'भावा' करता कायपण आजपण उद्यापण

Submitted by हर्पेन on 18 January, 2022 - 07:41

आपापल्या कोण्या एका मित्राच्या फोटोंवर, रापचिक, कड्डक, छावा अशा शब्दांपासून सुरु झालेला प्रवास 'जाळ आणि धूर संगटच' , 'टांगा पलटी घोडे फरार', 'विषय खोल' सारख्या एकोळ्यां मार्गे पुढे जाऊन उखाणे म्हणून चांगलाच रुजला आणि फोफावला.

माझ्या बघण्यात आलेले प्रकार म्हणजे

प्रकार १ - भावाला कोणत्यातरी प्रसिद्ध नटाचे वगैरे नाव देणे

१. फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी
आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी

२. पोह्याला दिली फोडणी, फोडणीत टाकले जिरे-मोहरी, कडीपत्ता अन् हींग,
भाऊच्या फोटोला बघुन पोरी म्हणतात हाच माझा 'कवळा कबीर सिंग'!

३. भाऊंनी केला पोरींना पिन....भाऊंनी केला पोरींना पिन,
पोरी म्हणतात हाच तर आमचा जॉनी सिन..

४. काल भाऊ ने खाल्ली मेथीची दशमी
भाऊ गॉगल लावून दिसतो इम्रान हाशमी

प्रकार २ - भावाचे वर्णन

१. च्यवनप्राष मध्ये टाकतात आवळा, च्यवनप्राष मध्ये टाकतात आवळा,
भाऊंना बघून पोरी म्हणतात, " आला गं माझा कवळा!

२. भावा तुझा फोटो म्हणजे नादखुळा, पब्लिक गोळा
भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा

३. आमचा भाऊ आहे मुलींचा लाडका ससा, आमचा भाऊ आहे मुलींचा लाडका ससा
पण हा सख्तभाऊ नेहमी मुलींना म्हणतो लांबच बसा, लांबच बसा

४. जिरा राईस मध्ये असतो जिरा...
भाऊ ने फोटो टाकला की पोरी म्हणतात हाच आमचा कोहिनूर हिरा.

५. मिर्चीत मिर्ची लाल मिर्ची, मिर्चीचा उडला खक्णा
सगळ्या गावातल्या मुली म्हणतायत कसा बघतोय बघ चिक्णा

६. आटली डाटली बाटली, मुली म्हणतात हाच आमचा जेटली
पण हा भाऊ म्हणतो मला काही नको द्या फक्त मटनाची ताटली

प्रकार ३ - भावावर फिदा असलेल्या किंवा भावाच्या आवडीच्या नट्या

१. भाऊंच्या घरात मारबल ची फरशी
क्रिती सॅनन म्हणते होणार सून मी ह्या घरची

२. कापलेल्या कोंबद्यातून वाहतय रक्त..
भाऊ आमचे "टिंबटिंब"चे भक्त टिंबटिंब च्या जागी सनी लियोनी, कटरिना कैक, दीपिका वगैरे कोणीही असू शकते.

३. राजासारख मन, मनासारखा राजा!
कियारा आडवाणी म्हणते मेरे घर आजा

सध्याच्या लॉक डाऊन काळात असेही काही वाचायला मिळाले....

१. Terrece वर उभा माझा भाऊ..
मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय #quarantine मध्ये कशी राहु

२. सध्या गल्लीत माणूस नाही फिरतंय काळं कुत्रं
पोरी म्हणत्यात भाऊच घालणार आम्हाला मंगळसुत्र

जशा ओव्या नक्की कोणी लिहिल्या सांगता येत नाहीत तसेच ह्या ओळी देखील नक्की कोणी रचल्या ते सांगता येत नाही.
एक प्रकारे ह्या ओळी म्हणजे आधुनिक लोककाव्यंच जणू.
तर असे उखाणे किंवा ह्या प्रकाराला जे काही म्हणतात ते प्रतिसादात लिहावे ही विनंती.

मुलींकरता असे उखाणे माझ्या बघण्यात तरी आलेले नाहीयेत. पण म्हणून मुद्दाम असे उखाणे तयार करू नये असे मात्र नाही.
किंवा आपल्या वाचनात असे उखाणे आले असतील तर ते पण लिहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल....
धागा वाचुन परत धागाकर्त्याचे नाव वाचले... पहिल्यांदी वाटले की माझीच काहीतरी चुक झाली असेल धागाकर्त्याचे नाव वाचण्यात !!!

पहिल्यांदी वाटले की माझीच काहीतरी चुक झाली असेल धागाकर्त्याचे नाव वाचण्यात !!! >>> अगदी Lol पण लगेचच त्यांची ही ओळ दिसली “ माझ्यात अनेक मी दडलेले आहेत” Happy

@DJ
कुणाचं काय तर कुणाचं काय Rofl

पण वर लिहिलेले उखाणे एका भावाने दुसऱया भावासाठी लिहीले असावेत.. “मुली म्हणतात“ म्हणत मुलींच्या नावावर बऱयाच गोष्टी उगाचच खपवल्यात
भाई लोग, लडकी लोग का भी एक श्टॅंडर्ड होता है!

धन्यवाद मंडळी,
अमितव, कसचं कसचं
आदित्य, अरे त्याचं काय आहे की मला ह्या वर्षी एक धागा विरंगुळा भागात काढायचा होता मग काय काढला आपला. मी एकदम फॅन आहे ह्या प्रकाराचा
म्हाळसा, एकदम बरोबर मोस्टली हे उखाणे सिंगल मुलं एकमेकांना अहो रूपम / प्रोत्साहन म्हणूनच लिहितात

वाह हर्पेन वाह Lol

भाऊवर ओवाळून टाकतात पोरी तन मन धन
कारण भाऊ हाय आमचा मिलिंद सोमन

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत व्हता बत्ता,
निवडून आले क्ष्क्ष्क्ष पण पंचायतीत आमच्या ताईची सत्ता.
--- (क्ष्क्ष्क्ष्क्ष जागी कोणताही नेता लिहा)

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत व्हती पोटली
विकी बोले आमच्या ताईपायी कटरिना सोडली

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीचा गज मोडला
येका शिट्टीपायी ताईनं अख्खा रोडरोमियो फोडला

(परत कुठे "मुलींकरता असे उखाणे माझ्या बघण्यात तरी आलेले नाहीयेत. " लिहायचं काम नाय!! Biggrin )

ठंडा करो कोला एक क्यूब बरफसे
आज की पार्टी दिदी की तरफ से

आबरा का डाबरा मोरा सांवरा है बावरा
भाऊ जोक्स ठीक होते, दिदीला आवरा.

एकच नंबर सी आणि आईची लेक!
चांगला प्रयत्न सामो आणि ॠ

बाकी मंडळी धन्यवाद आणि येऊद्या अजूनही...

ता.क. - सी, दीदीला आवरू नकोस

Pages