नट्या

१. भाऊंच्या घरात मारबल ची फरशी
क्रिती सॅनन म्हणते होणार सून मी ह्या घरची

२. कापलेल्या कोंबद्यातून वाहतय रक्त..
भाऊ आमचे "टिंबटिंब"चे भक्त टिंबटिंब च्या जागी सनी लियोनी, कटरिना कैक, दीपिका वगैरे कोणीही असू शकते.

३. राजासारख मन, मनासारखा राजा!
कियारा आडवाणी म्हणते मेरे घर आजा

सध्याच्या लॉक डाऊन काळात असेही काही वाचायला मिळाले....

१. Terrece वर उभा माझा भाऊ..
मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय #quarantine मध्ये कशी राहु

२. सध्या गल्लीत माणूस नाही फिरतंय काळं कुत्रं
पोरी म्हणत्यात भाऊच घालणार आम्हाला मंगळसुत्र

जशा ओव्या नक्की कोणी लिहिल्या सांगता येत नाहीत तसेच ह्या ओळी देखील नक्की कोणी रचल्या ते सांगता येत नाही.
एक प्रकारे ह्या ओळी म्हणजे आधुनिक लोककाव्यंच जणू.
तर असे उखाणे किंवा ह्या प्रकाराला जे काही म्हणतात ते प्रतिसादात लिहावे ही विनंती.

मुलींकरता असे उखाणे माझ्या बघण्यात तरी आलेले नाहीयेत. पण म्हणून मुद्दाम असे उखाणे तयार करू नये असे मात्र नाही.
किंवा आपल्या वाचनात असे उखाणे आले असतील तर ते पण लिहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या लॉकडाउन मधे फेस्बुक वर ही लाट आली होता... कोणाचा तरी जुना फोटो शोधुन त्याला अशा कमेंट करायच्या...

घ्या हे अजुन काही... (परत कुठे "मुलींकरता असे उखाणे माझ्या बघण्यात तरी आलेले नाहीयेत. " लिहायचं काम नाय!! Biggrin ) >> +१११ ;-);-);-)

मॅडम चा फोटो पाहुन पोरं आली धावुन
म्हणुन सरकारनं केलं २१ दिवस लॉकडाउन

धुणे भांडी करुन करुन , हात झाले खरखरीत
ताईचा लुक मात्र अजुनही कोरा करकरीत

चार बाजु समान त्याला म्हणतात चौकोन
आमच्या ताई समोर फीकी ती दिपीका पादुकोन

शिंपल्याचे शोपिस नको जीव अडकला मोत्यात
ताईचा नाद करु नका, ताई मारते घालुन पोत्यात

घरी पाहुणेयेइइनात, काव काव करुन दमला कावळा
ताईची ब्युटी म्हणजे, &&& ची जुही चावला
( &&& - सोसायटी किंवा गावाचं नाव )

हे भारी आहे! Rofl
मी यातलं कधीच काही कुठे वाचलं कसं नाही? (समांतर विश्वात राहते की काय मी?)

मी या जातीतलं फक्त ते गाडीच्या मागे लिहिलेलं वाक्य वाचलंय.. बघतोस काय रागानं.. ओव्हरटेक केलंय वाघानं.

चौक चांदनी चौधरी ढाबा
आमच्या दिदीसाठी घातला
टायगरने झब्बा

चौक चांदनी चौधरी ढाबा
सलमान बोल्ला आमच्या दिदीला
कर मला बाबा...

चौक चांदनी चौधरी ढाबा
आमच्या दिदीपायी तुटला
वरूणचा खुबा

चौक चांदनी चौधरी ढाबा
आमच्या दिदीसाठी बनवला
रणबीरने डबा

आरे कुठ ती काजोल अन कुठ ती करीना...
आमची ताई दिसली की पळून गेला कोरोना

#corona_go
.
हीरो आणि विलेन करतात जशी फाईट,
हीरो आणि विलेन करतात जशी फाईट,
ताईंचा रूप जसा syska LED light.

हे काय झालं!!! भास्कराचार्य लाडू करतात यातून सावरावं तर हा धागा .....>>>>>>+१

आता या पुढचा धक्का म्हणजे जिज्ञासा ने विनोदी लेखन करणे असेल बहुतेक….

सगळेच छान !

लॉक डाऊन स्पेशल अजून दोन

बाहेर पडल्यावर पोलीस मारतात काठी
आणि भाऊ चा फोटो पाहून पोरी विचारतात मुलगा सिंगल आहे का लग्ना साठी

भाऊंशी प्रेम करणारी पोरगी असली पाहिजेत महान...
कारण हनिमून ला भाऊ जाणार थेट वुहान...

“भावाकरता कायपण” असा धागा काढून हर्पेन यांनी केला कहर
ताई पण आमच्या आता ऐकत नाहीत, एकएक प्रतिसाद टाकताएत जेहेर

सगळेच Lol
भाऊ आमचा खतरनाक आहे जणू गब्बर
पोरी झाल्या महेबुबा दिली हेलनला टक्कर

दीदी आमची लाखात एक, जणू सैराटची आर्ची
पोरं गावची होतात परश्या, मोडून टाकतात खुर्ची

अस्मिता Happy घे तुला झब्बू...

दिदी आमची लाखात एक सांगे अख्खा चौधरीचा ढाबा
बाहुबलीने पण दिला बघा महिष्मतीचा ताबा

आमच्या भाऊस्नी मालुमीच न्ह्ववता चवधरीचा ढाबा
भली चारमिनारमे रुक्सानाको बुलाया.. तौबा तौबा

उरका पाडायला काय स्वयंवर म्हणजे वाटली लगोरी
दिदीचं दिल पायजेल तर कर आधी माशाची खांडोळी!
-दृष्टद्युम्न डायरीज मधुन

Pages